शिव पार्वती, ही जरी दैवते असली, तरी इतिहासात या खर्याखुर्या व्यक्ती होऊन गेल्या असाव्यात असे मला
वाटते. पण त्या इतिहासावर, दंतकथेची अनेक पुटे चढल्याने, अनेक संदर्भ सत्याशी फारकत घेतल्यासारखे
वाटतात.
या दंतकथांमागे काही सत्यांश असेल का ? असे माझ्या मनात नेहमी येते. या संदर्भात काही संशोधन / लेखन
नक्कीच झाले असेल, पण माझ्या मर्यादांमूळे ते ग्रंथ माझ्या वाचनात आले नाहीत. खुपदा पुस्तकांच्या
दुकानातही, असे ग्रंथ सहज समोर मिळतील, असे नसतातच. शिवाय त्यांचे वाचक मर्यादीत असल्याने,
त्यांच्या आवृत्त्याही कमीच निघत असाव्यात.
गेल्या काही वर्षांत मला, अनेक माहितीपट बघता आले. त्यात बायबलमधील अनेक घटनांचा, त्या काळातील
भूगोलाशी, भूगर्भातील हालचालींशी सांगड घालायचा प्रयत्न केलेला दिसला. हे सगळे, करताना शक्य तितक्या साधनांनी, तो काळ समोर आणायचा प्रयत्न केला पण त्याने कुठलीही घटना, निर्विवादपणे सिद्ध होत नाही, हेसुद्धा नमूद करण्यात आले.
मुसलमानांना पवित्र वाटणार्या, कुराणाबाबत, मात्र असे माहितीपट मी बघितले नाहीत. ( मला सापडले नाहीत.)
आपल्या दंतकथा / पुराणकथांबाबतही काही माहितीपट आहेत. पण ते तितकेसे प्रभावी वाटत नाहीत.
सध्या, स्वप्ना सातत्याने, देवोंके देव, महादेव या मालिकेसंदर्भात जे मजेशीर निरिक्षण नोंदवत असते, त्यावरुन
जे मनात आले ते लिहितोय. अर्थात हे माझ्या मनात आलेले विचार आहेत, यांना कुठलाही ठोस संदर्भ नाही.
( असल्यास तो इथल्या प्रतिसादातून कळेलच.)
तर असेच काही विचार
१) अन्न
त्या मालिकेत, खुपदा खीर केलेली दाखवतात. असे स्वप्नाने लिहिलेय. प्रत्यक्ष कैलास पर्वत, कितीही सुंदर
दिसत असला, तरी त्यावर वास्तव्य शक्यच नाही. ( त्या पर्वतावर, गिर्यारोहण करण्यास अनुमती नाही.)
त्यांचे वास्तव्य त्या परीसरात, असू शकेल.
खीर करण्यासाठी, तिथे बार्ली / जव सारखे धान्य त्या काळात असू शकेल. सध्या जरी गहू, तिथे पिकत
असला, तरी तो नंतर, तूर्कीमधून आला. त्या ऊंचीवर लवकर शिजण्यासाठी, बार्ली / जव हिच धान्ये असावीत.
थोडाफार तांदूळही असेल.
दूधासाठी याक / मेंढी अशा प्राण्यांचे दूध असेल. त्या परीसरात, त्या काळात गायी नसाव्यात. नंदी हा त्या
काळातही दुर्मिळ आणि जोपासण्यास, कठिण असावा, म्हणून त्याला इतके खास स्थान मिळाले असावे.
रानटी घोड्याचेही दूध असू शकेल. आजही मंगोलिया मधे, रानटी घोडीचे दूध पितात.
साखर मात्र नसणारच. मूळात खीर गोड असायची शक्यता कमीच आहे. कदाचित मध वापरत असतील, पण
तोही मर्यादीत प्रमाणातच. आजही गिरीजन / वनवासी मुद्दाम गोड पदार्थ करून खात नाहीत. निसर्गात
मिळणार्या गोड पदार्थांवर, ते भागवतात.
