(*ही माहिती फक्त पुणेकर आणि मुंबईकर मायबोलीकरांच्या टी-शर्ट संदर्भातच आहे)
मायबोली टी-शर्ट आणि कॅपचे पैसे प्रत्यक्ष भरण्यासंबंधीचे आणि टी-शर्ट मिळण्यासंबंधीचे डीटेल्स पुढीलप्रमाणे:
पुणेकर मायबोलीकरांसाठी:-
पैसे भरण्याची तारीख: १९ जुलै (शनिवार) आणि २० जुलै २००८ (रविवार)
स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा.
वेळ: सं. ५.३० ते ८.००
पुणेकरांचे टी-शर्ट्स आणि कॅप्स पैसे भरायच्या वेळेसच त्यांना देण्यात येतील. त्यामुळे ऑनलाईन पैसे भरणार्यानी देखील या दोन दिवसांपैकी कोणत्याही दिवशी वर दिलेल्या वेळेत आणि दिलेल्या ठिकाणी येऊन आपले टी-शर्ट्स व कॅप्स घेऊन जावेत.
पुण्याचे टी-शर्ट संयोजकः-
हिमांशु himscool (०९८२२०१८७९५)
अरुण Arun
पूनम Psg
मयूरेश kmayuresh2002
मुंबई आणि जवळपासच्या मायबोलीकरांसाठी:-
पैसे भरण्याची तारीख: २० जुलै २००८(रविवार)
स्थळ: स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात
वेळ: सं. ५.३० ते ८.००
जर २० तारखेपर्यंत टी-शर्टस आणि कॅप्स मुंबईला पोहोचवणे शक्य झाले तर २० तारखेस पैसे भरायच्या वेळेसच टी-शर्टस मुंबईकरांना मिळतील. अन्यथा मुंबईकरांना त्यांचे टी-शर्टस आणि कॅप्स वविच्या वेळेस मिळतील.
वविला न येणार्या मुंबईकरांनी मुंबईतल्या टी-शर्ट संयोजकांच्या संपर्कात रहावे. जर २० तारखेला टीशर्ट आणि कॅप्स उपलब्ध होऊ शकत नसतील तर टीशर्टस आणि कॅप्स कधी आणि कुठुन कलेक्ट करायचे हे मुंबई संयोजक त्यांना सांगतील.पण टी-शर्ट आणि कॅप्सचे पैसे मात्र २० तारखेलाच भरायचे आहेत.
मुंबईचे टी-शर्ट संयोजकः-
दत्तराज Indradhanushya(०९८३३९५३८८७)
आनंद Anandsuju(०९८२०००९८२२)
संदीप Gharuanna
निलेश Neel_ved
पैसे भरण्यासाठी ऑनलाईन ऑप्शन स्विकारलेल्या पुणे आणि मुंबईच्या लोकांनी मेलमधुन त्यांना पाठविलेल्या बँक अकाऊंटवर पैसे भरण्यास सुरूवात करावी. पैसे ट्रान्स्फर केल्यावर तश्या आशयाची मेल mb_tshirts@yahoo.co.in या मेल आयडीवर करावी.
मंडळी,
मंडळी, यंदाच्या वर्षी भरघोस प्रतिसाद मिळाला असुन आजपर्यंत 80 टी-शर्ट तसेच २७ टोप्यांच्या ऑर्डर्स आलेल्या आहेत..
तसेच उसगावकरांसाठी आनंदाची बातमी - टी-शर्ट उसगावात पाठवण्याची सोय झालेली आहे.. एकूण २० टी-शर्टसची ऑर्डर आलेली आहे..
अजून ३ दिवस शिल्लक आहेत तेव्हा हवे असतील तर अजूनही टी-शर्टची ऑर्डर पाठवता येणार आहे.. एकदा वेळ गेली की मग वर्षभर वाट पहावी लागेल तेव्हा लवकर ऑर्डर करा...
धन्यवाद,
टी-शर्ट समिती
"यंदाच्या
"यंदाच्या वर्षी भरघोस प्रतिसाद मिळाला असुन आजपर्यंत 80 टी-शर्ट तसेच २७ टोप्यांच्या ऑर्डर्स आलेल्या आहेत.."
पिच कलरच्या चहा सदर्याच्या किती ऑर्डर्स आल्या?
--------------------------------
धन्यवाद,
kadamcd@gmail.com
धन्यवाद
धन्यवाद मायबोलीकर्स!
