पत्रीका समोर आली आणि जर पत्रीकेचे संपुर्ण आयुष्याचे कथन करायचे असेल तर पत्रीकेत राजयोग आहेत का आणि असतील तर ते किती आहेत व कसे व कुठल्या काळात फलदायी होतील याचे विवेचन करावे लागते.
राजयोग याचा अर्थ प्रत्येक वेळेला एखादी व्यक्ती राजासारखे आयुष्य घालवेल असे नाही. पण पत्रीकेत असलेला अधिकार योग नक्कीच महत्वाचा. या व्यक्तीची पत्रीका पाहिली असताना उत्तरोत्तर प्रगती असे एका वाक्यात वर्णन केले तर गैर ठरणार नाही.
उत्तम निर्णयक्षमता, सहजपणे यशस्वी होणे याच बरोबर चिकाटी आणि ध्येयासक्ती हे गुण या पत्रीकेत येतातच.
राजयोग दोन प्रकाराने पाहिले जातात.
१) पाच महत्वाचे ग्रह केंद्र स्थानात असुन विषीष्ठ राशीत , काही खास अंशात असताना राजयोग होतात. काही ग्रंथात याला पंचमहापुरुष योग ही म्हणले आहे. हे योग स्त्रीयांच्याही कुंडलीत असतात हे वेगळे सांगणे नको.
वरील प्रकारचा राजयोग अथवा पंचमहापुरुष योग फलदायी होण्यासाठी आणखी एक महत्वाचे की हा ग्रह अन्य कोणत्या कुयोगात नसावा अन्यथा तो पुर्णतः फलदायी होत नाही.
२) दुसर्या प्रकारात पंचम स्थानाचा किंवा भाग्य स्थानाचा आणि केंद्र स्थानाच्या अधिपतीच्या युती/शुभ योगाने फलदायी होणारे राजयोग किंवा विषीष्ठ लग्नाला राजयोगकारक ग्रह केंद्रात असताना आणि कुयोगात नसताना होणारे एका ग्रहाने साध्य होणारे राजयोग.
वरील पैकी समजण्यास सोपा राजयोग प्रथम पाहु.
ज्यांना लग्न कुंडली म्हणजे काय ते समजते त्यांना हे सहज समजेल.
शुक्राच्या लग्नाला शनी आणि शनीच्या लग्नाला शुक्र राजयोगकारक होतो तसेच कर्क लग्नाला मंगळ राजयोग कारक होतो. सिंह लग्नाला सुध्दा मंगळ राजयोग कारक होतो.
याचा अर्थ असा की मेष पासुन मीन पर्येत १२ लग्ने होऊ शकतात पैकी सहा लग्ने ही राजयोग कारक असतात.
याचाच अर्थ असा की दररोज बारा लग्नाच्या कुंडल्या मांडल्या जाऊ शकतात आणि त्या पैकी सहा राजयोग कारक असतात. या सहा लग्नात दोन वेळा शुक्र, दोन वेळा शनी आणि दोन वेळा मंगळ राजयोग कारक होतो. रवी, चंद्र, बुध, गुरु एकटा ग्रह या प्रकाराने कोणत्याही लग्नाला राजयोगकारक होत नाही.
मंगळ ग्रहाची लग्ने आणि चार द्वी स्वभाव लग्ने ( मिथुन, कन्या, धनु आणि मीन ) ही सहा लग्ने राजयोग कारक ठरत नाहीत कारण द्वी स्वभाव लग्नाला धरसोड वृतीचा दोष आणि मंगळाच्या लग्नाला असलेला आरंभशुरत्वाचा दोष यामुळे चिकाटी, ध्येयासक्ती, अचुक निर्णयाचा अभाव या मुळे या लग्नांना यश फार अभावाने मिळते.
थोडक्यात महत्वाचे म्हणजे वरील सहा लग्ने म्हणजे वृषभ लग्न, कर्क लग्न, सिंह लग्न, तुळा लग्न, मकर लग्न आणि कुंभ लग्नाच्या कुंडल्या या राजयोगाच्या कुंडल्या आहेत. यात अनुक्रमे शनी जर स्वराशीत , केंद्रात, शुक्र स्वराशीत आणि केंद्रात व मंगळ स्वराशीत आणि केंद्रात असता हा राजयोग जास्त फलदायी होईल.