शंकराला बेल प्रिय, म्हणजे बेलाची झाडे असणार. बेलाची फळे आजही बंगालात आवडीने खाल्ली जातात,
त्यामूळे बेलफळही खाण्यात असावे. ( तिकडची बेलफळे आकाराने मोठी, भरपूर गराची आणि गोड असतात.)
हिमाचल प्रदेश, सिमला या भागात, आज सफरचंदाचे अमाप पिक येत असले, तरी ते झाड मूळचे, तिथले
नाही. सफरचंदाचे मूळ स्थान, म्हणजे सध्याचे कझकस्थान. तिथूनही ते फळ, थेट आलेले नाहीच.
बटाटाही, फार नंतर, दक्षिण अमेरिकेतून आला. पार्वतीचे अपर्णा नाव, बोराच्या संदर्भात आहे, त्यामूळे बोरे
नक्कीच असणार.
शंकराला धोत्राही प्रिय. पण तो काही खाता येत नाही. पण कदाचित बियांचा चिलीमीत वापर होत असावा.
भांग असेल तर खसखस, बडिशेप असणार. बदामही असू शकतात. पण आपण आज ठंडाई करताना, मिरी
वापरतो, त्या एवजी पिंपळी असणार.
२) समुद्रमंथन
आजचा हिमालय, हा भारतीय उपखंड, गोंडवनातून वेगळा होऊन, आशियाला थडकल्यामूळे तयार झालाय.
म्हणजे हे दोन भूभाग टक्करले आणि तिथे ज्या घड्या पडल्या, ते हिमालय.
अर्थात हे सगळे, मानव या खंडात यायच्या आधी घडले असणार. हा भाग पुर्वी समुद्राच्या खाली असल्याने,
तिथे अजून शंखशिंपल्यांचे जीवाष्म सापडतात. या जीवाष्मांमुळेच, एव्हरेस्टला, सागरमाथा असे नाव
पडले असावे.
आणि समुद्रमंथन म्हणजे कदाचित त्या भागाचे ट्रेझर हंट असेल. आज फक्त जीवाष्म सापडत असले, तरी
त्या काळात, तिथे रत्ने सापडल्याची शक्यता आहे. एखाद्या उंच पर्वताच्या भोवती, हे झाले असेल.
हायकिंगसाठी, वेलींपासून केलेला एखादा जाड रोप वापरला असेल, आणि त्यातून वासुकी सर्प, वगैरे
कल्पना निघाल्या असतील. एखाद्या बारकाश्या भूकंपाने, जर तो पर्वत त्या काळात हलला असेल, तर
मंथनाची कल्पना आणखी दृढ झाली असेल. तिथे काही दुर्मिळ,सुंगंधी वनस्पती देखील आढळल्या असतील.
आजही तिथे, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आहेच, शिवाय ब्रिटिश संशोधकांना पण तिथे अनेक दुर्मिळ वनस्पति
सापडल्या होत्या.
अशीच एखादी औषधी वनस्पति, किंवा शिलाजित सारखे औषध, अमृत म्हणून गौरवले गेले असेल का ?
च्यवनप्राशातल्या मूळ रेसिपीमधले काही घटक, त्या काळातही दुर्मिळ होते. त्यातली एखादी वनस्पति
तिथे विपुल प्रमाणात सापडली असेल का ? आणि तशी असेल, तर तिच्यावरुन भांडणे होणे, सहज शक्य आहे.
मग हलाहल म्हणजे काय ? माझ्या डोक्यात एक विचित्र कल्पना आली. भारतात नैसर्गिक खनिज तेलाचे
साठे असम ( आसाम नाही, असम च ) मधे, दिग्बोई ( Dig Boy ) ला सापडले. भूगर्भातील हालचाली
बघता, तिथे एका ठिकाणी क्रूड ऑईल सापडले असण्याची शक्यता आहे.
विचित्र वासाचे, चिकट असे ते रसायन म्हणजे काय, असे त्या लोकांना नक्कीच वाटले असेल. आणि कदाचित,
शिवाने त्याची परिक्षा केली असेल, चाखूनही बघितले असेल.
