कॅन्सर पेशंटकरता उपयुक्त माहिती

Submitted by मामी on 1 November, 2011 - 05:39

या धाग्यावर कॅन्सर पेशंट आणि त्यांचे नातेवाईक यांना उपयोगी पडणारी सर्व प्रकारची माहिती एकत्रित करता येईल.

* डॉक्टर्स व हॉस्पिटल्स
* सर्जरी झालेल्या आणि chemo सुरु असलेल्या रुग्णांनी घ्यायची काळजी
* आहार (तोंडाची चव गेलेली असते पण काहीतरी चविष्ट पण सकस साधे खावेसे वाटते)
* औषधे आणि सर्जरी साठी आर्थिक मदत करणाऱ्या संस्था
* कॅन्सरपेशंटसाठी उपयुक्त पुस्तके
* आधारगट
* इतर काही मदत

अशी सर्वसमावेशक चर्चा इथे अपेक्षित आहे.

या मुद्द्यांवर आलेली माहिती संकलित करून हेडरमध्ये साठवता येईल.

**************************************************************

हा धागा आधी केवळ कॅन्सर पेशंटकरता उपयोगी पुस्तकांकरता होता. वत्सलाने सुचवल्याप्रमाणे आता यावर कर्करोगाशी संबंधित सर्व प्रकारची माहिती मिळेल. या सुचनेकरता वत्सलाचे आभार.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी कॅन्सरयात्रा - संगीता वझे.
अजून काही पुस्तके मेडिकल कौन्सेलर सुचवतीलच. मे कौ शी बोलणे हा महत्वाचा मुद्दा आहे.
ब्रे कॅ सपोर्ट ग्रुप्स आहेत बहुतांश सगळ्या महत्वाच्या हॉस्पिटल्सना अलाइड. तिकडे जायला सांग.

हसरी किडनी- पद्मजा फाटक
कॅन्सर वर नाहीये पण वाचायलाच हवे. सकारात्मक विचारासाठी खूप उपयोगी ठरेल. उमेद वाढवेल.
अगदी नक्की वाचायला द्या.

मनश्री- सुमेध वडावाला रिसबूड
पुन्हा कॅन्सरवर नाहीये पण वरचेच वाक्य लागू पडते

माझा साक्षात्कारी हृदयरोग: डॉ अभय बंग
repeat

कॅन्सर माझा सांगाती- लेखकाचे नाव विसरले

Tuesdays with Morrie- Mitch Album मराठी अनुवाद सुद्धा उपलब्ध आहे.
वरचेच वाक्य repeat

इथे मायबोलीवर कोणीतरी लेख लिहीला होता कर्करोगाच्या अनुभवाचा. शोधुन दुवा देते.
त्यांना म्हणा घाबरू नका.

(मटामधून साभार)

कर्करोगावरील विजयाची अनोखी बखर :

पन्नाशी उलटलेल्या अनुपकुमार यांच्या मनात त्या काळात अशाच काहीशा भावना दाटल्या असतील. तो काळ त्यांच्यासाठी महाभयंकर होता. कॅन्सर या तीन अक्षरांनी त्यांचे आयुष्य उलटे-पालटे झाले. पण मनाचा निग्रह करीत ते समरांगणात उतरले आणि शत्रूची पाठ मातीला टेकली तेव्हाच त्यांनी उसंत घेतली. हेच द्वंद्व अनुपकुमार यांनी शब्दात मांडले ते 'द जॉय ऑफ कॅन्सर ' या पुस्तकात. माधुरी शानबाग यांनी त्याला मराठी रूप दिले. कर्करोगाचा स्पर्श झालेल्यांना धीर देणारे , या रोगाशी लढण्याची सामग्री त्यांना पुरवणारे असे हे पुस्तक आहे.