यातही जिथे दशमस्थानाचा अधिपती आणि भाग्य स्थानाचा अधिपतीच्या योगाने होणारा राजयोग जास्त प्रभावी असतो उदा. अनुक्रमे वृषभ लग्न ज्यात शनी नवमेश दशमेश म्हणुन राजयोग कारक होतो. मकर लग्नाला शुक्र पंचमेश आणि दशमेश म्हणुन कार्यरत होताना जरा कमी प्रभावी तर कर्क लग्नाला मंगळ सुध्दा पंचमेश आणि दशमेश म्हणुन कमी प्रभावी ठरतात.
चतुर्थेश आणि भाग्येशाचे राजयोग उदा कुंभ लग्न, सिंह लग्न आणि तुळा लग्न यांचा पंचमेष आणि चतुर्थेष याचा राजयोग आणखी कमी फलदायी होताना दिसतो.
याच प्रकाराने दोन ग्रहांच्या युतीने/ शुभ योगाने सुध्दा राजयोग होतात. हे योग कोणत्याही लग्नाला असु शकतात परंतु वरील सहा लग्नांना जर आणखी दोन ग्रहांच्या योगाने राजयोग या सोबत असेल तर पत्रीकेचा दर्जा आणखी वाढतो.
लग्न राजयोग कारक नसताना दोन ग्रहांच्या सहायाने होणारा राजयोग जर मित्र ग्रहांच्या योगाने होत असेल, केंद्रातुन होत असेल तरच फलदायी होताना दिसतो. अन्यथा हा राजयोग दिसला तरी फलदायी मात्र होत नाही.
मित्र म्हणुन ( शुक्र, शनी आणि बुध ) हा एक गट पडतो तर ( रवि, मंगळ आणि चंद्र ) हा एक गट पडतो.
अमावस्या आपण चांगली मानत नाही परंतु अमावस्येला रवी आणि चंद्राची युती होऊन एक राजयोग घडतो मेष आणि वृश्चीक लग्नाला सहजपणे महिन्यातुन एकदा प्राप्त होतो.
असे दोन मित्र ग्रह युती अथवा नवपंचमासारख्या योगात येणे ही गोष्ट सहज घडत नाही. या मुळे राजयोगकारक लग्न नसतानाचा दोन ग्रहांच्या युतीने /योगाने होणारा राजयोग हा अनकॉमन प्रकारचा राजयोग असतो. याचे फल कधी आणि काय मिळेल हे वर्तवणे तितकेच कठीण होऊन बसते.
या प्रत्येक प्रकाराच्या राजयोगाची उदाहरणे देणे लेखन मर्यादा असल्याने अशक्यप्राय आहे. जिज्ञासुंना मात्र अभ्यास करण्यास खाद्य पुरवले आहे असा विश्वास वाटतो.
फलज्योतिषातील समग्र ग्रहयोग
फलज्योतिषातील समग्र ग्रहयोग या व.दा.भट यांच्या पुस्तकात ८० प्रकारचे राज योग दिले आहेत. तसेच अन्य प्राचीन ग्रहयोग जवळपास २०० आहेत.
एकंदरीतच राजयोग ही काही फार दुर्मिळ गोष्ट नाही.
एकंदरीतच राजयोग ही काही फार
एकंदरीतच राजयोग ही काही फार दुर्मिळ गोष्ट नाही
नक्कीच, पण फलदायी होणारा राजयोग दुर्मीळ आहे.
मला वाटलं हा योगातला राजयोग
मला वाटलं हा योगातला राजयोग असेल म्हणून धागा उघडला होता
"राजयोग", "नीचभंगराजयोग",
"राजयोग", "नीचभंगराजयोग", "शापित कुंडली", इत्यादी शब्दप्रयोगामागिल नेमक्या अर्थाचे व त्यानुसार वास्तव परिस्थितीचे विवेचन मिळाले तर बरे होईल.