निळसर काळे, असे हलाहलाचे वर्णन, क्रूड ऑईलला बरोबर लागू पडते. शिवाय मानवी शरीराला, अगदी
तोंडावाटे प्यायले तरी अपायकारक नाही. कदाचित शिवाने ते अंगाला लावूनही बघितले असेल, त्यावरुन
निलकंठ वगैरे कल्पना, पुढे आल्या असतील.
३) शस्त्रे
सीतास्वयंवरात रामाने, शिवधनुष्य मोडल्याने, परशुराम संतप्त झाला, असा कथाभाग आहे. परशुरामाचे
नाव, कोकण ते गोवा, या प्रांताचा निर्माता म्हणूनही घेतात. सागराकडून त्याने हा भूभाग मिळवला, असा
संदर्भ आहे.
कदाचित मानववस्ती कोकणात नंतरच्या काळात झाली असावी. गगनबावडा, आंबाघाट आणि फोंडाघाट, या
तिन्ही घाटात, प्रत्येकी असा एक भाग येतो, कि जिथून खुप खाली पण दूरवर भूभाग दिसतो.
अर्थातच हे घाट नंतर झाले, पुर्वी तिथे ऊभे कडेच असणार. या परीसरात आजही घनदाट जंगल आहे, त्याकाळात तर असणारच आणि हिंस्त्र श्वापदेदेखील असणार.
त्यामूळे या कड्यावरून खाली उतरण्याचे धाडस, परशुरामाने केले असेल का ? या कामात घनदाट अरण्य
साफ करण्यासाठी आणि अंगावर चालून आलेल्या हिंस्त्र श्वापदांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी
परशू नक्कीच कामाला आला असणार. अर्थात हे काम एकट्याचे नसणार, पण त्याने त्या गटाचे नेतृत्व
नक्कीच केले असणार.
पण परशूच्या काही मर्यादा आहेत, ते दूरवर फेकून मारता येणार नाही. त्यामूळे पळत जाणार्या आणि
दूरवरच्या, जनावराची शिकार करण्यासाठी, भाला जास्त उपयोगी.
शिवाचा त्रिशुळ त्यासाठी, भाल्यापेक्षाही प्रभावी. भाल्याने एकच जखम होणार पण त्रिशूळाने, तीन जखमा
होणार. कदाचित खास डिझाईनमूळे, ते फेकतानाही फिरत वगैरे असणार.
शिवाचे चित्र, धनुष्यासोबत क्वचितच दिसते. पण शिवधनुष्य हा शब्द रुढ असल्याने, त्या शस्त्राची निर्मिती /
संकल्पना देखील शिवाने, केली असेल का ?
धनुष्यबाण तर शिकारीसाठी, त्रिशूळापेक्षाही प्रभावी. तर परशूपेक्षा जास्त प्रभावी शस्त्रे असणारा, शिव हा
म्हणूनच, परशूरामाने गुरुस्थानी मानला असेल का ?
परशूरामाच्या हातून मातेची हत्या झाली, हे सत्य असावे. त्यानंतर त्याला फार अपराधी वाटले असावे, आणि
त्याने, पूर्वेकडे वाटचाल केली असावी. याला कारण असे, कि ब्रम्हपुत्र ( पुत्रा नाही. पुत्र चे स्त्रिलिंगी रुप पुत्रा
होत नाही. इंग्लिश स्पेलिंगचाही तो चुकीचा उच्चार आहे. शिवाय ती नदी नाही, नद आहे.) नदावर कुठेही
तीर्थक्षेत्र नाही. भारतातल्या बहुतेक गावात, जर नदी असेल तर तिचावर घाट असतो, किमान स्नान
करण्यासाठी एखादी ठराविक जागा असते, आणि तिला तीर्थक्षेत्राचा मान असतो.