या वर्षी मायबोली टीशर्ट आणि टोप्यांना अभूतपूर्व प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व मायबोलीकरांचे मनापासून धन्यवाद. आपल्या भरघोस पाठिंब्यामुळे या वर्षी प्रथमच आपण टीशर्ट्सचा आकडा शतकाच्याही पुढे पोचवू शकलो आहोत!!
'मायबोली टोपी' या वर्षी प्रथमच आपण तयार केली आणि तिलाही उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला आहे.
मायबोलीवर आणि टीशर्ट समितीवर तुम्ही दाखवलेल्या विश्वासाबद्दल ॠणी आहोत!
दर वर्षी अनेक मायबोलीकर न चुकता हे टीशर्ट घेतात. या बरोबरच या वर्षी अनेक नवीन मायबोलीकरांनीही आपल्या या उपक्रमाला हातभार लावला, म्हणूनच हे शक्य झाले. तसंच या वर्षी अमेरिकेतल्या मायबोलीकरांनी टीशर्टांना चांगला प्रतिसाद दिल्यामुळे अनेक वर्षांनी आपण यंदा अमेरिकेतही टीशर्ट पाठवत आहोत.
हा उपक्रम केवळ आपल्या 'मायबोली'ची लोकप्रियता वाढवण्यासाठी नसून, त्यातला एक भाग आपण एका चांगल्या सामाजिक संस्थेला देणगीरूपात देतो हे याचे वैशिष्ठ्य! रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात मनात असेल तरीही सामाजिक जबाबदारी पार पाडणे शक्य होत नाही, या निमित्तानी अगदीच चिमणीचा का होईना, पण तो वाटा आपण उचलतो.
या वर्षी टीशर्टच्या एकूण ऑडर्स आल्या आहेत ११३, ज्यामधे काळ्या रंगाचे टीशर्ट आहेत ६४ आणि पीच आहेत ४९. मागणीअभावी 'पीच' रंगांचे टीशर्ट काढता येतील की नाही ही शंका होती, पण आपल्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे ती किती फोल होती हे सिद्ध झाले या वर्षी ५० मायबोलीकर आपल्या टोप्या मिरवतील
मंडळी, नोंदणी तर झाली. आता अजून एकच पूर्तता करायची आहे, ती म्हणजे पैसे त्वरित भरायचे! जे भारतातले मायबोलीकर 'ऑनलाईन' पैसे भरणार आहेत, त्यांनी पैसे भरायला सुरुवात करावी. काही शंका असल्यास याहू अकाऊंटवर मेल धाडावी.
जे मायबोलीकर प्रत्यक्ष पैसे भरणार आहेत, त्यांना डीटेल्स कळवले आहेतच.
अमेरिकेतल्या मायबोलीकरांनी या बीबीवर लक्ष ठेवा.. तुम्हाला डीटेल्स पुढच्या आठवड्यात कळवत आहोत.
सर्वांचे अभिनंदन आणि आभार!
टी-शर्ट समिती
एक
एक विनंती,
मागच्या वेळेस सांगितले एक आणि दिले भलतेच असे झाले होते, so, या वेळी तेवढी काळजी घ्या.
एम्ब्रोडरी केलेला T-Shirt मिळेल असे सांगीतले होते, प्रत्यक्षात रबर प्रिंट असलेला मिळाला. आणि ते प्रिंट ही खुप मोठे आहे. म्हणजे जो नमुना दाखवला होता, त्याच्या जवळपास पण नाही.
शिवाय घरी येउन बघे पर्यंत याची कल्पना पण नव्हती. म्हणजे कोणि convey पण केले नाही या बदला बद्दल.
असेल काही अडचण आली, पण असे अंघारात ठेउ नये, ही विनंती सयोंजकांना.
