१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.
सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).
आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.
जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.
आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?
हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.
थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .
या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.
<<परीक्षा हि अनादी काळापासून
<<परीक्षा हि अनादी काळापासून अनंत काळापर्यंत स्त्रियांच्याच नशिबी आहे!
ओ ऋन्मेऽऽष कुठ्ल्या काळात राहताय तुम्ही..तुमच्या ग’फ्रेंडला सिता व्हायला सांग थोड्यावेळा आणि द्यायला सांगा अग्निपरिक्षा बघा मग ती काय म्ह्णते
अरे काही काही लोकं षडयंत्र
अरे काही काही लोकं षडयंत्र करून या धागाला मामीच्या 'त्या' धाग्यात जाण्यापासून रोकतायेत.
अशांना आवरा!
पॉपकॉर्न उपवासाला चालत नाहीत. दुसरं काही तरी द्या.
श्रद्धा काकू, तुमची नात आधुनिक इजिंनिअरिंग करते आहे की पारंपारीक?
(आधुनिक, पारंपारीक हे दोन शब्द आल्याने माझी पोस्ट विषयाला धरूनच आहे)
सुरेख, माफ करा, पण आजही
सुरेख,
माफ करा, पण आजही व्यभिचाराबाबत स्त्री-पुरुषांना वेगळे च निकष लागू होतात.
अशांना आवरा!>> एक पारंपारिक
अशांना आवरा!>> एक पारंपारिक उपाय सांगू का? माचुपिचुच्या देवाची आरती म्हणून बघ काही फरक पडतोय का?
>>पण वीज दाखवा असं आवाहन केलं
>>पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बो वळते बडी. >>> ???
यांची बो वळते बडी. >>> ???>>>
यांची बो वळते बडी. >>> ???>>> बापरे
पॉपकॉर्न उपवासाला चालत नाहीत.
पॉपकॉर्न उपवासाला चालत नाहीत. दुसरं काही तरी द्या.>>>
पारंपारिक उपवासाला आधुनिक पॉपकॉर्न चालु शकतात..साबुदाण्याचे
वरीचे आणि राजगिर्याचे पण
वरीचे आणि राजगिर्याचे पण चालतील
नंदिनी, माचुपिचु हे नाव
नंदिनी, माचुपिचु हे नाव आधुनिक वाटतंय. पिकाचु च्या जवळपासचं.
प्लिज पारंपारिक नाव सजेस्ट कर!
अग्निपंख : साबुदाण्याच्या पॉपकॉर्नचे प्रचि टाका बरं!
जागुतै
लोकहो, मायबोलीवर 'विनोद'
लोकहो,
मायबोलीवर 'विनोद' नावाचा स्वतंत्र धागा आहे की?
मुक्तपीठावर आलेयका मी?
मुक्तपीठावर आलेयका मी?
तुम्हाला अजूनही फरक वाटतोय?
तुम्हाला अजूनही फरक वाटतोय?
नंदिनी, माचुपिचु हे नाव
नंदिनी, माचुपिचु हे नाव आधुनिक वाटतंय. पिकाचु च्या जवळपासचं.
प्लिज पारंपारिक नाव सजेस्ट कर!
अग्निपंख : साबुदाण्याच्या पॉपकॉर्नचे प्रचि टाका बरं!
जागुतै फिदीफिदी>>
नुसते हसायलाच येतेय! काय जेवले होते बरे मी!!
राहून राहून उंदराचा धागा पण आठवतोय!!
लोकहो, एक अतिशय महत्वाचे
लोकहो,
एक अतिशय महत्वाचे वाक्य दिसले
<सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतात. त्यांची दशहत एव्हढी आहे की परंपरागत गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत.>
अतिशय योग्य उदाहरण हा गट फारच आक्रस्ताळ पणे आपले म्हणने मांडतो हो. सगळ्या इतर नेत्यांंवर विनोद वगैरे करणे अतिशय घृणास्पद मजकुर पसरवणे इत्यादी कामे करत असतो. बरोबर आहे तुमचे.
<चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र परंपरागत ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एकादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.>
बरोबर आहे तुमचे सोशल मिडीया मधुन प्रचार करुन चांगला योग जुळवुन सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. हो एकदा निर्णय घेतला कि घेतलाच ६००० करोड लोन कसे एका झटक्यात दिले फारच तत्परता आहे सरकार मधे. शंकराचार्य गेली १०-१५ वर्ष शांतच होते. काहीच बोलले नाही. ते फक्त योग्य सरकार येण्याची वाट बघत होते. अनुकुल सरकार आल्याबरोबर त्यांनी बोलायला सुरुवात केली बरोबर आहे आपले निरिक्षण. आपल्या निरिक्षणाला मी दाद देतो.
<<जर आपलं परंपरागत ते मोडीत निघालं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार>>
अतिशय बरोबर बघा इतके लोक पंतजलीच्या मागे लागले आहेत. दिवसरात्र त्यांचेच औषध घेतले आहे. ज्या १० वर्षात डाबर, हिमालया यांची भरभराट झाली नाही त्याच्यापेक्षा १००% भरभराट पंतजलीची झालेली आहे याचाच अर्थ लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकला. आता त्यांनी "कँन्सर" देखील बरे केले आहे म्हणजे सांगितले आहे पण ते खुद्द रामदेव बाबांसारख्या माणसाने सांगितल्यामुळे ते खरेच आहे. जगाने देखील ऐकले. रामदेवबाबांना वैद्यकिय शास्त्राचा "नोबल पुरस्कार" मिळाला पाहिजेच. तुम्ही चालु करा एखादी मोहीम मी आपल्यला नक्कीच साथ देणार. त्याआधी तुम्ही आपल्या सरकारला एक पत्र लिहा कि यंदा २६ जानेवारीला रामदेवबाबांना भारतरत्न द्या म्हणुन. आधी पद्मश्री पद्मभुषण पद्मविभुषण सारखे पुरस्कार नाही मिळाले तरी चालतील. सरळ भारतरत्नच देउन इतक्या वर्षाची भरपाई करावी. भारत रत्न मिळाल्यावर मग आपण नोबल साठी निवेदन पाठवु. असे ही योगदिन साजरा करायला सुरुवात केलीच आहे. त्यामुळे रामदेवबाबा देशात नाहीतर जगात पोहचणार आहेत.
ही आपणास अतिशय आनंदाची आणि स्तुत्य बाब आहे.
<<राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.>>
बरोबर इथे ही असे बरेच लोक आहे ज्यांच्यामुळे इमेज खराब होत आहे. ते मुद्दामुन सरकारचे समर्थन करत आहेत त्यामुळे एका चांगल्या सरकारचे नुकसान करत आहे आज डॉलरचा भाव ६३ आहे. इतके चांगली कामगिरी होत असताना मुद्दामुन सरकार विरोधात वावड्या उडवत आहेत. मी देखील अश्या लोकांच्या विरोधात आहे.
<< आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ? >>
बरोबर आहे त्यात अडकणार्या अभिनेत्रीचे नाव लगेच मिडीयात दाखवले पण तिच्याबरोबर असणारे इतर पांढर्यापेशीलोकांचे नाव मात्र सांगितले नाही. अरे कुठे चालले आहे. पण आता कणखर सरकार आले आहे. काही दिवस जाउ द्या. नव्याचे नउ दिवस मग बघा एक एक चमत्कार कसे घडतात. आहात कुठे तुम्हाला वाटणारच नाही की हाच काय तो भारत काही दिवसांपुर्वीचा. शेवटी "चांगला योग" जुळुनच आलेला आहे. फक्त काही दिवस द्या. केजरीवालला नाही दिले ते जाउ द्या. त्याच्याकडुन तर पहिल्यादिवसापासुनच मागत होते पण जाउद्या त्याला असे पाहिजे. पण या सरकारला मात्र वेळ द्यावाच लागेल असे मागे लागुन चालणार नाही. समाज जिवंत होत आहे. तुम्ही बघितले नसेल परंतु नविन सरकार समाजात संजीवनी फुंकर मारत आहे आनि हे काम साध्वी ज्योती आणि गिरिराज सिंग, स्वामी आदित्यनाथ आणि साक्षी महाराज यांना दिले आहे. बघा संसद कसे जिवंत झाले आहे त्यांच्या कर्तुत्वाने. याआधी असे दृष्य कधी बघायला मिळाले होते का? अजुन जिवंतपणा बघाच समाजात येईल.
