Submitted by _आनंदी_ on 16 December, 2014 - 11:47
ऐरोली मधल्या शाळां बद्दल विचारायच होत
१) युरो स्कूल- घरा पासुन जवळ आहे(असेल) ICSC बोर्ड आहे..
युरो स्कूल ICSC मान्यता मिळालेले आहे ना? (नवर्याने उगाच डोक्यात घातल आहे हे)
२) NHP :- CBSC
हे कसं आहे?
घरापासुन जवळ असेल..
DAV/ VIBGYOR जरा लांब आहेत..
प्लिज मदत..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आता डिसेंबरात मधनंच शाळा
आता डिसेंबरात मधनंच शाळा कशाला ?
दूर असले तरी डीएव्ही मस्त
दूर असले तरी डीएव्ही मस्त शाळा आहे. स्कूल बस सर्विस चांगली आहे. सीबीएस सी शाळा आहे. इतर उपक्रम,
टीच र्स काउन्सेलिन्ग, चांगले आहे. पुढे अकरावीबारावीपण आहे. शाळेच्या वेबसाइट् वर अॅड मिशन प्रक्रियेची
माहिती मिळेल.
काउ अॅडमिशन प्रक्रिया आताच सु रू होते. व फेब मध्ये खतम एप्रिल्मध्ये शा ळा सुरू होतात.
अग्गोबै , माहीतच नव्हते..
अग्गोबै , माहीतच नव्हते.. आमचं अजुन नर्सरीत आहे.
DAV changli aahe. Mazya eka
DAV changli aahe. Mazya eka colleague kadun eiklay
DAV आणि NHP दोन्ही चांगल्या
DAV आणि NHP दोन्ही चांगल्या आहेत, माझ्या बहीणीची मुलगी NHP मध्ये काही, तीही चांगली आहे.
NHP पेक्शा NHSS New horizon
NHP पेक्शा NHSS New horizon scholars school चांगली आहे. टीचर चांगले आहेत. पालकही चांगले रिव्ह्यु देतात. फक्त nhss la स्वताचे ground नाहीये. बस सर्विस एकदम चांगली आहे.
nhp and nhss मधे लोक कन्फ्युज होतात. या वर्षी nhss took over nhp.
Euroschool महाग आहे. यांचेही ग्राउंड स्वताचे नाही. पालिकेचे वापरतात.
मान्यता आहे की नाही हे बघणे
मान्यता आहे की नाही हे बघणे गरजेचेच आहे.
शाळांना मान्यता क्रमांक असतो तो पहाणे. cbsc and Icsc दोन्ही बोर्डाच्या वेबसाईटवर शाळेचे नाव व क्र. बघता येतो.
CBSE - Central Board of
CBSE - Central Board of Secondary Education
ICSE - Indian Certificate of Secondary Education
Khup confuse hot aahe.. Euro
Khup confuse hot aahe.. Euro ICSE aahe ani nhp cbsc.. Kay karu.. ICSE mule euro cha wichar karat aahot.. Ani mulila school bus chi garaj padu naye as watat aahe .. Karan nhp aani euro donhi jawal ahet.. Sector१9 .. Icse ki cbsc ha mukhy mudda aahe..
Dusari gosht euro madhe music skate etc pahile nhp madhe the aahe ka?
I dont have experience with
I dont have experience with icsc but CBSC gives more rounded exposure and there are also plenty of extra curricular activities. projects etc. Also if your child plans to do college from Maharashtra, pl note for 11th and 12th they have to study in SSC pattern. The change over is a bit difficult from both ICSC and CBSC
school buses are much safer than sending a kid on the road to walk to school is my opinion or you can drop her by car. auto is again risky.
There is no major difference
There is no major difference in ICSE n CBSE. CBSE has Hindi language till 5 Std. By the way, those schools are aligned with board guidelines n they both have individual syllabus.
NHP tution fee is less but student count is 40 to 60 per class.
