मित्रांनो,
२०१५ नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
काही काळापुर्वी पाकिस्तानातील डॉन पेपरवर नजर गेली त्यातील काही बातम्या व तेथिल वाचकांचे पडसाद...
पाकिस्तानी बातम्यांचा सफरनामा
१. बातमी – 26 डिसेंबर - अर्शद मेहमूद ( ज्याला जनरल मुशर्ऱफना जिवे मारायची साजिश करून जेल मधे उमर कैद भोगणारास आता नव्याने फाशी द्यायला पाक सरकारने मान्यता दिल्यावर नुकतीच फाशी गेलेल्यावर) जवेरा नामक जन्मगावी त्याच्या मयताला हजारोंच्या संख्याने गावकरी उपस्थित होते.
यावरून त्याला आतून किती मोठ्याप्रमाणात आजही सहानुभूती दाखवणारे खेड्यापाड्यात लोक आहेत यावर आश्चर्य व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रियातून पडलेले पडसाद.
एक म्हणतात, अबब काय ही गर्दी, अगदी कायदे आज़म च्या मयताची जणु आठवण व्हावी!... अशा लोकांना माहित ही नसावे की याने काय कृत्य केले म्हणून फाशी दिली गेली... पण इतक्या संख्याने लोक आले असतील तर आतंकवाद्यांना ठार मारायचे काम फारच जोखमीचे व अशक्य वाटू लागते...
----
२. बातमी - दि 27 डिसेंबरला आईच्या पुण्यतिथीला पाकिस्तानात परतावा म्हणून पुत्र बिलावल (झरदारी) भुट्टो चा रुसवा काढायला वडील असिफ़ झरदारी लंडनला रवाना! (ता.क. - शेवटी बिलावल आलाच नाही. एकांनी तो आजारी असल्याचे म्हटले तर एकांना त्याला मारायचा कट असेल म्हणून तो आला नाही असे थातुरमातुर म्हणन सोडून दिले. झरदारींनी 28 तारखेला माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे सध्या सिंधप्रांताला गर्तेत ढकलायचे प्रयत्न होतायत असे म्हणायला जागा आहे. - आता जो जनरल आपल्याच घराच चोरासारखा लपून कोर्टाच्या वाऱ्या टाळतोय तो असे धंदे करेल व त्याला करायला इतर राजकारणी लोक साथ देतील का याचा वाचकांनी अंदाज करावा.)
बातमी वाचून अनेक रंजक पाकी प्रतिक्रिया वाचा...
'लावांगा लागा... कश्मीर पाकिस्तान में लावांगा' ...असा घसा फोडू ऐलान करून खळबळ माजवणारा पाकिस्तानमधील राजकीय पक्षाचा नेता लंडन मधे काय करायला गेलाय ... आईच्या आडनावाची ढाल वापरणाऱ्या बिलावलचे जीवन फार गोंधळाचे आहे. बरोबरआहे कारण स्विस बँकेतील खाती व दुबईतील आलिशान राजवाडा.. सांभाळताना असा वैतागतो बिचारा...'
आणखी एक म्हणतात, 'पहा सर्व देश आतंकवादात झुलसतोय आणि हे शहजादे, लुटेरा पार्टीचे नेते आपल्या व्यवसायाची गणिते मांडत फिरतायत... इतके असूनही काही भ्रमिष्ठ लोक त्यांना अजूनही कवटाळून बसले आहेत. काय होणार देशाचे...'
एका वाचकानी म्हटले, 'राहूल गांधी व बिलावल यांची तूलना घराणेशाहीची प्रतीके म्हणून छान करता येईल; मात्र राहूल निदान राजकारणी तरी वाटतो त्याच्या समोर बिलावल विदुषक(जोकर) वाटतो.
एकांनी म्हटले, 'बाप मुलाच्या तणातणीत पार्टीचे वाटोळे होतेय. अशाने पार्टीचा विनाश झाल्यावाचून राहणार नाही.'
---
३. बातमी - पाकिस्तानच्या राजधानी इस्लामाबादेतील लाल मशीदीच्या मुल्लांनी पेशावरच्या शाळकरी मुलांवरील अमानुष कृत्यावर तोडलेले तारे...
