रोड बाईक १०१!

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

सायकल घ्यायची आहे, कुठली घेऊ? हा प्रश्न मला अनेकदा लोकं विचारतात. हा प्रश्न जे विचारतात, त्यांना सायकल मधले काहीही माहिती नसते हे जरी मान्य केले तरी सर्वात मोठा प्रश्न की, त्यांना स्वतःला सायकल घेऊन काय करायचे आहे, (त्यांचा उद्देश) हे ही माहिती नसते, तर निदान मायबोलीवर ते कन्फ्युजन नको म्हणून हा लेख प्रपंच. हा लेख फक्त रोड बाईक्स साठीच आहे. मागे आशू अन माझ्या काही लेखात मी हायब्रिड बाईक बद्दल लिहिले होते.

रोड बाईक घेणे ही कार घेण्यापेक्षा क्लिष्ट प्रक्रिया आहे. आश्चर्य वाटलं का? तर मग पुढचे वाचा. ती का आणि कशी क्लिष्ट आहे आणि ती सोपी कशी करता येईल ते पाहू.

सायकलीचे खरे तीन प्रकार.
१. रोड - रोडचे मुख्य काही प्रकार - एन्डुरंस रोड आणि रेस रोड. सायकलच्या फ्रेमच्या जॉमेट्रीमुळे हा फरक आहे. एन्डुरंस रोड ही थोडी अपराईट जॉमेट्री असते तर रेस रोड बाईक अजून स्टिफ. पण एन्डुरंस रोडला थोडे कस्टमाईज करून रेस करता येते आणि रेसला एन्डुरंस. (ते कसे करायचे ह्यावर एक लेख होईल.)

२. हायब्रिड - हायब्रिड मध्ये टायर विड्थ ७०० ची असते आणि ती रोड व ट्रेल दोन्ही मध्ये चालवता येते.

३. माउंटेन बाईक : माऊंटेन बाईक ही बाय डिफॉल्ट लोकांना आवडते आणि सहसा लोकं ही बाईक जास्त घेतात. जाड टायर्स, फ्लॅट हॅन्डलबार मुळे ही सोपी वाटते. पण ही सर्वात जड सायकल असते आणि लाँग राईडसला सर्वात वाईट. ही माउंटेन बाईक आहे. ट्रेल्स आणि डोंगरात चालवायची, ती रोड वर कशी चांगली चालेल? पण लोक ही सायकल जास्त घेतात.

४. सायक्लोक्रॉस ( गेल्या काही वर्षांपासून हा एक नविन प्रकार देखील आला आहे.मुख्यतः रोड बाईकचेच इम्प्रोव्हायझेशन )

बरं सायकलचे प्रकार झाले तर सगळं संपल असं नाही. रोड बाईक घ्यायची तर आणखी रिसर्च, हा ग्रूपसेट की तो? हा ब्रॅन्ड की तो? रिअर कॅसेट कुठली अन फ्रंट कुठला? अर्रर्र .. १०० प्रश्न अन तेवढेच कन्फुजनसाधार
वेलकम टू रियलिटी Happy म्हणलं होतं ना कार घेणे सोपे आहे ते.

आज आपण सायकलच्या ब्रॅण्ड ऐवजी रोड बाईक (रोड सायकल म्हणजे काय त्यावरच लक्ष केंद्रित करू.)

रोड बाईक

Synapse_4.jpg

मॉडर्न सायकल ही तीन मुख्य भागांपासून बनते. फ्रेम, ग्रूपसेट आणि व्हिल्स ( चाक आणि रिम).

फ्रेम ही जेवढी हलकी तेवढी सायकल महाग. फ्रेम ही स्टील, अ‍ॅल्युमिनियम किंवा कार्बन असते. कार्बन फ्रेम सर्वात महाग. प्रो जी सायकल वापरतात त्या फ्रेमचे वजन १ किलो किंवा त्यापेक्षा कमी असते.

सायकलचे मुव्हींग पार्टस म्हणजे व्हिल्स. (रिम आणि टायर्स) साधारण त्यांचे वजन (चांगल्या रोड बाईकचे) २ किलो पेक्षा कमी असते. परत एकदा वजन जेवढे कमी ( व्हिलचे) तेवढे ते चाक महाग हे इथेही आहेच. आता तर एक्स्ट्रीम सायकलींग मध्ये एरो व्हिल्स आणि कार्बन व्हिल्स मिळतात.

तर ग्रूप सेट म्हणजे काय?