Euro tution fee is higher but student count is 25 to 35 per class.
In navi mumbai, no school has own play ground. Cidco has alloted school plot next to play area plot.
Both schools are good so I would suggest to consider school based on your budget for next 10 years. But consider school which is near by your home.
विबग्योरला विचारले तर
विबग्योरला विचारले तर सांगितले की ग्राऊंडसाठी शाळेच्या बाजूलाच जागा घेतली आहे आणि ग्राऊंडचे काम सहा एक महिन्यात पूर्ण होईल.
DAV कोणत्या सेक्टरला आहे?
डी. ए. व्ही. एकदम मस्त आहे..
डी. ए. व्ही. एकदम मस्त आहे.. १ली ते दहावी मराठी चा ऑप्शन देखिल आहे..
डि. ए. व्ही. सेक्टर १० ला आहे .. मुलुंड ऐरोली ब्रिज जवळ..
धन्यवाद, सतिश.
धन्यवाद, सतिश.
डि.ए.व्ही. मागिल ५ वर्षे
डि.ए.व्ही. मागिल ५ वर्षे नवीमुंबईत टॉप टेन स्कुल मध्ये येत आहे..
नासा - एम्स स्पेस सेटलमेंट डिझाईन काँटेस्ट मध्ये प्रथम पारितोषिक मिळवीले आहे..
शाळा मुलांना बाहेरगावी नेताना, सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वेची अख्खी बोगी बुक करुन मुलांना नेते..
सर्वांना खुप धन्यवाद.. सध्या
सर्वांना खुप धन्यवाद..
सध्या तरी असा निर्णय घेत आहे की, नर्सरी साठी युरो स्कूल ला अॅडमिशन घेईन..
एक वर्ष अनुभव घेऊ.. थोडा अंदाज येईल सगळ्याचाच म्हणजे ICSE /CBSC , युरो कि दुसरी शाळा ई चा ..
तरी कोणाला काही अधिक माहिती असेल तर प्लिज शेअर करा..
सतिश, विबग्योरबद्दल काही
सतिश, विबग्योरबद्दल काही माहिती असेल तर कृपया द्या. प्रथमदर्शनी तरी आर्थिक दृष्ट्या खूपच खर्चिक वाटली. (प्राथमिक वर्गांची वार्षिक फी लाख दीडलाखाच्या घरात आरामात जाईल.) शिवाय दरवर्षी फियांमध्ये वाढ होणारच. पण इन्फ्रास्ट्रक्चर तरी चांगले वाटले. त्यात राबवले जाणारे उपक्रम वैविध्यपूर्ण वाटले. अर्थात त्यांच्या वेगळ्या फिया असाव्यात.
तिथेच आजूबाजूला आणखी कोणत्या शाळा आहेत? विबग्योरच्या मागच्या बाजूला एक सेंट झेविअर्स शाळा आहे. ती शाळाही चांगली आहे असे तीनचार जणांकडून ऐकले. पण तिथे फक्त SSC आहे बहुतेक. (नक्की माहीत नाही.)
माझ्या सरांची दोन्ही मुले (२
माझ्या सरांची दोन्ही मुले (२ री / सिनियर) euroschool मध्येच आहेत आणि त्यांच्यामते ती चांगली शाळा आहे. (सर मुलुंडला राहत असुन जैन आहेत) धर्म सांगण्याचे कारण की हे लोक फारच choosy असतात आणि सर तर आहेतच म्हणजे त्यांनी निवडलेली शाळा योग्यच आहे असे नाही पण वाईट तर नक्कीच नसणार.
बर, अमुक एका धर्माच्या लोकांबद्दल बोलतेय किंवा विनाकारण धर्म मधे आणला करत माझ्यावर दातओठ खाऊन भांडायला येऊ नका ही नम्र विनंती
विबग्योर शाळा यावर्षी चालू
विबग्योर शाळा यावर्षी चालू झाली आहे. शाळेचा स्टाफ चांगला नाही.
