छोटे टोमॅटो
कांद्याची पात,
गहू, ज्वारी आणि चण्याच्या डाळीचे पिठ
जिरे पावडर, मोहरी, मीठ, तेल, हळद, लिंबू, साखर, तिखटजाळ मिरच्या मस्ट आहेत.
१) पोळ्या करुन झाल्यात की तोच तवा वापरायचा. तव्यावर २ ते ३ चमचे तेल ओतायचे. तवा गरम असतो म्हणून लगेच पंचपुरण टाकायचे. मोहरी उडायला लागली की मग मिरच्या आणि मग टोमॅटो तव्यावर नीट पसरवायचे. आच एकदम मंद करावी किंवा बंद करुन टाकवी. आच जास्त लागली की टोमॅटो फुटु शकतील. म्हणून टोमॅटो च्या सर्व भागाला तेल लागायला हवे. काही टोमॅटो लगेच आकसतील. वरचा पापुद्रा/साल बाहेर निघेल. पण टोमॅटो फुटणार नाही. कालथा वापरायचा. पळी नाही.
पोळ्या करुन झाले की उरलेले पिठ घ्यायचे. त्यातच बेसन, ज्वारीचे पिठ घालायचे.
पात तव्याभर पसरवायची.
२) पात थोडी आकसली की मग त्यात मीठ, जिरे पावडर, लिंबू, साखर हे सर्व घालून हळुवार एकजीव करत रहायचे.. मग तिन्ही पिठे घालायची.
खूप चवदार होते ही भाजी. टोमॅटो आतून इतके गरम होतात की थंडीच्या दिवसात असा गरम घास फार हवाहवासा वाटातो.
खूप सोपी आहे ही कृती. मी सिंक मधले भांडी घासताना हा प्रकार बाजूला सुरु असतो. अगदी ह्याच पद्धतीन कुठलाही इतरही भाज्या सवतळता येईल. उदा हा अजून एकः
कालथा वापरायचा. पळी नाही <<
कालथा वापरायचा. पळी नाही << हे कळल नाही आणि पिठाच काय केल?
अदिति, कालथा सोयीचा पडतो
अदिति, कालथा सोयीचा पडतो भाज्या सवतळायला. पळीमुळे टोमॅटो फुटु शकतात. पिठ घातले की वर.
अरे कालथा म्हणजे काय ते कळले
अरे कालथा म्हणजे काय ते कळले नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुझी पोळी पण मस्त आहे आणि भाजीही.
कालथा म्हणजे सराटा. तो
कालथा म्हणजे सराटा. तो स्टीलचा तव्यावर दिसत आहे ना.. मी मुद्दाम कालथा घेतला आहे फोटोत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा वा
वा वा
कालथा == उलथने छान आहे भाजी
कालथा == उलथने
छान आहे भाजी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे बी तुझ्या दोन्ही पाक कृती
अरे बी तुझ्या दोन्ही पाक कृती मस्त आहेत, पण फोटु लय मोठ्ठाले हाय न बाप्पा. एकदम सारा स्क्रिन व्यापुन टाकतात.:अओ:
छान. दोन्ही भाज्या एकदम मस्त
छान. दोन्ही भाज्या एकदम मस्त कलरफुल दिसताहेत.
कालथा म्हणजे सराटा>> मस्त
कालथा म्हणजे सराटा>> मस्त एक्दम विदर्भातले वाटतयं
फोटु लय मोठ्ठाले हाय न बाप्पा. एकदम सारा स्क्रिन व्यापुन टाकतात.> +१ तो पासुं
आम्ही उलथने म्हणतो . फो
आम्ही उलथने म्हणतो . फो टोतील कलथ्याकडे आत्ता लक्श गेले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी सिंक मधले भांडी घासताना हा
मी सिंक मधले भांडी घासताना हा प्रकार बाजूला सुरु असतो. >> मी पण असाच स्वयंपाक करते. बारीक गॅस वर काही भाजी गरम नाहीतर डोसा धिरडे करत ठेवते व भांडी घासोन घेते. मजेशीर भाजी दिसते आहे. चेरी टोमॅटो मी सलाद मध्येच खाल्ले आहेत.