लिंबुजी, सध्या चर्चा
लिंबुजी,
सध्या चर्चा राजयोगाची चालु आहे. पुढील लेखात कुंडली सह विष्लेषण देईन,
आपले दोन्ही माजी पन्तप्रधान
आपले दोन्ही माजी पन्तप्रधान कै राजीव गान्धी आणी अटलबिहारी वाजपेयी या दोघान्च्या हाताच्या बोटान्वर ( शेवटच्या पेरावर/ टोकावर) चक्रे होती. त्यामुळे त्याना राजयोग होता असे म्हणतात. हातावर चक्रे, पद्म चिन्हे मान देतात. आता आपापले तळहात तपासा पाहु.:डोमा: न जाणो एखादा माबोकर मन्त्री व्हायचा.:फिदी:
माझ्या दोन्ही हातांचे अंगठे
माझ्या दोन्ही हातांचे अंगठे सोड्ले तर बाकी सगळ्याच बोटांवर चक्र आहे.
>>>> न जाणो एखादा माबोकर
>>>> न जाणो एखादा माबोकर मन्त्री व्हायचा. <<<<<
रश्मी, माझ्या दहाही बोटांवर चक्र आहे
[अन याक्षणी तरी मी कंगाल कारकूंडा आहे..... ]
बडे बडे मंत्री आधी कंगालच
बडे बडे मंत्री आधी कंगालच होते नंतर मालदार झाले
>>> बडे बडे मंत्री आधी कंगालच
>>> बडे बडे मंत्री आधी कंगालच होते नंतर मालदार झाले <<< तर तर...
पण मी कॉन्ग्रेस किंवा राष्ट्रवादी यांचा नाममात्र सभासदही नाहीये हो !
हो पन युरीयावाले पेट्रोलपंप
हो पन युरीयावाले पेट्रोलपंप वाल्या भाजप्यांचे सभासद आहातच की
अगोदरचा प्रतिसाद दिसत नाहीये
अगोदरचा प्रतिसाद दिसत नाहीये !
मला राजयोग आहे का असे जातक विचारतो का ?ज्योतिषांना समजलेला राजयोग कोणता?
ए हिथ भान्डु नगा, व्हा
ए हिथ भान्डु नगा, व्हा म्होरल्या अन्गाला.:राग::फिदी:
लिंबुभाउंनी मुद्दामुन चालु
लिंबुभाउंनी मुद्दामुन चालु केले . मग थुत्तरफोड उत्तर मिळाल्यावर शांत बसले
लिंबुभाउंनी एखादा
लिंबुभाउंनी एखादा कौन्सिलिंगची पदवी वा प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे. नंतर त्यांना बाबा/बुबा बनण्याचा योग आहे. नाही तरी मानसशास्त्रज्ञ कौन्सिलर्स हे बाबा बुवाच असतात. बुवा योग हा राजयोगासारखीच फळे देतो.किर्ति व पैसा असे दोन्ही त्यांच्या आयुष्यात त्यांना मिळणार आहेत असे आमचे भाकीत आहे
लिंबुबाबा की जय हो!
>>>> लिंबुभाउंनी एखादा
>>>> लिंबुभाउंनी एखादा कौन्सिलिंगची पदवी वा प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे. <<<<<<
या वयात शक्य नाही, पण पदवी न घेताच रिटायरमेंट नंतर लिगल कन्सल्टन्सी चालू करायचा बेत आहे.
>>>> नंतर त्यांना बाबा/बुबा बनण्याचा योग आहे. <<<<<<
गेली बावीस वर्षे मी माझ्या कंपनीत "बुवा" म्हणूनच ओळखला जातोय.
>>>>>> नाही तरी मानसशास्त्रज्ञ कौन्सिलर्स हे बाबा बुवाच असतात. बुवा योग हा राजयोगासारखीच फळे देतो.किर्ति व पैसा असे दोन्ही त्यांच्या आयुष्यात त्यांना मिळणार आहेत असे आमचे भाकीत आहे <<<<<
तुमच्या तोंडात साखर पडो,
फक्त बुवा बनताना त्या "अंन्निसवाल्यांचा अन् कम्युनिस्ट नक्षल्यांचा" पिच्छा कसा सोडवावा याचेही मार्गदर्शन कराच ना प्लीजच !
