१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.
सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).
आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.
जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.
आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?
हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.
थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .
या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.
अरे काआआय बोलताय काय
अरे काआआय बोलताय काय तुम्ही..."परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा प्राप्त करुन देण्यासाठी, मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी" कुणी कंबर कसलीय.. अन तूम्ही लुना वर पूना फिरताय..! नियम क्र. ९ वाचलाय ना?
जमेल तशी उत्तरे देण्याचा
जमेल तशी उत्तरे देण्याचा प्रयत्न करते. ( ज्या प्रश्नांना उत्तर दिलेलं नाही त्यांनी नियम वाचावेत).
- उथळता या शब्दाच्या बाबतीत नंदिनी यांना अनुमोदन.
- "अहो हे जर खरं असतं तर रामायण , महाभारत घडलचं नसतं " असं श्री यांचं म्हणणं. आहे. त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे त्यांनी कळवलेलं नाही. रामायण, महाभारत हे ग्रंथ आपल्याला जीवनात उपयोगी पडतात. आपले ७०% संस्कार याच ग्रंथांतून येतात. मग यात चुकीचं काय आढळलं ? कदाचित भिंग घेऊन शोधलं तरच निगेटीव्ह काही सापडू शकेल.
या ग्रंथामुळेच पुरूषांना एकवचनी, एकपत्नी आदर्श समोर ठेवता येतो. वडीलांच्या इच्छेसाठी राज्याचा त्याग करू शकणारा नायक खूप काही शिकवतो. हे ग्रंथ वाचून कुणी रावणाचा आदर्श ठेवतं का ? चांगल्या बरोबर वईटाची ओळख करून देताना काय टाळावे याचं मार्गदर्शन हे ग्रंथ करतात म्हणून ते महान आहेत. आता त्यामुळं त्यात जे चित्रण काळे आहे तेच खरं असं कुणी म्हणत असेल तर काय म्हणणार ? शिवाय जे वाक्य पेस्ट करून संदर्भ दिला आहे त्याचे समर्थन या ग्रंथात कुठे आहे ? उलट परस्त्रीचा मोह धरणा-या रावणाचा शेवट कसा होतो हेच उदाहरण समाजात रूढ होते.
- श्रद्धाकाकू , या वयात सुद्धा आपण सहभाग घेत आहात याबद्दल आभार.
- अदिति काकू, तुम्हाला खरच समजलं नाहीये का ?
<< जुन्याला कुठलाही विचार न
<< जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. >> कदाचित, किंवा बहुतेक, 'जुनं तेंच सोनं' या अट्टाहासावरचीच ही तीव्र प्रतिक्रिया असावी; यथावकाश जुन्यातलं व नव्यातलं फक्त खरं तेंच घ्यायला शिकतीलच लोक. पण दोन्ही बाजूच्या लोकानी आपला अट्टाहास एकतर्फी चालूच ठेवला तर मात्र प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण होवून ही प्रक्रीया लांबणीवरच पडत राहील !
[ या धाग्याच्या खास नियमावलीतल्या कोणत्याही नियमाचा माझ्या या पोस्टमधे भंग झाला नसावा, अशी मीं आशा करतों].
मायबोलीवर स्वागत...
मायबोलीवर स्वागत...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्यांची दशहत एव्हढी आहे की परंपरागत गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं.
------ परंपरागत गोष्टींमधे सायन्स आहे आणि ते समजून न घेता मोडीत निघाले अशी पाच उदाहरणे मिळतील का?
हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे.
------- दिल्लीत निर्भया बलात्काराच्या घटनेत आसुमल दिलेला सल्ला आणि नुकत्याच हरियाणात अटक केलेल्या कुठल्या बाबा/ स्वामी या घटना मला आठवल्या... या दोन्ही विषयान्वर आपले काय मत आहे ?
थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही.
------- थोरान्चा आदर करणे म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे ?
सगळेच प्रतिसाद
सगळेच प्रतिसाद![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
या धाग्याचा विषय म्हणजे मी
या धाग्याचा विषय म्हणजे मी आणि माझ्या ग’फ्रेंड मधील नेहमीचा वादाचा विषय.
मी जुने ते सोने करणारा, सर्व संतवचने मानणारा.. तर ती मॉडर्न भारतीय नारी, तुझे माझ्यावर प्रेम आहे तर सिद्ध करून दाखव तरच विश्वास ठेवेन म्हणनारी..
प्रेम हे सिद्ध करायची नाही तर करायची गोष्ट असते हे कधी समजणार देव जाणे..>>>>. काय खर नाय ऋन्मेषचे.:अरेरे:
मै और मेरी गर्लफ्रेन्ड अक्सर ये बाते करते है
माबो होती क्या होता, माबो ना होती तो क्या होता
मै उसके साथ होता, वो मेरे साथ होती
मै माबो पे न आता, न वो मुझसे कभी दूर होती
वो ये कहेती, वो वो कहती
मै और मेरी गर्लफ्रेन्ड अक्सर ये बाते करते है
ये कहा आगये हम युही नेट नेट करते
मेरे हाथोमे है कीबोर्ड, मेरे मनमे है मेरी गर्लफ्रेन्ड....
रश्मी.. छानेय
रश्मी.. छानेय![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सर्वदेव नमस्कारः केशवं प्रती
सर्वदेव नमस्कारः केशवं प्रती गच्छती
प्रमाणे सर्व धागे शेवटी ऋन्मेष ह्यांच्या अमानुष ताकद असलेल्या पंज्यात लुप्त होत आहेत.
