१ पाकीट ताज्या क्रॅनबेरीज
२ मध्यम कांदे (किसून)
१ चमचा तिखट
१ वाटी गुळ
चवीप्रमाणे मिठ
फोडणीसाठी मेथ्यांचे दाणे, हिंग आणि तेल (ऐच्छिक)
१. क्रॅनबेर्या धुवून, निथळवून घ्याव्या.
२. एका खोलगट भांड्यात क्रॅनबेर्या घालून मध्यम आचेवर ठेऊन द्याव्या.
३. थोड्यावेळाने त्या मऊ होऊन फुटायला लागल्या की डावाने किंवा मॅशरने घोटत रहावं.
४. त्याच्या लगदा तयार झाला की गॅस बंद करून त्यात किसलेला कांदा, गुळ, तिखट आणि मिठ घालून चांगल ढवळावं. कांदा शिजवायचा नाहीये. त्यामुळे गॅसवरून उतरवून मगच कांदा घालावा.
५. गुळ विरघळला की लगेच खाता येतं. पण मुरल्यावर दुसर्यादिवशी जास्त चांगलं लागतं.
६. पाहिजे असेल तर गार झाल्यावर वरून तेल, हिंग आणि मेथ्यांची फोडणी द्यावी.
पोळी, ब्रेड, भात कशाबरोबरही छान लागतं.
स्वातीच्या रेसिपीने क्रॅनबेरी सॉस करून पाहिला. तो अगदी मेथांब्यासारखा लागला. त्यामुळे कैरी कांदा लोणच्यात कैरीच्या जागी क्रॅनबेरी घालून प्रयोग करून बघायचं ठरवलं. त्यात कैरी कच्ची घालतात. पण क्रॅनबेर्या कच्च्या खाणं शक्य नसल्याने त्या शिजवून लगदा करून मग त्यात बाकीचे पदार्थ घातले. (कोणी कच्चा क्रॅनबेरीचा करून पाहिलं तर खाता आलं का ते सांगा). मेथ्यांची फोडणी दिली नाही तरी चालेल. फ्रिजमध्ये आठवडाभर टिकू शकेल पण आमचं दोन दिवसातच संपलं.
कांदा कैरी खूप आवडते त्यामुळे
कांदा कैरी खूप आवडते त्यामुळे करुन बघेन! कांदा न शिजवता आठवडाभर टिकेल का?
भा. प्र. : क्रॅनबेरीमधे बिया नसतात का?
kachya cranberry khayala
kachya cranberry khayala avadataat. tyachya barik fodi kelyaki murun chan lagel i guess. crunchy pan rahil kadachit.
लागतात का चांगल्या ? मी
लागतात का चांगल्या ? मी खाल्ल्या त्या फारच जास्त आंबट, तुरट होत्या.. ! त्यामुळे त्या शिजवून घेतल्या..
जिज्ञासा.. नसतात बिया.. म्हणजे निदान लागत तरी नाहीत..
मस्त पाकृ, अडमा हे व्हेरिएशन
मस्त पाकृ, अडमा हे व्हेरिएशन करून पाहायला हवं.
जिज्ञासा, बिया अगदीच छोट्या असतात.
क्रनबेरी कुठे मिळेल हो ..
क्रनबेरी कुठे मिळेल हो .. तालुक्याचा बाजारात विचारला तर हसाय लागलेत ...
छान प्रकार. ड्राय क्रॅनबेरीचा
छान प्रकार.
ड्राय क्रॅनबेरीचा चांगला होईल असे वाटतेय.
मी कधी खाल्ल नाहीये
मी कधी खाल्ल नाहीये कैरी-कांदा लोणचं. त्यामुळे क्रॅनबेरीज घालून कसं लागेल अंदाज येत नाहीये. फोटो टाक की.
सिंडी, क्रॅनबेरी सॉससारखच
सिंडी, क्रॅनबेरी सॉससारखच दिसतं.. फार काही वेगळं नाही.. तिथले फोटो बघून घे ह्याचे समजून..
ड्राय क्रॅनबेरीचा चांगला होईल असे वाटतेय >>> म्हणजे ? फ्रोजन का? की ड्राय वेगळ्या? इथे कधी पाहिल्या नाहीत.. आता शोधेन..
बर्बर. ड्राइड क्रॅनबेरीज
बर्बर.
ड्राइड क्रॅनबेरीज (क्रेझिन्स) मिळतात इथे ग्रॉसरी स्टोअरमध्ये. ट्रेलमिक्समध्ये आणि सॅलडबारवर हमखास असतात.
पण त्या साखरेत घोळवलेल्या
पण त्या साखरेत घोळवलेल्या असतात ना?
छान!!पराग, मी नेहमी कच्च्या
छान!!पराग, मी नेहमी कच्च्या क्रॅनबेरीचं लोणचं करते. मस्त लागतं. टाकते रेसिपी.
ओह मस्तच! जरा आधी नाही
ओह मस्तच!
जरा आधी नाही लिहायचीस?!
मस्तं रेस्पी. करून बघते. मी
मस्तं रेस्पी. करून बघते. मी यासाठी (पुन्हा एकदा) फ्रोझन क्रॅनबेर्या आणल्यात.
ताज्या मिळेनाशा झाल्यात का
ताज्या मिळेनाशा झाल्यात का मृण? आमच्याकडे अजून मिळत आहेत. मी थोडा आणखी सॉस करण्यासाठी कालच आणल्या
प्रोड्यूस सेक्शनमध्ये नाही
प्रोड्यूस सेक्शनमध्ये नाही दिसल्या. तिथे काम करणार्यांना विचारायला थांबले नाही. फार्मर्स मार्केटात फ्रेश नक्की मिळतील.
मला कच्चा कांदा घालायची
मला कच्चा कांदा घालायची कल्पना जरा नको वाटतेय.. फार आवडत नसल्यामुळे.
मस्त .. हा क्रॅनबेरीचा तक्कू
मस्त ..
हा क्रॅनबेरीचा तक्कू वाटतोय
केलं आणि खाल्लं. चवीला आवडलं.
केलं आणि खाल्लं. चवीला आवडलं.
लोणच्यापेक्षा चटणी म्हणून खपेल.
मध्यंतरी हॅलापिन्यो, क्रॅनबेरी-कांदा डिप प्रकार खाल्ला होता. साधारण तसं लागतंय. कांदा पांढरा राहिला नाही. त्यालाही मजेंटा रंग आला. जरा पाणी सुटलंय. तेव्हा लवकर संपवावं लागेल.
अरे वा केलस पण का मृ ?
अरे वा केलस पण का मृ ? सहीये..
बायदवे, त्या लोणचं/चटणीला पुष्प का अर्पण केलं आहेस ?
व्हेरिएशन इन्टेरेस्टींग आहे
व्हेरिएशन इन्टेरेस्टींग आहे ..
मृ, पुष्प वगैरे अर्पण केलंस पण लोणच्याचं स्टॅटस एकदम "डिस्पोजेबल" दिसत आहे तुझ्या ठायी ..
भारतात असाल तर पिकलेली करवंदे
भारतात असाल तर पिकलेली करवंदे वापरुन हे लोणचे करता येईल. मी मात्र पिकलेली करवंदे नुसतीच खायची पसंत करतो.