सारे काही छान चाललेले असताना कुमार यांना कॅन्सर झाल्याचे कळले. कॅन्सर फुफ्फुसाचा. तोही चवथ्या अवस्थेतला. उपचार फक्त केमोथेरेपीच. त्याचे भयंकर साइड इफेक्ट सहन करूनही जगण्याची शक्यता कमीच. असे असूनही अनुपकुमार यांनी उपचारांच्या जोडीला कमालीचा मनोनिग्रह आणि खास त्यांच्या सातकलमी युद्धनीतीला अनुसरून कॅन्सरशी लढा दिला. तो सुरू असतानाच कुमार अनुभव शब्दबद्ध करीत होते. त्यामुळे पुस्तकातील प्रत्येक शब्दाला स्वानुभवाचा भक्कम आधार आहे. या पुस्तकात रोगाची विस्तृत माहिती , संस्थांचे पत्ते अशी बरीच सामग्री आहे. केवळ कर्करोग्यांनी वा त्यांच्या नातलगांनी नव्हे तर प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी ही बखर आहे.

सहजसोप्या ह्रदयगोष्टी

कॅन्सरप्रमाणेच धडकी भरवणारा दुसरा आजार म्हणजे ह्रदयविकार. थेट जीवनमरणाशी संबंध येणाऱ्या या विकाराबाबत एकीकडे फारशी माहिती नाही तर दुसरीकडे असंख्य गैरसमज आहेत. ते दूर करणे ही फार आवश्यक गोष्ट आहे. हे पुस्तक त्या दृष्टीने उल्लेखनीय आहे. आंबडेर्कर यांना भेटलेले रुग्ण , त्यांच्या आजाराचे स्वरूप , त्यांच्याशी झालेल्या संवादातून प्रकट होणारी माहिती , असे या पुस्तकाचे साधारण स्वरूप आहे. गप्पागोष्टींच्या सोप्या शैलीतून वाचकांना माहिती मिळते.

आजीच्या बटव्याची आठवण

गेल्या काही वर्षांत आजी-आजोबा हे कुटुंबातील घटक हळुहळू पुसट होत आहेत. आपला सुरकुतलेला हात पाठीवरून प्रेमाने फिरवणारी आजी हरवली तसाच तिचा बटवाही. डॉ. विकास आणि डॉ. विनिता गोगटे यांचे ' डॉक्टरांकडे जाण्यापूवीर् ' हे पुस्तक त्या बटव्याची आठवण देणारे आहे. शीर्षकच पुस्तकाचे स्वरूप स्पष्ट करते. एखादा आजार झाल्याचे जाणवल्यानंतर डॉक्टरांकडे जाण्यापूवीर् कुठली काळजी घ्यावी , कुठली पथ्ये पाळावीत याची माहिती यात आहे.

ताणतणावांचे ताणेबाणे

आजचे आयुष्य प्रचंड धावपळीचे , गुंतागुंतीचे बनले आहे. या जीवनशैलीचा ' साइड इफेक्ट ' म्हणजे वाढते ताणतणाव , आणि त्यातून उद्भवणारे आजार. या बाबींची सोप्या शैलीतील चिकित्सा डॉ. यश वेलणकर यांच्या ' ताण-तणाव आणि आरोग्य ' या पुस्तिकेत आहे. मानसिक ताणतणावाबाबत डॉक्टरांना विचारलेल्या शंका आणि त्यांचे शंकानिरसन अशा शैलीतून हे ताणेबाणे उलगडत जातात.

डॉक्टरांचा संवाद

डॉ. शिरीष पटवर्धन यांचे ' अर्थार्जन कोणासाठी ? स्वत:साठी का डॉक्टरांसाठी ?' हे पुस्तक म्हणजे सामाजिक बांधिलकीच्या नात्याने वाचकांशी साधलेला संवाद आहे. रुग्णाला आजारातून बरे करणे हे डॉक्टरांचे कर्तव्य आहेच , पण त्यापेक्षा आजार दूरच कसे राहतील , याकडे लक्ष द्यावे , अशी डॉ. पटवर्धन यांची भूमिका आहे. हीच भूमिका पानोपानी जाणवते.

अलीकडेच प्रकाशित झालेली इतरही अनेक पुस्तके आरोग्याबाबत अधिक सजगता निर्माण करणारी आहेत. त्यांचा उल्लेख शेवटी केलाच आहे. गेल्या काही काळात मराठीत आरोग्यविषयक पुस्तकांचे प्रमाण वाढले असून अनेक जाणकार डॉक्टर आपले अनुभव आणि ज्ञान सोप्या भाषेत वाचकांपर्यंत नेऊ लागले आहेत , ही आनंदाची बाब आहे.