ब्रम्हपुत्र च्या बाबतीत तसे नाही. त्याच्यात, तीर्थ म्हणून स्नान करायची प्रथा नाही. याचे स्वाभाविक कारण
असे कि, तीरावरून अंदाज आला नाही, तरी त्याची खोली आणि रुंदीही भयानक आहे. त्याच्यात लाल रंगाचे
पाणी, प्रचंड वेगात वहात असते. त्याच्या काठची माती भुसभुशीत आहे. नवखा माणूस, जर त्या प्रवाहात
शिरला तर तो बुडण्याची, वाहून जाण्याची शक्यता जास्त आहे.
पण सरळ सांगून लोक ऐकणार नाहीत, म्हणून या नियमाला परशुरामाच्या कथेची जोड दिली जाते. मातेच्या
रक्ताने माखलेला परशु, त्याने या प्रवाहात धुतला, म्हणून ते पाणी, अपवित्र. शिवाय ब्रम्हपुत्र चे दुसरे नाव,
लोहित असेही आहेच.
अर्थात याला एक बारीकसा उ:शापही आहेच. तिथेच परशुराम कुंड नावाचे तीर्थ आहे. आणि त्यात स्नान केले
तर, मातृॠणातून मुक्ती मिळते, अशी धारणा आहे.
आता कर्मभूमी कोकण, प्रत्यक्ष दुर्दैवी घटना घडली ते माहूर आणि प्रायश्चित्तासाठी आसाम, या मधे शिवाचा
प्रभाव असलेले क्षेत्र येते. आणि त्या भटकंतीमधे, कदाचित त्याचा, शिवाशी परिचय झाला असणार.
४) गीत संगीत
शिवाचा संबंध नृत्य गायन कलेशी लावला जातो. नटराज म्हणून जी मुद्रा आहे, ती स्थिर असली, तरी तिच्यात
सुंदर आकृतीबंध दिसतो. नर्तकाने ती मुद्रा साकार केली, कि आपोआप शरीराचा एक तोल, साधल्यासारखे
वाटते.
तांडव प्रकार, म्हणजे जोरकस तालावर केलेला एखादा नृत्यप्रकार असावा. आजही असम परिसरात जे बांबू
नृत्य केले जाते, त्यातला ताल तर जोरकस असतोच पण तो सादर करायला कमालीचे, कौशल्य लागते.
( मधुमति चित्रपटातल्या, लता, मन्ना डे च्या, बिछुआ गाण्यात शेवटी हा ताल, सलील चौधरींनी वापरलाय.
चित्रपटात जरी टिपर्या दाखवल्या असल्या, तरी तो ताल, असमीच आहे. ) या तालाची निर्मिती, शिवाने
केली असेल का ?
आजही प्रचलित असणार्या अनेक रागांचे श्रेय, शिवाला दिले पाहिजे. भैरव ( तू है मेरा प्रेम देवता, मोहे भूल गये
सावरीया ) शंकरा ( दे हे शिवा मोहे ऐसा वर, तूजसाठी शंकरा भिल्लीण मी झाले ) शिवरंजनी ( मेरे नैना सावन
भादो, बहुत दिन बीते ) मल्हार ( या रागाचे तर अनेक प्रकार आहे, मेघमल्हार, मियाँ मल्हार, सूर मल्हार,
गौड मल्हार, दूर्गा मल्हार, बैरागी मल्हार, रामदासी मल्हार.... ) या सर्व रागांच्या नावातच शिवाचे नाव आहे.
शिवाचे डमरू हे पण एक तालवाद्यच म्हणावे लागेल. हे सर्व संगीतप्रकार तर आजही लोकप्रिय आहेत.
५) पार्वती.
पार्वती, एक नि:संशय शूर स्त्री होती. तिने एखाद्या बलाढ्य रानरेड्याचा, एकटीने वध केला असावा. शिवाय
वेळप्रसंगी, समुहाचे संरक्षण देखील केले असावे. तिची किर्ती नक्कीच दूरवर पसरलेली असणार.
