चांदुल्याला घातल ढगांच टोपडं (अंगाई)

Submitted by सत्यजित on 2 July, 2008 - 02:11

चांदुल्याला घातल ढगांच टोपडं
आभाळाची शाल पांघरुन झोपी गेलं बापडं

चांदुल्याच्या शालीवर लुकलुक तारे
टकामका पाहती चांदुल्याला सारे
दृष्ट लागेल असं माझ्या, चांदुल्याच रुपडं

चांदुल्याचे लाड बाबा करती आती
आत्या, मामा खेळणी आणती किती
कुणी आणलं असवल, नी कुणी आणली माकडं

तुझ्या सवे खेळताना वाटते बरे
सर्व नित्य चिंतांना विसरती सारे
तुझ्या सवे झालं बघ, घर सार बोबडं

चांदुल्याला बर नसता आई गं जागते
पदर पसरुन देवाकडे आजी गं मागते
आजोबाही घालती देवा कडे साकडं

बघता बघता माझं बाळ मोठ होईल
बंगला नी गाडी काय विमान ही घेईल
आत्ताच होउ लागल बघा, झबलं ही तोकडं

उत्कर्षाला असावी संस्कारांची साथ
आपण ही व्हाव कुणा आधाराचा हात
येवढच माझ मागणं, आज गं देवाकड

चांदुल्याला घातल ढगांच टोपडं
आभाळाची शाल पांघरुन झोपी गेलं बापडं

चांदुल्याच्या शालीवर लुकलुक तारे
निजता गं चांदुल्याला झोपी सारे
बोलू नका कुणी आता बाळ आहे झोपल...

-सत्यजित.

गुलमोहर: 

खुप छान

==============
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा

बघता बघता माझं बाळ मोठ होईल
बंगला नी गाडी काय विमान ही घेईल
आत्ताच होउ लागल बघा, झबलं ही तोकडं
>>>>
किती गोड! Happy
सत्या, सध्या ’बालसाहित्यावर’ जोर आहे, काय विशेष? Happy
----------------------
The cheapest face-lift is a SMILE
Happy

सत्यजीत गोड आहे रे. मागे पण तू एक बालकविता लिहीली होतीस ना.
फारच छान आणि सहज.

चिनु, सारंगी, दिमदु, पुनम, संघमित्रा प्रतिक्रिये बद्दल आभार.. मला वाटल होत कुणाला आवडत की नाही... रोज बालगित आणि बडबड गीत कोण वाचणार?... कुणा आवडो ना आवडो कुणा एका आईने जरी बाळाला जोजवताना ऐकवली तरी समाधान पावेलो असा विचार करुन टाकली. मना पासुन Thanks!!! आता अजुन बालगीत लिहीन म्हणातो Happy Happy Happy

पुनम, काही विषेश नाही तस माझ बाळ आता ३ वर्षाच झाल आहे.. त्यामुळे तो आता अंगाई वगैरे ऐकत नाही, मलाच ऐकवतो.. Happy
बाल साहीत्यावर जोर येवढाचे की ते जास्त लिहिल जात नाही आणि मला लहान मुलं प्रचंड आवडतात तेव्हा सर्व बाळांसाठी माझ्या कडुन जमेल तस, पण त्यांच्या पर्यंत पोहचवायच इफेक्टीव साधन नाही Sad असो...

संघमित्रा,
माझ्या बालकविता मी येथे संग्रहीत केल्या आहेत सत्याच्या पलीकडले. . .

कुणाला जर बालगीतांसाठी चाली सुचल्या तर मला नक्की कळवा...