- राजीव काळे

द जॉय ऑफ कॅन्सर : अनुप कुमार , अनुवाद : माधुरी शानबाग. मेहता पब्लिशिंग हाऊस , पुणे. पाने : 180, किंमत : 150 रुपये.

ह्रदयगोष्टी: डॉ. शेखर आंबडेर्कर , मॅजेस्टिक प्रकाशन , मुंबई. पाने : 210, किंमत : 150 रुपये.

डॉक्टरांकडे जाण्यापूवीर् : डॉ. विकास गोगटे-डॉ. विनिता गोगटे. मेहता पब्लिशिंग हाऊस , पुणे. पाने : 404, किंमत : 250 रुपये.

ताण-तणाव आणि आरोग्य : डॉ. यश वेलणकर. निरामय प्रकाशन , सिंधुदुर्ग. पाने : 52, किंमत : 40 रुपये.

आरोग्य गाथा : निरंजन घाटे , मधुराज पब्लिकेशन्स , पुणे. पाने : 130, किंमत : 100 रुपये.

औषधाविना आरोग्य : डॉ. ह. वि. सरदेसाई. श्रीविद्या प्रकाशन , पुणे. पाने : 37, किंमत : 50 रुपये.

क्षयरोग रोखण्यासाठी : डॉ. रवींद गुरव. रुचिरा प्रकाशन , मुंबई. पाने : 91, किंमत : 40 रुपये.

एड्स-कथा आणि व्यथा : डॉ. दीप्ती डोणगावकर , ग्रंथाली ज्ञानयज्ञ , मुंबई. पाने : 74, किंमत : 40 रुपये.

विषाणूंबद्दल : डॉ. रंजना देशमुख , ग्रंथाली ज्ञानयज्ञ , मुंबई. पाने : 77, किंमत : 45 रुपये.

आयुवेर्दप्रधान वैद्यक संशोधन : काल , आज व उद्या : वैद्य खडीवाले , प्रकाशक : शरद भिडे , पुणे. पाने : 48, किंमत : 25 रुपये.

ओळख कुटुंब कल्याणाची : डॉ. उमिर्ला चाकूरकर , साकेत प्रकाशन , औरंगाबाद , पाने : 58, किंमत : 45 रुपये

सर्वांना अनेकानेक धन्यवाद. किती लगेच्च उत्तरं मिळाली मला. माझ्या मैत्रिणीला मी म्हटलच होतं की मायबोलीवर प्रश्न टाकायचाच अवकाश की मला लगेच अनेक पुस्तकांची नावं मिळतील. देते मी तिला. तिच्या सासूबाईंकरता हवी आहेत. पुन्हा एकवार धन्यवाद, मित्रमैत्रिणींनो.

मामी, माझी मावसवहीनी नुकतीच या आजारातून बाहेर पडली. ती अगदी तरुण वयात या विकाराला बळी पडली, पण तिची मानसिक खंबीरता अतुलनीय अशी होती. ती टाटा मधील उपचाराबरोबर काही आयुर्वेदीक उपचार पण घेते. हवा असल्यास मी तिचा फोन नंबर देऊ शकेन.

दिनेशदा, धन्यवाद. मी नक्कीच मैत्रिणीला तुमचा निरोप कळवीन. त्या बाई जरा या पहिल्या धक्क्यातून बाहेर येऊ द्यात.

द सिक्रेट.. याचे मराठी भाषाम्तर रहस्य.. त्यात मोठ्या आजारांबद्दएक, आरोग्याबद्दल एक टॉपिक आहे.

१. पेशंटला वाचनाची आवड आहे का?
२. बर्‍याचदा पेशंतसोबत त्याच्या घरात रहाणार्‍या लोकांचे शिक्षण / प्रबोधन करणे जास्त गरजेचे असते.
३. कॅन्सर संबंधी योग्य ती माहिती तिच्या डॉ. नी दिलेलीच असेल. परत परत तेच तेच वाचायला लावण्या पेक्षा जिंदगी कितनी अच्छी है असे विचार तयार करणारे काही वाचले तर जास्त चांगला परिणाम साधतो असे वाटते. शेवटी Life is a fatal disease, which is congenital and gets worse as u grow up..
४. माझं नावच इब्लिस आहे. तेव्हा वेगळा नजरिया मांडण्याची मला मुभा असावी.

