भाजलेले शेंगदाणे - वाटीभर
खवलेला ओला नारळ - अर्धी वाटी
उकडून सोललेला बटाटा - १. मध्यम आकाराचा.
दही - ३ वाट्या
५-६ कोकमं / आमसुलं
१ हिरवी मिर्ची (ऐच्छिक)
अर्धंपेर आलं (ऐच्छिक)
तिखटपूड (चवीनुसार)
मीठ
साखर
साजुक तूप
जिरं
-दही, तूप आणि जिरं सोडून बाकी सगळे जिन्नस एकत्र करून, थोडं पाणी घालून, मिक्सरमधून अगदी गंधासारखे बारीक वाटून घ्यावे.
- या पेस्टमध्ये आता दही घालून, नीट फेटून, आमटी जितकी पातळ हवी त्यानुसार पाणी घालावं.
-तूप-जिर्याच्या फोडणीत हे मिश्रण ओतून उकळी आणावी. किंवा मोठ्या भांड्यात दही-वाटण एकत्र केलं असेल तर त्यात वरून फोडणी ओतता येईल. पण उकळणं आवश्यक आहे.
-मीठ-साखर चवीनुसार वाढवता येईल.
-यातले शेंगदाणे, बटाटा, दही, आमसुलं हे सगळे घटक चवी आणि आवडीनुसार कमी-जास्त करता येतात.
-हिरव्या मिरच्या आणि आलं न घालताही छान चव येते.
-लाल रंग हवा असेल तर चमचाभर साजुक तुपात काश्मिरी तिखट पोळवून आमटीत वरून ओतायचं.
अहो, याला दाण्याची आमटी
अहो, याला दाण्याची आमटी म्हणतात ? पण त्यात बटाटा नसतो मला वाटतं. फोटो मस्त आहे.
अहाहा! काय मस्त रंग आलाय!
अहाहा! काय मस्त रंग आलाय!
कोण म्हणतं? धन्यवाद!
कोण म्हणतं?
धन्यवाद!
छानच !...
छानच !...
फोटो मस्त!
फोटो मस्त!
ऑस्सम.. सोलकढीसारखा रंग आलाय.
ऑस्सम.. सोलकढीसारखा रंग आलाय. साध्या भाताबरोबर खायची की भगरीबरोबरच?
आमच्या घरातले आणखी कोणी
आमच्या घरातले
आणखी कोणी म्हणत असतील तर कळेलच प्रतिसादातून
दही - ३ वाट्या >>> झालं, हे
दही - ३ वाट्या >>> झालं, हे वाचूनच आमची शस्त्र खाली.
फोटो भारी आला आहे
सायो, चांगला प्रश्न! याचं
सायो, चांगला प्रश्न! याचं उत्तर देऊ शकते. आमटी आधी झाली. भगर शिजायची होती. पण खणकून भूक लागली म्हणून एक ढेकूळ शिळा भात उरला होता त्याच्याशी आमटी खाल्ली. नंतर भगरीबरोबरपण खाल्ली. भगर्-आमटी काँबो जास्त चांगलं लागलं.
सिंडे, तू दह्याऐवजी नारळाचं
सिंडे, तू दह्याऐवजी नारळाचं दूध वापर आणि ओला नारळ वाटणातून कमी कर. चांगली लागेल.
असली वाफाळती आमटी + भगर
असली वाफाळती आमटी + भगर कॉम्बो अफलातून लागतं.
आई नारळ, दही, आलं, बटाटा न घालता करते अशीच आमटी. मी ही बटाटा नाही घालत. आता करून पाहीन अशी कृती. बटाटा घातल्यानी नक्की काय फरक पडतो पण?
योकु, मीपण आधी नारळ आणि
योकु, मीपण आधी नारळ आणि शेंगदाणे एवढंच वाटणात घेत असे. पण बटाट्यामुळे आलेली चव जास्त आवडली. चोथा-पाणी न होता आमटी जास्तं एकजीव झाल्यासारखी वाटली.
वा वा. मस्त कृती. फोटोत रंग
वा वा. मस्त कृती. फोटोत रंग काय सही आलाय.
आमच्याकडे बटाटा आणि दही वगळता बाकी अशीच बनवली जाते. कोकम घातले नाहीत तर पिस्ता कलर येतो तो पण छान दिसतो.
पण सोबत भगर हवीच्च्च!!!! आता उद्या परवा हा मेनू करायलाच हवाय.
बटाटा आमच्याकडेही नाही घालत.
बटाटा आमच्याकडेही नाही घालत. आणि आमसुलं आमटी उकळताना घातल्यामुळे रंगही वेगळा असतो. ह्या पद्धतीने करून बघते आता. इथे वरीचे तांदुळ काय नावाने मिळतात?
सामो सीड्स
सामो सीड्स http://2.bp.blogspot.com/_XL7yfnrTcTk/TCq90ihvPXI/AAAAAAAACTo/12WEm1UQOD...