कालथाला आमच्याकडे काविलता
कालथाला आमच्याकडे काविलता म्हणतात... आमच्याकडे म्हणजे कुठे तेवढे विचारू नका![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
बाकी भाजी बद्दल नो कॉमेंटस, शाकाहार हा माझा प्रांत नाही, पण फोटो मस्तय,
बी मस्तच दिसतेय भाजी... करून
बी मस्तच दिसतेय भाजी... करून पाहीन नक्कीच. आता हिरव्या भाज्या चिकार मिळायला लागल्यात...
बी पिठ सुकेच वापरायचे असेल
बी पिठ सुकेच वापरायचे असेल ना?
छान आहेत भाज्या.
कालथा म्हणजे चपाती उलथण्याचा.
जागू, पिठे भाजून घेतली तर
जागू, पिठे भाजून घेतली तर उत्तमच. मी तशीच घातली. काल सैपाकाला ११ वाजले होते.
सर्वांचे खूप आभार.
नवीन प्रकार दिसतोय. रंग पण
नवीन प्रकार दिसतोय. रंग पण छान आलाय.
चार दिवस कळ काढायची. रविवारी
चार दिवस कळ काढायची.
रविवारी लच्छा पराठा व ही भाजी .
अरे मस्त आहे ही भाजी. आधी
अरे मस्त आहे ही भाजी. आधी पहायला हवी होती. आजच केली पातीची पीठ पेरून भाजी.
यात पिठे भाजून घालण्यापेक्षा मग थालिपिठाची भाजणीच लावायची.
मी बर्याच पीठ पेरलेल्या भाज्यांना बेसन+भाजणी असं लावते.
आणि हो काय तो टम्म फुगलेला फुलका ...व्वा!
मस्त काल सैपाकाला ११ वाजले
मस्त
काल सैपाकाला ११ वाजले होते.>> तरी ही इतका उत्साह.. ग्रेट
छान कृती. करून पाहाणार.
छान कृती. करून पाहाणार.
पीठ न लावलेली पण छान होईल
पीठ न लावलेली पण छान होईल चायनीज स्टाईल!
ही पण मस्त आहे...
कणिक जास्त दिवस ठेवलेली आहे का फ्रिजमध्ये? २-३ दिवसंवर ठेवू नका...काळी वाटतेय वरची साईड म्हणून विचारलं
हो कणिक रविवारच्या दुपारची
हो कणिक रविवारच्या दुपारची होती ती सोमवारच्या रात्री वापरली म्हणून वरची बाजू किंचीत काळी वाटते.
कालथाला आमच्याकडे काविलता
कालथाला आमच्याकडे काविलता म्हणतात > आमच्याकडे ही काविलता च म्हणतात.
भाजी मस्त वाटते आहे.
व्वा.. ही भाजीही कलरफुल
व्वा.. ही भाजीही कलरफुल दिस्तीये, छानै रे रेसिपी , तूच इन्वेंट केलीस की काय?? ग्रेट जॉब
मस्त!
मस्त!
Masta prakar ahe Bee! photos
Masta prakar ahe Bee! photos too good![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
nakki karun baghanar. phulaka masta tamma phuglay, shabbas!
बी, तुमचा तवा कोणता आहे?
बी, तुमचा तवा कोणता आहे?
छ्न दिसतिय भाजी! करायला पण
छ्न दिसतिय भाजी! करायला पण सोप्पी वाटतिय करुन बघनार.
आणि हो काय तो टम्म फुगलेला
आणि हो काय तो टम्म फुगलेला फुलका .>>>> +१ आणि तव्यावर फुलवलेला!सुगरण आहात.
१२ टोमेटो एकावेळी खायचे?![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
१२ आकडा मोठा आहे......पण
१२ आकडा मोठा आहे......पण टोमॅटो छोटुसे आहेत....चालतील खाल्ले तर![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
भाजी मस्त दिसते आहे!
Pages