रेखा अभिताब 'सिलसीला' सगळ
रेखा अभिताब 'सिलसीला' सगळ डोळ्यापुढुन गेल.
<< या धाग्याचा विषय म्हणजे मी
<< या धाग्याचा विषय म्हणजे मी आणि माझ्या ग’फ्रेंड मधील नेहमीचा वादाचा विषय.>> यावरून, अगदीं महाभारतातील सुभद्रा व द्रौपदी, कण्व मुनींच्या आश्रमातील शकुंतलेपासून आजपर्यंत 'गर्लफ्रेन्ड' या संकल्पनेबाबत तरी वाद नाहीं असं दिसतंय. हेंहीं नसे थोडकें !![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आवरा रे हे सर्व. माबोवरचे
आवरा रे हे सर्व. माबोवरचे मागे गेलेले चांगले लिखाण शोधून शोधून वाचावे लागतय अश्यामूळे.>>>>>>>>>>> सेनापती +१
जुनं ते सर्वच खोटं असंच
जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. >>> ह्याला अनुमोदन
मोठ्या माणसांना वाकून नमस्कार करणे - हे सध्या जवळजवळ मोडीत निघाल्यासारखे आहे.
आशिर्वाद देणे - हे देखिल कोणी नमस्कारच करत नसल्याने मोडीत निघाले आहे. कोणी केलाच तर सुचत नाही काय आशिर्वाद द्यावा ते.
केवळ वयाने मोठा म्हणून वाकून नमस्कार का करावा ह्या मताची सध्या चलती आहे पण दुसर्या कोणाल नमस्कार करणायाकरता वाकणे म्हणजे आपल्या अहंभावाला वाकवणे असे असावे. वारकरी परंपरेत सरसकट सगळ्यांनी एकेमेकांना नमस्कार करण्याची पद्धत आहे.
कर्म माझ !!!! सकाळी सकाळी हा
कर्म माझ !!!! सकाळी सकाळी हा धागा उघडला
(No subject)
लॉल श्रद्धा आजी आणि नात लॉल
लॉल श्रद्धा आजी आणि नात लॉल![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
मृणाल असेच माझे होतेय. काल
मृणाल असेच माझे होतेय. काल रात्री केवळ उत्सुकता म्हणून ई टिव्हीवर असावा सुन्दर स्वप्नान्चा ही भयानक विकृत मालिका बघीतल्यापासुन माझे डोके ताळ्यावर नाहीये. ते ठिकाणावर आणावे म्हणून माबोवर आले तर प्रत्येक ठिकाणी वादाची धुमश्चक्री चालू आहे.:अरेरे: आता एकदाचे दूपारी ओगी बघीतले की मन प्रसन्न होईल.:फिदी:
हेच ओळखून पूर्वीच्या साधू
हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे.
हे तितकस पटल नाही. पूर्वीच्या काळी स्त्रियांवर अत्याचार होतच होते की. अनेक साहित्यात दिसून येते ते.
अरे हे अजून सुरू च
अरे हे अजून सुरू च का???????????
अरे कंटाळा कसा येत नाही
अरे कंटाळा कसा येत नाही तुम्हाला त्याच त्याच विषयावर वाद-प्रतिवाद करुन. प्रतिसाद देउन.
अशा विषयाचे धागे काय कमी झाले काय आतापर्यंत? काही तर उगीचच पॉपकॉर्न साठी उघडलेले आहेत हे स्पष्ट कळतं. तरी पब्लिक त्याच उत्साहाने तेच तेच मुद्दे - आपलेच मुद्दे कसे बरोबर- मांडत बसतय. आश्चर्य वाटतं.
(No subject)
मला तर भविष्यात 'उथळता'(!)
मला तर भविष्यात 'उथळता'(!) हीच 'आधुनिकता' होण्याची चिन्हं दिसताहेत!
आवरा रे हे सर्व. माबोवरचे
आवरा रे हे सर्व. माबोवरचे मागे गेलेले चांगले लिखाण शोधून शोधून वाचावे लागतय अश्यामूळे.>>>>>>>>>>> सेनापती +१ <<<<<<<< +११११११११११
मला ते उथळता म्हणलं की
मला ते उथळता म्हणलं की काहीतरी (किंवा कोणीतरी) निथळत असल्यासारखं वाटतयं![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अग्निपंख , एवढशे पॉपकॉर्न
अग्निपंख , एवढशे पॉपकॉर्न पुरतील काय![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मी असा विचार करतिय आताच्या
मी असा विचार करतिय आताच्या सितेला अग्निपरिक्षा द्यायला सांगितल तर ती काय करेल??
कदाचित म्हणेल की समानता आहे,
कदाचित म्हणेल की समानता आहे, द्यायचीच परिक्षा तर दोघांनी द्यायची.
वीणाताइ तुम्हाला नेमके काय
वीणाताइ तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे ते खरच कळत नहिये....
कदाचित म्हणेल की समानता आहे,
कदाचित म्हणेल की समानता आहे, द्यायचीच परिक्षा तर दोघांनी द्यायची.
>>>>>
ती म्हणेल, पण तिच्या म्हणण्याने काय होतेय..
परीक्षा हि अनादी काळापासून अनंत काळापर्यंत स्त्रियांच्याच नशिबी आहे!
http://www.patheos.com/blogs/
http://www.patheos.com/blogs/drishtikone/2012/11/sita-abandonment-no-mat...
वीणाताइ तुम्हाला नेमके काय
वीणाताइ तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे ते खरच कळत नहिये....
>>>>
त्यांना या नवीन पिढीला सांगायचे आहे की अक्कल हि ईंटरनेटला गूगाळून नाही तर परंपरांना उगाळून मिळते.
Pages