क्रस्ट्साठी:
साधारण २/३ कप बिस्किटांचा चुरा ( निल्ला वेफर्स, ओरीओ, मारी, ग्रॅहम क्रॅकर्स यापैकी तुमच्या आवडीप्रमाणे)- मी निल्ला वेफर्स फूड प्रोसेसर मधून काढुन घेते.
१ टे. स्पून ग्रॅन्युलेटेड साखर ( ओरीओ वापरल्यास साखर वापरायची गरज नाही)
४ टीस्पून अनसॉल्टेडबटर, वितळवून घेतलेले
केक बॅटर
८ औस क्रिमचीज, रूम टेंप्रेचरला मऊ झालेले
१/२ कप साखर
१ टे स्पून + १ टीस्पून ऑल परपझ फ्लोर
१ मोठे अंडे
१ १/२ टे. स्पून कॉफी सिरप
रेडीमेड उपलब्ध नसल्यास
कॉफी सिरप साठी
१ टे स्पून कोमट पाणी
२ टे. स्पून साखर
१/२ टे स्पून इंन्स्टंट कॉफी ग्रॅन्युल्स
प्रथम क्रस्टसाठी बिस्किटांच्या चुर्यात साखर घालून नीट मिसळून घ्या. आता त्यात वितळवलेले बटर घालून मिश्रण फोर्कने नीट ढवळून घ्या. कॉफी सिरपसाठी एका छोट्या वाटीत कोमटपाणी, साखर आणि कॉफी ग्रॅन्युल्स घालून चमच्याने ढवळून एकजीव मिश्रण करुन घ्या.
१२ कप -मफिन पॅनमधे कपकेक लायनर्स लावून घ्या. मफिन पॅन नसेल तर कुकीशीटवर १२ कपकेक लायनर्स मांडा. त्यात तळाला क्रस्ट्साठी केलेले मिश्रण घालून शॉट ग्लासने किंवा बोटांनी दाबून फर्म क्रस्ट करुन घ्या.
ओवन ३०० फॅ. ला प्रीहीट करत ठेवा. साधारण २ कप पाणी ओवनसेफ पॅनमधे घालून ते पॅन ओवनच्या खालच्या रॅकवर ठेवा.
एका मोठ्या बोलमधे क्रिमचीज घ्या. त्यात साखर घालून हॅन्ड मिक्सरने मस्त क्रिमी होईपर्यंत बीट करा. आता त्यात कॉफीसिरप घालून १ मिनिट बीट करा. १ अंडे फोडून घाला. अंडे नीट मिक्स होईपर्यंत बीट करा. आता हे मिश्रण कपकेक लायनर्स मधे पळीने घाला. कपकेक लायनर्स बरताना वरच्या कडेच्या साधारण पाव इंच खाली इतपतच भरा. या कामासाठी आईसक्रिम स्कूप वापरल्यास काम झटपट होते.
मफिन पॅन /कुकी ट्रे ओवनच्या मधल्या रॅकवर ठेवून १६-१८ मिनीटे बेक करा. केक बाजून सेट आणि सेंटर थोडे हलतेय्/ओलसर आहे असे झाले की बाहेर काढा.
अर्धा ते एक तास वायर रॅकवर गार होऊ द्या. मग फ्रीजमधे कमीत कमी ४तास ठेवा. मी रात्रभर ठेवते. मिनी चीजकेक तयार आहेत. आवडत असल्यास आणि वाढीव कॅलरीज चालणार असल्यास चीजकेकवर चॉकलेट ग्लेज, व्हिप क्रिम घालू शकता.
ओवनमधे जास्त रॅक्स नसल्याच त्याच रॅकवर छोट्या बोलमधे पाणी ठेवावे. आद्रता मिळणे महत्वाचे. हेच प्रमाण वापरुन मिनी स्प्रिंगफॉर्म पॅन्समधे २ छोटे चीजकेक्स करता येतील. मी बरेचदा सहा मिनी केक्स आणि एक छोटा चिजकेक करते. कॉफी सिरपऐवजी वॅनिला घालून प्लेन चिजकेक करता येइल. वर सजावटीसाठी आवडीप्रमाणे बेरीज.
Photo? ?????
Photo? ?????
तयार झालेले चीज केक्स दाखवा
तयार झालेले चीज केक्स दाखवा की
(No subject)
है शाब्बास ! मस्त दिसतायत
है शाब्बास ! मस्त दिसतायत
यम्मी दिसताएत एकदम!
यम्मी दिसताएत एकदम!
मस्त दिसतायत..
मस्त दिसतायत..
मस्त दिसतायत!
मस्त दिसतायत!
धन्यवाद!
धन्यवाद!
वाह यम्मी एकदम. पटकन उचलून
वाह यम्मी एकदम.
पटकन उचलून तोंडात टाकावा वाटला.
यम्मी !
यम्मी !
मस्त रेसिपी! करून बघीन
मस्त रेसिपी!
करून बघीन स्वाती..........माझा अत्यंत आवडता आहे चीजकेक.
मस्त दिसताहेत !
मस्त दिसताहेत !
पुन्हा एकदा धन्यवाद! अपडेट-
पुन्हा एकदा धन्यवाद!
अपडेट- वरील रेसीपी १/३ फॅट क्रिमचीज वापरुन ट्राय केली, चवीत फरक जाणवला नाही.
१/२ कप साखर आवरा
१/२ कप साखर
आवरा