105 Group.jpeg

ग्रूपसेटचे भाग -

१.क्रँकसेट
२.कॅसेट
३. चेन
४.डिरेलर ( फ्रंट आणि रिअर)
५. शिफ्टर्स आणि
६. ब्रेक्स

हे सर्व मिळून ग्रूप सेट म्हणवले जातात. बरेचदा बहुतांश सायकलींना पूर्ण ग्रूप सेट हा त्याच मॉडेलचा लावतील असे काही नाही. टिअ‍ॅग्राचे फ्रंट डिरेलर, ट्रेक्ट्रोचा ब्रेक आणि १०५ चे रिअर डिरेलिअर आणि शिफ्टर्स असेही मिक्स न मॅच पैसे वाचविण्यासाठी (आणि ग्राहकांना तुलनेने स्वस्तामध्ये सायकल देण्यासाठी) केले जाते.

आता प्रश्न असेल की टिअ‍ॅग्रा आणि १०५ म्हणजे काय? आणि त्याचा उपयोग काय? बरोबर? तर आत्ता कुठे आपल्या कन्फुजनला सुरूवात होणार. कारण हा ग्रूपसेट जसाजसा वजनाने हलका होत जातो, तसे तसे पैसे अन परफॉरमन्स दोन्ही वाढतात. उदा, शिमानोचा ड्युरा एस हा ग्रूपसेट हा साधारण रू १५०,००० ला मिळतो. फक्त दिड लाख ! (मी सायकल नाही, ग्रूपसेट म्हणतोय !, फ्रेमचे वेगळे अन टायर्सचे वेगळे! रिम मात्र ग्रूपसेट मध्ये येते. )

ग्रूपसेट विकणार्‍या तीन मुख्य कंपन्या.

१. शिमानो - Shimano
२. सरॅम - SRMA
३. कॅम्पॅगनोलो ( कॅम्पी) - Campagnolo

शिमानो ही जपानी कंपनी खालील ग्रूपसेट बनवते. अगदी बजेट क्लॅरिस ते कॉम्पिटिटिव्ह ड्युरा एस अशी त्यांची लाईनअप आहे.

१. क्लॅरिस - Claris - बजेट बाईक्स म्हणजे $ ५०० - ७०० पर्यंतच बाईक्स मध्ये हा ग्रूपसेट असतो. हा ८ स्पिड आहे म्हणजे कॅसेटला पाठीमागे ८ गिअर्स आहेत.
२. सोरा - SORA - हा 9 स्पिड आहे.
३. टिअ‍ॅग्रा - १० स्पिड ग्रूप सेट. इथून पुढचे सर्व ग्रूप सेट कॉम्पिटिशनमध्ये वापरले जाऊ शकतात.
४. शिमानो १०५ Shimano 105 - २०१५ पासून हा ग्रूपसेट ११ स्पिड आहे. मागच्या वर्षीची अल्ट्रीग्रा ट्रिकल डाउन टेक्नॉलॉजी
५. अल्ट्रिग्रा - Ultegra - प्रोफेशनल ड्युरो एस च्या खालचा.
६. ड्युरा एस - Dura-Ace सर्वात महाग. फ्लॅगशिप आणि प्रो बिल्ड असणारा ड्युरा एस कार्बन फायबर आणि
टायटॅनियम पासून बनवलेला आहे.

Campagnolo

कॅम्पी हा इटालियन ब्रॅण्ड आहे. कॅम्पीचे ग्रूपसेट हे इतरांपेक्षा खूप महाग असतात. आणि सरॅम आणि शिमानोला कम्पॅटिबल नसतात. कॅम्पीचे ग्रूपसेट हायरारकी- (शेवटचा सर्वात भारी अन महाग)

१. व्हेलोचे ( Veloce) - शिमानो १०५ सोबत कॉम्पिटिशन पण २०१५ १०५ मध्ये ११ स्पिड कॅसेट आहे.
२. अथिना (Athena) - हा ११ स्पिड ग्रूपसेट आहे. सरॅम फोर्स किंवा शिमानो अल्ट्रिग्राचा कॉम्पिटिटर
३. कोरस ( Chorus) - शिमानो अल्ट्रिग्रा आणि डुरा एस च्या मधील ग्रूप.
४. रेकॉर्ड ( Record) - फ्लॅगशिप. ड्युरा एस आणि रेड सोबत कॉम्पिटिशन - रेस मध्ये वापरला जाणारा.

