आधुनिकता की उथळपणा ?

Submitted by वीणा सुरू on 15 December, 2014 - 10:16

१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.

सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).

आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.

जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.

आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?

हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.

थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .

या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देशमुखजी
सॉरी पण ते एकतर समजत नाहीये, त्यात पूर्वग्रहदूषित वाटतंय. राजकारणाकडे जास्त झुकलेलं. आपला विषय काय आहे बघा बरं ? आय मीन मतितार्थ.

मायबोली वर एव्ढ्या लोकांना एकाच वेळी एवढे हसताना पुर्विकधी पाहिले नव्हते...>> सुरेख. मायबोली अभ्यास बराच कमी पडतोय हां. माचूपिचूची आरती म्हणा.

मितार्थच लिहिला आहे मी
थोडे गुढपणाकडे झुकलेले आहे पण माझे लिखाण बहुदा गुढवादी असल्याने असे घडले असावे

काय हे माचू न पिचू सारखंच ? पिठलं काय न प्~ओपक्~ओर्न काय.. आणि यात हसण्यासारखं तरी काय आहे हे कळू द्या एकदा.

नियम क्र. १ वाचा प्लीज.

<<नेहमी धाग्याला सुस्वरुपच प्रतिक्रिया देतो.>>सुस्वरुप म्हणजे ? Happy
अक्षरशः चुथडा करतात लोक्स . अरे नियम वाचत चला ना Happy

नियम वाचुन समजुन त्यावर चर्चा करुन मग परत विचार करुन मग इतर प्रतिक्रिया वाचुन बघुन समजुन त्यानंतरच प्रतिक्रिया दिलेली आहे

<,नियम वाचुन समजुन त्यावर चर्चा करुन मग परत विचार करुन मग इतर प्रतिक्रिया वाचुन बघुन समजुन त्यानंतरच प्रतिक्रिया दिलेली आहे>.

दिवाकर देशमुख, शेवटच्या वाक्यात गुढवादी प्रतिक्रिया अशी दुरुस्ती करा.

इब्लिस, माचूपिचूची आरती कुठे वाचायला मिळेल?.

मला कधी कधी गंमतच वाटते. पारंपारिक सायन्स विसरल्याची उदाहरणे विचारली आहेत कुणीतरी.
पाच का अनेक देता येतील आठवून लिहायचं म्हटलंच तर.

इथे आत्ता आठवणीत असलेली काही उदाहरणे देता येतील

१. खगोलशास्त्राला आज शास्त्र म्हणून मान्यता मिळालेली आहे. पण आपले पूर्वज ल्युनार कॅलेंडर वापरत असत. नक्षत्रावरून समुद्रप्रवास अचूक करीत असत. तेव्हां जीपीएसची सोय नव्हती. या कॅलेंडरवरून कालमापन करण्यात येई. वैदीक कालगणनेप्रमाणे मोजलेल्या पृथ्वीच्या सूर्याला प्रदक्षिणा घालण्याच्या वेळेत आणि आजच्या प्रगत कालमापन पद्धतीत फक्त २८ सेकंदांचा फरक होता.

२. मुंबई येथे बडोद्याचे महाराज सयाजीराव शिंदे यांच्या उपस्थितीत एका गरीब ब्राह्मणाने विमानविद्येचा प्रयोग करून दाखवला. हा प्रयोग यशस्वी झाल्याने इंग्रजांनी त्यांचा छळ करून विमानविद्येची सर्व पुस्तके जप्त केली आणि अमानुष अत्याचार करून विमानविद्या इंग्लंड अमेरीकेत नेली. त्यानंतर तिकडे विमानाचा शोध लागला. या घटनेचे पुरावे आहेत. पण ते देऊनही आधुनिकवादी लोक त्यावर विश्वास ठेवत नाहीत.

३. मनाच्या शांतीसाठी लोक मानसोपचार तज्ञाकडे जाऊन लाखो रूपये घालवतात. पण आमच्या प्राचीन ध्यान, विपश्यना या पद्धतींमुळे स्ट्रेस मॅनेजमेंट होते हे पाश्चात्य जगताने मान्य केल्यानंतर काळ्य़ा आधुनिकवाद्यांची मोठीच पंचाईत झाली. आर्ट ऒफ लव्हिंग ही जगातली सर्वाधिक वेगाने विस्तारणारी एक संस्था आहे. हे कशाचं निदर्शक आहे ?