>>> सध्या चर्चा राजयोगाची
>>> सध्या चर्चा राजयोगाची चालु आहे. <<<<
हो, त्यादृष्टिनेच, मला "राजयोग" कशा कशाला म्हणता येईल याचे वस्तुस्थितीदर्शक वर्णन हवे आहे.
(नैतर काय होते की "राजयोग" म्हणले की भरजरी कपडे घालून अलिशान महालात लोडाला टेकुन बसलेला ढेरपोट्या राजा, मागे दासी वारा घालताहेत असे काहीसे नजरेसमोर येते")
हे पाहून राजयोग आहे की नाही
हे पाहून राजयोग आहे की नाही हे ठरविता येईल का?
चेतन तुम्हाला व्यवसायात भरपूर
चेतन तुम्हाला व्यवसायात भरपूर पैसा दिसतोय.:स्मित: धनस्थानातला कर्केचा शुक्र दर पाच-सहा वर्षाने सम्पत्ती वाढवतो. बुध स्वराशीचा लग्नी. मार्केटिन्गमध्ये करीअर आहे का? बुध्+गुरु एकत्र आणी हर्षलशी नवपन्चम योग बुद्धीमत्ता उपजत आहे. तुमच्या पत्रिकेत शनी+मन्गळ युती पराक्रम स्थानात ( सिन्व्ह राशीत, ५ आकडा असलेले ठिकाण ) आहे. पण दोघे एकमेकान्चे शत्रु त्यामुळे अडथळा येतोय.
चतुर्थात कन्येचा राहु उच्चीचा, पण त्रास देतो. तुमच्या धर्मानुसार उपासना करा. राहु त्रासदायक आहे.
धन्यवाद रश्मीजी, << चेतन
धन्यवाद रश्मीजी,
<< चेतन तुम्हाला व्यवसायात भरपूर पैसा दिसतोय. >>
याच्या नेमकी उलट परिस्थिती आहे.
<< धनस्थानातला कर्केचा शुक्र दर पाच-सहा वर्षाने सम्पत्ती वाढवतो. >>
हे मात्र खरंय असंच म्हणावं लागेल कारण संपत्ती दर पाच सहा वर्षांनीच वाढतेय माझी. मधली वर्षं तिच्यात शून्य वाढ किंवा बरेचदा मोठी घट होते. व्यवसायात सलग अनेक वर्षे नुकसान मग एखादं वर्ष फायदा आणि पुन्हा पुढची अनेक वर्षे नुकसान असं सूत्र चालंलय. [एक गोगलगाय दिवसभरात भिंतीवर दोन फुट वर चढते आणि पाच फुट खाली घसरते या गोष्टीसारखं]
मी कुठलीही आर्थिक जोखीम स्वीकारली की नुकसान ठरलेलेच, पण जीवावरची (प्राणाची) जोखीम स्वीकारली तर मात्र अजिबात नुकसान नाही. तेव्हा मी आता अशा एखादी संधीच्या शोधात आहे जिच्यात आर्थिक लाभ भरपूर, त्यात कुठलीही जोखीम नाही परंतु प्राण जाण्याचा मात्र शंभर टक्के संभव ज्यामुळे इतर कुणी त्या फंदात पडत नाहीयेत. मी जर अशी जोखीम स्वीकारली तर त्यातून सहीसलामत बाहेर पडू शकेन असा आत्मविश्वास पुर्वीच्या अनुभवांवरून वाटतोय.
अमावस्या आपण चांगली मानत नाही
अमावस्या आपण चांगली मानत नाही परंतु अमावस्येला रवी आणि चंद्राची युती होऊन एक राजयोग घडतो मेष आणि वृश्चीक लग्नाला सहजपणे महिन्यातुन एकदा प्राप्त होतो. >>>>>>>. ह्म्म..... माझी वृश्चीक लग्न रास आहे.....बरीचशी कामे अमावस्येला नीट होतात अस आढ्ळलतय मला........त्यामागे असे काही कारण असे वाट्ल नव्ह्त..........पण अमावस्येला काम करत अस्ल्याने घरी फार शाल्जोडीतून मिळ्तात........" हाच मुहुर्त मिळाला तुला????/ सग ळ जग मुर्ख हीच एक शहाणी वगैरे" "P
मला वाटते कि कोणतीही गोष्ट
मला वाटते कि कोणतीही गोष्ट घडवून आणण्याचा अधिकार हा महादशा आणि अंतर्दशा स्वामीला असतो . कोणती महादशा कोणते भाव support करते आणि कशाला विरोध करते हे पाहणे जास्त महत्वाचे आहे . ते बघण्यासाठी कृष्णमुर्ती पद्धत हि मला सगळ्यात सोपी आणि अचूक वाटते.
