आधुनिकता की उथळपणा ?

Submitted by वीणा सुरू on 15 December, 2014 - 10:16

१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.

सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).

आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.

जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.

आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?

हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.

थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .

या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन गोष्टीतला फरक समजण्याची आणि मुद्देसूद चर्चा करण्याची कुवत तुमच्यात नाही हे विसरून मी वाद घालू लागलो होतो. मला क्षमा करा.

दोन गोष्टीतला फरक समजण्याची आणि मुद्देसूद चर्चा करण्याची कुवत तुमच्यात नाही हे विसरून मी वाद घालू लागलो होतो. मला क्षमा करा.

भेकडांची लायकीच नाही
तुमची लायकी आणि कुवत किती खालच्या पातळीला गेली आहे हे सगळ्यांना माहीत आहे

अर्रर्र क्षमस्व. पुन्हा त्याच मोहात पडलो. मी जातोच कसा. तुमचे आत्मपरिक्षण चालूद्या. बाकीचे २७ प्रतिसाद टाका रे कुणीतरी.

१) ड्यु आय डी शोधताना, हा प्रयत्न व्यर्थ झाला.,
ड्यु आय डीचे गुण ऐकता हा दिप ही विझाला

२) दर्शन द्या हो अ‍ॅडमीन आता
धागा हा भरकटे, वाद-चर्चा रन्गता,
दर्शन द्या हो अ‍ॅडमीन आता

३) नकळत सारे घडले
मी काढता हा धागा, सारे हसले

४) आय डीच्या डोक्यावर धाग्याचे ओझे, धाग्याचे ओझे

मुळ विषय आहे आधुनिकता की उथळपणा ? एका आयडी ने पालायन केल्या मुळे
मुळ विषया वर चर्चा होईल असे वाट्तय.

खिसा शिवतो त्या डाव्या बाजूच्या आत कुठेतरी माणूस नावाचे यंत्र चालू असते, तो विचारही तिथूनच करतो, ब्रेन फक्त त्याने केलेले विचारांची अंमलबजावणी करायला इतर ईंद्रियांना आदेश देतो>>>
------ हा आधुनिक विचार आहे अथवा उथळपणा ?

धाग्याच्या विषयाला अनुसरुन मी पहिल्या पानावर लिहिल्याप्रमाणे मला लेख पटला नाही कारण आधुनिकता की उथळपणा हा प्रश्न नसुन ,आधुनिक असणं म्हणजे नक्की काय ? हा असावा.

माझ्यामते आधुनिक असणं म्हणजे कुठल्याही सरसकट जुन्या गोष्टींचा विरोध नाही तर ,जुन्या नवीन सगळ्याच गोष्टींकडे वैज्ञानिक दॄष्टीकोनातुन आणि सद्सद्विवेकबुद्धी ने पाहणे हा होय.म्हणजेच स्वतःच्या डोळ्यांवर आणि विचारांवर विश्वास ठेवणे. याचा धार्मिकतेशी संबंध तुम्ही जोडलाय .श्रद्धेचं म्हणाल तर श्रद्धा ही त्या श्रद्धा ठेवणारया व्यक्तीपुरती मर्यादित असावी.कोणी सांगितल्यामुळे ,भडकवल्यामुळे ती कमी जास्त होत नाही .आधुनिक असणारया व्यक्ती ह्या श्रद्धाळु नसतात हा पण एक गैरसमज आहे. फक्त अंधश्रद्धेच्या बाबतीत डोळसपणे विचार करण्याची गरज आहे नाहीतर लोकांना गंडवण्याचे आणि हानी पोचवण्याचे प्रकार जास्त होतील आणि ते बंद झाले पाहीजेत .आपल्या देशात प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे .चांगल्या हेतुने मत मांडणारया प्रत्येक व्यक्तीला धर्म या विषयावर मत मांड्ता येते. मी पण तर मांडतेच आहे की Happy (यातही मी काही चुकीचे लिहित असेन तर विरोध करु शकता )

संतांचा आदर करावा पण भोंदुबाबांना कड्क शिक्षा व्हायला हवी.श्रद्धेला आधुनिकतेचा काही धोका नसावा आणि तुम्ही म्हणताय तसं काळाच्या उदरात चांगल्या गोष्टी गडप होणार नाहीत ,कारण वैज्ञानिक दॄष्टीकोन आणि आधुनिकता माणसाला प्रत्येक गोष्टीकडे डोळसपणे बघण्याची दॄष्टी जरी देत असली तरी जोपर्यंत चांगली मुल्य आणि संस्कार अबाधित आहेत तोपर्यंत काळजी करण्यासारखं काही नाही.त्यामुळे आधुनिकता उथळ(चुकीची) नाही .

