१. दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून, चौकोनी फोडी करून..
२. तीन हिरव्या मिरच्या.
३. तीन टेबलस्पून तेल.
४. दोन ते तीन टेबलस्पून ओले खोबरे.
५. फोडणीसाठी मोहरी, हिंग, कढीपत्ता
६. मीठ अर्धा ते पाऊण टीस्पून.
६. चिमूटभर हळद.
बटाटा हा जरी परदेशी पाहूणा असला तरी आपल्या देशात तो सगळ्यानी आपलासा करून घेतला आहे. तो नैवेद्यालाही चालतो. बटाटा आवडत नाही अशी फारच थोडी माणसे सापडतात.
या भाजीला जरा तेल जास्त लागते, कारण बटाटा तेल शोषतो.
फोडणीसाठी तेल तापवा. त्यात हिंग, मोहरी , कढीपत्ता टाकून नेहमीसारखी फोडणी करा.
मग त्यात हिरव्या मिरच्या टाकून परतून घ्या.
मग बटाटाच्या फोडी टाका.
हळद, आणि मीठ टाकून नीट ढ्वळून घ्या.
आता झाकण टाकून चांगली वाफ येऊ द्या.
ओले खोबरे टाकून परतून घ्या.
हवी असल्यास चिरून कोथंबीर टाका...
पाणी घालायचे नाही आहे. भाजी तेलावर शिजते. अगदीच कोरडी वाटली तर थोडे तेल टाका.
मिरची कमी-जास्त करता येईल.
कोकणात देवाच्या पानावर ही भाजी वाढतात.
इतरः
http://www.maayboli.com/node/50731 चेट्टीनाड मसाला
http://www.maayboli.com/node/49007 अमेरिकेत डोकं न वापरता उंधियू
http://www.maayboli.com/node/45519 'खडे आलू' अर्थात बाळ्-बटाटे
http://www.maayboli.com/node/46057 मालवणी भाजाणे वापरून केलेल्या पाककृती (व्हिडिओ)
http://www.maayboli.com/node/45955 पास्ता
http://www.maayboli.com/node/42083 कोवळा फणस
http://www.maayboli.com/node/46123 डाळ पक्वानची डाळ
उपासाच्या भाजीला हिंग, मोहरी,
उपासाच्या भाजीला हिंग, मोहरी, हळद आणि कढीपत्ता चालतो का? (मी उपास, तापास करत नसल्याने आणि बाकी हे चालत नाही, ते चालत नाही मानत नसल्यामुळे मला फरक पडत नाही)
आमची उपासाची भाजी- बटाटे उकडून चौकोनी फोडी करून घ्यायच्या. तुपावर जिरं, लाल सुक्या मिरच्यांची फोडणी करून त्यावर बटाटा टाकयचा. झाकण घालून वाफ काढून मग वरून दाण्याचं कूट, मीठ, साखर, कोथिंबीर इ.
उकड बटाटा आणि हा फोटो...
उकड बटाटा
आणि हा फोटो...
आमच्या कडे उपासाची भाजी
आमच्या कडे उपासाची भाजी सायोने लिहिल्याप्रमाणे. तुमच्या कृतीनुसार भाजी नैवेद्याच्या पानावर वाढायला.
सायो इज म्हणिंग द
सायो इज म्हणिंग द राइट.
उपासाची नव्हे, नैवेद्याची म्हणा मग.
यात आलं, लिंबू, साखर आणि आणखी लाडात असाल तर धने-जिर्याची पावडर भारी लागते. फारच लाडात आलात तर मटारही.
आमच्या कडे उपासाची भाजी
आमच्या कडे उपासाची भाजी सायोने
लिहिल्याप्रमाणे. तुमच्या कृतीनुसार
भाजी नैवेद्याच्या पानावर वाढायला.>>> +1
गोगा,शिर्षक confusing आहे
जाई, स्वाती, स्वाती, सायो -
जाई, स्वाती, स्वाती, सायो - दुरुस्ती केली आहे...
ही उपासाची भाजी नाही,
ही उपासाची भाजी नाही, नैवेद्याची आहे. हिची क्लासिक चव असते.
छान आहे उकड बटाट्याची
छान आहे उकड बटाट्याची नैवेद्याची भाजी .
स्वाती_आंबोळे ,तुमची पद्धत पण छान आहे भाजीची . (पण साखर सोडुन)
आमच्याकडे एकादशीच्या उपवासाला करतात ह्याच पद्ध्तीने .पण फक्त बटाटा ,मीठ, मिरच्या आणि ओले खोबरे एवढचं . ही भाजी जरा जास्त खरपुस परतली तर मस्तच लागते.
गोगांनी रेसिपी लिहीली
गोगांनी रेसिपी लिहीली म्हटल्यावर काही तरी एक्झॉटिक असेल असे वाटले होते
आई अशीच करते नैवेद्याची भाजी. संक्रांतीला किंवा रथसप्तमीला केली तर हमखास मटार घालते. हळद फोडणीतच घातली तर एकसारखी लागते सगळ्या फोडींना.
गोगांनी रेसिपी लिहीली
गोगांनी रेसिपी लिहीली म्हटल्यावर काही तरी एक्झॉटिक असेल असे वाटले होते <<< ते कधी कधी सात्विक पण खातात......