पाव किलो कोबी
चायनीज शेव - मला वाटले होते हे मैद्याचे असेल. पण पाकिटावर चक्क तांदळाची चकली असे लिहिले आहे.
चटणीसाठी - लाल टोम्याटोचा कीस , कांद्याचा कीस , शेजवान चटणी , टोम्याटो सॉस , थोडे तेल , मीठ , लाल तिखट
आधी चटणी करुन घ्यावी. चार चमचे तेल गरम करुन त्यात कांद्याचा कीस , टोम्याटोचा कीस , शेजवान चटणी , सॉस , तिखट व मीठ घालुन परतावे. लालभडक मस्त चटणी तयार होते.
नुसतीच शेजवान चटणी च सॉस मिसळुनही दाट व तिखट चटणी होऊ शकेल.
कोबी किसून घ्यावा. त्यात चायनेज शेव व चटणी मिसळावी. चायनीज भेळ तयार.
हा प्रकार सर्वात आधी मी पाच वर्षापुर्वी खाल्ला होता. परेल व एल्फिस्टन जोडणार्या ब्रिजवर एक माणुस पाच रुपये प्लेट विकायचा. तेंव्हा खूप गंमत वाटली होती.
हल्ली साध्या भेळपेक्षा याचीच दुकाने दिसतात.
खूप ठिकाणी खाल्ले. पण चटणीचा फॉर्मुला अजुन समजलेला नाही. ही चटणी मी मनानेच करुन पाहिली.
छान दिसतीय की. निदान या
छान दिसतीय की. निदान या निमीत्तने तरी लहान मुले कोबीसारख्या उग्र भाज्या खातील. मी कधी खाल्लेली नाहीये, त्यामुळे चव माहीत नाही. पण कोबीबरोबर लाम्बट चिरलेला कान्दा, भाजलेले शे. दाणे, बरे वाटतील आणी कोबी किसण्या ऐवजी बारीक लाम्बट चिरावा, हक्का न्युडल्स साठी चिरतो तसा. करुन बघता येईल.
मस्त लागते ही भेळ. कोबीबरोबर
मस्त लागते ही भेळ. कोबीबरोबर गाजर आणि सिमला मिर्च जुलिएन चिरुन घ्यावी. छान चव येते.
मला ती शेव हक्का नुडल्सची वाटलेली. तांद़ळाची असेल तर घरी करता येईल.
मे महिन्याच्या सुट्टीत मी हका नुडल्स तळून मोठ्या डब्यात भरुन ठेवलेले आणि चटणी फ्रिजमध्ये ठेवलेली. दोन दिवसात चटणी झाली सगळ्याची.
फक्त मी घरात नसताना ते जुलिएन कापायचे कसे इथे घरची गाडी अडली होती. 
करायला सोप्पी वाटतिय व दिसतिय
करायला सोप्पी वाटतिय व दिसतिय पण छान करुन बघनार.
हो रश्मी. कोबी बारीक कापून
हो रश्मी. कोबी बारीक कापून घ्यायचा असतो.
त्या चटणीचीच कमाल असते,
त्या चटणीचीच कमाल असते, चटकदार असते, चटक लागते. बाकी असते काय तर शेव आणि कोबी. या व्यतिरीक्त काहीही घालाल तर पदार्थ बिघडेलच. असतेही स्वस्त. १० रुपयांच्या आसपास. त्यामुळे गल्लोगल्ली मिळते. चायनीजच्या हॉटेलात/गाडीवर जाऊन चायनीज भेल मागाल तर तो जरा वेगळा प्रकार असतो.
एक लहानपणीची आठवण आठवली.
दहा-बारा वर्षांपूर्वी, रस्त्यावरच्या चायनीज गाड्यांचे अप्रूप असायच्या शालेय वयात मित्राकडे रात्रीचा अभ्यास करायला जायचो, तेव्हा त्याच्या बिल्डींगखाली ओळखीची एक गाडी लागायची. रात्री गाडी बंद करताना आम्ही त्याच्याकडे फुकटात चरायला जायचो. त्याच्या स्टॉकमध्ये उरलेसुरले काहीबाही एका कढाईत मिसळून द्यायचा.... ती आयुष्यात खाल्लेली पैली चायनीज भेळ
काही बदल केले .. १. कोबी
काही बदल केले ..
१. कोबी बारीक चिरला.
२. तेलात फक्त शेजवान चटणी व सॉस घाल्य्न परतून चटणी केली.
३. शेव व कोबी मिश्रणात चटणीबरोबर तिखट पूड व मीठ घातले.
४. डाळिंबाचे दाणे व सिमला मिर्ची बारीक करुन घातली.
अगदी मस्त
छान दिसतोय फोटो व रेसिपी.
छान दिसतोय फोटो व रेसिपी. सिमला मिर्ची कच्चीच घ्यायची का? कांदा नाही घालत?
फारच आवडता पदार्थ आहे. इथे ती चायनीझ शेव कुठे मिळेल माहीत नाही पण
भारतात आल्यावर गाडीवरच खावा लागेल.
सिमला मिर्ची कच्ची चिरुन
सिमला मिर्ची कच्ची चिरुन घातली.
हि भेळ चवीला छानच लागते. फक्त
हि भेळ चवीला छानच लागते. फक्त आमच्या पुण्यात ती चायनीज शेव मीळत नाही. मी बर्याच ठिकाणी विचारले. डेक्कनच्या आसपास कुठे मिळते ते कुणाला माहित असेल तर प्लिज सांगा.