बाकीचे नंतर सध्या इतकेच
बहुतेक मीच एकमेव सुसंबंधित प्रतिक्रिया देणारा
आ नि.
देशमुख
राहून राहून उंदराचा धागा पण
राहून राहून उंदराचा धागा पण आठवतोय!!>>
डीविनितातै, कोणता धागा लिंक द्या पाहु.. मी बहुतेक मिसला वाटतय...:अओ:
अग्निपंख : साबुदाण्याच्या पॉपकॉर्नचे प्रचि टाका बरं!>>>
रीया, प्रचि नाहिये पण पत्ता देउ शकतो
लोटा कॅफे मध्ये आहे..
मला या धाग्याचा विषय भावला
मला या धाग्याचा विषय भावला आहे. कुणीतरी हे मांडायलाच हवे होते, इथे मांडल्याबद्दल धन्यवाद.
वेळेअभावी मला तपशीलात दीर्घ प्रतिसाद देता येत नाहीये, क्षमस्व.
देशमुख,तुमच्या मागे सुसंबंधित
देशमुख,तुमच्या मागे सुसंबंधित प्रतिक्रिया आलि बघा.
आधुनिक स्त्री पुरुष लै
आधुनिक स्त्री पुरुष लै ड्यांबिस !
अग्निपंख, आपल्याला कोणी काही
अग्निपंख, आपल्याला कोणी काही मागितलं तर त्याची पत्ता देऊन बोळवणी करणे हा असला आधुनिकपणा माझ्या पारंपारिक मनाला आवडलेला नाही.
या धाग्यावर आता महारथींचं आगमन झालेलं आहे. तेंव्हा उपवास पॉपकॉर्न आणि हाताची घडी तोंडावर बोट :फिदी
किती हे ragging करन...माझ्या
किती हे ragging करन...माझ्या पारंपारिक मनाला आवडलेल नाही.
अग्निपंख>>इथे लिंक देणे फारच
अग्निपंख>>इथे लिंक देणे फारच अवांतर होईल व मला दिवे प्राप्त होतील या भितीने मी लिंक तुमच्या विपुत टाकतेय
नक्की काय चाललंय?
नक्की काय चाललंय?
लिखाण चाल्लय.
लिखाण चाल्लय.
रीया, माचुपिचुला आधुनिक
रीया, माचुपिचुला आधुनिक म्हणतेस? त्या श्रद्धाआज्जींचा जरातरी विचारमाचिइकाय यातना होतील त्यांच्यामनाला?
मायबोलीवर माचूपिचूच्या कृपेनेच माकाचु हा बीबी अभेद्य ठरला आहे हे मी इथं जाताजाता नोंदवते.
>>मला या धाग्याचा विषय भावला
>>मला या धाग्याचा विषय भावला आहे.
मला पण या धाग्याच्या विषयाची कल्पना भावली आहे.
पण मी लिंबूदा प्रमाणे लिहू शकणार नाही कदाचित.
पारंपरिक गं मुलींनो, मी
पारंपरिक गं मुलींनो, मी पहिल्याच पोस्टीत लिहिलंय हे!
आता मराठी लिखाणाची प्रक्टिसच
आता मराठी लिखाणाची प्रक्टिसच चालली आहे इथे म्हणून इथेच विचारते
मायबोलीवर माचूपिचूच्या कृपेनेच माकाचु हा बीबी अभेद्य ठरला आहे हे मी इथं जाताजाता नोंदवते.
माचूपिचूच्या म्हणजे काय ????
माचूपिचूच्या म्हणजे काय ????
माचूपिचूच्या म्हणजे काय ???? >> माझे प्रमाण चुकले म्हणुन पिठले चुकले
माझे प्रमाण चुकले म्हणुन
माझे प्रमाण चुकले म्हणुन पिठले चुकले>>>
(No subject)
Pages