one meal a day

Submitted by काउ on 17 February, 2015 - 09:01

दिवसातून फक्त एकदाच जेवण घेऊन रहाणे , हा प्रयोग कुणी केला आहे का ?

एकच वेळ जेवायचे असल्यास शाकाहारी पदार्थ वापरुन कोणत्या पद्धतीने जेवण करावे लागेल ?

http://www.finalcall.com/artman/publish/Health_amp_Fitness_11/article_89...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपले शरीर फ्याट , प्रथिने अशा इतर गोष्टी वापरुनही उएजानिर्मिती करु शकते. पण शरीराला तशी आपण संधी देतच नाही. >>>

व्यायाम केला तर संधी मिळेल की आपोआपच Happy एन्ड्युरंस व्यायाम प्रकारांमध्ये ( रनिंग / सायकलींग) फॅट आपोआप बर्न होतात.

तसेच व्यायाम केल्यावर सगळे जण काही घेत नाहीत ही एक चुकच ठरावी बहुदा. प्रोटीन पावडर (स्पेशली व्हेजी लोकांनी) घ्यायला हवी. म्हणजे रिकव्हरी लवकर सुरू होते. (अर्थात तेवढा व्यायाम केला तर Wink ) नाहीतर उगाच शरीरावर मारा.

जामोप्याच्या पोस्टी वाचून त्याला एकभुक्त राहणे की रोजा करणे / करून पाहणे ह्यात कन्फुजन आहे. ते सोडविण्यासाठी काही दिवस एकभुक्त राहून पाहा. किंवा खरचं रोजे कर, म्हणजे आपोआपच एकभुक्त राहायला मोटिव्हेशन मिळेल. मोटिव्हेशन मिळण्याशी कारण रोजे असो की महाशिवरात्र.

हलीम फार हाय कॅलरी असते. ते शक्यतो खाउ नका. प्रॉपर रोजा ठेवन्यातही इतर धार्मिक कार्यक्रम, मानसिक डिटॉक्स, प्रार्थना व एक हायर बीइन्ग ऑफ रिलिजस कॉन्शस नेस अपेक्षित आहे ती जमणे अवघड वाटत असल्यास तसे करू नका. साधे एकभुक्त राहा. पण जर डायबेटीस आधीच असेल तर असे उपाशी राहणे फार खतरनाक ठरू शकेल. हे मी आपल्याला काय सांगू. डायेटिशिअन चा सल्ला घ्या. इथे पण आहेत एक बाई.

बेस्ट इज सहा मील्स छोट्या छोट्या पण आरोग्यपूर्ण खाव्या. फळे व भाज्यांची पाच हेल्पिन्ग डेली. पण व्यायाम पण हवा. पण फंडा म्हणजे तुम्हाला असे एकदाच खावे असे का वाटू लागले? आपल्या देशात कितीतरी लोक, मुले सुद्धा, प्राणी देखील एक वेळचे नीट जेवण जेवु शकत नाहीत. भुकेल्या पोटी झोपतात. एक मील तुम्ही जी वाचवता आहात ती कुठे तरी डोनेट होईल असे बघा म्हणजे तुम्हाला खरे व सिरीअस समाधान लाभेल.

धन्यवाद सगळ्यांना... पण आता सल्ले देतच आहात तर...
१. सकाळी उठून कोमट-उष्ण पाणी प्यावे.. (मोठ्ठा ग्लास भरून पितो).
२. आल्या लिंबाचा रस प्यावा (चालू आहे).
३. फळांचा रस न गाळता प्यावा... (मिक्सर मधून smoothie येते तीच न गाळता पितो). हे आणि फळे खाणे सारखेच आहे.. फक्त चावण्याच्या व्यायाम करून जाणार्‍या १०/२० कॅलरी जात नसतील...
४. विचार सकारात्मक ठेवावेत.. (हे मला भेटलेल्या कुणाही व्यक्तीला माहिती आहे )..
५. व्यायाम करा (करतोच आहे).
६. रोज वेगवेगळा व्यायाम करा (तेही चालू आहे).
७. घरचे खा.. (मी २,३ महिन्यानी एकाद्या दिवशी हॉटेलात किंवा बाहेरचे आणून खाणारा माणूस आहे). आठवड्यातून २ ते ३ दिवस स्वयंपाकही मीच करतो.
८. खेळ खेळा.. त्यासाठी एकाहून अधिक व्यक्ती लागतात तेव्हा ते शक्य होत नाही...
९. संध्याकाळी लवकर जेवा.. ७:३० ला smoothie पिऊन १०:३० नंतर झोपतो.
१०. सकाळच्या व्यायाम रिकाम्या पोटावर नको (ऋ. दिवेकर) .. खाऊन मग व्यायाम करतो.
११. डॉक्टरला भेटा... तेही केले. (एक अमेरिकन आणि एक भारतातला..)

