तिलापिया मासे( मी कॉस्टकोतुन किर्कलॅन्ड ब्रॅन्डचे तिलापिया लॉयन नावाचे आणले)
तर असे २ मासे थॉ करुन
लिन्बु-१ मोठे
शान तन्दुरी मसाला
कोथिन्बैर-आल-लसुण याची एकत्र वाटून चटणी २ टेबलस्पुन
मिठ,हळद
तिलापिया मासे पाकिटावरिल सुचनेप्रमाणे थॉ करुन घ्या, एका माश्याचे ३ तुकडे करुन त्याला वरुन एखादी बारिक खाच करा. अर्ध्या लिन्बाचा रस आणी,मिठ,हळद माश्याला लावुन घ्या बाकि अर्ध्या लिन्बाच्या रसात शान मसाला मिक्स करुन पेस्ट तयार करा आता हि पेस्ट माशाला लावुन घ्या, त्यावर हिरव वाटण
थोड थोड लावा. आता मासे अर्धा-एक तास मुरु द्या.
तोवर ओव्हन ३५० ला तापत ठेवा, ओव्हन हिट झाले की सगळ्यात खालच्या रॅक वर मासे २० मिनिट शिजवुन घ्या नन्तर १० मिनिट ब्रॉइल सेटिन्ग वर ठेवा. खरपुस झाले की सर्व करा.
शानच्या मसाल्यात पुरेसे तेल असते, मी आणखी तेल अजिबात वापरलेले नाही.
तिलापिया ला भारतातात काय म्हणतात ,कुठे मिळतील हे जाणकार(वाचा:जागु) सान्गु शकतिल.
ग्रिल सेन्टिन्ग असेल तर ओव्हन-बॉइल अशा स्टेप करायची गरज नाही.
तिलापिया म्हण्जे कमीतकमी
तिलापिया म्हण्जे कमीतकमी मसाले लाउन (फक्त तिखट, मिठ, हळद, लिम्बू) लाउन कमीतकमी तेलात कमीत कमी वेळात करण्याचा प्रकार आणि तरीही जास्तीत जास्त चवीचा मासा म्हणुन केला जातो.
असाही करुन बघिन
वॉव छान यम्मी दिसतय. टिलापिया
वॉव छान यम्मी दिसतय. टिलापिया च कालवण आणि फ्राय करून बघितला छान लागत. प्ण तन्दूरी ह्म्म्म्!!!!! नाक्की करणार.
अवान्तरः इकडे चेरियन्स मधे पापलेट, हलवा, सुरमई, मान्देली मिळते. त्यापैकी पापलेट आणि मान्देली ट्राय केली. पापलेट झक्कस. पण मान्देली अगदीच वैस. अक्खा पॅकेट टाकून द्याव लागल. आता पापलेट पण आणायची इच्छा नाही होत इत्का तो वास नाकात बसलाय.
पुन्हा घ्यावे कि नाही शन्का वाटतेय. ़कारण पॅकेट्वर युस बाय्,सेल बाय, पॅक्ड ओऑन असा तपशील नव्हता.
अवान्तराबद्द्ल क्षमस्व.
मी पण एकदा एशियन मार्केट मधला
मी पण एकदा एशियन मार्केट मधला पापलेट खराब निघाल्यापासुन फक्त कॉस्ट्को मधुन तिलापिया आणि सॅमन च घेते. फ्रेश क्रॅब मात्र घेते तिथुन.
कमीतकमी तेलात >> हा कमी
कमीतकमी तेलात >> हा कमी तेलातच आहेत, शानच्या मसाल्यात जेवढ तेल आहे तेवढच वापरलय मी!
कमीत कमी वेळात करण्याचा प्रकार आणि तरीही जास्तीत जास्त चवीचा मासा म्हणुन केला जातो. >> हे मला खरच माहित नाही, किन्बुहना चिकन्,मासे आवडत असुन ते माझे फोर्टे अजिबात नाही, मासे तर पहिल्यान्दाच केले आहेत.
हे मला खरच माहित नाही>>
हे मला खरच माहित नाही>> आमच्या कडे गं. बाकी इतर लोक कसा करतात माहीत नाही. तुझी रेसीपी (स्पेशली फोटो ) मस्तच आहे
तिलापिया म्हणजेच
तिलापिया म्हणजेच चिलापी
याबद्दल वाचनात आलेला लेख वाचा
भारताबाहेर कदाचित परिस्थिती वेगळी असेल.
अतिशय चविष्ट मासा पण भारतात खाता येत नाही, खाऊ नये.
तंदूरी मसाला हा टिपिकली दही
तंदूरी मसाला हा टिपिकली दही लावून केला जातो. शान च्या मसल्यात दही असेल तर ठाउक नाही. ग्रिल्ड मासा म्हणता येइल
छान दिसताहेत तुकड्या
छान दिसताहेत तुकड्या !
विनिता, छान लेख आहे. नैरोबीतही हा मासा लोकप्रिय आहे, तिथे त्याला फार मसाला लावत नाहीत.
आपल्याकडे जसा या माश्याने उच्छाद मांडला आहे ( त्या लेखात लिहिल्याप्रमाणे ) तसाच लेक व्हीक्टॉरियात नाईल पर्च या माश्याने मांडला होता.
काल-परवा नवरा करमाळ्याजवळ
काल-परवा नवरा करमाळ्याजवळ हुरडा पार्टीसाठी गेला होता. तिथे त्याला चिलापी म्हणजे टिलापिया असे मासे विकणार्याने सांगितले. ८० रु. किलोने हे मासे मिळत होते. भारताबाहेर कायम टिलापिया खात असू त्यामुळे येताना आमच्यासाठीही तो ते घेऊन आला. फिले नव्हते, इथल्यासारख्याच तुकड्या करुन दिल्या. चव आवडली.
कुतूहल वाटून मायबोलीवर जागूने चिलापीवर लेख लिहिलाय का शोधायला आले तर हा धागा दिसला.
डीविनिता लेख अगदी योग्य वेळी वाचनात आला ! ती लिंक दिल्याबद्दल अनेक धन्यवाद. त्या मासेवाल्याने पुण्यात सुद्धा हे मासे १०० रु किलोनेच मिळतात, चव किती छान असते, लोकं उगीच पापलेट-सुरमईच्या मागे लागतात वगैरे बरेच काही सांगितले. एकदा खाल्ला ठीक आहे, वरचेवर खाण्यात अर्थ नाही हे समजले. पण आजकाल अश्या ढीगाने ( आणि म्हणून स्वस्त ) मिळणार्या सगळ्याच फिशच्या बाबतीत ( बासा पटकन आठवला ) हे लागू होते की काय ? जे फिश प्रदुषणामुळे टिकू शकत नाही ते दुर्मिळ त्यामुळे किंमत खूप जास्त. एवढे महाग फिश न परवडणार्यांनी तब्येतीचे नुकसान करुन न घेता कुठले फिश खावे मग ?