किन्वा, मक्याचे दाणे, ब्लॅक बीन्स (भिजवून शिजवलेले किंवा कॅनमधले), अननस, कांदा किंवा कांद्याची पात, केल, टोमॅटो, मीठ, बारीक वाटलेली ताजी/ओली लाल मिरची किंवा मेक्सिकन हॉट सॉस, ऑलिव्ह ऑइल, लसणाच्या पाकळ्या
चौदाव्या ते सोळाव्या शतकात अॅझ्टेक संस्कृती मध्य मेक्सिकोमध्ये अस्तित्वात होती. हे अॅझ्टेक लोकं जिरायती, बागायती आणि घरगुती शेती करत. मका हे मुख्य पीक आणि अवाकाडो, बीन्स, तांबडे भोपळे, रताळी, टोमॅटो, मिरच्यांचे प्रकार आणि राजगिरा ही इतर पिकं. पुढे दिलेल्या पाककृतीचा आणि अॅझ्टेक संस्कृतीचा काही संबंध असावा असं मला तरी वाटत नाही. पण किन्वा बोल बनवण्यासाठी लागणार्या जिन्नसांपैकी बरेच जिन्नस या अॅझ्टेक लोकांच्या रोजच्या आहाराचा भाग असल्यानं आणि शिजवलेला किन्वा शिजवलेल्या राजगिर्यासारखा दिसत असल्यानं या पदार्थाला 'अॅझ्टेक किन्वा बोल' असं जरा 'अॅन्टिक' नाव दिलं गेलं असावं. तर....
१ वाटी (होय, एक वाटी) ऑलिव्ह ऑइल गरम करून त्यात ७-८ लसणाच्या पाकळ्या अख्ख्या टाकाव्यात. साधारण गुलाबी झाल्या की आंच बंद करून कढई तशीच ठेवावी. हे तेल आधीच तयार करून ठेवावं.
साधारण १ कप होईल इतका किंवा खाणार्याच्या भुकेच्या अंदाजाने किन्वा शिजवून घ्यावा. भाज्या चिरून हलक्या हातानं मिसळून ठेवाव्यात, त्यातच बीन्स घालून ठेवावेत. लोखंडी कढईला हलका तेलाचा हात लावून गरम करायला ठेवावी. चांगली कडकडीत तापली की त्यावर पाण्याचा हबका मारून सगळ्या भाज्या एकदम टाकाव्यात आणि भराभर हालवावं. आंच मोठीच असू द्यावी. भाज्यांच्या पाठी शेकून काळसर झाल्या की आधी तयार करून ठेवलेलं तेल १-२ चमचे घालावं, आपल्या कुवतीनुसार हॉट सॉस किंवा वाटून ठेवलेली लाल मिरची, किन्वा आणि मीठ घालावं. या स्टेपला थोडी टोमॅटो प्युरे सुद्धा घालू शकता. सगळं पुन्हा भराभर हालवत अर्धा मिनिट परतावं आणि पानात वाढावं. हेल्दी खाल्ल्याचा गिल्ट येऊ नये म्हणून सोबत टॉर्टिया चिप्स घ्याव्यात.
जेवायला एकापेक्षा जास्त माणसं असतील तर त्या प्रत्येकासाठी नव्यानं किन्वा बोल बनवावा. पहिला घाणा झाला की कढईवर पाण्याचा हबका मारून पुसून घ्यावी. आवडत्या व्यक्तीसाठी सगळ्यात शेवटी बनवावा कारण कढई भरपूर तापलेली असते त्यामुळे भाज्यांना मस्त खरपूस जळकट चव येते.
_भाज्या अजिबात शिजवायच्या नाहीत, कच्च्या राहिल्या पाहिजेत
_भाज्या आपल्या आवडीप्रमाणं कमी-अधिक-वेगळ्या घेऊ शकता
_यात ग्रिल्ड चिकन किंवा श्रिंप पण चांगलं लागत असावं कारण अनेक लोकांना तशी ऑर्डर देताना बघितलं आहे
_हॉट सॉसऐवजी एन्चिलाडा सॉस, Tomatillo Salsa Verde इ. घालू शकता
_लागणारा वेळ ३० मिनिटे दिला आहे कारण 'चला जेवायला जावं' टाइप करून प्रतिसाद सेव्ह करून खुर्चीवरून उठून किन्वा स्टेशनवर पोचून किन्वा बोलची ऑर्डर देऊन पैसे चुकते करून पुन्हा डेस्कपाशी तडमडायला तेवढाच वेळ लागतो
मस्त रेसिपी !! आवडत्या
मस्त रेसिपी !! आवडत्या व्यक्तीसाठीची टिप घरच्यांना देउन झाल्यावर स्वतःसाठी बरी पडेल असे वाटतेय मला , वर सर्वांना घालून मगच आपण खाल्ल्याचा सात्विक तवंग मिरवायला मोकळे!