SRAM

1. अपेक्स - Apex - १० स्पिड ग्रूपसेट WiFli system आहे.
२. रायव्हल Rival - ११ स्पिड ग्रूपसेट - शिमानो १०५ चा स्पर्धक
३. फोर्स - Force - ११ स्पिड ग्रूपसेट - शिमानो अल्टिग्रा चा स्पर्धक
४, रेड - RED टॉप ऑफ द लाईन ड्युरा एस आणि रेकॉर्डचा स्पर्धक.

अबब ! केवढे ते चॉईस. चक्रावलात? वेट, अजून संपलं नाही. आता आपण डिरेलर्स आणि कॅसेट बद्दल बोलू. कारण योग्य ती कॅसेट आणि योग्य तो क्रँक असल्याशिवाय आपली सायकल पूर्ण होणार नाही.

क्रँकसेट : समोरचे गिअर्स अन पेडलचे आर्म असे एकत्र आले की त्याला क्रँकसेट म्हणतात. हे मुख्यःत ४ प्रकारचे असतात.

Ultigra_Crank.jpgCrank.JPGFront_chain_ring.JPG

१. सॅन्डर्ड डबल ; हा सेट प्रो रायडर्स वापरतात सॅन्डर्ड डबल मध्ये दोन रिंग असतात. मोठी रिंग ५३ तर लहान ३९ टिथ ची असते. ( ५३-३९)
२. सेमी कॉम्पॅक्ट - दोन रिंग असतात. मोठी रिंग ५२ तर लहान ३६ टिथ ची असते. ( ५२-३६)
३. कॉम्पॅक्ट - दोन रिंग असतात. मोठी रिंग ५० तर लहान ३४ टिथ ची असते. ( ५०-३४)
४. ट्रीपल - तीन रिंग असतात. ५०-३९-३०

साधारण मोठ्या रिंगचे दात कमी होताना दिसतील, तर लहान रिंगचे दात वाढताना. आपल्यापैकी बहुतांश जणांना ५० -३४ चे कॉम्बो अगदी व्यवस्थित आहे. आणि जे वयाने जेष्ठ आहेत किंवा गुडघे अन कंबरदुखी / पाठ दुखीचा खूपच त्रास आहे त्यांच्या साठी ट्रीपल सेट बरा पडतो. किंवा जिथे खूप पहाड आहेत तेथील लोकही ट्रीपल सेट घेतात.

मागे एक मोठी कॅसेट लावलेली असते ज्याला अनेक दातांच्या अनेक रिंग असतात. पुढचे आणि मागचे कॉम्बीनेशन मिळून सायकल फास्ट किंवा स्लो चालवता येते.

फ्रन्ट डिरेलर : क्रँक मधील दोन (किंवा तीन) रिंग्स मध्ये चेन टाकण्यासाठीयंत्र यंत्र लावले जाते त्याला फ्रंट डिरेलर म्हणतात.
Front D.jpg

रिअर डिरेलर
Rear DR.jpg

कॅसेट मध्ये अन दातेरे असतात. त्यांच्या मध्ये योग्य तिथे चेन टाकण्यासाठी रिअर डिरेलरचा वापर केला जातो.

शिफ्टर्स : योग्य त्या गिअर मध्ये शिफ्ट करण्यासाठी हे शिफ्टर्स वापरतात. हॅन्डल बारच्या दोन्ही साईडला शिफ्टर्स असतात. डाव्या हाताने समोरचे गिअर्स अन उजव्या हाताने पाठीमागचे गिअर्स शिफ्ट करतात.

Shifter.jpgShifter.JPG

कॅसेट :

Cassette.JPG

प्रो रायडर्स जनरली टीथ मध्ये खूप कमी अंतर असणार्‍या कॅसेटस लावतात. उदा ११,१२,१३,१४,१५ म्हणजे एकावेळी एकच टिथ वाढत गेलेला. (रादर कमी झालेला)

उदाहरणासाठी मी काही कॅसेटस देतो.

टिथ गिअर्स
11-25 11-12-13-14-15-17-19-21-23-25
11-28 11-12-13-14-15-17-19-21-24-28
12-25 12-13-14-15-16-17-19-21-23-25
12-27 12-13-14-15-16-17-19-21-24-27
11-32 11-12-13-14-16-18-20-22-25-28-32

थोडक्यात क्रँकच्या ५०-३४ किंवा ५२ -३६ सोबत ही रिअर कॅसेट लावली म्हणजे तेवढे गिअर्स आपल्याला मिळाले.

