Submitted by सामी on 5 February, 2015 - 07:44
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
एक वाटी मोड आलेले मेथी चे दाणे,
१ कांदा बारीक कापून
१ टॉमेटो बारीक कापून
फोड्णी साठी हिंग, मोहरी, जीरे आणि कडीपत्ता
हळद, मसाला पूड, मीठ
चवीसाठी साखर, खोबरे, कोथिंबीर.
क्रमवार पाककृती:
मेथी ही भाजी पाने व बिया (मेथीदाणे) या दोन्ही रूपांत वापरली जाते.
मेथीच्या पानांप्रमाणेच मोड आलेल्या मेथीदाण्यांची भाजी/उसळ चविष्ट लागते. आमच्या कडे थंडी मधे ही भाजी केली जातेच.
- मेथी धूवून रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा.
- सकाळी पाणी काढून एका जाळीच्या भांड्यात मोड येण्यासाठी झाकून ठेवा. मेथीदाण्यांना मोड यायला दोन दिवस लागतात. रात्री पुन्हा मेथी धुवून परत झाकून ठेवा. दुसर्या दिवशी मोड आलेले मेथीदाणे भाजी करण्यासाठी तयार आहेत.
- कढईत तेल तापल्यावर त्यात मोहरी आणि कडीपत्त्याची फोडणी द्या. मग जीरे आणि हिंग घालून बारीक चिरलेला कांदा घाला.
- कांदा थोडा फ्राय झाल्यावर बारीक चिरलेला टॉमेटो टाका.
- टॉमेटो शिजल्यावर मोड आलेले मेथीदाणे टाका.
- हळद, मसाला आणि मीठ टाकून परतून भाजी झाकून ठेवा आणि वाफेवर शिजण्यासाठी झाकणावर थोडे पाणी घाला
- मेथीदाणे शिजल्यावर एक चमचा साखर टाकून गॅस बंद करा
- वरून चिरलेली कोथिंबीर आणि खोबरे टाका
मोड आलेले मेथीदाणे
तयार भाजी
वाढणी/प्रमाण:
दोघांसाठी
अधिक टिपा:
ही भाजी भिजलेली चण्याची डाळ किंवा बटाटा घालून ही करता येते.
माहितीचा स्रोत:
आई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे. वाफेवर शिजतील का
छान आहे. वाफेवर शिजतील का मेथ्या?
नाचणी ला मोड कसे काढायचे ?
नाचणी ला मोड कसे काढायचे ? प्लीज सांगा.
मेथी दण्याला मोड काढु शकतो तशी काढता येते का?
मस्त.. या भाजीत खारीक घातली
मस्त.. या भाजीत खारीक घातली तर छान लागते.
मेनका, नाचणी ८ तास भिजवून, निथळून मग पुरचुंडी बांधून ठेवायची. अधून मधून त्यावर पाणी शिंपडायचे. १२ तासानी मोड येतात. पण फार लांब मोड येत नाहीत.
मस्त!
मस्त!
तयार भाजी मस्त दिसते आहे.
तयार भाजी मस्त दिसते आहे.
मस्त दिसतेय तयार भाजी. उष्ण
मस्त दिसतेय तयार भाजी. उष्ण पडत नाहीत का मेथीदाणे?
मस्तच आहे ही कृती. मी हा
मस्तच आहे ही कृती. मी हा प्रयोग कधीच करुन पाहिला नाही.
आम्ही विषुववृत्तापासून खूपच जवळ राहतो. इथे कायम गरम वातावरण असत. मग मोड आलेली मेथी चालेल का? मला तर एक चमचा तिळही बाधतात इथे.
मेथीदाणे म्हणजे कडू असतात तेच
मेथीदाणे म्हणजे कडू असतात तेच ना. उसळ कडू नाही लागत का चवीला?
तोंपासू !
तोंपासू !
मेथी दाण्यांची उसळ
मेथी दाण्यांची उसळ डेलिव्हरी नंतर खायच्या प्रकारात करतात - उष्ण म्हणून!
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/49686.html?1148303387
आणि इथे दिनेशदांनी पण रेसिपी दिल्ये.
http://www.maayboli.com/node/35181
सगळ्यांना धन्यवाद. दिनेशदा
सगळ्यांना धन्यवाद.
दिनेशदा खारीक घालून करून बघेन एकदा. तुम्ही ही रेसिपी दिली आहे हे मला माहीत न्हवते ( कशी काय मिस झाली;:-) ?). आता रायगड यांनी दिलेली लिंक बघितली. तरीही तुम्ही माझ्या क्रुती वर रिप्लाय दिलात. धन्यवाद.
बी, सायो आणि निधी मोड आल्यामुळे असेल कदाचीत पण ही उसळ बाधत नाही आणि कडू ही लागत नाही. नुसती खायला पण आवडते मला. शक्यतो थंडीतच केली जाते.
फोटो छान आहे. थंडीत करायला
फोटो छान आहे. थंडीत करायला हवी एकदा. थोडेच दिवस राहिलेत.
सामी, अगं इथे एकाने पाकृ लिहिली आहे म्हणजे दुसर्याने लिहूच नये असा नियम नाहीये अगं
मटकीच्या उसळीत हे मोड आलेले
मटकीच्या उसळीत हे मोड आलेले मेथीदाणे घालतात. म्हणजे मेथी पोटात जाते, पण उष्ण पडण्याची भीती नाही.
मस्त!!!
मस्त!!!
भयंकत पित्तकर भाजी आहे,
भयंकत पित्तकर भाजी आहे, ज्यांना पित्तानं डोकं चढतं अशांनी जपूनच खावी, पण चवीला मस्त लागते.
मस्त मी खाल्ली आहे छान
मस्त मी खाल्ली आहे छान लागते
मोड आलेली मेथी कडू नाही लागत.
मोड आलेली मेथी कडू नाही लागत...अशी भाजी / सलाड मध्ये छान लागते...
पण पित्तकर...✓✓
- अशीच भाजी , आणि फोडणीस टाकताना ,थोडी भिजवलेली तूरडाळ घालून आमच्याकडे करतात...तयार झाली की भरपूर कोथिंबीर आणि लिंबू पिळून खायची...मस्त लागते...