Thank u nilsan.. Thod
Thank u nilsan.. Thod positive waachun bar waatal
युरो स्कूल ची बस आमच्या
युरो स्कूल ची बस आमच्या मुलुंडच्या काँप्लेक्स मध्ये येतेच. तिथे पण असेच चूझी सिलेक्ट क्लास लोक्स आहेत. नर्सरीतच आहे मुलगी म्हणजे बराच मोठा पल्ला गाठायचा आहे सातवी - आठवी नंतर काय ते सीरीअस विचार होईल.
Hmm.. Amaa choosy class
Hmm.. Amaa choosy class mhanaje high fandoo ka?
Saadhech shala hawee khar tar.. Euro high fight watal..
Saadhech shala hawee khar
Saadhech shala hawee khar tar.. Euro high fight watal.. >> मागच्या पोस्टमधेच युरोस्कुल महाग आहे असे लिहीले होते. पण तुमच्या या पोस्टमुळे पुन्हा एकदा इथे लिहीतेय. युरोस्कुलची फी जास्त असल्याने अर्थातच तिथे थोड्या उच्चमध्यमवर्गाची किंवा श्रीमंत मुलं असणार हे सत्य आहे. तिथले अॅन्युअल डे, पिकनिक इत्यादीचे खर्चही जास्त असतात ( ही ऐकीव माहिती, प्रत्यक्ष अनुभव नाही) खरतर शाळेत एकदा विजिट केली तरी ते सहज लक्षात येते
डिएव्ही, एनएचपी, एनएचएसएस या शाळाही अगदी स्वस्त नाहीत पण तरी साधारण मध्यमवर्गातलीही मुले इथे असतात.
गजानन, विबग्योर हे प्रायमरी, सेकंडरी स्कुलपण आहे का? नसल्यास नंतर पुन्हा अॅडमिशनची कटकट होते आणि हवे तिथे अॅडमिशन मिळत नाही.
ग्राऊंडसाठी शाळेच्या बाजूलाच जागा घेतली आहे आणि ग्राऊंडचे काम सहा एक महिन्यात पूर्ण होईल >> असे आम्हालाही एका शाळेत जागा दाखवुन सांगितले होते. दोन वर्षानीही त्या जागी अजुन स्क्रॅप पडलेले आहे.
गजानन, नर्सरीतच शाळा फार खर्चिक वाटत असेल तर पुन्हा एकदा विचार करा. मुलं मोठी झाली की अॅक्टीविटी, कसले कसले डे, ट्रिप्स इत्यादी वाढतातच. त्यांचे खर्चही वाढतात. दर वर्षी / वर्षा आड इयत्तेप्रमाणे फि वाढही होते. शिवाय शाळेची बस असेल तर त्याचाही खर्च प्रचंड असतो. २५ ते ५० हजार अशा साधारण शाळांच्या फि आहेत ( त्याहुन कमी फि वाल्याही अर्थातच आहेत पण इथला साधारण अंदाज देतेय ) . बसच्या फि अण्तरावर अवलंबुन असतात तरी ८००रु महिना ते २०००रु महिना होऊ शकते. डिझेल रेट प्रमाणे ते वाढेलच.
दहावी होईपर्यंत किती खर्च होईल ते विचार करा.
Hmm.. Amaa choosy class
Hmm.. Amaa choosy class mhanaje high fandoo ka?>> तसेच नाही पण डिसर्निंग. मुलांच्या शिक्षना ची काळजी घेणारा जागरूक पालक वर्ग.
