मागच्याच आठवड्यात मलाला या १७ वर्षीय विद्यार्थिनीला नोबेल हा पुरस्कार भेटला तिने केलेला शिक्षण प्रचार व काम याचा बदलाच जणू आज आतंकवादी संघटनेने घेतला आहे .
अतिशय क्रूर व अमानवी असा भ्याड हल्ला आज पाकिस्तानातील पेशावर या ठिकाणी विद्यार्थ्यावर झाला, फक्त ऐकले तरी अंगावर काटा येतो. उद्याचे भविष्यच जणू संपवायचा विचाराने हा हल्ला पाकिस्तानात झाला .
मालालाने अतिशय प्रामाणिक पणे व कष्टाने शिक्षण व त्याचा प्रसार करण्याचे काम केले आहे पण अश्या हल्ल्याने उद्या पालक मुलांना शाळेत सोडताना विचार करतील
१०० ते १२० विधार्थ्याना आपला जीव गमवावा लागला आहे तर तितकेच विध्यार्थी जखमी अवस्तेत जीवन मरण्याच्या उंबरठ्यावर झुंज देत आहेत . कालच सिडनी येथे आतंक माजवला होता ४० ते ५० नागरिकांना ओलिस ठेवले होतो , त्याच्याच दुसर्या दिवशी हा भ्याड हल्ला यावरून एकच सांगता येईल आतंकवाद हे जागतिक संकट आहे त्याचा बिमोड करण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येउन पावले उचलली पाहिजेत . जर नैसर्गिक आपत्ती आली तर प्रत्येक देश आपल्या परीने मदत करतो तसेच आतंकवाद संपवण्यासाठी जागतिक स्तरावर काही तरी अश्या संघटना उभारल्या पाहिजेत ज्यांची भीती आतांक्वन्द्याना वाटली पाहिजे .
देव त्या मुलान्च्या आत्म्याना
देव त्या मुलान्च्या आत्म्याना शान्ती देवो.:अरेरे: करतय कोण आणी भोगतय कोण?
आता तरी पाकिस्तानला भान येऊ दे की आतन्कवाद किती क्रूर असतो, जो दुसर्याबरोबर आपलेही सर्वस्व उध्वस्त करतो.
http://zeenews.india.com/news
http://zeenews.india.com/news/india/after-shamiwitness-discovery-india-b...
आता हा भस्मासूर कुणाच्याच
आता हा भस्मासूर कुणाच्याच ताब्यात राहिलेला नाही. सर्व जग एकवटून प्रतिकार करेल तरच काहीतरी आशा आहे <<<<<<< हो पूर्णपणे सहमत आहे .
http://zeenews.india.com/news
http://zeenews.india.com/news/world/sydney-hostage-crisis-as-it-happened...
अतिशय निंदनीय हल्ला!!
अतिशय निंदनीय हल्ला!! धर्मांधतेमुळे सगळे जग प्राचीनतेकडे (primitivity) कडे झुकते आहे
चीनही दहशतवादाचा सामना करतो
चीनही दहशतवादाचा सामना करतो आहे:
http://www.bbc.com/news/world-asia-china-30490727
Chinese authorities have arrested a knife-wielding man who injured three people waiting at a bus stop in Xinjiang, local media say. The incident took place in the region's capital, Urumqi, on Monday night. No information has been released on the attacker's identity or motivation.
But Xinjiang, which borders Central Asia, has seen a spate of attacks in recent months, amid tension between its minority Muslim Uighur population and Han Chinese residents.
(No subject)
अतिशय घृणास्पद निंदनिय
अतिशय घृणास्पद निंदनिय कृत्य!!
@#$%^&*&% !!!!
उद्या दैनिक सकाळमध्ये ब्रिटिश
उद्या दैनिक सकाळमध्ये ब्रिटिश नंदींचे लेखन वाचायची अतिशय उत्सुकता लागली आहे.
अत्यंत निंदनीय कृत्य.पण तरीही
अत्यंत निंदनीय कृत्य.पण तरीही क्षणभर मनात विचार आला की आतातरी पाकिस्तानला दहशतवादाचे दु:ख कळेल.
आशुचँप , सहमत. तडफड होते
आशुचँप , सहमत.
तडफड होते मनाची असं काही वाचलं की.