तिचे शिवावरचे प्रेम, त्यासाठी तिने केलेली मनधरणी, त्याचा अपमान झाल्याने तिने यज्ञात केलेले आत्मसमर्पण, त्यानंतर तिच्या शवाला डोक्यावर घेऊन, शिवाने केलेला विलाप, हे एक विलक्षण प्रेमकथेचे
घटक आहेत.
पण कल्पनाशक्ती खुंटते, ती तिच्या देहाचे, विष्णूने, सुदर्शनचक्राच्या आधारे केलेले तूकडे. ते जिथे पडले,
तिथे निर्माण झालेली, शक्तीस्थळे.. या कथाभागापुढे.
हि शक्तीस्थळे इतक्या दुरवर पसरलेली आहेत, कि तेवढ्या ठिकाणी, असे मृतदेहाचे तूकडे पडणे अशक्य आहे.
पण तिची किर्ती मात्र नक्कीच पोहोचली असावी. आणि तिच्या आठवणीप्रीत्यर्थ लोकांनी, या स्थानांची
निर्मिती, केली असावी.
तरीपण या कथाभागाचे थोडेफार साधर्म्य जाणवते ते, तिबेट परीसरात आजही प्रचलित असलेल्या, स्काय
बरीयल या प्रथेत. या स्काय बरीयल मधे, मृतदेहाचे तूकडे करून, आकाशात भिरकावले जातात. त्या परीसरातील शिकारी पक्षी, ते घेऊन जातात.
आपल्याला जरी हे वर्णन, क्रूर वाटत असले, तरी तिथल्या लोकांना, या प्रथेची सवय आहे. शिवाय ही प्रथा
पडण्यामागची, प्रॅक्टीकल कारणेही आहेत. तेवढ्या ऊंचीवर, विरळ हवेत, मृतदेह पुरण्यासाठी खड्डा खणणे
प्रचंड कष्टाचे आहे, शिवाय सरणासाठी लाकडेही उपलब्ध नसतात.
सध्या देहाचे तूकडे करण्यासाठी, कुर्हाड आणि हातोड्यासारखी अवजारे वापरतात, पण हेच काम, सुदर्शन चक्रासारख्या हत्याराने ( रोटरी ब्लेड ) लवकर करता येईल. तसे काही झाले असेल का ?
शिव पार्वतीसारख्या लोकप्रिय, कलासक्त, शूर युगुलाच्या बाबतीत दंतकथांची पुटे चढल्याने, त्यांचा मानवी
चेहरा हरवल्यासारखा वाटतो. त्या दोघांना तर आदीपुरुष आणि आदीमायेचा मान आहे.
आपल्या आधुनिक इतिहासातील दैवताला, छत्रपति शिवाजी महाराजांनादेखील, आपण शिवाचा अवतार मानतो.
या कथा म्हणजे पुटाचा ओवा वाटतात. ( पुटाचा ओवा, ओव्यावर लिंबाच्या रसात खललेया सैंधवाचे सात थर
देऊन करतात. ) होणारे रसायन, उत्कृष्ठ असले, तरी आतमधे ओवा आहे, असे म्हणण्याने, काय नुकसान होणार आहे ?
इथे मी लिहिलेय, ते केवळ माझा कल्पनाविलास आहे. याबाबतीत जर कुणी, काही वाचले असेल, तर मला
अवश्य संदर्भ द्या.
हा धागा धार्मिक नाही, कुणाच्याही धार्मिक भावना दूखवायचा, अर्थातच हेतू नाही. पण कुणी दूखवून घ्यायच्याच ठरवले, तर माझा नाईलाज आहे.
सध्या उपलब्ध माहितीनुसार
सध्या उपलब्ध माहितीनुसार पुराण कथांचे नवीन अर्थ अवश्य लागू शकतात. पण मला असं करायची गरज समजत नाही
असो, कालखंडाबाबत विकीवरुन मिळालेली माहिती:
आजच्या पेपरमधे सिंधुदुर्गात
आजच्या पेपरमधे सिंधुदुर्गात मालवणात कुडोपी येथे नवाश्मकाळातील कातळशिल्पे सापडल्याचे वृत्त आहे.