माझ्या २ आज्यांना १०-१२ वर्षापूर्वी वेगवेगळ्या प्रकारचे (पॅन्क्रीअ‍ॅज आणि बहुधा इंटेस्टाइन) कॅन्सर डिटेक्ट झाले होते. वय साधारण ७० च्या आसपास. घरच्या डॉक्टर्सनी सुद्धा सांगितलं होतं की काही खरं नाही शिवाय वयामुळे इतकी कठीण ऑपरेशन्स झेपतील का नाही ही शंकाही होती. पण दोन्ही आज्यांची विलपॉवर जबरदस्त. दोघींनी ऑपरेशन, केमोथेरपी करुन घ्यायला अजिबात कटकट केली नाही. नंतरही प्राणायाम, गायत्रीमंत्र वगैरे सुरु ठेवले. आणि टाटाच्या डॉक्टरांनाही आश्चर्यचकित करत त्यातनं बाहेर आल्या. त्या दोघी अनेकांसाठी रोल मॉडेल्स आहेत.
एका मैत्रिणीच्या आईला २ वर्षापूर्वी ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला. बर्‍याच खचल्या होत्या. मैत्रिण माझ्या आजीची अगदी भक्त आहे. तिनी तिच्या आईला सांगितलं की अजिबात निगेटीव्ह विचार मनात आणू नकोस. पण त्यांना ते जमेना. मग "द सिक्रेट" आणून वाचायला लावलं. समहाऊ त्यांना ते फारच पटलं. आणि त्यांनी ते अगदी मनापासून फॉलो केलं असावं. कारण त्यांच्याही डॉक्टरांनी सांगितलं की अपेक्षेपेक्षा शरीर फार चांगला प्रतिसाद देतंय ट्रीटमेंटला आणि ७ च्या ऐवजी ४ रेडिएशन्स पुरतील. त्या अजूनही अधनंमधनं सिक्रेट वाचत असतात.

टीप: १. हे अगदी वैयक्तीक अनुभव आहेत. त्यावरुन आपण काहीही जनरलाइज करु शकत नाही याची मला कल्पना आहे.
२. द सिक्रेट अनेकांना हॉगवॉश वाटते. पण कुठल्या मनस्थितीत कुणाला कशाचा आधार वाटेल हे आपण ठरवू शकत नाही. जर त्याने पॉझिटिव्ह थिंकींग वाढत असेल तर i give it thumbs up! माझ्या कॅन्सर सर्जन काकाच्या मते पॉझिटीव्ह थिंकींग मुळे कॅन्सर पेशंट्सच्या बरे होण्याचा रेट बराच वाढतो. त्यामुळे पेशंटला ज्यामुळे पॉजिटिव्ह वाटेल ते करु द्यावे. कुणाला देवधर्म-पोथी-सिक्रेट करुन वाटेल, कुणाला बागकाम्/संगीत्/गप्पा याने वाटेल. त्यांना "ह्याने काय होणार आहे?" वगैरे बुद्धीवादी विचार फोर्स करु नयेत, हे मला पटायला लागलंय. Happy

पॉझिटीव्ह थिंकींग मुळे कॅन्सर पेशंट्सच्या बरे होण्याचा रेट बराच वाढतो.>> +१.
मामी,
ह्यातनं लवकर बरं होण्यासाठी त्यांना सदिच्छा.
...कुठल्याही प्रश्नाला इतक्या पटकन उत्तरं माबोवरच मिळू शकतात्, हे मात्र वेळोवेळी पटतं. Happy

अन्कॅनी, कर्कवृत्तची लिन्क दिल्याबद्दल खूप धन्यवाद.
कस्सला पॉझिटिव अप्रोच आहे त्या काकूंचा ! __/\__

हा धागा आधी केवळ कॅन्सर पेशंटकरता उपयोगी पुस्तकांकरता होता. वत्सलाने सुचवल्याप्रमाणे आता यावर कर्करोगाशी संबंधित सर्व प्रकारची माहिती मिळेल. या सुचनेकरता वत्सलाचे आभार.

