उल्ली थियल - केरळी पद्धतीची कांद्याची करी

Submitted by दिनेश. on 18 February, 2015 - 03:58
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांना पुरेल
माहितीचा स्रोत: 
२०१५ चे कालनिर्णय कॅलेंडर
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय काय शोधून काढता राव तुम्ही! नावही काय भारीच आहे.

फोटो असला की आपण प्रतिसाद देतो, नाहीतर काही समजत नाही पदार्थ कसा दिसतो ते. फोटो फार आवडला. अंडी वाटत आहेत हे निराळे!

काय काय शोधून काढता राव तुम्ही! नावही काय भारीच आहे. >> +१
करायला पण सोपे आहे.

वॉव! अशी अख्ख्या कांद्याची रसभाजी मी फक्त एकदाच खाल्ली आहे माझ्या एका मावशीच्या घरी ते पण मी दहावर्षाच्या आत असताना. पण लागते अप्रतिम.
कांदे फार छोटे असतील तर सोलणे कर्मकटकटिचे होते.

आहा... कांदा करी .. खरच वेगळ्या एखद्या पक्ष्याचे अंडे वाटत आहे.. लिस्ट वाढतच चाल्ली बनवायच्या पाकॄ ची . लवकर लवकर कामाला लागावं लागेल ..

आभार.. ही करी दहीभाताबरोबर छानच लागली.

नंदिनी, नेमक्या याच मुद्द्यावर अडलेय. त्या मूळ कृतीत तसा काही स्पष्ट उल्लेख नाही. मी नेहमीचेच वापरले.

एकदम हटके कृती!! फोटो बघून अगदी यम्मी वाटली!!..... Happy
काय काय शोधून काढता राव तुम्ही! नावही काय भारीच आहे. >>>> +१००....

अय्या !!
काल रात्री सहज २०१५ चे कालनिर्णय चाळले नी ह्या रेसिपीची नोंद मनात केली...
आणि आज सकाळी तुमची पोस्ट!
खत्री फोटो! आता नक्कीच करुन बघणार Happy

रच्याकने, सांबार कांदे असणार, केरळी पाक्रु आहे ना म्हणून हा अंदाज.
गूगलून बघीतले तर फोटो पण त्याचेच वाटताहेत.

सांबार कांदे वापरायचे तर २०/२५ वापरावे लागतील एवढ्या प्रमाणात. परतायला मात्र साधेच / नेहमीचेच घ्यावे लागतील कापून.

सांबार कांदेच असतील. छान दिसते आहे. कांद्याची पीठ पेरून भाजी पण किती दिवसांत केली नाही.
ह्या भाजीची एक आठवण म्हणजे लेखक ना. सी. फडके ह्यांना अश्या पद्धतीची कांद्याची रस्सा भाजी फार आवडत असे . ती देखील अगदी गरम. म्हणजे कमलताई चुलीवर रस्सा उकळत ठेवूनच त्यांना वाढत असत. मसाल्यात व कृतीत फरक असेल थोडाफार पण कांद्याची रस्सा भाजीच.
मातीच्या भांड्यात सर्व्ह केली तर छान दिसेल. बरोबर लुसलुशीत अप्पम्स.

उल्ळी थियल, ही केरळची एक फेमस रेसिपी आहे,

केरळ करीचे प्रकार,
१. नारळाचा वापर करुन
२. नारळाचा वापर न करता.
३. कांद्याचा वापर करुन
४. आंबट पदार्थाचा वापर करुन.

करीचे कंसिस्टंसीवरुन प्रकारः
१. तोट्ट करी : गाढ कंसिस्टंसी असलेली करी, (उदा. थियल करी)
२. ओळ्ळच्च करी : पा तळ करी ( उदा, सांभार, रस्सम )

करीचे प्रकार मसाल्यावरुन
१. थियल करी : खरपुस भाजलेला (मसाला +नारळ) वापरुन केलेली करी.
२. कुट करी : विविध प्रकारच्या भाज्या एकत्र करुन (कुट) मसाला वापरुन केलेली करी. (नारळाचा वापर कमी)
३. पुल्लिं करी : आंबट पदार्थ ( दही ) वापरुन केलेली करी.
४. एरीशेरी : कच्चा नारळ (न भाजता) वापरुन केलेली करी.

वरच्या थियल करीमध्ये छोटे कांदे ( शॅलॉट ) वापरले जातात,

आभार..

अमा, आपल्याकडे पुरणाचे कांदे म्हणूनही एक प्रकार असतो. त्यात कांद्याच्या आत मटाराचे किंवा बेसनाचे पुरण भरतात.

विवेक, छान माहिती. छोटे सांबार कांदे इथे मिळणे शक्यच नाहीत. शॅलॉट्स असतात पण त्याला सांबार कांद्याची चव नाहि.

मस्त फोटो!
इ. ग्रो. त सांबार कांदे फार महाग आहेत आणि साधे कांदे फार मोठे! तेव्हा ग्रेवीत उकडलेली अंडी किंवा कोलंबी घालून प्रयोग करेन.

फोटो आणि पाककृती मस्त!

<<< इ. ग्रो. त सांबार कांदे फार महाग आहेत आणि साधे कांदे फार मोठे! तेव्हा ग्रेवीत उकडलेली अंडी किंवा कोलंबी घालून प्रयोग करेन.

स्वाती२, ये हुई ना बात Wink Proud Light 1

मदत पूस्तिकेत कोणिच मदत करत नाहीये ... म्हणुन माझा प्रश्न इथे विचरतिये..

मला पण १ पाक कृती द्यायची आहे. कशी देवु?
पाक कृति आणि आहारशास्त्र या ग्रुप ची सभासद आहे पण Eडीट सेक्शन नाहिच दीसत.
कृपया मदत करावी

नीरा, नवीन धागा म्हणून पानाच्या उजव्या बाजूला जी लिन्क आहे ती ओपन करा. आधी पूर्ण वाचा, मग पाकृ लिहा.

Pages