सावली म्ह ण ते आहे तो प्रश्न मला ही कधी कधी पडत असे. हैद्राबादेत बंजाराहिल्स मध्ये काही खूप श्रिमंत पब्लिक आहे. व दर वेळी आपल्याला तितका खर्च जमेलच असेनाही. त्यात बेडरूम एसी, क्लास रूम एसी, बस एसी कार तर एसी आहेच इतक्या कृत्रिम वातावरणात मला मूल वाढवायचे नव्हते. म्हणून दि ल्ली पब्लिक स्कूल वगैरे शाळा घेतल्या नाहीत. महर्शी विद्या मंदीर उत्तम शाळा आठवी परेन्त व मग डीएव्ही ऐरोली तून
नववी दहावी. सी बी एस सी टू सीबी एस सी प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडली. जानेवारीत फॉ र्म भरून फेब मध्ये परीक्षा वगैरे झाल्या. डीएव्ही स्टाफ छान आहे. मध्य म वर्गीय व उच्च मध्यम वर्गीय मुले आहेत.
थोडे योगा, वगैरे ओरिएंटेशन आहे. अभ्यास क्रमाबरोबरच मुलांना चांगली व्हॅल्यू सिस्टिम देउ शकणा री शाळा बघा. खूप उपयोग होतो.
सावली, राजू, धन्यवाद. सावली,
सावली, राजू, धन्यवाद.
सावली, विबग्योरला आता प्लेस्कूलपासून सहावीपर्यंतचे वर्ग आहेत आणि दरवर्षी एक याप्रमाणे पुढचे वर्ग वाढणार आहेत, असे सांगण्यात आले. तिथल्या इतर शाळांच्या फियांचा अंदाज दिल्याबद्दल धन्यवाद. ही शाळा अगदी जवळ होती म्हणून प्रथमदर्शनी तीच असली तर बरे, असे वाटत होते. ग्राऊंडचे तुम्ही म्हणताय ते आहेच. प्रत्यक्ष झाल्याशिवाय काही खरे नाही. तसे राहत्या जागी सोसायटीचे ग्राऊंड आहेच, त्यामुळे शाळेच्या ग्राऊंडबाबतीत तडजोड करण्यासारखे आहे.
सेंट झेविअर्सबाबत कोणाला माहिती असल्यास कृपया कळवा. किंवा विबग्योर, सेंटझेविअर्स जवळ इतर कोणत्या शाळांची माहिती असेल तर कृपया लिहा.
अजूनपर्यंत स्कूलबसमधून पाल्याला पाठवणे मनाला कंफर्टेबल वाटत नव्हते आणि स्वतः जाऊन सोडणे शक्य होते म्हणून स्कूलबसने पाठवले नव्हते. पण आता ते करावे लागेल बहुतेक. तुम्ही तुमची मुलं स्कूलबसने सोडत असाल तर शाळा ते घर अंतर एक ते दीड किमी हे फार आहे का? (१ ते दीड हे सरळमार्गे गूगलने दाखवलेले अंतर आहे, शाळेची बस फिरत फिरत जाणार.)
विबग्योरला आता प्लेस्कूलपासून
विबग्योरला आता प्लेस्कूलपासून सहावीपर्यंतचे वर्ग आहेत आणि दरवर्षी एक >> अॅफ्लिएशन आहे का ते आधी शोधा मग.
आयसिएससी अफ्लिएशन शोधण्यासाठी
http://www.cisce.org/Locate.aspx
सिबिएससी अॅ. शोधण्यासाठी
http://schools.icbse.com/states/
सेंट झेविअर्सबाबत >> माहित नाही काहीच.
तुम्ही तुमची मुलं स्कूलबसने सोडत असाल तर शाळा ते घर अंतर एक ते दीड किमी हे फार आहे का? >> माझ्यामते नाही पण.. नुसत्या अंतराबरोबरच बसचा साधारण वेळही बघा. मधे खुप स्टॉप असतील/ ट्रॅफिकचा रस्ता असेल तर ते मुद्दे बघा. माझ्या घरापासुन एक शाळा सुमारे ८/ ९ किमी दुर आहे पण बसला २५ मिनीटे लागतात. दुसरी शाळा पाच किमी आहे पण बसला ४० मि. लागतात. अजुन एक शाळा घरापासुन (माझ्या नव्हे, मैत्रिणीच्या ) ३ किमी आहे आणि बसला ४५ मिनीटे लागतात!!