आशा करूया की या कातळशिल्पांना शेंदूर बिंदूर फासून करणी, जादूटोण्याच्या कथा पसरवून एक नवीन बाजार भरवला जाणार नाही.
ती शिल्पं नक्की कोणत्या
ती शिल्पं नक्की कोणत्या काळातली आहेत हे ठरवणं खूप अवघड आहे. नवाश्मयुगातील आणखी कुठलेच पुरावे कोकणात ठोसपणे मिळालेले नाहीत.

अर्थात शेंदूरबिंदूर बद्दल हजार हिस्से सहमत
दिनेश, मी दोन तीनदा लेख
दिनेश,
मी दोन तीनदा लेख वाचला. पण प्रयत्न करूनही तुम्ही सांगताय ते लॉजिक पटत नाहीये. उदा. बार्लीची खीर वगैरे. देवाला नैवेद्य दाखवताना आपल्याकडे ज्या गोष्टी उपलब्ध आहेत, त्या गोष्टींचा नैवेद्य दाखवला जातो ना? पूर्वी गो-धन हे म्हहत्वाचं धन असं मानलं जायचं तसंच मुबलक दूध दुभतं असल्याने 'खीर' हा ऑप्शन निवडला असेल का? त्याचा कैलास पर्वताशी संबंध नसावा असं मला वाटतं.
लॉजिक लावायचं म्हटलं तर कैलास पर्वत म्हणजे हिमालय ज्यावर हजारो वर्षांपूर्वी सामान्य माणसांसाठी चढाई करणे जवळपास अशक्यप्राय असायचे. असे ठिकाण जिथे सामान्य माणूस जाणे शक्य नाही, 'देवतांचे ठिकाण' म्हणून निवडले असण्याची शक्यता असेल का? पण अशा ठिकाणी रहाण्यासाठी शंकराची निवड का केली असावी? विष्णू अथवा ब्रम्हाची का नाही? गंगेचा उगम शंकराच्या मस्तकावरच्या जटेतून होतो या कथेमुळे? Anthropology आणि Mythology चे कुणी अभ्यासक असतील तर लिहीता का?
हो अंजली, तेच मला हवे होते.
हो अंजली, तेच मला हवे होते. एकतर संगीतासारखे आजही वापरात असलेले पुरावे आहेत, म्हणजे कुणीतरी मानव, याचा निर्माता असावाच. पण मग काही अमानवी वाटतील अशा कथा, कशा चिकटल्या, ते कळत नाही.
नीधप / वरदा... राजापूरला कातळावर एक मोठे कोरीव चित्र बघितल्याचे आठवतेय. त्याचा अर्थ लागला नव्हता.
त्याबद्दल काही माहिती आहे का ?
वाक्यावाक्यात किती ते
वाक्यावाक्यात किती ते अनावश्यक स्वल्पविराम! तसाच ठिकठिकाणी पहिल्याच्या जागी दुसरा उकार अन दुसरी वेलांटी आणि vice versa. याच एका लेखात नव्हे, तर सगळीकडेच. दिनेशदा, राग मानू नका पण खरोखरच रसभंग होतो वाचताना.. अनेक महिन्यापासून सांगायचे होते.
अतिशय खालच्या level ला येवून
अतिशय खालच्या level ला येवून कैच्या की लॉजिक लावून लिहिलेला लेख आहे . माहितीपटाच्या नाडी लागण्यापेक्षा आपल्या उच्च कोटीच्या योग्यांनी ,
संतांनी लिहिलेलं साहित्य का नाही वाचत तुम्ही . समुद्रमंथन हि काय प्रक्रिया आहे ह्याचा कधी शोध घ्यायचा प्रयत्न केला तर उत्तर सापडेलच कि .
