१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.
सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).
आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.
जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.
आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?
हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.
थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .
या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.
Bhushan dada toooooooo gud
Bhushan dada toooooooo gud
कोकणस्थ माईंड जर आपण ब्रेन या
कोकणस्थ माईंड जर आपण ब्रेन या अर्थाने बोलत असाल तर तसा काही प्रकार अस्तित्वातच नसतो.>>
स्वतःच्या बाबतीत केलेल्या कन्फेशनबद्दल हार्दिक अभिनंदन.
बेफिकीर
बेफिकीर![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
मुळ धाग्या कडे वळु
मुळ धाग्या कडे वळु या....
<<हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे.>>.
या बद्द्ल मायबोली करांचे काय मत आहे कृपया अॅडमिनच्या विपुत लावलेल्या पोस्ट पाहुन प्रतिक्रिया देऊ नयेत.
सोप्पे सोप्पे वचनं सांगु शकतो.
<<हेच ओळखून पूर्वीच्या साधू
<<हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे.>>.
केवळ साधुसंतांनी सांगितले आहे म्हणुन परस्त्री मातेसमान मानन्यापेक्षा प्रत्येक स्त्रीला हा सन्मान किंवा योग्य मान ,आदर देण्याची शिकवण आणि संस्कार घरातुनच मिळाले पाहिजेत. प्रत्येलाका स्त्रीचा आदर हा स्वता:हुन वाटला पाहिजे ,नाहीतर कीतीही, कोणीही सुवीचार सांगितले तरी काही उपयोग होत नाही.
धागा पुन्हा मूळपदावर
धागा पुन्हा मूळपदावर आणतो.
सुरु बाइंचे अभिनंदन
आद्य विमानपिता तळपदे यांच्यावर येत्या जानेवारीत हवाईजादा नावाचा शिनेमा येणार आहे.
http://hindinewsportal.com/daily/2014/12/26/film-hawaijada-official-trai...
यु ट्युबावर ट्रेलर उपलब्ध आहे
बरोबर आहे अगदी सिनि. सुरेख,
बरोबर आहे अगदी सिनि. सुरेख, शिका काहीतरी यांच्याकडून.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मी कॉमनसेन्स मध्ये डिप्लोमा
मी कॉमनसेन्स मध्ये डिप्लोमा आणि लॉजिक मध्ये डिग्री केलीय, स्मार्ट थिंकिंगमध्ये जन्मापासूनच मास्टर आहे, तरी सध्या औट ऑफ द बॉक्स थिंकींग वर पीएचडी चालूय, अध्येमध्ये प्रत्यय येतच राहणार..>>
खिसा शिवतो त्या डाव्या बाजूच्या आत कुठेतरी माणूस नावाचे यंत्र चालू असते, तो विचारही तिथूनच करतो, ब्रेन फक्त त्याने केलेले विचारांची अंमलबजावणी करायला इतर ईंद्रियांना आदेश देतो>>>
माबो सन्यास घ्यायलाच हवा आता....
कोकणस्थ स्त्रियांना डोळा
कोकणस्थ स्त्रियांना डोळा मारुन बोलू नये हे सुसंस्कार नव्हेत.
ऋन्मेष : Keep It up .....
ऋन्मेष :
Keep It up ..... तसही लॉजिकल लिहीण्याचा ठेका फक्त काही ठराविक लोकांकडेच आहे इथे
येव्हड्यात काही नविन धागा वगैरे काढला की नाहि. काढला असल्यास लिंक दे बर जरा.....
कोकणस्थ स्त्रियांना डोळा
कोकणस्थ स्त्रियांना डोळा मारुन बोलू नये हे सुसंस्कार नव्हेत.