उदाहरणार्थ

५०-३४ & ११-३२ मध्ये खाली कॉम्बो मिळतील, एकुण पाठीमागचे गिअर्स = ११ आणि समोरचे २ म्हणजे एकुण गिअर्स २२ झाले.

५० सोबत 11-12-13-14-16-18-20-22-25-28-32 आणि
३४ सोबत 11-12-13-14-16-18-20-22-25-28-32

मागच्या कॅसेट ह्या कस्टमाईज्ड लावू शकतो. पण त्या क्रँक सोबत कम्पॅटिबल असायला हव्यात अन्यथा रिअर डिरेलर तो गिअर टाकू नाही शकणार.

गिअर्स कसे टाकायचे?

एक साधारण गैरसमज असा असतो की मोठ्या गिअर वर चालवल्यावरच आपण फास्ट जातो आणि आपले काफ मसल तयार होतात. त्यामुळे सर्वचजण समोरचा गिअर मोठ्या रिंग वर आणि पाठीमागचा छोट्यावर टाकून चालवतात. ( उदा हायब्रिडवाले समोर तीन अन पाठीमागे ५ , ६ किंवा ७) पण ह्यात होतं काय की बरेचदा आपण गिअर रेशो प्रमाणे स्पीड मध्ये नसतो आणि मोठ्या गिअर मध्ये लोअर केडन्स असतो, त्यामुळे आपली अर्धी एनर्जी ही वाया जाते. आणि आपण लवकर थकतो किंवा गुडघे दुखायला लागतात.

रोड सायकल गिअर्स -

हे वर लिहिल्याप्र्माणे क्रॅ़क प्रमाणे बदलतात. ५३-३९, ५०-३४ आणि ५२-३६ आणि रिअर कॅसेट जशी लावली त्या प्रमाणे.

उदा साठी मी ५०-३४ आणि ११-३२ चे कॉम्बो लिहितो म्हणजे थोडे अजून क्लिअर होईल.

कॉम्पॅक्ट क्रँक मध्ये समोरचे गिअर्स ( ५० - ३४) मोठा नंबर = स्पीड आणि पाठीमागचे गिअर्स - छोटा नंबर ( ११,१२) = स्पीड ह्यातील ५०-११ हा गिअर सर्वात फास्ट आहे, तर ३४-३२ हे कॉम्बो सर्वात स्लो. थोडक्यात घाटातच वापरायचे कॉम्बो.

पाठीमागे जसेजसे मोठ्या नंबरवर कॅसेट सरकणार तसे तसे आपली स्पीड कमी होणार आणि आपला केडन्स वाढणार. केडन्स विषयी मी मागे एका लेखात लिहिले होते. आपल्याला हवी असणारी स्पीड ही केडन्स नुसार ठरते.

एकच स्पीड दोन कॉम्बो मधून मिळू शकते. कसे?

गिअर कॅलक्युलेटर वापरून मी ह्या ८० ते १०० केडन्स साठी प्रत्येक कॉम्बो मध्ये काय स्पीड मिळेल ह्याचे गणित मांडले.

Gear_Calc.JPG

काळे चौकोन = ५० रिंग
लाल चौकोन = ३४ रिंग
कॅसेट = ११-३२

वरील चित्रात दाखविल्याप्रमाणे समजा मला ३० किमी प्रतितास जायचे असेल तर मी साधारण दोन तीन गिअर काम्बो वापरू शकतो.

१. ५० ची रिंग वापरून मी जर पाठीमागे १६ किंवा १८ वापरला तर ३० ची गती मिळेल.
२. ३४ ची रिंग वापरून मी जर पाठीमागे १२ वापरला तरी मला ३० ची गती मिळेल.

थोडक्यात विविध रिंग्सना आपण आपल्या केडन्स द्वारे वेगवेगळी स्पीड मिळवू शकतो. सायकलचे गिअर आपल्याला फक्त मदत करतात, सायकलचे इंजिन आपण स्वतः असतो.

तरी अजून मी सायकलींच्या ब्रॅन्ड बद्दल काहीच लिहिले नाही. सायकलचे फ्रेम सर्वकाही असते. तिच्याबद्दल परत कधी तरी. कार्बन फ्रेमचे वजन आधी लिहिल्याप्र्माणे साधारण १ किलो च्या आतबाहेर ( ९०० ते १२०० ग्रॅम) असते. जितके वजन कमी, तितकी किंमत महाग. शिवाय जितके कार्बन लेअर जास्त तितकी किंमत महाग.