एकच सल्ला राहिला आहे गोष्टीगावाचे,

बारीक व्हा

ते तुम्ही होत नसाल नक्की! Light 1

जुयेरेगा बघणं थांबवा पहिले. त्यात सगळे फक्त बसून बोलत असतात किंवा खात असतात किंवा खाण्याचे बेत करत असतात त्यामुळे मनाचा कल वजनवाढीकडे झुकतो. देसाईवाडीचे नामकरण वजनवाढी करण्याची सूचना गेली आहे.

आशूडी... जुयेरेगा बघणं थांबवा पहिले.... चिपो साठी करावे लागते... <<<<< Proud

आता 'कारेदू' मधे अजून एक देसाई अवतरलेत.... आणि तेही बलदण्ड आहेत. Happy

सर्वात परफेक्ट सल्ला आशूडी यांनी दिला.

पण वजन कमी झाले तर ते मेघनाचे काका कसे शोभणार.

सर्व शिरेलीवाल्याना देसाई हेच आडनाव दिसते का.

sorry इथे हे सर्व लिहिल्याबद्दल.

जनः १८० पाऊंड. वय ५१
दिवसाचा आहार:
सकाळी डोसा, पोहे, आमलेट इत्यादी. साखरेशिवाय चहा..
कमीत कमी अर्धा तास व्यायाम.
दुपारी: २ शिजवलेल्या भाज्या , किंवा १ उसळ १ भाजी (दोन्ही मोठी वाटी भरून ).
संध्याकाळी: १ आवाकाडो..केव्हातरी साखरेशिवाय चहा... १५ - ३० मिनिटे व्यायाम.
रात्री: १ ग्लास फळांचा रस.

>> गोगा तुम्ही दिवसातून फक्त दोन भक्कम आहार घेत आहात ते हि वेळ लिहिली नसल्याने डोसा ऑम्लेट खाण्याची वेळ मी ९ ते १० च्या दरम्यान धरते. बरोबर?

हा जो गॅप आहे तो जीवघेणं वजन वाढवतो. यात फिलिंग करायला हवं.
शिवाय सकाळी पोहे, डोसे ऑम्लेट ऐवजी... वेगळा आहार घेणं गरजेचं आहे.
मी ३-४ टिप्स देईन वाटलं तर चालेल क?

अव बेफिकीर ते काउ रोजा ठेवायच मनावर घेऊ र्हायले म्हनून म्या म्हनल हलिम खावा. ते भयन्कर असो वा अभ्यन्कर, रोजा सोडताना मुस्लिम भाव खातात की कदीमदी. ( भाषेला महत्व देऊ नका, भावनेला द्या)

गोगा तुम्ही जाम हसवलत.:फिदी:

देसाई/गोगा, तुम्ही हे सगळं करताच आहात त्याबरोबर सकाळी झक्कीफेम 'मौजा ही मौजा' आणि संध्याकाळी 'जिंदगी क्वाब है' हे दोन मंत्र म्हणा आणि बघा रिझल्ट्स.. Proud

जरूर दक्षिणा..
सकाळचे खाणे: ६:४५ , व्यायाम ७ - ८ दरम्यान.
८:३० ते १२:१५ कार्यालयातले काम.
१२:३० ते १:०० दरम्यान दुपारचे जेवण. (घरी जाऊन , गरम करून.. त्यावर १०/१२ बदाम्/दाणे मुखशुध्दी)
१:०० ते ५:३० कार्यालयातले काम.
५:४० चहा किंवा एकादे फळ.
६:१५ ते ७:१५ पुढच्या दिवसाचे जेवण शिकवणे.
७:३० फळे चुरडून सगळ्यासकट रस पिणे... एकादे फळ खाणे..
१०:३० झोपणे..
शिवाय सकाळी पोहे, डोसे ऑम्लेट ऐवजी... वेगळा आहार घेणं गरजेचं आहे. <<< दिवसातून एकदा पिष्टमय (कार्ब) नाही खाल्ले तर शरिरातली साखर पार संपून जाऊन चक्कर येऊ लागेल. त्याच प्रमाणे सर्व माहितगारांच्या म्हणण्याप्रमाणे 'सकाळचे खाणे नीट खावे Eat breakfast like a king .. दिवसभराच्या energy ची ही जननी आहे.