दुर्दैवी घटना . हि घटना
दुर्दैवी घटना . हि घटना मुस्लिम कट्टर धर्मान्धानी घडवून आणली हे च सत्य . पण या घटने मधून माझ्या देशाने काय धडा घ्यायला हवा ? धर्मांध हे धोकादायकच असतात . मग ते कुठल्याही धर्माचे असो . आपल्या कडच्या अनेक हिंदू धर्मांधाना सौदी अरब किंवा पाकिस्तान चे एक सूक्ष्म आकर्षण असत . ते म्हणजे ते बघा कसे कट्टर आहेत त्यांच्या धर्माबद्दल . नाही तर आपण किती मवाळ आहोत ? पण हिंदू धर्मांध सोयीस्कर पणे विसरतात कि १९७१ मध्ये याच सेकुलर देशाने एका कट्टर धर्मांध देशाला दोन तुकड्यात विभाजित केल होत . भारतासारख्या प्रचंड वैविध्य असणार्या देशासमोर , सगळ्या जाती धर्मा च माहेर घर असणार्या देशासमोर आव्हान आहे ते धर्मांधता न वाढू देण्याच . मग ती iSIS असो , LTTE असो , किंवा RSS असो . आता सध्या देशात ओवेसी , रामझादे वाली साध्वी , साक्षी महाराज , या लोकांची चलती आहे . दुसऱ्या धर्माच्या धर्मान्धांवर टीका करताना आपण आपल्या धर्माच्या धर्मांधाना थारा देत आहोत का याची खातरजमा आपण च करून घ्या . नाही तर महा शक्ती असण्याची क्षमता असणारा हा देश दुसरा पाकिस्तान बनेल यात काही शंका नाही . पंतप्रधान बनल्यावर मोदी ना हे नक्कीच कळले असेल पण भक्ताना ज्या दिवशी हे कळेल तो सुदिन .
अनुमोदन देणार होतो पण ही वेळ
अनुमोदन देणार होतो पण ही वेळ त्याची नाही
>>>नाही तर महा शक्ती असण्याची
>>>नाही तर महा शक्ती असण्याची क्षमता असणारा हा देश दुसरा पाकिस्तान बनेल यात काही शंका नाही . पंतप्रधान बनल्यावर मोदी ना हे नक्कीच कळले असेल पण भक्ताना ज्या दिवशी हे कळेल तो सुदिन .<<<
ह्या संतापजनक विधानाचा तीव्र निषेध!
एक तर ह्या विधानात धागा व धाग्याचे गांभीर्य भरकटवण्याचे पोटेन्शिअलच आहे असे नाही तर ते व्यवस्थित हेतूपुरस्पर करण्यातही आलेले आहे.
दुसरे म्हणजे तुलना करताना अतिशय स्वस्त घाई केलेली आहे. इसिस आणि संघ ह्यांची तुलना करणे हे कृत्य कोण करू शकते ते इथे सगळेजण जाणतातच.
वर पुन्हा असे म्हंटलेले आहे की मोदींना पंतप्रधान झाल्यावरच हे कळलेले असणार! हे अतिशय व्यक्तीगत रोख असलेले चीप विधान आहे.
आणि शेवटी उगाचच 'भक्त' वगैरे टर्म वापरून काहीजणांवर बिनबुडाचे व ***** ताशेरे झाडलेले आहेत व आपण कोणी आंतरराष्ट्रीय राजकारण व दहशतवाद ह्यातील सुपरतज्ञ आहोत असा आवही आणलेला आहे.
पाकिस्तानातील घटना समजल्यावर हेलावलेल्या सहृदय वाचकांनी असल्या निंद्य प्रतिसादांकडे ह्यापुढे दुर्लक्ष करावे अशी विनंती!
बावरा मन, भक्त हे मोदिंचे
बावरा मन,
भक्त हे मोदिंचे आहेत त्यांच्या विकासाच्या राजकारणाचे आहेत, भक्त राजकारण करत नाहीत !
आणि भाजपच्या ज्या ज्या मंत्र्यांची नेत्यांची जिभ घसरली त्यांना मोदीनीं आजच चागलच खडसावलय !!
पण ईथले काही लोक तर मोदीच्या नावाचे शत्रूच झालेत, अरे ते मोदी निवडुन आलेत, कोणाच्या मेहेरबानीवर,
कुठल्याही सहानभुतीच्या लाटेवर स्वार होऊन आलेले नाहीत.
बेफी.
बेफी.
१०००००००००००००००००००००००००००००००००००००% अनुमोदन !!!