आता सांगा कुठल्या कॅसेट सोबत कुठला क्रँक लावून व कुठला ब्रॅन्डच्या ग्रूपसेट सहीत तुम्ही सायकल घेणार आहात?

विषय: 
प्रकार: 

__/\__

हैला, डोक्यावरून सुसाट गेली सायकल Happy नीट वाचाव लागेल.
मला माझी बी एस ए एस एल आर आठवली. सिंग सायकल दुकानातून ७५० रुपयाना घेतलेली. Wink

डोक्यावरून गेले सगळे.
मला माझ्या ATLAS च धूड आठवल. जितकी जड तितकी दणकट तितकी टिकाऊ असल गणित होत. त्या मुळे बी एस ए एस एल आर सुद्धा घेऊ दिली नव्हती मला.

हर्रे बापरे.. फोटो पाहिले, मस्तच वाटले, मग प्रतिसाद वाचले, तुर्तास अर्धविराम.
पण _/\_ हे माझ्यातर्फेही Happy

बी, माझ्या सायकलचा फोटो टाकलाय मी. ती जी वर आहे ती माझीच आहे. Happy हे आणखी दोन.

Synapse_1.jpgSynapse_3.jpg

ATLAS > Lol अ‍ॅटलस नावाचे शिमानोचे एक प्रॉडक्ट पण आहे. हायब्रिड ग्रूप सेट.

मलातरी अजून २-३ वेळा वाचल्याशिवाय समजणार नाही Happy

कुठला ब्रॅन्डच्या ग्रूपसेट सहीत तुम्ही सायकल घेणार आहात? >> ATLAS >> Lol मला बीएसए स्ट्रीट कॅट Wink

जबरी! अजून एकदा वाचावं लागणार... Happy

इंद्रा Biggrin

मला माझी बी एस ए एस एल आर आठवली. सिंग सायकल दुकानातून ७५० रुपयाना घेतलेली >>> इन्ना...मी पण्ण सिंसामा मधून घेतली होती... ७०० रुपयांना...घरी एक जुनी अ‍ॅटलास सायकल होती. मी आणि बहिणीनं दोन्ही सायकलींचे वार लावून घेतले होते. सोम-मंगळ-बुध बहीण नवी सायकल वापरायची आणि नंतरचे ३ दिवस मी वापरायचे. पण वर्षभरात ती चोरीला गेली Sad

अवांतराबद्दल सॉरी हां, केदार...

केदार कसलं अभ्यासपूर्ण लिहिलंयस हे सायकल पुराण Uhoh
मला एक अक्षर कळलं नाही ही गोष्ट निराळी.

सॉरी काय? लिहा, सायकलीचे वार वाचून मजा वाटली. Happy

मला एक अक्षर कळलं नाही ही गोष्ट निराळी. >>

खरे तर मला वाटले की मी "रोड बाईक १०१" म्हणजे सर्व सोपे करून मांडतोय पण हे जास्तच क्लिष्ट झाले की काय? लेख फसलाच Wink

फक्त "सायकल घेणे" हे खूपच सोपे आहे. पण सर्व समजून उमजून घ्यायला अभ्यास लागतोच. निदान माहिती लागते. जर आपल्यापैकी कोणी "रोड बाईक" चा विचार केला तर निदान त्याला क्रँकचा वापर काय? कॅसेट म्हणजे काय ह्यावर मराठीत लगेच उत्तर मिळेल म्हणून लेख लिहिला.

तुम्हा सर्वांसारखेच पूर्वी माझ्याकडे पण हर्क्युलस, अ‍ॅटलस, बिसए अशी सायकली होत्या. आता सहज लिहिताना आठवले मोजल्या तर माझ्या कडे हाय स्कुल ते आज पर्यंत एकूण ७ सायकली होत्या / आहेत. हर्क्युलस, अ‍ॅटलस, बिसए, दोन श्विन, ट्रेक आणि कॅननडेल !

आपण आपल्या लहाणपणी ज्या सायकली चालवल्या त्यांना "फिक्सी" म्हणतात. म्हणजे एकच गिअर. ह्या सायकली आता युरोप मधील काही देशात जास्त पॉप्युलर होत आहेत.

केदार लेख फसलेला नाहीये. फक्त काही मुद्दे आधीच स्पष्ट व्हायला हवे होते.