खुप दिवसांनी मायबोलीवर
खुप दिवसांनी मायबोलीवर ज्योतिषशास्त्रावर चांगला लेख वाचायला मिळाला.
अजुन अनेक योग आहेत, त्यावर देखील लेख येऊ द्यात
शनि(फार धोरणी आणि दिर्घकाळ
शनि(फार धोरणी आणि दिर्घकाळ ),चंद्र (बाल बुद्धीचे, लहरी, दिवाणजी मंत्री यांवर अवलंबून, परंतू लोकप्रिय), मंगळ (पराक्रमाने अचानकपणे आणि तेवढाच लवकर पदच्युत होणारे )असे तीनच ग्रह माणसास राजा करू शकतात. आता राजा-योग थोडा कालमानाप्रमाणे समजून घ्यायचा. बाकीचे रवि, बुध, गुरू हे राजा करू शकत नाहीत. दरबारात सिंहासनाच्या फारतर पायाशी चिकटून बसवतील पण वरती नाही. आता हीच कल्पना थोडी सैलकरून राजयोगात वापरायची.
सुम, अमावस्येला योग्य रित्या
सुम,
अमावस्येला योग्य रित्या पुर्ण होणारे काम आणि वृष्चिक लग्नाला अमावस्येला जन्माला आल्याने बहाल होणारा राजयोग या संपुर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत.
आपले लग्न जर वृश्चिक असेल आणि आपला जन्म जर अमावस्येला झाला असेल तर अन्विता म्हणतात त्याप्रमाणे चंद्र आणि रवी यांच्या महादशेत तसेच चंद्राच्या महादशेत आणि रविच्या अंतर्दशेत व रविच्या महादशेत आणि चंद्राच्या अंतर्दशेत आपली व्यावसायीक प्रगती वेगाने झाल्याचे आपल्याला दिसेल.
ही प्रगती म्हणजे अचानक मोठ्ठे प्रमोशन्/पगार/ अधिकार इ. किंवा व्यवसाय असल्यास मोठ्या ऑर्डर्स, करार किंवा नविन प्रॉडक्ट बाजारात येऊन मोठ्ठा खप होऊन व्यवसायवाढ इत्यादी.
सरकारी नोकरांना ( वृष्चिक लग्नाला दशमेश रवी ) व जर दुपारी १२ वाजताचा जन्म असल्यास सरकारी नोकरीत पदोन्नती या काळात ( रवी/ चंद्र महादशा आणि अंतर्द्शा ) ऑगस्ट महिन्यात जेव्हा मुळ रविवरुन गोचर रविचे भ्रमण असता नक्की अनुभवाला येईल.
दुपारी बारा वाजता जन्म नसता जेव्हा जेव्हा मुळ रविवरुन गोचर रवि जाताना व महादशा / अंतर्दशा असताना अनुभवाला येईल.
अधिकार मिळणे , प्रमोशन इ.
अधिकार मिळणे , प्रमोशन इ. करता पत्रिकेतील दशम स्थान active असणे महत्वाचे आहे . प्रसिद्धी योगाकरता करता पण दशम व तृतीय भाव तसेच दशम व प्रथम भाव ह्यांचे एकमेकातील सबंध तपासावे लागतात .
तसेच पैसे मिळण्याच्या दृष्टीने २,६, ,१०,११ हि स्थाने व त्याजोडीने कधी ८ हि महत्वाची स्थाने होत . त्यामुळे आधी पत्रिकेचे potential आणि मग महत्वाचे म्हणजे ते लाभ कधी मिळणार ह्या करता योग्य वयात योग्य महादशा याव्याच लागतात.
नीचभंग राजयोग म्हणजे काय ?
नीचभंग राजयोग म्हणजे काय ?