चायनिज भेळ एकदाच खाल्ली आहे
चायनिज भेळ एकदाच खाल्ली आहे गेल्यावर्षीच्या बांद्रा एक्स्पोमध्ये. सोबत असलेल्या मायबोलीकरणीनेही पहिल्यांदाच खाल्ली होती. एकदम चटकदार होती. रंग मात्र लाल भडक होता. तो रंग पाहून घ्यावी की नाही असा विचार एकदा मनात आला होता, न जाणो कसला तरी रंग टाकलेला असायचा. पण होऊन जाऊदे...म्हणत घेऊन खाल्ली दोघींनी
हो. तीच ही लालभडक भेळ
हो. तीच ही लालभडक भेळ
वेदिका! इथे चॉउ मिन नुडल
वेदिका! इथे चॉउ मिन नुडल मिळतात (कुठल्याही रेग्युलर स्तोअर मधे एशिय्न आयल मधे)आपल्या शेवेच्या जवळजाणारी चव असते, मला ब्रॅन्ड आता आठवत नाही पण नेक्ष्ट टाइम नोट करुन आणेल
थॅन्क्स प्राजक्ता! मीही शोधते
थॅन्क्स प्राजक्ता! मीही शोधते आता ग्रोसरीला जाईन तेव्हा
तुला ब्रॅन्ड मिळाला तर नक्की सांग.
वेदिका हा बघ मिळाला, हाच डबा
वेदिका हा बघ मिळाला, हाच डबा आणला होता
वा! आता खूप छान दिसतीय भेळ.
वा! आता खूप छान दिसतीय भेळ. इथे चायनीज न्युडल्स ( लहान मुलान्साठी ते कुरकुरे असतात तसे लाम्बट तळलेली शेव मिळते) पाकिटात कुठेही मिळतात. ते आणुन करेन.
अश्विनी ते रन्ग घालत असतील चटणीत. किन्वा शेजवान सॉस करताना सुकी लाल मिर्ची भिजवुन वाटतात त्याचा रन्गही असेल. पण चायनीज पदार्थान्विषयी सान्गता येत नाही.
अश्विनी ते रन्ग घालत असतील
अश्विनी ते रन्ग घालत असतील चटणीत>>>>>> हो घालतात.आमच्याकडे स्टेशनला चायनीज भजी विकणारी बाई,आमच्या वनिताच्या ओळखीची असल्यामुळे तिने सांगितली रेसिपी सांगितली होती.
गल्लोगल्ली मिळणारी स्वस्त
गल्लोगल्ली मिळणारी स्वस्त लालभडक चायनीज भेळ वा तत्सम चायनीज पदार्थ आरोग्याला अतिशय घातक असतात.
गल्लोगल्ली मिळणारी स्वस्त
गल्लोगल्ली मिळणारी स्वस्त लालभडक चायनीज भेळ वा तत्सम चायनीज पदार्थ आरोग्याला अतिशय घातक असतात.>>> +१
रश्मी, तो लाल रंग तिखटाचा वाटतच नव्हता.
हो. म्हणुनच घरी केले. रंग
हो. म्हणुनच घरी केले. रंग वापरला नाही
गुड बॉय.
गुड बॉय.
गुड ( काउ) बॉय
गुड ( काउ) बॉय
धन्यवाद प्राजक्ता ती रोडसाईड
धन्यवाद प्राजक्ता
ती रोडसाईड गाडीवरची चायनीज भेळ एक प्लेट ४-५ जणांत मिळून घ्यावी. चमचाभर खावी. पूर्ण प्लेट खाल्ली तर नक्की जळजळ, अॅसिडिटी होणार. त्यापेक्षा अर्थात घरी करणं कधीही सेफ.
गल्लोगल्ली मिळणारी स्वस्त
गल्लोगल्ली मिळणारी स्वस्त लालभडक चायनीज भेळ वा तत्सम चायनीज पदार्थ आरोग्याला अतिशय घातक असतात. >>>>>>>>>>१००% सहमत.
स.प समोरच्या गोकुळ मधे
स.प समोरच्या गोकुळ मधे कॉलेजची तीनही वर्श चायनीज भेळ खाल्ली आहे.नंतर ते एस.पीज बिर्याणी समोर शिफ्ट झाल.आता आहे की नाही माहीत नाही.पाहायला हव.तेव्हा फक्त २० -२५ रु ला मिळायची.३-४ जण आरामात खाऊ शकतील एवढी क्वांटीटी.
साधना, हाका नूडल्स उकडून घेउन
साधना, हाका नूडल्स उकडून घेउन मग तळायच्या का?
काउबॉय हे छान आहे. अहो तशीच एक शेजवान इडली देखील मिळते. कांद्याच्या पातीचे तुक्डे पण फिट होतील. सध्या चायनीज साठी कापलेल्या भाज्या रेडी मिळतात ते पॅकेट चालेल. मी बिगबास्केट. कॉम वरून घरपोच मागवते. बाहेरची खूपच स्पायसी असल्याने खात नाही. व डेंजर पण वाटते पण घरी बनवून खाता येइल. तिखट अॅडजस्ट करून.
नाही. कच्च्या नूडल्स चालतील
नाही. कच्च्या नूडल्स चालतील बहुतेक
अरे ह्याची एक गोड व्हर्जन पण
अरे ह्याची एक गोड व्हर्जन पण आहे हनी सेसमी नूडल्स. तळीव नूडल्स, वरून मध व तील शिंपडायचे. व मग व्हॅनिला आइसक्रीम च्या स्कूपवर घालून द्यायचे. फार पतल्या नूडल्स नसाव्यात. फेटुचीनी साइजच्या फिट होतील. अगदी कमी कटकटीचे पण मस्त स्वीट आहे. मौ गार आइसक्रीम आणि क्रंची नूडल्स सेसमी.