वरील तीन मुद्यांचीच व्याप्ती इतकी सखोल आहे की आणखी उदाहरणांची गरज पडू नये. पण नगास नग या न्यायाने पाच म्हणजे पाचच असा आग्रहच असेल तर आठवल्यानंतर आणखी लिहीन.

तूर्तास इतकेच.

परंपरागत गोष्टींमधे सायन्स आहे आणि ते समजून न घेता मोडीत निघाले अशी पाच उदाहरणे मिळतील का?>>> असा प्रश्न होता, विसरल्याचा नव्हता...
मला नाही वाटत तुम्ही दिलेली उदाहरणे कुणा भारतीयांच्या स्मृतीतून गेलेली आहेत.

काही अशास्त्रीय शंका उत्पन्न झाल्या, त्या अशा:

वरच्या माचुपिचुला इंका लोकांच्या क्यालेंडरची माहिती दिलेली आहे. त्याबद्दल व अशाच प्रकारच्या इजिप्शिअन वगैरे लोकांच्या खगोलाबद्दल थोडा अभ्यास करा. (तुम्हालाही बराऽच अभ्यास करायचा आहे अजून. प्रचारकी साहित्य म्हणजे अभ्यास नव्हे. Wink )

तर, खगोलशास्त्र ही आपली मक्तेदारी नव्हे.

*

>>
२. मुंबई येथे बडोद्याचे महाराज सयाजीराव शिंदे यांच्या उपस्थितीत एका गरीब ब्राह्मणाने विमानविद्येचा प्रयोग करून दाखवला. हा प्रयोग यशस्वी झाल्याने इंग्रजांनी त्यांचा छळ करून विमानविद्येची सर्व पुस्तके जप्त केली आणि अमानुष अत्याचार करून विमानविद्या इंग्लंड अमेरीकेत नेली. त्यानंतर तिकडे विमानाचा शोध लागला. या घटनेचे पुरावे आहेत. पण ते देऊनही आधुनिकवादी लोक त्यावर विश्वास ठेवत नाहीत.
<<
गरीब ब्राह्मण अन विमानविद्या ही १००% भाकडकथा आहे. पुरावे द्या, पुन्हा तपासू.
तुम्हाला सयाजीराव महाराजांचे आडनांवही ठाऊक नाहिये.
पुन्हा एकदा, अभ्यास करायची भयंकर गरज आहे. उग्गं उचल्ला कीबोर्ड लागला बडवाया, असं करू नये.

*
पण आमच्या प्राचीन ध्यान, विपश्यना या पद्धतींमुळे स्ट्रेस मॅनेजमेंट होते हे पाश्चात्य जगताने मान्य केल्यानंतर काळ्य़ा आधुनिकवाद्यांची मोठीच पंचाईत झाली. आर्ट ऒफ लव्हिंग ही जगातली सर्वाधिक वेगाने विस्तारणारी एक संस्था आहे. हे कशाचं निदर्शक आहे ?
<<
०. पाश्चात्य लोक बर्‍याच गोष्टी करतात. उदा. मध्ययुगापासून असलेली रेशियल अ‍ॅपर्थाईड. साम्राज्यवाद इ. हे तुम्हीदेखिल आदर्श मानून सर्रास करणार का? काय वाट्टेल तो बिण्डोकपणा केवळ पाश्चात्यांनी सांगितला म्हणून आम्ही मान्य करतो, हे तुम्हाला कुणी सांगितले?

१. विपस्सनेत हिंदू धर्म कुठून आला?

२. आर्ट ऑफ लिव्हिंग व त्याचे प्रणेते श्रीश्रीश्री यांच्या पद्धतींबद्दल हे थोडे : LEAVING THE ART OF LIVING

पैसे घेऊन 'धर्म' शिकवणार्‍यांचा मला जाम राग येतो बायदवे.

३. पाश्चात्य जगाचे स्ट्रेस घेत जाऊ नका. अमेरिकेत (शिकागो) रहायला का गेलात आपण?
आमच्या त्या एक काकू होत्या जगभर फिरणार्‍या. वलसाडचं वाचून ते आठवलं.

काळ्य़ा आधुनिकवाद्यांची
<<

या रेसिस्ट वक्तव्याबद्दल निषेध!

ही अत्यंत भिकारडी मनोवृत्ती आहे असे म्हणतो.

अमेरिकेत अशी वक्तव्ये जाहीररित्या कराच, मज्जा येईल, असेही सुचवितो Happy

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र लोकांनी विषय बदलला
<<
हो नं!
मधेच पंजा अन अमानुष ताकत आणली त्यांनी Sad

...