सात्विक तवंग >>>
सात्विक तवंग >>>
चांगला वाटतो आहे
चांगला वाटतो आहे पदार्थ..
तयार करून ठेवलेलं तेल १-२ चमचे घालावं >>>> तेल एक-दोन चमचेच घालायचं असेल तर वाटीभर का तापवलय आधी ? त्या प्रमाणात कमी लसूण घालून करता येईल ना?
अॅझ्टेक संस्कृती बद्दल अधिक
अॅझ्टेक संस्कृती बद्दल अधिक जाणून घेण्याची भूक लागलेय, किन्वा नक्कीच भागवेल ती भूक. तुमची लिंक एकदम भारी, ती तशी चुकून आहे का मुद्दामून या विचारात पडून विकी वाचायचा विचार यायच्या आत सगळी कृती वाचली.
किन्वा राहिलाय घालायचा. तो घालून नक्की करून बघणार धन्यवाद.
अमितव, कुठे काय कुठे काय?
अमितव, कुठे काय कुठे काय?
पग्या, हो चालेल थोडंच तेल केलेलं. आधी मी जास्त प्रमाणात करण्यासाठी कृती लिहिणार होते म्हणून अंदाजाने वाटीभर लिहिलं.
रेसिपी छान आहे नक्कीच करणार
रेसिपी छान आहे नक्कीच करणार .. पण किन्वा कधी घालायचा ???
तिसर्या स्टेप ला च असेल
टिपा आवडल्या..
मस्त रेसिपी. हल्ली आमच्याकडे
मस्त रेसिपी. हल्ली आमच्याकडे किन्वा चक्क आवडायला लागलाय.
कुवतीनुसार >> हाहाहा ...
कुवतीनुसार >> हाहाहा ... आवडीनुसार घालेन. पचवायची कुवत आणि खायची आवड ह्यांच्या भांडणात बाजू कुणाची घ्यावी ह्याबाबतीत मी कायमच गोंधळलेली असते.
मस्त! करुन बघण्यात येइल. >>
मस्त! करुन बघण्यात येइल.
>> सात्विक तवंग>>
आज कॅफेटेरियात जाउन ऑर्डर कर
आज कॅफेटेरियात जाउन ऑर्डर कर आणि मग खायला लागायच्या आधी फोटो काढ आणि इथे टाक.
ते वर रताळी कलरचं काय आहे?
ते वर रताळी कलरचं काय आहे?
ते वर रताळी कलरचं काय आहे?
ते वर रताळी कलरचं काय आहे? >>> Tortilla chips.
किती त्या किन्व्याच कौतुक. किन्याची खिचडी, salad, पुलावा ह्या repeated पाककृतीसाठी नविन धागा काढण्यापेक्षा मागे डीजेनी काढलेल्या धाग्यावरच receipes add केल्या असत्या तर जास्त सोईसकर झाल असत.
आणि ही वरची comment टिपापा ला तर्गेट करण्यासाठी नाही आहे. हे माझ माबोवरच general observation आहे. बिबटे/बिट्टे same story! एका महीन्यात ४ धागे for more or less same receipe.
आणि सगळ्यात कहर म्हणजे -- > दिनेशदा आपली १ रेसीपी - ३ वेळा प्रस्तूत करतात वेगवेगळी नाव देऊन Ref: अचारी बेन्ग्न!
टिपापा, बिबटे/बिट्टे receipe owners आणि दिनेशदा, तुमचे ईगो दुखावले असतील तर आधीच sorry, मला सगळ्या गोष्ठी well organized आणि lean लागतात--- borderline OCD आहे अस समजा आणि सोडून द्या!
रेसिपी छान आहे .. (पण घरी
रेसिपी छान आहे ..
(पण घरी करणं फारच कठिण दिसतंय .. बाहेरच्यासारखा वॉक/लोखंडी कढई जबरदस्त तापवून भाज्या परतवणं .. त्यातला क्रंच शिल्लक ठेवणं, थोड्याबहुत "चार" करणं आणि परत नुसतं पाणी शिंपडून नुसती पुसून नवनवीन सर्व्हिंग्ज् बनवणं हे घरच्या किचन मध्ये कसं जमवावं ह्याबद्दल काही टिप्स् असत्या तर आवडलं असतं .. ;))
अवांतरः >>
मला सगळ्या गोष्ठी well organized आणि lean लागतात--- borderline OCD आहे अस समजा आणि सोडून द्या!