ईट्समी,
ईट्समी, तेव्हा चूक झाली होती, पण ती मागच्या वर्षी नाही, त्याच्या मागच्या वर्षी. मागच्या वर्षी अगदी सँपलप्रमाणेच टीशर्ट केले होते, आणि या वर्षीही अगदी तसेच मिळतील टीशर्ट. काळजी नसावी
----------------------
The cheapest face-lift is a SMILE
मागच्या
मागच्या वेळेस सांगितले एक आणि दिले भलतेच असे झाले होते, so, या वेळी तेवढी काळजी घ्या. >>>>>>>>>
Its_Me : खुपच लवकर आठवण झाली हो तुम्हाला याची? आणि मुख्य म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही टी-शर्ट घेतला नव्हता आणि या वर्षी सुद्धा ऑर्डर केला नाहिये. त्याच्या आधीच्या वर्षी म्हणाल तर तेंव्हा तुम्ही स्वत: टी-शर्ट संयोजन समिती मध्ये होतात. आणि तेंव्हा कशा प्रकारचे टी-शर्टस असतील याची कल्पना आपण टी-शर्टस घेणार्यांना दिली होती, हे विसरलात का ????????
असो. वरच्या पोस्ट मध्ये पूनम ने सांगितल्याप्रमाणे या वर्षी सुद्धा सँपलप्रमाणेच टी-शर्ट मिळणार आहेत (अर्थात ज्यांनी ऑर्डर केली आहे त्यांनाच).
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Dream is not what you see in sleep
But it is the thing which does not let you sleep
चहा
चहा सदर्यांची वाट पहात आहे पीच रंगाचा चहा सदरा..
अरुण, मी general
अरुण,
मी general काळजी घ्या म्हंटले आहे. माझ्या T-shirt च्या बाबतीत काळजी घ्या असे नाही म्हंटले.
>>>>
आणि तेंव्हा कशा प्रकारचे टी-शर्टस असतील याची कल्पना आपण टी-शर्टस घेणार्यांना दिली होती, हे विसरलात का ????????
>>>>
एम्ब्रोडरी केलेला T-Shirt मिळेल असे सांगीतले होते, प्रत्यक्षात रबर प्रिंट असलेला मिळाला. मी पुराव्या दाखल पठवुन देउ शकते कारणा तो घालण्या सारखा तर नाहीच
आणि मी तुझ्याशी फोने वर बोलले पण होते, T-shirt मिळाल्या बरोबर. तेंव्हा तु मला clarification दिलेस. but not before that.
शिवाय I was not part of संयोजन समीती, मी मॉड होते म्हणुन admin ना मेल लिहीणे एव्हडाच काय तो माझा संबंध.
आणि मागचे वर्ष भर अजिबातच माय्बोली वर फिरकणे होत नसे, त्यामुळे माझ्या माहीतीत त्या नंतर हेच. म्हणुन सुचना केली. पुन्हा तसे 'कुणाच्याच' बाबतीत होउ नये म्हणुन.
जर चुक झाली असेल, आणि पुन्हा तसच event असेल तर सुचना येणार च आणि त्या स्विकारण्याची तयारी असायलाच हवी, बरोबर ना ?
.
पुनम,
thanks
Itsme, arun, कृपया
Itsme, arun,
कृपया वाद इथेच थांबवू या ! या वर्षी जुन्या चुका दुरुस्त करून काळजी घेण्यात येत आहे हे आश्वासन इथे पुरे असावे.
नविन
नविन टी-शर्टच्या ऑर्डर्स घेणे बंद केलेले आहे
धन्यवाद,
टी-शर्ट समिती
ज्या
ज्या मायबोलीकरांनी पुण्याहून टीशर्ट ऑर्डर केले आहेत, त्यांनी १९/२० जुलै ही तारीख 'लाल' करून ठेवली आहे ना? बालगंधर्व रंगमंदिराच्या तिकिटखिडकीशेजारील कट्ट्यावर तुमचे टीशर्ट आणि टोपी मिळणार आहे. या दोन्ही दिवशी संध्याकाळी ५.३० ते ८ या वेळात मायबोली टीशर्ट आणि टोपीचे वितरण होईल.
'वर्षाविहाराचे' पैसे ही याच दोन दिवसात घेण्यात येणार आहेत. तेव्हा ज्यांनी वर्षाविहार आणि/ किंवा टीशर्ट-टोपी यांची नोंदणी केली आहे त्यांनी १९/२० जुलैला बालगंधर्वला येण्याचे करावे.
मुंबईकरांचे वर्षाविहारापूर्वीचे सम्मेलन २० जुलैलाच आहे. त्याच दिवशी त्यांचेही टीशर्ट-टोपी द्यायची व्यवस्था होईल का याची चाचपणी करत आहोत. तसे झाले तर मुंबईकरांनाही त्यांचे टीशर्ट-टोपी २० जुलैलाच मिळेल आणि वविला त्यांना ते घालून येता येईल. मात्र २० जुलैला टीशर्ट देता आले नाहीत, तर त्यांना त्यांचे टीशर्ट-टोपी वर्षाविहारच्या दिवशी, अर्थात २७ जुलैला मिळतील.
