१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.
सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).
आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.
जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.
आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?
हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.
थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .
या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.
(No subject)
माचूपिचूच्या म्हणजे काय ????
माचूपिचूच्या म्हणजे काय ???? >> माझे प्रमाण चुकले म्हणुन पिठले चुकले ----- हे अस आहे होय .
माचुपिचु हे नाव आधुनिक वाटतंय. पिकाचु च्या जवळपासचं.
प्लिज पारंपारिक नाव सजेस्ट कर! ----- हे वाचून माझ डोक कुठे पण चालायला लागल होत.
(No subject)
(No subject)
नंदिनी, श्रद्धा आज्जी काय
नंदिनी, श्रद्धा आज्जी काय पारंपारिक आहेत होय?
त्यांनी त्यांच्या नातीला वेद अभ्यसाला न घालता इंजिनिअरींगला घातलं म्हणजे त्या अधुनिक आहेत
रच्याकने.. जिन्स घालुन
रच्याकने..
जिन्स घालुन (उपाशीपोटी) वडाला फेर्या मारणारी, मोबाइलवर (फेर्या मारतानाचा) प्रचि काढुन तो फेबुवर शेअर करणारी स्त्री आधुनिक की परंपरावादी?
आधुवादी!
आधुवादी!
अग्निपंख, विषयाला धरून
अग्निपंख, विषयाला धरून बोला.
पॉपकॉर्नचं काय झालं?
छान चर्चा चाललीय.
छान चर्चा चाललीय.
छान चर्चा चाललीय. चुकून
छान चर्चा चाललीय.
चुकून नाही, मुद्दाम दोनदा प्रतिसाद दिलाय. शतक गाठायचे होते.
अमानुष ताकद असलेल्या पंज्यात
अमानुष ताकद असलेल्या पंज्यात लुप्त होत आहेत.
<<
चला! यानिमित्ताने पंज्यात अमानुष ताकद असते हे बेफिंच्या एकदाचे लक्षात आले ते बरें झाले.
शाणे करुन सोडावे सकळजन अशी
शाणे करुन सोडावे सकळजन अशी आपली परंप्रा असतांना लिंबुदेव वेळ नाही असे म्हणत निळ्या तोंडाने निघुन गेले ही उथळता नव्हे काय?
इब्लिसदा, कोणाचं काय तर
इब्लिसदा,
कोणाचं काय तर कोणाचं काय
>>>चला! यानिमित्ताने पंज्यात
>>>चला! यानिमित्ताने पंज्यात अमानुष ताकद असते हे बेफिंच्या एकदाचे लक्षात आले ते बरें झाले.<<<
बरेच महिन्यांनी तुम्हाला कसलातरी आनंद झाल्याचे पाहून हिंदू धर्मातील देवांवरील माझी श्रद्धा योग्य असल्याचे जाणवले इब्लिस!
जाणवते देखील ? हबिणंदन
जाणवते देखील ?
हबिणंदन
पॉपकॉर्नचं काय झालं?>>> सध्या
पॉपकॉर्नचं काय झालं?>>>
सध्या मी डीविनितांच्या कृपेने उंदीर पकडत असल्यामुळे "पॉपकॉर्न" बद्द्ल नो कोमेंटस...
तुम्हाला उंदीर हवे आहेत का
तुम्हाला उंदीर हवे आहेत का अग्निपंख?
बेफि़जी, सध्या आहे तेव्हढे
बेफि़जी, सध्या आहे तेव्हढे पुरेसे आहेत..
अहो काय चाललंय काय इथे ?
अहो काय चाललंय काय इथे ? कुठल्य कुठे नेऊन ठेवलाय विषय
बेफिकीर
बेफिकीर
मीच एक व्यवस्थित आणि विषयाला
मीच एक व्यवस्थित आणि विषयाला धरुन प्रतिक्रिया दिलेली आहे. मी कधीच इकडची तिकडची प्रतिक्रिया कुठे ही देत नाही. नेहमी धाग्याला सुस्वरुपच प्रतिक्रिया देतो.
धन्यवाद
आ. नि.
दिदे
दिदे आ नि म्हणजे काय?
दिदे आ नि म्हणजे काय?
नितिन
नितिन
मायबोली वर एव्ढ्या लोकांना
मायबोली वर एव्ढ्या लोकांना एकाच वेळी एवढे हसताना पुर्विकधी पाहिले नव्हते...
बरेच महिन्यांनी तुम्हाला
बरेच महिन्यांनी तुम्हाला कसलातरी आनंद झाल्याचे पाहून हिंदू धर्मातील देवांवरील माझी श्रद्धा योग्य असल्याचे जाणवले इब्लिस!>>>माचूपिचू देव पावला का?
आ. नि.>>आपला निनावी
आ. नि.>>आपला निनावी
दिवाकर देशमुखजी. तुमचा
दिवाकर देशमुखजी. तुमचा प्रतिसाद वाचला.
अतिशय योग्य उदाहरण हा गट फारच आक्रस्ताळ पणे आपले म्हणने मांडतो हो. सगळ्या इतर नेत्यांंवर विनोद वगैरे करणे अतिशय घृणास्पद मजकुर पसरवणे इत्यादी कामे करत असतो. बरोबर आहे तुमचे.
धन्यवाद. आपण सहमत आहात हे पाहून बरं वाटलं.
मला दुर्लक्ष करणंच आवडलं असतं, पण इतकं अवांतर कसं बरं लिहवतं लोकांना ? काय फरक राहीला मग फेसबुक आणि इथे ?
अरे कुठे नेऊन ठेवला धागा
अरे कुठे नेऊन ठेवला धागा वीणाताईन्चा?:फिदी:
अजुन बरच काही लिहिले आहे
अजुन बरच काही लिहिले आहे मी
कृपया ते देखील वाचावे
वेळे अभावी जास्त लिहिता आले नाही क्षमस्व आहे
बरं झालं
बरं झालं
Pages