तुम्हाला ओसीडी आहे पण बाकीच्यांचीही काही कारणं असतील त्याचं काय? एकाच थ्रेडवर लिहीलेल्या शंभर रेसिपी शोधण्यासाठी १०० मिनीटं घालवावीत असं म्हणणं आहे का तुमचं? "well organized आणि lean" म्हणजे नक्की काय? (एव्हढं सगळं करून आयत्या वेळी मायबोलीवर रेसिपी शोधणे हे तसंही जमतच नाही)
>>किती त्या किन्व्याच कौतुक.
>>किती त्या किन्व्याच कौतुक. किन्याची खिचडी, salad, पुलावा ह्या repeated पाककृतीसाठी नविन धागा काढण्यापेक्षा मागे डीजेनी काढलेल्या धाग्यावरच receipes add केल्या असत्या तर जास्त सोईसकर झाल असत.>> बरोबर पण मग एखादी पर्टिक्युलर रेसिपी हवी असेल तेव्हा शोधायला वेळ लागेल त्याचं काय?
पाककृती हवी आहे धाग्यावरही तिथेच नवीन रेसिपी न देता नवीन धाग्यात द्या असं अॅडमीनचं म्हणणं आहे जे वेळ वाचवण्याच्या दृष्टीने योग्यच आहे.
well organized आणि lean
well organized आणि lean लागतात >>> तुमची पोस्ट वाचून तसं वाटलं नाही.
घरच्या किचन मध्ये कसं जमवावं >>> सशल, शक्यतो खिडक्या उघड्या ठेवता येतील अशा सीझनमध्ये कर. घरी दोसे करतेस का? दोशांचे पण एकामागून एक सर्विंग्स केले जातातच की.
सशल, माणसागणिक वेगवेगळी
सशल, माणसागणिक वेगवेगळी सर्विंग्ज बनवणं जरा कटकटीचं होऊ शकेल पण भाज्या चिरून तयार असतील तर होऊ शकेल पटकन.
>> घरी दोसे करतेस का? दोशांचे
>> घरी दोसे करतेस का? दोशांचे पण एकामागून एक सर्विंग्स केले जातातच की.
हो, डोसे होतात ना घरी .. पण प्रत्येक वेळेला तवा पुसून घेतला जात नाही .. हे वरचं प्रकरण घरी करायला बाहेरच्या किचन मध्ये भल्यामोठ्या लोखंडी कढया असतात तशी हवी असं वाटतं .. तसंच त्यांच्या किचन मध्ये लगेच पाठी नळ असतो आणि काही ठिकाणी छोट्या खराट्यासदृश काहितरी .. एक घाणा झाला की लगेच पाणी सोडून कढई साफ करायला .. (एका मॉडेल होममध्ये मी स्टव्ह पाठी नळ असलेलं गॉर्मे किचन बघितलं होतं) .. घरच्या आहे त्या साहित्यात आणि आमच्या अॅमॅच्यर स्किल ने करता येईल .. पण बाहेरच्यासारखा इफेक्ट येणं कठिण वाटतंय असं म्हणायचं आहे ..
>>>>किती त्या किन्व्याच
>>>>किती त्या किन्व्याच कौतुक. किन्याची खिचडी, salad, पुलावा ह्या repeated पाककृतीसाठी नविन धागा काढण्यापेक्षा मागे डीजेनी काढलेल्या धाग्यावरच receipes add केल्या असत्या तर जास्त सोईसकर झाल असत. <<< +१
काही रेसीपीत जराही असा खास बदल नसतो. जरासंच ह्यांव, त्यांव बदललं की माझी रेसीपी, माझे प्रयोग नावाखाली लिहायची. मध्ये वांग, अप्पे, तिळाची वडी, बिबटे-बिट्टे(अलीकडे),
नाहितर रोजचे खिचडी,पराठे,डोसे,सॅलड वगैरे ह्या कॅटगरीतल्या(उगाचच आपण काहीतरी वेगळे असा सोस दाखवायची) असतातच.
विकिमापियातली माहिती इथे कशाला? तसेही काही सबंध नाहीच आहे म्हणताय ना पाकृ आणि संस्कृतीचा.
किंन्वा बिचार्या सॉउथ अमेरीका मधल्या लोकांनाच महाग मिळायला लागलाय....
काही हुशार(?) लोकं किंन्वा खावूनच जगतात असे वाटतय आता त्या भसभसा किंन्वा रेसीप्या पाहून.
हो ते आहे. पाठी नळ, खराटा ()
हो ते आहे. पाठी नळ, खराटा (:खोखो:) एवढी व्यवस्था घरी नसणार.