माझ्याकडे भगर असतेच आणलेली. नादु घालून करतेच उद्या-बिद्या.
उपासाला जी दाण्याची आमटी
उपासाला जी दाण्याची आमटी करतात त्यात बटाटा, खोबरं वगैरे असतं का? ही रेसिपी खूपच वेगळी वाटते आहे. आईला दाखवेन.
थँक्यू! सायो, Samo seeds,
थँक्यू!
सायो, Samo seeds, व्रत का चावल.
प्रामाणिकपणे सांगते, या आमटीचे अनेक व्हेरिएशन्स खाल्लेत. आईची पद्धत वेगळी. ती आमसुलं वाटणात घेत नाही, बटाटे घालत नाही. पण बहिणीच्या या पध्दतीनं जितकी अफाट चव आली तशी एरवीच्या व्हेरिएशन्स्मध्ये कधी वाटली नाही. म्हणून आता या आमटी रेस्पीला घरात परमनंटनेसपणा असणार आहे. बदल म्हणून वाटणात फारतर ४ मिरंदाणे घालेन.
मस्तच! पण बटाट्यामुळे आलेली
मस्तच! पण बटाट्यामुळे आलेली चव जास्त आवडली. चोथा-पाणी न होता आमटी जास्तं एकजीव झाल्यासारखी वाटली. <<< हो. बटाट्याची चव या रश्श्यात चांगली लागते.
काही फरकाने आमच्याकडेही ही बनते. तशी भगरीसोबतच केली जाते. पण उरलेली शिळ्या भाताबरोबरही (साध्या) चांगली लागते. ही जशी जुनी होत जाईल तशी आटून आटून जास्त रुचकर बनत जाते.
वेगळी आहे क्रुती, आमची फार
वेगळी आहे क्रुती, आमची फार बेसिक असते, आमसुल, दाण्याच कुट पेस्ट आणि फोडणी, कोथिबिर वैगरे.. सासरी आल-मिरची दही मस्ट असते, कोकम नसल तरी चालतय.. जामानिमा आहे म्हणजे ही रेसिपी भारी होत असणार.. करायला पाहिजे..
मस्त दिसतंय. कित्ती वर्षांत
मस्त दिसतंय. कित्ती वर्षांत खाल्ली नाहीये.
त्या ह्या उपासाच्या दिवशी
त्या ह्या उपासाच्या दिवशी माया बायडीनं अशी भगर + आमटी + दही, खोबरं अन हिरव्या मिरच्यांची अफलातून चटणी केली होती. सुप्पर लागत होतं हे तीन्ही प्रकार एकत्र खायला...
भगर म्हणजे वरईचा भात ना?
भगर म्हणजे वरईचा भात ना?
हे जमेल मला.. करून लगेच
हे जमेल मला.. करून लगेच प्रतिसाद देण्यात येईल..
योकु, ह्या सगळ्याबरोबर
योकु, ह्या सगळ्याबरोबर बटाट्याची उपासाची भाजीही भारी लागते. चटणीही हवीच साईडला.
हो हो! उपासाला सात्त्विक आहार
हो हो! उपासाला सात्त्विक आहार हवाच!
वर थोडी फळं, गोडाचा रताळ्याचा किंवा शिंगाड्याचा शिरा घ्यावा. परीपूर्ण उपास!
ही जशी जुनी होत जाईल तशी आटून
ही जशी जुनी होत जाईल तशी आटून आटून जास्त रुचकर बनत जाते>> हो.
योकु, बटाट्याचे पापड,
योकु, बटाट्याचे पापड, साबुदाणा पापड्या, काकडीची कोशिंबीर आणि खजूर+साजुक तूप र्हायलं
मृण्मयी, आम्ही दाण्याची आमटी म्हणतो. दही, कोकम, बटाटा नसतो. पण हे व्हेरिएशन जास्त चविष्ट वाटतंय.
वरदा, या आधी आम्हीपण दाण्याची
वरदा, या आधी आम्हीपण दाण्याची आमटी म्हणण्याजोगा पदार्थ खायचो. या व्हेरिएशनला ते नाव देववलं नाही.
गजाभौंना धन्यवाद देऊन उरलेली आमटी जुनी करायला ठेवली.
वा मस्त! आमच्याकडेही फक्त
वा मस्त!
आमच्याकडेही फक्त दाणे .. कधीतरी भोपळ्या च्या फोडीही घालते आई .. ही सगळी उपासाची प्रकरणं खाऊन खरंच बरीच वर्षं झाली .. पण आमची माहेरची माणसं नाहीत बरोबर तर हे पदार्थ ओरपून दुपारी झोप काढायला काही मजा येत नाही ..
परदेशगमन केलेल्या भारतीयांचा
परदेशगमन केलेल्या भारतीयांचा उपवास आहे की काय?
Pages