भेटू,
धन्यवाद,
टी-शर्ट समिती
उसगावकरां
उसगावकरांना चहा-सदरे कधी मिळणार ?
पुण्यातून
पुण्यातून ईकडे आणण्याची व्यवस्था केली आहे. या महिना अखेरपर्यंत US मध्ये पोचतील.
पोहोचले
पोहोचले का? अजुन धीर धरवत नाही हो.... चहा सदरा घालुन मिरवल्याची स्वप्न पण आता जुनी झालीत....
असो. चहा सदरा समितीसाठी एक प्रश्न. माझा पत्ता मी बदलला आहे. चहा सदरा पोस्टण्यापुर्वी मला तो बदलता येइल काय?
कळावे. लोभ असावा.
Tshirt एकदम
Tshirt एकदम व्यवस्थित बसला, मंडळ आभारी आहे.
अविकुमार, स
अविकुमार,
सर्व tshirts गेल्या आठवड्यात पोस्ट केले आहेत.
मला नाही
मला नाही मिळाले हो अजुन चहा सदरे माझे. मागोवा क्रमांक घेता येईल काय त्या पाठवणीचा?
टीशर्ट
टीशर्ट समिती,
पोच हवी असेल तर माझा टीशर्ट लालुकडे आलाय.
मी अजुन आणला नाही. जावुन घेतल्यावर कसा आहे हे कळवीन.
अविकुमार, त
अविकुमार,
तुम्हाला इमेल केली आहे.
मंडळी, मंगळ
मंडळी,
मंगळवार दिनांक २८ ऑक्टोबर २००८ रोजी ठाणे येथे पार पडलेल्या GTG मध्ये वनवासी कल्याण आश्रमाच्या श्री. विकास कुलकर्णी यांच्याकडे चॅरिटीची रक्कम रुपये १०००१/- फक्त (चॅरीटी रु. ९०७० + घारुआण्णांचे स्वतःचे रु. ९३१) सुपूर्त करण्यात आली..
त्याची पावती खाली देत आहे..
श्री. विकास कुलकर्णी यांना देणगी देताना मायबोलीकर घारुआण्णा.. सोबत इंद्रधनुष्य, आनंदमैत्री आणि आनंदसुजू....
अरे वा! चला,
अरे वा! चला, काम पूर्ण झालं यंदाचं
-----------------------------------
मैं जहाँ रहूँ, मैं कहींभी हूँ, तेरी याद साथ है..
१०००१/-......
१०००१/-...... सहीच एकदम. शाब्बास मायबोलीकरांनो!!
---------------------------------------------
उपास-तपासाच्या मी विरोधात आहे, पण 'फराळाच्या' नाही....
काही contribution
काही contribution काढले आहे का?
अश्विनी,
अश्विनी, मायबोलीच्या टीशर्टच्या किंमतीतच चॅरिटीची रक्कम धरलेली असते. १ टीशर्ट घेतला की आपोआप चॅरिटीला अप्रत्यक्षपणे आपण मदत करत असतोच, म्हणूनच जास्तीतजास्त माबोकरांनी टीशर्ट घ्यावे अशी इच्छा असते
-----------------------------------
मैं जहाँ रहूँ, मैं कहींभी हूँ, तेरी याद साथ है..
हम्म्म.
हम्म्म. पुढच्या वेळी
छान आहे
छान आहे फोटू!
God made Man and tailor made Gentleman!
अरे व्वा..
अरे व्वा.. छान !
-::- -::- -::--::--::--::--::-
Yo Rocks !! तुम्ही म्हणाल जसं..
-::- -::- -::--::--::--::--::-
अर्रे
अर्रे व्वा! हे झकासच की! अन इथे फिडबॅक दिला ते खूपच छान झाल!
(तसा मी टीशर्ट घेत नाही कारण त्याला खिसा नि कॉलर नस्ते! बघू, पुढच्या वेळेस असेल तर!)
घारूअण्णाच अभिनन्दन!
बायदिवे, इन्द्राच्या हातातल बाळ मर्फीच्या बाळासारख दिस्तय, नै? एक बोट हनुवटीला लावलेल!
...;
आपला, लिम्बुटिम्बु