हा लेख केदारने लिहीला तो आमच्यासारख्या लोकांनी त्याला प्रश्न विचारून भंडावून सोडल्यानंतर. मला आणि अनेकांना ग्रुपसेट, कॅसेट आणि गियर्सबद्दल थोडीफार माहीती होती पण ती तपशीलवार समजाऊन घ्यावी म्हणून त्याच्या मागे लागलो होते.

त्यामुळे ज्यांना अगदीच सुरुवात करायची आहे आणि किंवा सुरुवातीच्याच यत्तेत आहेत त्यांनी याचा फार वाऊ करू नये. सुरुवातीचे दोन एक वर्षे सायकल नित्यनेमाने चालवल्यानंतर आता पुढच्या यत्तेत जावेेसे वाटेल तेव्हा मा्त्र या लेखाची पारायणे केली पाहिजेत.

थोडक्यात म्हणजे बिगीनर कॅटेगरीतून इंटरमिजिए़टला जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी

एक दंडवतच रे बाबा तुला!

हैला, डोक्यावरून सुसाट गेली सायकल स्मित नीट वाचाव लागेल. >>> इन्ना + १. Lol

आमच्या करता सायकल म्हणजे कोणतीही! नगाला नग असल्याशी कारण. हे गौडबंगाल लै भारीये.

केदार, असे वाटते तुम्ही सायकल इतकी दामटली की दामटून दामटून सायकल एकदम स्लिम झाली. छान आहे सायकल. तुम्ही प्रत्येक लेखात एक तरी आलेख देताच देता Happy

केदार,माझ्यापण खूपसं डोक्यावरूनच गेलं.:( पण अजून एक-दोन वेळा वाचलं तर कळेल कदाचित.
माझी BSA SLR होती आणि ती दोन- अडीच वर्षात चोरीला गेली.. सायकल मग थांबलीच.. पण मला सायकल चालवायला खूप आवडायचं.. दीड वर्षापूर्वी नवरा अचानक एका सकाळी फायरफॉक्स ची सहा गिअर्स वाली सायकल घेवून घरी अवतरला.. चॉईस वगैरे काही मामला नाहीच.. आता कुठेही जायचं असले एकटीला तर 'चल मेरी लुना' च्या थाटात मी मर्यादित बेळगावात फिरते. एक तर सायकल वर जाणारी मुलगी ( मीच मला बाई म्हाणायला अजून जीभ धजावत नाही !) इथे दिसणं नवखंच आणि इथल्या टु व्हिलर्स च्या जमान्यात वेडेपणाचंच.. असो. मला आपलं आवडतं आणि जमतंय तोवर मला ते एंजॉय करायचंय..
मा.बो. वरचं सायकल संबंधी लिखाण जमेल तेव्हा वाचते मी पण नियमितपणा नाही त्यामुळे कधी चांगलं / वाईट ( वाईट नसतंच काही) असं मत सुद्धा देऊ शकत नाही. पण इथल्या सायकलस्वारांचं मला नेहेमी कौतुक वाटतं. Happy

आधीच सायकलीचा मुळीच संबंध नाही. त्यामुळे मला त्यातले पार्ट्स वगैरे अजिबातच माहित नाहीत. पार डोक्यावरून गेलं. पण तरी 'तू माहिती चांगली दिली आहेस' असा म्हणायचा मोह टाळवत नाही. Proud

मी "फिक्सी " चालवलि आहे. >>. आपल्याकडील सर्वच जुन्या सायकली फिक्सी आहेत. हिरो पासून बिसए पर्यंत. फिक्सीचे पण खूप फायदे असतात.

लेख सायकलविषयी आहे एवढेतरी मला समजले >> Lol

एखाद्या विषयाचा ध्यास कसा घ्यावा. >> Happy

'तू माहिती चांगली दिली आहेस' असा म्हणायचा >> Proud

इन्नाशी सहमत, पण तू अगदी मनापासून लिहिलं आहेस >> Happy

तुम्ही प्रत्येक लेखात एक तरी आलेख देताच देता >> Happy आलेख दिला की समजायला सोपं जात असावं असं वाटतं. हार्डकोअर अ‍ॅनलिस्ट असण्याचे तोटे. Happy

मला आपलं आवडतं आणि जमतंय तोवर मला ते एंजॉय करायचंय.. >> सोनचाफा चालवत राहा. मजा येते. Happy

सर्वांनाच धन्यवाद. क्लिष्ट असूनही वाचलत. म्हणूनच म्हणलं होतं, कार घेण्यापेक्षा अवघड आहे हे प्रकरण!

Pages