ही बातमी वाचल्यापासून मन
ही बातमी वाचल्यापासून मन सैरभैर झाले आहे २६/११ च्या वेळी जसे वाटत होते तसेच वाटत आहे..अत्यंत हेल्पलेस!
अश्वत्थामी कृत्याचा निषेध
अश्वत्थामी कृत्याचा निषेध
हा धागा भरकटवणाऱ्या
हा धागा भरकटवणाऱ्या सर्वांचांच तीव्र निषेध...आणि पाकिस्तान्यांना अद्दल घडली म्हणणाऱ्यांचाही...
माझ्या मुलाच्या आणि त्याच्या साधारण वयाच्या मुलांची अशी निर्घृण हत्या झालेली पाहून थरकाप उडाला. त्या मुलांच्या जागी मला माझेच मूल दिसू लागले गोळ्यांपासून सैरावरा पळणारे...घरी जाऊ त्याला बघेपर्यंत जीवाला चैन नव्हती. आणि या सगळ्या नरकापासून आपण खूप दूर असल्याबद्दल बरेही वाटले. पण थोडाच वेळ.
बातम्या बघताना एक जाणिव काळीज पोखरून गेली. आज ते जात्यात आहेत आणि आपण सुपात आहोत. असाही आतंकवाद आपल्या घरापर्यंत येऊन ठेपला आहे. परवापरवा पर्यंत शांत समजल्या जाणाऱ्या पुण्यातही बॉंबस्फोट होत आहेत. मुंबईतले तरूण जाऊन इसीसमध्ये सामिल होत आहेत.
आणि दुर्दैव असे की आपण त्याविरोधात काहीही करू शकत नाहीत. सुरक्षाव्यवस्था कुठे कुठे आणि कशी कशी पुरवणार. मूलभूत सुविधा पुरवताना शाळांची मारामार, तिथे सुरक्षा कसली डोंबलाची देणार.
शाळा नाही, रस्ते नाहीत, सरकारी कार्यालये नाहीत. अक्षरश उघड्यावर पडल्यासारखे झालेय. आत्तापर्यंत काही घडणार नाही हा विश्वास होता त्यामुळे या गलथानपणा बद्दल फारसे काही वाटत नव्हते, पण आता कुठे काय होईल आणि काय ऐकावे लागेल याची शाश्वतीच उरली नाहीये काही.
हा आतंकवाद म्हणजे कॅन्सरसारखा झालाय. एकदा आला की शरीर पोखरून टाकतो आणि त्याचा उपचारही शरिराची नासा़डीच करत जातो.
आणि त्यातही काहींना राजकारण सुचतेय. मोदी येऊ देत नाहीतर राहूल गांधी...शेवटी निरपराध असल्याची किंमत तुम्हा आम्हालाच चुकवावी लागणार आहे.
आशुचँप सहमत...मुख्यत्वे
आशुचँप सहमत...मुख्यत्वे शेवटच्या वाक्याशी जास्तच....
आशुचँप, वा मस्त लिहीलत
आशुचँप,
वा मस्त लिहीलत की,
मग " आणि दाउदवर गोळी ..." हा धागा तुम्हाला एकदम फुसका बार वैगेरे वाटला होता, अगदी दोन तीन दिवसा पुर्वीच !! आता सगळ बदलल ?
तेंव्हा तुमच मत वेगळ होत आणि आता ते बदललय ?
जोशी ते कंदाहार विमान अपहरण प्रकरणावरती पण लिहा की. त्यावेळी कुणाचा फोन आलेला वगैरे
हे पण तुमचच वाक्य आहे !! ह्या विमानात सुद्धा एक प्रवासी असाच अतिरेक्यांनी मारला होता सर्वांसमक्ष ?
बरं मग.... तुम्हाला काय हे
बरं मग....
तुम्हाला काय हे हिशेब चुकते करायचे असतील ते तुमच्याच धाग्यावर करू. काय....
आणि माझे मत अजूनही तेच आहे. आणि तुमचा धागा हा फुसका बार आहे हे अजूनही सांगतो. आता बाकीची तुमची खरकटी आवरा आणि निघा.
ह्या क्रूर कृत्याचा तीव्र
ह्या क्रूर कृत्याचा तीव्र निषेध!
एक छोटीशी दुरुस्ती सुचवू का ?