लोकांना फार गूढ गोष्टी एकदम सांगून काळात नाहीत . त्यामुळे काहीतरी गोष्ट रचून त्यांना समजावून द्यावं लागतं . म्हणून पूर्वीच्या ऋषी मुनींनी अश्या कथा रचल्यात . पण पुढे त्याचा मुल संदर्भ जावून फक्त कथा तेवढ्या मागे उरल्या . समुद्रमंथन , भगीरथाने गंगेला पृथ्वीवर आणण ह्या कुंडलिनी जागृती आणि तिचा मुलाधारापासून सहस्त्रार चक्रापर्यंत चा प्रवास ह्याचं वर्णन आहे . कुंडलिनी मूलाधार चक्रात जागृत झाल्यावर हलाहल विष पिल्याप्रमाणे
साधकाची अवस्था होऊ शकते . तिच्यातून तो पार जातो तोच शिव्पाडला पोचू शकतो . तुम्ही शिव शक्ती ला सामान्य माणसांच्या level ला आणून ठेवलंत ?:राग:
हा लेख अध्यात्मातल्या
हा लेख अध्यात्मातल्या कुठल्याही गोष्टीची काहीही माहिती नसताना केवळ हवेतच कुठेही गोळ्या झाड्ल्यासारखा वाटतोय . अरेरे . सत्यापासून कलीयुगातले लोक किती दूर जात आहेत हे बघून वाईट वाटतं . सत्य समोर असतानाही आपल्याच मनाने काहीतरी लॉजिक लावून हे असं असेल आणि ते तसं असेल असं इमाजिन करून लोक जन्म अक्षरश: वाया घालवतात
नमस्कार सारिका३३३ ताई, ३
नमस्कार सारिका३३३ ताई,
३ वर्षांपुर्वी लिहिलेला लेख वाचलात म्हणून आभार.
मी ज्या लेव्हल ला आहे तिथूनच विचार करु शकतो, आणि आता जन्म वाया गेलाच आहे, त्याला काय करणार ? मानवी जन्म शेवटचा म्हणतात ना, म्हणजे आता गचकलो कि आटोपलाच कारभार.
तूमच्यासारख्या ज्ञानी लोकांनी, त्या गूढ गोष्टी सोप्या करून सांगायचे मनावर घेतले पाहिजे हो, म्हणजे मी सोडून बाकिचे तरी शिव्पाडला पोचू शकतील !
हॅप्पी जर्नी !
दिनेशदा,_/\_ उत्तराकरता.
दिनेशदा,_/\_ उत्तराकरता.
कारल्याचा मांडव, तांदळाचे धूण
कारल्याचा मांडव, तांदळाचे धूण <<< म्हणजे काय?
hey samznya karata aarya aani
hey samznya karata aarya aani dravid yanchi history aani culture chi study havi aahe
thodkyat shiv bharata(aashiya khanda) madhe dravid/sankh toliche pramukh hote, Daxa aaryache pramukh
समुद्रमंथन म्हणजे कदाचित त्या
समुद्रमंथन म्हणजे कदाचित त्या भागाचे ट्रेझर हंट असेल.
>> समुद्रमंथनाचा संबंध उत्तरायण आणि दक्षिणायन या भौगोलिक घटनांशी आहे आणि हे भौगोलिक ज्ञान कोणत्यातरी स्वरुपात जतन करावे यासाठी प्रतिकात्मक समुद्रमंथनाची कथा रचली गेली आहे.
संदर्भः "एक होतं देऊळ"- श्री. उदयन इंदुरकर.
piyu, he vishleshan chukicha
piyu, he vishleshan chukicha ahe. Asa arth darshavanara kuthalahi purava nahiye
interesting subject. Nicely
interesting subject. Nicely written. There are n number of possibilities when imagination of old era is concerned. Many resposes are very good.
दिनेशदा, सारिका३३३ यान्ना
दिनेशदा, सारिका३३३ यान्ना दिलेल्या उत्तराकरता _____/\____
पौराणिक काळातील काही संदर्भ
पौराणिक काळातील काही संदर्भ आपल्याला समजतील पटतील अश्या रितीने मांडण्याचा प्रयत्न केला तरी काहीजण डिफेंसिव्ह का होतात? चौकटीपेक्षा वेगळं असूच शकतं ना? बाकी दिनेशदा काही तर्क पटले.
Pages