_एक क्रॅनबेर्यांचं पाकीट (१२ औंसाचं) (किंवा ४ मोठे-मोठे टोमॅटो)
_१०-१२ बिया काढलेले खजूर
_एक मूठभर हिरवे बेदाणे
_अर्धा कप साखर (४ औंस)
_कढीपत्ता एक पान (एका पानाला असलेले सर्व पानुटले)
_अर्धा इंच आलं
_३-४ हिरव्या मिरच्या
_१ मसाल्याचा चमचा भरून जिरा पावडर
_१ मसाल्याचा चमचा पंचफोरन
_मीठ
_फोडणीसाठी तेल
साडेतीनक्रॅनबेरीमुहुर्तांपैकी राहिलेला अर्धा साधते आहे
टोमॅटो/क्रॅनबेर्या, मिरच्या, कढीपत्ता धुऊन पुसून कोरडा करून घ्यावा. टोमॅटो वापरणार असलात तर टोमॅटोंच्या फोडी करून घ्याव्यात.
एका कढईत २ चमचे तेल गरम करून त्यात कढीपत्ता, मिरच्या आणि आलं घालावं. लगेचच टोमॅटोच्या फोडी किंवा क्रॅनबेर्या घालाव्यात आणि नीट हालवून घ्यावं. हे मिश्रण जरा शिजायला आलं की त्यात बेदाणे, खजूर, मीठ, जिर्याची पावडर घालावी. सगळं मऊ शिजलं की गॅस बंद करावा आणि साखर घालून नीट हालवून घ्यावं. हे मिश्रण कोमट झालं की एस (S) आकाराचं ब्लेड लावून फूड प्रोसेसरमध्ये फिरवून घ्यावं. जरा खरबरीत चटणी झाली पाहिजे.
एका कढईत २ चमचे तेल गरम करून त्यात पंचफोरन टाकावं. फोडणी तडतडली की चटणीवर घालून नीट हालवून घ्यावं.
_टोमॅटो खजूर खट्टा नावाची चटणी माझ्या ओरिया मैत्रिणीकडे नेहमी खाते. तिला आपला क्रॅनबेरी सॉस चाखायला दिला तर बदल्यात क्रॅनबेरी खट्टाचं सँपल मिळालं. दोन्ही चटण्या चवीला एकदम मस्त आहेत.
_इथे अशी कृती आधीच कुणी दिली असल्यास कृपया सांगणेचे करावे.
फोटो नाही का? मस्त लागत असेल.
फोटो नाही का? मस्त लागत असेल.
मी केली चटणी की टाकेन फोटो
मी केली चटणी की टाकेन फोटो
सध्या फक्त सँपल आवडलं म्हणून रेसिपी मागून घेतली आहे.
इथे बंगाल्यांतही अशीच खजूर
इथे बंगाल्यांतही अशीच खजूर चटणी करतात. फक्त मिक्सर वापरत नाहीत. शिवाय साखरेऐवजी रसगुल्ल्याचा पाक वापरतात. अर्थात वरदातै जास्त प्रकाश टाकू शकतील.
मस्त आयड्या. वाटली नाही
मस्त आयड्या. वाटली नाही (म्हणजे मिक्सरमधे :P) तरी छान लागेल बहुधा - पिकलसारखी.
(सगळ्यांना सीझन संपल्यावर रेसिप्या सुचतायत! :P)
वाटली नाही (म्हणजे मिक्सरमधे)
वाटली नाही (म्हणजे मिक्सरमधे)
वर्जिनल रेसिपीमध्ये मिक्सर नाही असं मैत्रिण म्हणाली असं आवटीबाई म्हणाल्या.
आमच्याकडे पण टोमॅटोची
आमच्याकडे पण टोमॅटोची 'टोमॅटो खटा'- ( ओडिशा रेसिपी) या नावानेच चटणी करतात. याचंच थोडं व्हेरिएशन आहे. त्यातही खजुर असतातच ,बेदाणे मात्र नसतात.
फोडणी सुरुवातीलाच करुन त्यातच पंचफोरन ( फुटणं) , मिरच्या, कडीपत्ता, आलं आणि लसुण ठेचुन घालतात. टोमॅटो बारिक चिरुन, खजुर घालतात. सगळं शिजलं की मीठ आणि गुळ. आणि सर्वात शेवटी मेथी भाजुन तिची पुड ( चमचाभर) टाकुन गॅस बंद करतात. मिक्सरला लावत नाहीत.
मस्तच लागते
आणि झटपट होते.