त्वमेव माचु च पिचु त्वमेव, त्वमेव बापु सखा त्वमेव,....

हरे माचु हरे पिचु....

काळ्य़ा आधुनिकवाद्यांची
<<
या रेसिस्ट वक्तव्याबद्दल निषेध!
ही अत्यंत भिकारडी मनोवृत्ती आहे असे म्हण्तो.+११११११११११

इब्लिस, 'शेवटल्या टिंबांवर क्लिक करून पहा म्ह्णालात पण माचुपिचु मधे टिंबंच नाहिय.:(

पु. लं नि कित्ती सुंदर शब्दात संस्कृती म्हणजे काय हे सांगितले आहे……..
शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी. वांग्याचे भरीत. गणपतीबाप्पा मोरया ची मुक्त आरोळी. केळीच्या पानातली भाताची मुद आणि त्यावरचे वरण. उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ. मारुतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळाचे उडालेले पाणी. दुसर्याचा पाय चुकून लागल्यावर देखील प्रथम केलेला नमस्कार. देवा समोर दिवा लाऊन म्हटलेले दिव्य दिव्य दिपत्कार. आजीने सांगितलेल्या भुताच्या गोष्टी. मारुतीची न जाळणारी आणि वाट्टेल तेव्हा लहान मोठी होणारी शेपटी. दसर्याला वाटायची आपट्याची पाने. पंढरपुरचे धूळ आणि अबीर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखर फुटाणे. सिंहगडावर भरून आलेली छाती आणि दिवंगत आप्तांच्या मुठभर अस्थींचा गंगार्पणाच्या वेळी झालेला स्पर्श. कुंभाराच्या चाकावर फिरणार्या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजूक हात लागून घाटदार मडके घडावे तसं ह्या अदृश्य पण भावनेने भिजलेल्या हातानी हा पिंड घडत असतो. कुणाला देशी मडक्याचा आकार येतो तर कुणाला विदेशी कपबशीचा........

असे वाटते पु लं नि संस्कृती आणि ती जपण्यासाठी प्रत्येकाच्या मनात असणार्या हळुवार भावना अगदी अचूक शब्दात सांगितल्या आहेत. संस्कृती म्हणजे मनाच्या कोपऱ्यात हळुवार पणे जपलेल्या आपल्या आई बाबांच्या, आज्जी आजोबांच्या, आजूबाजूच्या वातावरणातील बालपणीच्या(आयुष्याच्या सगळ्यात आवडत्या) आठवणी........ संपूर्ण भारतीय संस्कृती बद्दल मला बोलत येणार नाही पण ज्या मराठी वातावरणात माझे बालपण गेले मी त्याबद्दल बोलावयाचा प्रयत्न करू शकेन.

नवीन वर्षाच्या सुरवातीला भिंतीवर दिसणारे कालनिर्णय. आज्जीची आठवण येउन आईने बनवलेला एखादा पारंपारिक पदार्थ आणि तो खाताना आईच्या डोळ्यांचा ओलावणाऱ्या कडा. साध्या कुंडीत का असेना पण हळुवारपणे हिवाळ्यातल्या गोठवणार्या थंडीत सुद्धा जपलेली तुळस. आईची आठवण येउन संध्याकाळी घरी आल्यावर संध्याकाळच्या संधिप्रकाशाच्या उजेडात तुळशी आणि देवासमोर लावलेला दिवा आणि मनापासून केलेली प्रार्थना. आपल्या आज्जी आजोबांच्या वयाचे कुणी भारतीय Senior citizen समोर आले कि नकळत जोडले जाणारे हात. आपल्या आवडत्या लेखकाच्या / लेखिकेच्या पुढील भारत भेटीत आवर्जून खरेदी करावयाच्या मातृभाषेतील पुस्तकांची केलेली यादी. चैत्रात आठवणीने केलेले हळदी कुंकू आणि कैरीचे पन्हे. सहज कुणा मैत्रिणीच्या घरी गेल्यावर उत्साहाने तिने दाखवलेले जस्मिन चे रोप, आणि मग हळूच त्या फुलांच्या जवळ जात असताना आपल्या मोगर्याचा येणारा सुगंध. नोव्हेंबरच्या थंडीत सुद्धा दिवाळी म्हणून दाराबाहेर काढलेली रांगोळी. कॅलरीजचे गणित विसरून गणपतीच्या नैवेद्धया साठी आवर्जून केलेले उकडीचे मोदक. मायबोलीच्या पारंपारिक पदार्थांच्या धाग्यावर आणि जगूदिच्या निसर्गाच्या धाग्यावर मारलेल्या गप्पा आणि वेळात वेळ काढून मायबोलीवर टाकलेली एक चक्कर. कदाचित ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्या संस्कृती बरोबरच तर जोडलेल्या आहेत. काळाबरोबर बदल हे घडणार. आपण आपल्यापरीने जे चांगले आहे ते घेण्याचा प्रयत्न करावयाचा. मला वाटते आपण प्रत्येकजण साध्या नेहमीच्या गोष्टीन मधून सुद्धा आपली संस्कृती अगदी सहज जपत असतो फक्त ते आपल्या लक्षात येत नाही.