<<मलाला या १७ वर्षीय विद्यार्थिनीला नोबेल हा पुरस्कार भेटला>> पुरस्कार भेटत नाही. पुरस्कार मिळतो. फक्त माणसच एकमेकांना भेटतात
धागा "फुसका" असेल ही पण
धागा "फुसका" असेल ही
पण कंदहार विमानात अपहरण प्रकरण आणि त्यात मरणारा प्रवासी हे तुमच्या मते
काय होते हेच ईथे प्रकर्षाने दिसल,
तुमच डबल स्टँडर्ड बस करा आणि एक तुमच्या पातळीला मला उतरता येणार नाहीच.
हे. मा. शे. पो.
नशिब माझे आणि सर्वांचेच...आता
नशिब माझे आणि सर्वांचेच...आता बोललाय त्याप्रमाणे वागा म्हणजे झालं...
अतिशय दुर्दैवी घटना. CNN वर
अतिशय दुर्दैवी घटना. CNN वर लहान मुलांचे फोटो पाहत असताना एक विचार मनात आला. त्यांच्या देशातील आतंकवादाचे दुर्दैव सत्य कित्ती भयानक प्रकारे नकळत्या वयात ह्या मुलांच्या समोर आले आहे. त्याचा त्यांच्या मानसिकतेवर कसा परिणाम होईल? हि मुले पुन्हा निर्भयपणे त्या शाळेत जाऊ शकतील का? मुल जो पर्यंत घरी येत नाही डोळ्यासमोर दिसत नाही तो पर्यंत आई वडिलांची काय अवस्था झाली असेल? कुठे नेउन ठेवणार हा धर्म माणसाला? लहान निरागस मुलांना काही समजण्या आधीच त्याचं आयुष्य त्यांच्याकडून घेणारा हा कुठला धर्म?
पण हिंदू धर्मांध सोयीस्कर पणे
पण हिंदू धर्मांध सोयीस्कर पणे विसरतात कि १९७१ मध्ये याच सेकुलर देशाने एका कट्टर धर्मांध देशाला दोन तुकड्यात विभाजित केल होत
>>>> 'प्रामाणिक' अभ्यासाची नितांत गरज आहे. नेमका आज १६ डिसेंबर आहे.
अत्यन्त चिड आणणारी घटना...
अत्यन्त चिड आणणारी घटना...
निरागस, निरपराधी, निशस्त्र शाळकरी मुलान्वर हल्ला करणारे अतिरेकी अगदी भ्याड आहेत.
मला वाटत हा दहशतवाद वरवर
मला वाटत हा दहशतवाद वरवर दिसतो तितका सरळ नाही, त्याची पाळंमुळ वेगळी कडे मुरललेली असावित कारण ज्या प्रमाणा मध्ये हे दहशतवादी कृत्य करतात आणि त्या साठी जो काही पैसा लागतो तो दहशतवाद्याना कोण पुरवतो? आणि कुणी जर 'क्ष' पैसे पुरवत असेल तर त्या गुतवणुकीतुन होणारा नफा हा कितीतरी पटीने जास्त असायला हवा.
धर्म, इस्लाम हे सगळ सोंग आहे, खर कांड काहीतरी वेगळच आहे असा मला दाट संशय आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्ता हे भाड्याचे टट्टू आहेत आणि करता करविता कोणीतती भलताच आहे. तालिबान ने अमेरिका, युके अशा धनाड्य आणि आधुनिक युद्ध सामुग्रीनी ससज्ज अशा देशाच्यां उकाळ्या पा़काळ्या काढणे हे काही शक्य नाही आणि त्यांना ते परवडण्या सारखेपण नाही. कुवेतच उदाहरण ताजं असताना तर नाहीच नाही.
जे काय झालय आणि जे काही चाललय ते तर्कशुद्ध विचार पद्धतिला अजिबात पटण्या सारख नाही. त्यामुळे >>आतंकवाद हे जागतिक संकट आहे त्याचा बिमोड करण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येउन पावले उचलली पाहिजेत .<< असं काही होईल हा भोळा भ्र्म आहे.
मुंबईतले तरूण जाऊन इसीसमध्ये
मुंबईतले तरूण जाऊन इसीसमध्ये सामिल होत आहेत.》》 Not only mumbai but they have reached to very small villages also. One boy from one very small , undeveloped village from satara was caught on border.he wanted to join isis. This was a shock for the whole village as well as his own family as nobody thought that this will reach to such a ground level.
In cities like satara also many of the muslim boys are targeted nowdays.
Pages