धन्यवाद मामी.

ओळखीतल्या एका स्त्रीला कर्करोगाचे निदान झाले आहे. येत्या काही दिवसांत त्यांच्यावर शस्त्रक्रिया होऊन पुढील औषधोपचार सुरु होतील.

औषधोपचाराचा नक्की खर्च किती होईल हे आत्ता सांगणे कठीण आहे पण साधारण रुपये ५ लाख + एव्हढा खर्च अपेक्षित आहे. तुमच्यापैकी कोणाला स्वस्त किंमतीत औषधे देणार्‍या पुण्यातील संस्था किंवा दवाखाने यांची माहिती असल्यास कृपया येथे लिहावी.

त्यांना आत्ता, शस्त्रक्रिया झाल्यानंतर आणि केमो सुरु असताना काय काय पदार्थ देता येतील? सकस, साधे पण रुचकर असे पदार्थ सुचवा. जेणेकरुन केमो दरम्यान जेवणाची इच्छा न होणे, तोंडाला चव नसणे, पोट खराब होणे अशा वेळी त्यांना (त्यांच्या कुटुंबियांना) काहीतरी रुचकर करता येइल.

माझ्या आईला काही वर्षांपुर्वी कर्करोगाशी सामना द्यावा लागला. ती त्यातून बरी झाली. तिच्या उपचारादरम्यान पुढील गोष्टी जाणवल्या/ कुटुंबियांनी केल्या:

१. ती स्वतः आणि सगळे कुटुंबिय खुप सकारात्मक होते. ती खुप धैर्यवान आहे.
२. तिचा देवावर असलेला दृढ विश्वास.
३. मित्रमंडळी आणि नातेवाईकांनी केलेली मदत (हीआम्ही कधीच विसरु शकणार नाही!)
४. मदतीचे खुप हात होते. त्याचे नियोजन भावाने खुप व्यवस्थितरित्या केले. जे नातेवाईक किंवा मित्रमंडळी दवाखान्यात (सर्जरीनंतर आणि केमो उपचारासाठी दवाखान्यात असताना)आईसोबत राहणार/थांबणार होते त्यांचे रोस्टर तयार केले होते. त्यामुळे फक्त काही लोकांवर ताण न येता तो विभागला गेला.
५. तिने DXN medicines ही alternative medicines तिच्या डॉक्टरांच्या परवानगीने घेतली. ती औषधेही तिने मनोभावे घेतली.
६. या सगळ्या काळात ती रोज एक-दोन आवळे खायची. (मोरावळा)

ती बरी झाल्यानंतर वडलांनाही ब्लॅडर कॅन्सर झाला होता. त्यांचे ब्लॅडर काढले आहे. देवाच्या कृपेने त्यांना नंतर काही औषधोपचार करावे लागले नाहीत.

वरील माहिती केवळ एक अनुभव म्हणून लिहीली आहे. तुमच्यापैकी कोणाला या संदर्भात काही सकारात्मक माहिती द्यायची असल्यास नक्की लिहा.

माझ्या बहिणीला ओवरीजचा कॅन्सर दोनवर्षांपुर्वी झाला होता. डॉ सोहोनींची ट्रीटमेंट घेतली होती. तिच्या नाती मुलाची मुलगी ५ महिन्याची व मुलीची ९ महिन्याची होती. मला ह्या नातींना शाळेच्या गणवेशात बघायचे आहे ह्या विचाराने तिने ही परीक्षा पास केली. त्याचदरम्यान तिला इथे सदस्य केलं. ती नियमीत माबोची वाचक आहे तिलाच इथे लिहायला सांगणार आहे.. खास करुन आहाराविषयी कारण तिला केमोचा त्रास झाला नाही आणि वेळेत सायकल पूर्ण झाल्या...

मंजु, नक्की सांगा त्यांना लिहायला.

आईलाही केमोचा त्रास झाला नाही आणि वेळेत सायकल्स पुर्ण झाल्या हे वर लिहायचेच राहिले Happy

जाई, लिंकबद्दल धन्यवाद.