मनात सहज ज्या भावना आल्या त्या अगदी तशाच शब्दात उतरविण्याचा प्रयत्न केला. कुणाच्याही भावना दुखविण्याचा हेतू अजिबात नाही.......

सयाजीराव गायकवाड होते.

तुम्ही त्याना शिन्दे करुन टाकलेत.

बरं पुस्तके इंग्रजानी जप्त केली.

तर ती अमेरिकेच्या राइट बंधुना कुणी नेऊन दिली ?

विणातै,
तुमचे म्हणणे आता थोडे पटते आहे. पन थोडे प्रश्न आहेत क्रउपया त्यावर बोलावे..
- हे सयाजी शिन्दे सातार्या जवळचे ना.., की बडोद्याचे? अन त्या 'विमानविद्येचा प्रयोग' बद्द्ल पन अजुन सांगा ना.
कारण सयाजी शिन्दे बर्याचदा विमान प्रवास करीत असतात..
-काळे अन पांढरे आधुनिकवादी म्हनजे नक्की कोण?

इब्लिस कि कोण ते

मला कधी कधी गंमतच वाटते या अशा वादप्रियतेची. भारतात पूर्वी सायन्स होतं यात शंकाच नाही. अनेक जुन्या ग्रंथात ते आहे. यासाठी संस्कृत अनिवार्य केलं तर हे भांडार सर्वसामान्यांना खुलं होईल. पण आधुनिकतेच्या नावाखाली त्याला विरोध होतोय ही अंधश्रद्धा नाही का ? हा मुद्दा का लक्षात येत नाही हेच कळत नाही.

http://sonimediacom.blogspot.in/2011/07/blog-post_541.html

हे पहा आता नेटवर सुद्धा संदर्भ मिळू लागले आहेत. यासाठी तुम्हाला संस्क्रुत शिकावी लागेल. आपले महान ग्रंथ पहावे लागतील. पूर्वी गुरुकूल पद्धतीमधे हे ज्ञान मिळत असे.

भारतात पूर्वी अनेक वैज्ञानिक होऊन गेले. कण्व ऋषींनी अणूचं अंतरंग सांगितलेलं आहे. हे सर्व विस्मृतीत गेलं आणि आपण रुदरफर्ड आणि बोरला सर्व श्रेय देत बसलो.

सयाजीराव महाराजांच्या आडनावात काही चूक असल्यास आणि कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास क्षमा मागते. माझ्या मते प्रयोग महत्वाचा होता. आडनाव चुकल्याने घटना तर बदलत नाही ना ? त्या काळच्या वृत्तपत्रात ते छापून आले आहे. त्यांनी जर या प्रयोगाला मदत केली असती तर त्यांचे नाव सर्वांच्या लक्षात राहीलेच्च असते. पण ते तरी काय करणार म्हणा ! ब्रिटीशांना दुखावून आपले राज्य कोण जाऊ देईल ?

ही कथा भाकडकथा आहे असं आजवर कुणी म्हणालेलं नाही. त्यामुळं इथे पुरावे देऊनही काही उपयोग होईल असं वाटत नाही. जिज्ञासूंनी गुगलवर शोधलं तर सापडेल.

डीविनिता
मध्यंतरी अध्यात्म, ध्यान हे सर्व टीकेचे धनी झाले होते. प.पू. रागमदेवजी महाराज. प.पू. श्री श्री गुरुजी यांच्यामुळे आज चांगले दिवस आले आहेत.

काळा साहेब असं बिनदिक्कतपणे म्हटलं जाई. गोरा साहेब गेला आणि काळा साहेब आला असं म्हणतात तेव्हां जो अर्थ अभिप्रेत आहे तोच मला काळा या शब्दातून अभिप्रेत आहे. उगीच त्याला वर्णभेदी रंग नका देऊ.

Pages