स्कुलबसने पाठवताना -
स्कुलबससाठी सरकारने केलेले नियम पुर्ण वाचा. शाळेची बस सर्विस ते फॉलो करते की नाही ते पहा. फार कमी शाळांच्या स्वतःच्या स्कुलबस सर्विसेस आहेत. पण कॉन्ट्रॅक्टवरच्या बस पेक्षा शक्यतो अशा सर्विसेस बघा. कारण यात ड्रायवर, क्लिनर आणि मावशी या बॅकग्राउंड चेक केलेल्या ( अशी अपेक्षा आहे ) आणि बहुतेकवेळा पुर्ण वेळ असतात. कॉन्ट्रॅक्टवरच्या बसमधे ड्रा. क्लि. मावशी बदलत असु शकतात.
स्कुलबसचे नियम फक्त अॅडमिशनच्या वेळेस नाही तर रोजच फॉलो होतात की नाही ते पहा. होत नसल्यास शाळेत लगेच त्याच दिवशी नोंदवा ( त्यासाठी ऑफिसला उशीर झाला तरी चालेल !) स्कुलबसमधे नवा अनोळखी माणुस असणे, मावशी नसणे हे एखाद्या दिवसासाठीही धोकादायक आहे.
पैसे वाचवण्यासाठी ओमनी(!)ने किंवा रिक्षाने मुलांना पाठवु नका, यांचे चार्जेस खुप कमी असतात आणि अर्थात सेफ्टीची वाट लागलेलीच असते. जी शाळा तुमच्या एरियात चांगली बस सर्विस देत नाही त्या शाळेत अॅडमिशन घेऊ नका.
हुश्श..
Sarwaana dhanyawaad..
Sarwaana dhanyawaad.. Maayboli war wicharlyawar mahitee milel hi khatri hotich
गजानन, नवीन मुंबईत स्कूलबसचे
गजानन, नवीन मुंबईत स्कूलबसचे नियम कडक आहेत. पिवळया बसमध्ये 1 किंवा 2 स्त्रिया मुलांसाठी मदतनीस म्हणून असतात.
तुम्ही शाळा/ तुमच्या सोसाय़टीच्या पालकांमध्ये प्रायव्हेट/ शाळेच्या स्कूलबस/ बसरूटची चौकशी करा.
माझी दोन्ही मुले ( 5 आणि 8 वर्षे) प्रायव्हेट स्कूलबसने 5 किमी जातात.
सावली, राजू, धन्यवाद. राजू
सावली, राजू, धन्यवाद.
राजू तुमच्या पोस्टमुळे बराच कम्फर्ट आला.
आज मी DAV ला जाऊन आलो.
कोणाला माहिती हवी असेल तरः
त्यांची नर्सरी आणि ज्यु केजी ची प्रवेशप्रक्रिया ३ जाने. ते ८ जाने. दरम्यान असणार आहे. अर्ज घेतल्यानंतर दोन दिवसांत भरून द्यायचा आहे. मग त्यानंतर पुढची प्रक्रिया. म्हणजे अॅडमिशन कन्फर्म झाल्यानंतर फी भरणे वगैरे.
सी केजी ते नववीच्या वर्गातले प्रवेश फेब्रु. ३ र्या आठवड्यात सुरू होणार आहे.
गजाननन, ऐरोली रबालेच्या
गजाननन, ऐरोली रबालेच्या दिशेला त्या दोनच शाळा आहेत, विबग्योर आणि सेंट झेवियर्अस.
सेंट झेवियर्असला लोकल ( ऐरोली/ रबाले गावठाण) क्राऊड आहे. शाळा जुनी आहे पण गर्दी जास्त आहे.
Pages