घरात किसलेला दुधी अनायासे होता, पण तो कमी होता, त्यात भर घालावी लागणारच होती. मग मागे एकदा साबांनी केलेले केळ्याचे कोफ्ते खाल्लेले आठवले. त्यामुळे दुधी + कच्चे केळे असे करुन बघायचे ठरवले.
आधी वाचलेल्या आणि घरी पाहिलेल्या पाकृ मधे काजु ग्रेवी होती, त्याऐवजी टरबुज बिया वापरल्या.
कोफ्त्यासाठी -
२ वाटी किसलेला दुधी ( पाणी पिळुन टाकुन)
१ कच्चे केळे
बेसन लागेल तसे
१ छोटा चमचा धणे जीरे पावडर , तिखट, हळद, मीठ
तळायला तेल
करी साठी
२ छोटे कांदे
२ मध्यम टोमॅटो
आल, लसुण पेस्ट
१ / २ लाल काश्मिरी मिर्च्या
२ चमचे टरबुजाच्या बिया / मगज
गरम मसाला पावडर
कोफ्ते
कच्चे केळे उकडुन मग सालं काढुन मॅश करायचे. ( मी मावे मधे ४ मिनीटे उकडले).
त्यात कोफ्त्याचे बेसन सोडुन इतर साहीत्य टाकायचे.
थोडे थोडे बेसन घालत पाणी न घालता मळायचे. शक्य तितके घट्ट पिठ झाले पाहीजे.
तेल गरम करत ठेवुन, तापले की पिठाचे (भारतीय) लिंबाएवढे छोटे गोळे करुन तेलात खरपुस तळुन घ्यायचे.
( मी दुधीतले पाणी नीट न काढल्याने थोडं मऊसर पिठ झालं, त्यामुळे हाताला तेल लावुन मग एकेक गोळा करुन तेलात सोडावा लागला )
करी साठी
एका कढईत थोड्याश्या तेलावर कांदा चिरुन, सोनेरी रंगावर परतुन घ्यायचा.
मिक्सर मधे टोमॅटोच्या मोठ्या फोडी, कांदा, काश्मिरी मिर्च्या आणि मगज घालुन चांगले बारिक वाटायचे.
आता आधीच्याच कढईत पुन्हा छोटा चमचाभर तेल तापत ठेवायचे.
तापले की त्यात आलं, लसुण पेस्ट टाकायची आणि चांगली परतायची.
ती जरा गोळा व्हायला लागली की हळद, तिखट, मीठ आणि गरम मसाला घालुन परतायचे.
मग वरचे वाटलेले मिश्रण त्यात ओतायचे आणि भरपुर परतायचे.
बाजुने तेल सुटायला लागले की हवे तितके पाणी ओतुन पुन्हा एक दोन उकळ्या येऊ द्याव्या.
(सुरुवातीला रस्सा थोडा पातळच असु द्यावा, मग आटतो)
आता मीठ टाकुन ढवळुन मग वरचे कोफ्ते रश्श्यात सोडावे आणि गॅस बंद करुन थोडावेळ झाकुन ठेवावे.
थोडा वेळाने पोळी / भाताबरोबर खायला घेता येईल
- कोफ्त्याचं पिठ घट्ट असेल तर ते नंतर रस्सा फारसा शोषत नाहीत आणि विरघळत नाहीत
- कोफ्ते न तळता उकडुन करुन बघायचे राहीले , ते पुढच्या वेळेस
- मी फोटो काढण्यासाठी म्हणुन कोफ्ते वरुन घातलेत, रश्श्यात मुरलेले नाहीत
- ४५ मिनीटात फोटोसाठी सजवणे आणि फोटो काढण्याचा वेळ धरलेला नाही
यम्मम्मी ! कातिल फोटू
यम्मम्मी ! कातिल फोटू
अक्षरशः तोंपासु
अक्षरशः तोंपासु
वॉव, झकास फोटो आहे! रेसिपी पण
वॉव, झकास फोटो आहे! रेसिपी पण जमणेबल आहे
छान.. उकडूनही चांगले होतील.
छान.. उकडूनही चांगले होतील.
व्वा . मस्तच. फोटो पण भारी
व्वा . मस्तच. फोटो पण भारी आहे..
(भारतीय) लिंबाएवढे
(भारतीय) लिंबाएवढे
मस्त
मस्त
फोटु जीवघेणा आहे..
फोटु जीवघेणा आहे..
अप्रतिम!
अप्रतिम!
मस्त आहे रेसिपी. डीप फ्राय
मस्त आहे रेसिपी. डीप फ्राय करायचे नसल्यास आप्पेपात्रात घालूनही तळता येतील असं वाटतंय.
फोटो मस्त. माझ्या एका
फोटो मस्त. माझ्या एका मैत्रिणीच्या सासूबाईंनी केलेली खाल्ली आहे अशी करी आणि कच्च्या केळ्यांचे कोफ्ते. ते कोफ्ते नुसते खायला पण छान लागतात.
छान आहे रेसिपी .. करीमध्ये
छान आहे रेसिपी .. करीमध्ये दही घातल्यासारखं वाटत आहे फोटोत .. ते मगज आहे का?
मस्त फोटो!!
मस्त फोटो!!
मस्त! फोटो तर अगदी खल्लास आहे
मस्त! फोटो तर अगदी खल्लास आहे