पेशावरच्या शाळकरी मुलांच्या हत्याकांडावर,'झाले ते ठीकच झाले. हे मेणबत्या घेऊन फिरणारे, आमचे भाऊ व अन्य 86 मशीदीतून धार्मिक शिक्षण घेणाऱ्यांना जनरल मुशर्ऱफ़नी आर्मी लाल मशीदीत आणून मारले तेंव्हा कुठे गेले होते हे मेणबत्यावाले? ... उद्या आमच्यावर असी कारवाई केली गेली तर आम्ही असा करारा जबाब देऊ की सर्व पाकिस्तानला आम्हाला आवरणे शक्य होणार नाही... असे उर्मटपणे म्हणणाऱ्या लाल मशीदीचे - बुर्क्याच्या आड धरपकडीतून पळून गेलेले -मुल्ला - मौलाना अझ़ीझ़ यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना अनेक वाचकांनी त्यांची भत्सना केलेली आहे. काही प्रतिक्रिया -
एक म्हणतात, हा मुल्ला पाकिस्तानच्या राजधानीतून अशी बेछूट बडबड करतोय त्याला देर बंद करायला सरकार काही करत नाही? सर्व आतंकवाद्यांना पकडून फाशी देऊ वगैरे वल्गना आहेत तसे काही होणारच नाही. सगळे इतके निगरगट्ट आहेत की काही महिन्यात पुन्हा मरायला व मारायला तयार होतील...
एक म्हणतात, ही साज़िश (मेणबत्या मार्चचे पुढारीपण करणारे) अमीन शाहिदी व फैज़ल रज़ा अबिदी यांची नसून सर्व पाकिस्तान तुमच्या सारख्या कठमुल्लांच्या विरोधात आहे.
एक म्हणतात, 'हे दोघे भाऊ (एक 2008च्या पाकी आर्मी अॅक्शन मधे मेला व आता हा मौलाना अझीझ), पुर्वी जनरल झिया उल हक़च्या फार जवळचे मानले जात असत. शिवाय सौदी लोकांनी अफाट पैसा देऊन त्यांना पोसले आहे. अशा लोकांना हात लावायला नवाज़ शरीफना फार जड जाईल... खरे तर लाल मशीदीला पाडून तिथे सर्व धर्म श्रद्धांवंतांच्या साठी एक संस्था उभारावी...'
मीडियातून फार तिखट प्रतिक्रिया आल्यावर या मुल्लांच्या दोन अनुयायांनी मेणबत्याधारी लोकांत सामील होऊन आमच्या मौलवींचे जरा चुकले त्यांच्या बरोबर आम्ही नाही.'
अशी रदबदली करत माघार घेतली. खुद्द मौलानांनी, माझे म्हणणे'तोड-मरोड कर'म्हटले गेले, असे म्हणत रदबली केली!
(ता.क. दि 28. अजुनही हा मुल्ला लाल मशिदीतून असा डरकाळ्या फोडत असतो व पोलीस नुसते पहात बसत आहेत...!)
पाकिस्तानी मेडियात लै करमणूक
पाकिस्तानी मेडियात लै करमणूक असतीय बघा.
भारताविरुद्ध सतत बकबक करणारा झैद हमीद ही पाकी टीव्ही वरची टॉप मोष्ट करमणूक हय ....
यू टुबवर Ziad hamid सर्च द्या आणि प्रचण्ड करमणुकीच्या विश्वात सामील व्हा. ही असामी इंजीनीअर आहे अभ्यासू आहे. भारताबद्दल त्याची मते लईच लाजवाब हायेत . एक डाव ऐकाच. कोणतीही क्लिप लावा करमणुकीची १०० टक्के खात्रीच ::फिदी:
पाकड्यांच्या बातम्या इथे
पाकड्यांच्या बातम्या इथे देण्याचे प्रयोजन?
http://www.maayboli.com/user/
http://www.maayboli.com/user/25604/created
मित्रांनो, काही काळापर्यंत
मित्रांनो,
काही काळापर्यंत सुधीर काळे यांचे अनेक धागे विविध प्रकारे आपल्या आपसपासच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करणाऱे असत. त्यांचा अनुभव व अभ्यास भरपूर होता. काही कारणांनी वाचनात आलेल्या
वरील बातम्या कथन करणे असा नुसता उद्देश नव्हता तर त्याच बरोबर तेथील नेटवरील (सुशिक्षित) वाचकांची मते व विचारांची दिशा आपल्याला समजावी असा ही आहे. तेथे भारतीयांच्याही भरपूर प्रतिक्रिया येताना दिसतात. बुद्धिबळाचा डाव खेळताना समोरचा या पुढील चाल काय करेल याचा विचार करून खेळ्या खेळाव्या लागतात. म्हणून आपले मित्र व शत्रूंच्या घरात काय घडतेय याचा कानोसा घेणे उद्बोधक ठरते.
असेच कधी पुन्हा वाचनात आले तर सादर करेन.
@रॉबिनहूड... लाल बंदर किंवा
@रॉबिनहूड...
लाल बंदर किंवा लाल टोपी झेद हमीद यांची वक्तव्ये ऐकून ते महाशय खरोखरच डिफेंन्स एनॅलिस्ट आहे कि वेळोवेळी युद्धाच्या सिंह गर्जना करणारे नकली कोल्हा आहेत अशी शंका तेथील विचारक अनेकदा करतात. त्यांचे अल्लामा इकबाल व जीनांवरील अतिरिक्त प्रेम अनेकांना हास्यास्पद वाटते....