स्टोव्ह पाठचा नळ पास्ता पॉट
स्टोव्ह पाठचा नळ पास्ता पॉट भरायला असतो म्हणे. किती त्या गृहिणींचा विचार.
विकिमापियातली माहिती इथे
विकिमापियातली माहिती इथे कशाला? तसेही काही सबंध नाहीच आहे म्हणताय ना पाकृ आणि संस्कृतीचा. >>>> किती बाणेदार आपली झंपी ! पण हे आप्ल्या त्या तिकडे पण लिहित जा की गडे दर वेळी.
मै >>किंन्वा बिचार्या सॉउथ
मै
>>किंन्वा बिचार्या सॉउथ अमेरीका मधल्या लोकांनाच महाग मिळायला लागलाय....
काही हुशार(?) लोकं किंन्वा खावूनच जगतात असे वाटतय आता त्या भसभसा किंन्वा रेसीप्या पाहून.>> तुमचे जगभर नातेवाईक आहेत तसेच साऊथ अमेरिकेतही असणार आणि त्यांनीच तुमच्याकडे तक्रार केली असणार हे नक्की.
मस्तं रेस्पी आहे. घराबाहेर
मस्तं रेस्पी आहे.
घराबाहेर ठेवलेल्या ग्रिलच्या शेगडीवर भाज्या व्यवस्थीत जाळता येतील. किंवा हिवाळ्याच्या थंडीत स्मोक डिटेक्टर्सना ओली फडकी बांधून घरात.
मै, स्मोक डिटेक्टर्सना ओली
मै,
स्मोक डिटेक्टर्सना ओली फडकी बांधून >>>
मेक्सिकन व्हर्जन आवडल!
मेक्सिकन व्हर्जन आवडल!
अरेरे! एखादा मोठा शोध
अरेरे! एखादा मोठा शोध लावल्यासारखं सांगताय. घ्या तुमच्या मैत्रीणीकडून उधार ती ही, पण तुम्हाला संधी हवी ना शेवटी.
>>आणि ही वरची comment टिपापा ला तर्गेट करण्यासाठी नाही आह>><<
त्याचे काय एवढं? त्याच त्या ह्या गोष्टीसारखं आहे.
एक पोरगं रस्त्याच्या मधोमध उघड्यावर वेडे वाकडे चाळे, खाणाखुणा, लोकांविषयी काही बाही बोलणे करत असतो. उद्देश हाच की , लोकांनी त्याच्याकडे बघावं. (तसं नसतं तर उघड्यावर कशाला करेल ना?). पण वरचे वर तक्रार सुद्धा हिच की, लोकं त्यालाच बघायला येतात, त्याच्याविषयी बोलतात, त्याचे एकायला येतात. तसा प्रकार असल्याने त्याला काय वाटेल ह्याची चिंता लोकांनी कशाला घ्या.
फुकटची करमणूक करतय समजून सोडायचं
छान आहे रेसिपी आणि फोटो पण.
छान आहे रेसिपी आणि फोटो पण.
lean लागत म्हणजे काय?
lean लागत म्हणजे काय? फाफटपसारा नको असा अर्थ का?
मोठे मोठे शेफ सुद्धा एखाद्या पाककृतीचे व्हेरीएशन वेळोवेळी देत असतात. उदा: ढोकळा शोधलात तर तरला दलालच्याच १५-२० रेसिप्या (खून! खू SSSन!!) आहेत.
तुमचे स्वतःचे असे रेसिपी बुकलेट गुगल ड्राईव्हवर किंवा कुठेही ऑन-लाईन नाही का? आवडली रेसिपी तर मी माझ्या बुकलेटमध्ये टाकते. पदार्थ करताना आपण केलेले बदल किंवा नंतर वाचनात आलेले बदल तिथे नोंदवून ठेवायचे. तेच तेच आहे असे वाटले तर आपले रेसिपी बुकलेट बदलायचं नाही. आपण आपल चोख असल की झाल. बाकी जग मग कितीका ढोलं होईना.
(सॉरी, अवांतर झाल.)
>> हेल्दी खाल्ल्याचा गिल्ट
>> हेल्दी खाल्ल्याचा गिल्ट येऊ नये म्हणून
मस्त रेसिपी.
(असणारच, इसमें केल जो है! :P)
भाज्या सरळ ग्रिल करून रेडी ठेवल्या तर आणखी सोप्पं काम होईल भौतेक. मी बहुधा केल चिप्सच घालेन. तेवढाच अॅडेड क्रंच.
छान आहे रेसीपी. माझ्याकडे
छान आहे रेसीपी. माझ्याकडे जब्री ग्रिल तवा आहे. त्यात मस्त होईल. चिकन घालून करून बघेन.
Pages