पालकाची डाळभाजी

Submitted by हर्ट on 15 December, 2014 - 03:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पालक
तुरीची डाळ
चण्याची डाळ
हिरवी किंवा लाल मिरची
छोटे पिल्लू कांदे अथवा मोठे कांदे (पण छोटे बरे)
मोहरी
जिरे
हळद
आमचुर पावडर
गोडा मसाला
गुळ
शेंगदाणे
टोमॅटो
कढीपत्ता
लसून
मीठ
तेल

टिपः ही सर्व व्यंजने प्रमाणबद्ध असे काही नाही. आपापल्या अंदाजानुसार ती घ्यायची.

क्रमवार पाककृती: 

१) एका मोठ्या पातेल्यात मुठभर तुरीची डाळ, मुठभर चण्याची डाळ, मुठभर शेंगदाणे, टोमॅटो, कांदा, कढीपत्ता हे सर्व एकत्रित करुन २० मिनिटे आच अगदी मंद करुन आणि फक्त एकच शिटी होईल ह्याची दक्षता बाळगून हे पातेले कुकरच्या आत ठेवून गॅस वर ठेवावे. २० मिनिटे झाली की आच वाढवून पटकन शिटी काढून गॅस बंद करावा. खालची दोन चित्रं बघा:

पातेले कुकर मधे ठेवण्यापुर्वी

पातेले कुकरमधून बाहेर काढल्यानंतरः

२) आता दुसर्‍या पातेल्यामधे तेल घालून त्यात जिरे मोहरी हळद लसून ह्याची एक फोडणी तयार करावी. बाजूला पालकाची भाजी हवी तशी चिरून घ्यावी.

चिरलेली पालकः

फोडणी:

३) फोडणी जमून आली की त्यात चिरलेली पालक टाकावी. ती गोळाभाजी इतपत शिजली की त्यात आमचुर पावडर, जिरे पावडर, गोडा मसाला, मीठ घालून पळीने सगळे साहित्य एकजीव करावे.

४) ह्या भाजीमधे पहिल्या पातेल्यातील शिजलेली डाळ घालावी. डाळ आणि भाजी एकजीव होईपर्यंत ती ढवळत रहावी. एक दोन उकळ्या आल्या की गॅस बंद करुन टाकावा. भाजी तयार!

वाढणी/प्रमाण: 
तीन चार जनांना पुरेल इतकी भाजी.
अधिक टिपा: 

अशा पद्धतीने भाजी केली की भाजीचा हिरवा रंग कायम तसाच राहतो. भाजी जास्त शिजत नाही की कमीही नाही. जर एकाच पातेल्यात भाजी आणि डाळ एकत्र करुन शिजवली की भाजी खूप शिजून त्यातील ए‍न्झाईम नष्ट होतात.

ह्यात भाजीत : ताक सुद्धा घालता येते. पण खूप चवी एकत्रित करु नये.

घरात जर आमचुर नसेल तर चिंचगुळ चालतो.

गोडा मसाला नसेल तर आलेलसूनाची पेष्ट चालेल. किंवा गरम मसाला चालेल.

माहितीचा स्रोत: 
आरतीच्या विनंतीवरुन.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ऐकले आहे असे पण बेसन नक्की कधी घालावे माहिती नाही. डाळ असतेच ना मग बेसन कशाला असे मला वाटते. बेसन जर तेलात भाजले फोडणीत तर सगळे तेल प्यायले जाईन ना?!

हो...

आमच्याकडे लग्नात डाळभाजी असती ती अशीच केली जाते. मोठे कुकर नसतात १०० ते ५०० माणसांचा सैपाक करायला. मग अशीच पद्धत वापरावी लागते. लग्न जर मे मधे असेल तर कैरीच्या फोडी घालतात. शिजलेल्या कैरीची चव खूप मस्त असते. तो गर.. !!!!

चुक्याची डाळभाजी तर खूपच मस्त होते पण तो पालकासारखा कधीही मिळत नाही. त्यात आंबटपणा अंगचाच असतो. मग काय हवे आणि!!! मला चुका फार फार प्रिय आहे.

हो ठेवतात पण ताजी भाजी तिची सर सुक्या भाजीला येत नाही. माझी बहिण मला सुकवलेल्या भाज्य देते. पण मला त्या गोड लागत नाही.

बी....
तोंपासू एकदम...
विदर्भात फार केल्या जाते आणि आवडिने खाल्ल्या ही जाते....

नाही माझ्यामते सबंध भारतभर ही भाजी केली जाते. निदान सबंध महाराष्ट्रात तरी नक्कीच केली जाते. इतर ठिकाणी आलूपालक खूप चालतो.

मस्तच!... यात चव वाढवायला एक करायचं; भाजी अगदी कमी तेलात अन विना लसणाची करायची. अगदी पानं वाढलीत की जरा जास्त तेलाची चरचरीत फोडणी करून त्यात लसूण लालसर होईलसा परतायचा अन ती फोडणी भाजीत घालायची. वर गरमगरम भाकरी (बाजरीची असेल तर उत्तमच) कच्चा कांदा, मुळ्याच्या शेंगा वर ताक... मस्त मेन्यू!

वा एकेक टिप मस्त मस्त मिळत आहे. अशी कढवलेल्या लसणाची चरचरीत धार आम्ही पिठल्यावर आणि तुरीच्या खिचडीवर घेतो.

यस यस! मस्तच लागतं असं पिठलं अन खिचडी... Happy
मंगला बर्वे म्हणतात की वरून फोडणी दिलेला कुठलाही पदार्थ नेहेमीच जास्त चविष्ट लागतो. ते खरंही आहेच म्हणा!

छानच.
>>>फोडणीत थोड बेसन भाजलं की त्यात भाजी घालते>>> +१. आम्हीही अशीच करतो डाळभाजी.

मस्त तोंडाला पाणी सुटले. पालक मला नुसती आवडत नाही म्हणुन नेहमी अस काहीतरी कराव लागत. नी अशी दाणे आणि चना डाळ कधी टाकुन कधी केली नव्हती. करुन बघेण.

आज केली होती ही भाजी. मस्त मिळून आली होती व चविष्ट झाली होती. कढीपत्ता नव्हता त्यामुळे तो वगळला. हरभरा डाळ न वापरता मूग व तूर डाळ वापरली फक्त. आमचूर पावडरीऐवजी पानात भाजी वाढून घेतल्यावर त्यात लिंबू पिळले. दाणे मस्त टम्म फुलले होते व मऊ शिजले होते चांगले. लसूण व लाल मिरचीची चरचरीत फोडणी वरून घातली. मस्त चव आली.

Pages