सुरेख, तुम्ही मला संस्कार शिकवावेत हा मोठा जोक आहे![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
आणि योग्य ठिकाणी स्वल्पविराम द्यायला शिका
माझ्या मते ऋन्मेऽऽष ला
माझ्या मते ऋन्मेऽऽष ला म्हणायचे असेल" दिल से सोचो दिमाग से नही "
कोकणस्थ, स्त्रियांना डोळा
कोकणस्थ, स्त्रियांना डोळा मारुन बोलू नये हे सुसंस्कार नव्हेत.+१
माझ्यासारख्या( डुय)आयडी ला समर्थन दिल्याबद्दल. धन्यवाद .![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कोकणस्थ स्त्रियांना डोळा
कोकणस्थ स्त्रियांना डोळा मारुन बोलू नये हे सुसंस्कार नव्हेत.>>![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
फक्त कोकणस्थ स्त्रियांनाच का? बाकिच्यांनी काय घोडं मारलय..
कोकणस्थ या शब्दानंतर comma
कोकणस्थ या शब्दानंतर comma द्यायचा राहिला यांचा![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अग्निपंखा, अनेक लोक फॅशन
अग्निपंखा, अनेक लोक फॅशन म्हणुन गुडघ्यावर खिसे असलेली पॅन्ट पण वापरतात. सिक्स पॉकेट की कायसेसे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व् www.youtube.com/watch?v=pj
व्
www.youtube.com/watch?v=pjtN0IV_lJc
हवाईजादा .. ट्रेलर मस्त आहे.
कोकणस्थ माईंड जर आपण ब्रेन या
कोकणस्थ माईंड जर आपण ब्रेन या अर्थाने बोलत असाल तर तसा काही प्रकार अस्तित्वातच नसतो.>![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
<<
कोकणस्थ माईंड असा प्रकार, किंवा ब्रेन या अर्थाने वापरलेला कोकणस्थ माईंड हा प्रकार अस्तित्वात नसतो, याचेशी शमत!
कोकणस्थ, सुसंस्कार शिका
कोकणस्थ, सुसंस्कार शिका स्वल्पविरामच काय घेऊन बसलात.
माझ मराठी व्यकरन साक्षात ब्रम्हदेव पण सुधारु शकनार नाही..
अरिगातोगोजायमास.
रीन्हामोतुंला
रीन्हामोतुंला
रीन्हामोतुंला>> +१
रीन्हामोतुंला>> +१
जोशीबुवा, तुम्ही काय +१ देताय
जोशीबुवा, तुम्ही काय +१ देताय कप्पाळ??
स्मिता सचिन, द्यायला नको होतं
स्मिता सचिन, द्यायला नको होतं का?
ऋन्मेऽऽष, >> माईंड जर आपण
ऋन्मेऽऽष,
>> माईंड जर आपण ब्रेन या अर्थाने बोलत असाल तर तसा काही प्रकार अस्तित्वातच नसतो. जिथे आपण शर्टाला
>> खिसा शिवतो त्या डाव्या बाजूच्या आत कुठेतरी माणूस नावाचे यंत्र चालू असते, तो विचारही तिथूनच करतो, ब्रेन
>> फक्त त्याने केलेले विचारांची अंमलबजावणी करायला इतर ईंद्रियांना आदेश देतो.
त्याचं काये की स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. तसंच तुमच्या विधानातला फोलपणा कळण्यासाठी स्वत: मरायला टेकणं आवश्यक आहे!
त्यामुळे तूर्तास हे विधान चालू वर्षातले सर्वात लखलखीत स्वयंप्रमाणित मुक्ताफळ धरायला हरकत नाही. ![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
आ.न.,
-गा.पै.
विशेष विनंती : वर्ष संपायला आजून दीड दिवस बाकी आहे. बघा आजून काही जमतं का!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अरे वा! मलाही ड्युआयडी गेस
अरे वा! मलाही ड्युआयडी गेस करता येउ लागले की अचुक.
स्मिता सचिन>>>>>:-)
काही समजलं नाही स्मिता सचिन.
काही समजलं नाही स्मिता सचिन.
गा मा
गा मा![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
गामा
गामा![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
जोशीबुवा, तुम्ही काय +१ देताय
जोशीबुवा, तुम्ही काय +१ देताय कप्पाळ?? जोशीबुवा=कोकणस्थ का?????
मी कोकणस्थच आहे
मी कोकणस्थच आहे![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
Pages