मी ३-४ टिप्स देईन वाटलं तर चालेल क? <<< द्या तुम्ही,. घ्यायच्या की नाहीत ते मी बघतो....

थोडीशी रंपा(वाईन) आणि हा मंत्र, ह्याने फायदाच होत असेल तर करावं की.
तसंच गटगही नियमित अटेंड करावीत. त्याचाही उपयोग होईल.

६:१५ ते ७:१५ पुढच्या दिवसाचे जेवण शिकवणे. तुम्ही कुकरी क्लास घेता का? कार्बज हवे ना समतोल आहारात .. धागा गोगांसाठी की काऊसाठी आहे? काऊ - मी रात्री खूप हलकं जेवते ज्यात लाह्या मुख्य असतात .. सकाळी पोहे उपमा धिरडे व जेवण वरण भात भाजी पोळी कोशिंबीर..

गटगही नियमित अटेंड करावीत. त्याचाही उपयोग होईल >>>> बरोबर आहे. हसण्यात, बोलण्यात केवढ्या कॅलरीज बर्न होतात.

तुम्ही कुकरी क्लास घेता का? << घेईन ना.. कुणाला यायचे असेल तर ( शिजवतो म्हणताना शिकवतोझाले)

धागा गोगांसाठी की काऊसाठी आहे? << म्हणूनच मी काल सोडला होता हा धागा.. आता परत सोडतो...

हे. मा. शे. पो.. असे लिहू का? Proud

आत्तापर्यंत असे लिहिण्याची वेळ आली नव्हती.. पण काऊ हे मा शे पो... Light 1

आशूडी, मी हेच लिहिणार होते Proud ब.चाळीतला उपवास आठवला! गोगा, नोकरी सोडा हा सल्ला अजून मिळाला नाहीए इथे! तो मिळाला की तुम्ही पु.लं.च्या पंक्तीत Wink Light 1
बाकी चांगली चर्चा चालू आहे. फळांच्या रसाबाबत बीं यांच्याशी सहमत.

स्मायली द्यायची राहिली गोगा .. मनोरंजनात्मक उदबोधक चर्चा वाचतेय.. मौलिक सल्ले तुम्ही क्लेल्या प्रयोगातले येऊ देत..

केदार तू व्हे प्रोटिन घेतोस का? मी सध्या आठवड्यातून चार वेळा किमान १ तास पळतो आहे. व एक दिवस ४५ मिनिटे खूप इन्क्लाइन व टेन्शनवर एलिप्टिकल. आणि शाकाहारी (मासे क्वचित खातो). डाळ रोज खाल्ली जात नाही - करायला वेळ=लागतो म्हणुन.

तेव्हा प्रोटिन सोर्स बघत आहे.

गोगा, इतकं अवांतर झालच आहे तर मागे पण तुम्ही 'उंधियो' लिहिताना शिजवणे ऐवजी 'शिकवणे' लिहिलं होतं ते आठवलं.
-'वांगे शिकत नाही'
शिकवा , शिकवा.
Wink

व्हे प्रोटीन खूप लोक घेतात, पण मला त्याबद्दल फार कॉन्फीडन्स नाही. कारण त्यात अनेक इंनग्रेडियंट असे आहेत जे इतर फूड, ड्रग्ज बरोबर इंटर अ‍ॅक्ट करू शकतात आणि त्या इंटरॅक्शनचे परिणाम डॉक्युमेंटेड नाहीत. ( ओव्हर द काउंटर व्हीटॅमीन्स बद्दल लोकं आता जागृत होत आहेत, इतके वर्ष तसेच घेत होते, कश्याहीबरोबर).
त्यामुळे स्वतः कोणत्याही अननॅचरल सोअर्स ऑफ प्रोटीन वगैरेसाठी कंफर्टेबल नाही. हार्ड बॉइल अंडी, कडधान्ये, टोफू, भरपूर पाणी पिउन टॉक्सीनस शरीराबाहेर टाकणे, आणि फारच लांब राईडनंतर एखादी मॅग्नेशियम गोळी, इतक्यावरच मी खुश आहे/ आणि मला शक्यतो असंच ठेवायचं आहे.

Pages