केवळ साधुसंतांनी सांगितले म्हणुन परस्त्री मातेसमान मानन्यापेक्षा स्त्रीयांना मान , आदर देण्याची शिकवण देण्याची जबाबदारी पालकांची(सगळ्यांची) आहे. हे लहानपणापासुनच घरातुन शिकवले पाहिजे.

संतांचा आदर करावा पण भोंदुबाबांना कड्क शिक्षा व्हायला हवी

--> +१

पण प्रश्न हा आहे कि खरा कोण आणि ढोंगी कोण हे तुम्ही कसा शोधणार ?

हे लेखन आवडलेले मायबोलीकर कोण असेल ? त्या आय डी चा सत्कार करावा असे मला वाटते. Happy

केवळ साधुसंतांनी सांगितले म्हणुन परस्त्री मातेसमान मानन्यापेक्षा स्त्रीयांना मान , आदर देण्याची शिकवण देण्याची जबाबदारी पालकांची(सगळ्यांची) आहे. हे लहानपणापासुनच घरातुन शिकवले पाहिजे.
------ समोरच्या प्रत्येक व्यक्तीला मान द्यावा... मान देण्यासाठी स्री, वरिष्ठ नागरिक असा काही क्रायटेरिया नको.

मी माबो वर येतो ते फक्त या धाग्याच्या काम्मेंत्स वाचण्यासाठी ... you are सिम्पली अ rockstar विना तै ...
कसला मस्त धागा उघडलाय ... लोकांच्या जीवनाला दिशा मिळाली ... ध्येय मिळाले आहे ...
सध्या सर्वांचे एकाच उद्दिष्ट आहे ... धागा १००० ला न्यायचा म्हणजे न्यायचाच..
कितीही अडचणी येउ देत... कितीही लोक मूळ विषयावर येउ दे ...

कायदा पाळा गतीचा ... काळ मागे लागला ... थांबला तो ( धागा ) संपला...

संतांचा आदर करावा पण भोंदुबाबांना कड्क शिक्षा व्हायला हवी
--> +१

पण प्रश्न हा आहे कि खरा कोण आणि ढोंगी कोण हे तुम्ही कसा शोधणार ?
--------- च्रप्स यान्च्याशी सहमत.... मला असुमल ढोन्गी वाटतो पण तो/ते इतरान्ना सन्त वाटतो. आमचे स्वामी सच्चे आहेत ते इतर भोन्दू बाबासारखे खोटे नाही अशी प्रामाणिक भावना भक्तमन्डळीत असते.

पण प्रश्न हा आहे कि खरा कोण आणि ढोंगी कोण हे तुम्ही कसा शोधणार ?>>

पैसे घेउन उपदेश देनारा ढोंगी
---- बहुतान्श वेळा हे चालेल पण सर्व ठिकाणी लागू पडेलच असे नाही. पैसा नसेल तर इतरही अनेक गोष्टीन्चा मोह या चोरान्ना असतो.
पेपर चाळले तर हरियाणामधे नुकत्याच अटक केलेल्या बाबा कडे काय काय साहित्य मिळाले ? या वरुन त्यान्च्या व्यावसायाचे जाळे किती मोठे आहे हे दिसते....

पण प्रश्न हा आहे कि खरा कोण आणि ढोंगी कोण हे तुम्ही कसा शोधणार ?<<< ह्यात वीणातैंचा आयडी पण आला का?

डीविनिता | 30 December, 2014 - 11:08
पण प्रश्न हा आहे कि खरा कोण आणि ढोंगी कोण हे तुम्ही कसा शोधणार ?<<< ह्यात वीणातैंचा आयडी पण आला का?

--->

हहहहहहह .... लोल

Pages