नमस्कार,
मी अडीच वर्षांपूर्वी एल. आय. सी. कडून गृहकर्ज घेतले होते. तेंव्हा इंटरेस्ट रेट साधारण १० च्या आसपास होता. आता तो वाढत वाढत ११.२५ झाला आहे. मला एल. आय. सी. ऑफिसमधून असे कळले की माझे कर्ज ज्या योजनेमध्ये मंजूर झाले त्या योजनेनुसार हे बरोबर आहे आणि बाहेर अथवा एल. आय. सी.मध्येच कितीही कमी इंटरेस्ट रेट असला तरी मला हाच रेट असेल.
कर्जाची रक्कम बरीच जास्त असल्याने व इतर काही घरगुती अडचणींमुळे कर्ज डाउन पेमेंट करुन लवकर भरणे ३-४ वर्षात शक्य नाही.
आता माझ्यापुढे तीन पर्याय आहेत.
१. काही पर्याय न शोधता जास्त रेटने कर्जफेड करत रहावे.
२. एल. आय. सी. मधूनच राहिलेल्या कर्जाइतकेच टॉप-अप कर्ज घ्यावे. याचा रेट १०.१०% असेल + प्रोसेसींग फी ०.५%. पण तेही २ वर्षांनी १२ %पर्यंत जाउ शकते असे मला एल. आय. सी. ऑफिसमध्ये सांगितले.
३. एस. बी. आय.ची मॅक्स गेन योजना. याचा रेट १०.१० आहे. पण प्रोसेसींग फी १% + इंशुरन्स मिळून १ लाख जास्त भरावे लागतील.
सगळीकडे आर्थिक नुकसान आहेच याची जाणिव मला आहे. याशिवाय काही दुसरा पर्याय आहे का? किंवा यातच कमी तोट्याचा पर्याय कोणता असेल? यासाठी कोणी सल्लागार असतात का?
धन्यवाद.
सोने मोदुन कर्ज part pay
सोने मोदुन कर्ज part pay कर्तारता येउ शकते .इतक्यात सोन्याहचे भाव फार वाढतील असे वातत नाही.
पर्याय नंबर दोन त्यातल्या
पर्याय नंबर दोन त्यातल्या त्यात बरा वाटतोय. तुम्हाला आधी आहे त्या कर्जापेक्षा अधिक कर्ज हवं आहे का?
माझं गृहकर्ज एच डि एफ सी मध्ये आहे. मध्ञ्म्तरी थोडे पैसे भरून रेट ऑफ इंट कमी करून घेतला होता मी. २ वर्ष तोच होता.
धन्यवाद arc, दक्षिणा. मला
धन्यवाद arc, दक्षिणा.
मला जास्त कर्ज नकोय. राहिलेले कर्ज फेडण्यासाठीच टॉप-अप कर्ज घेणार.
एखादी नामांकीत बँक (उदा.
एखादी नामांकीत बँक (उदा. HDFC) जर गृहकर्जास मंजूरी देत असेल तर त्या प्रॉपर्टीची संबंधीत सगळी कागदपत्रे (ओ.सी. वगैरे) क्लिअर असतील असे गृहीत धरावे का?
एल.आय.सी वाले आहे त्याच
एल.आय.सी वाले आहे त्याच कर्जाचे री प्रोसेसिंग करत नाहीयेत का? बर्याच ठिकाणी असे करतात.. प्रोसेसिंग फी भरून रेट किंव टर्म अल्टर करुन घेणे.
एखादी नामांकीत बँक (उदा.
एखादी नामांकीत बँक (उदा. HDFC) जर गृहकर्जास मंजूरी देत असेल तर त्या प्रॉपर्टीची संबंधीत सगळी कागदपत्रे (ओ.सी. वगैरे) क्लिअर असतील असे गृहीत धरावे का? >>> यासाठी , एसबीआय बेस्ट .
<<माझं गृहकर्ज एच डि एफ सी
<<माझं गृहकर्ज एच डि एफ सी मध्ये आहे. मध्ञ्म्तरी थोडे पैसे भरून रेट ऑफ इंट कमी करून घेतला होता मी. २ वर्ष तोच होता.>>
सेम, मी पण वर्षा तून २ दा तरी एच.डी.एफ. सी मधे चक्कर मारतो यासाठी
एकदा ४ ते ५ हजार भरून स्प्रेड अॅड्जस्ट केला की रेट ऑफ ईंट्रेस्ट तोच रहातो.
एल आय सी स्प्रेड अॅड्जस्ट करून देत नाही का?
गजा.. बहुतेक राष्ट्रीय कृत
गजा.. बहुतेक राष्ट्रीय कृत बँकांकडे सगळे क्लिअर असल्याशिवाय लोन बहुदा मिळतच नाही..
रेट कमी करण्यासाठी एल आय सी
रेट कमी करण्यासाठी एल आय सी उरलेल्या कर्जावर १% चार्जेस लावते. कर्जाची रक्कम बरीच जास्त असल्याने (३० लाखांहून अधिक) तो पर्याय परवडत नाही. आणि एवढे पैसे भरून रेट ११.२५ चा १०.९५ होणार.
असल्या गोष्टी अल्टर बिल्टर
असल्या गोष्टी अल्टर बिल्टर करु नयेत... मुकाट्याने पैसे भरत बसा आणि जे घर घेतले आहे त्यात सुखाने रहा.
स्विच करायचे सगळे पर्याय
स्विच करायचे सगळे पर्याय तपासून बघा... एस.बी.आय. मॅक्स गेन उत्तम आहे.. पण तिकडे स्विच करताना प्रचंड वेळ लागेल त्याची तयारी ठेवा... जाम छळतात डॉक्युमेंट्स साठी..
एखादी खोली भाड्याने देता आली
एखादी खोली भाड्याने देता आली तर पहा.
थोडे सोनेनाणे असेल घरात तर ते विका.
घर हवेच. ते झाले ह्याचे समाधान माना.
एखादा मित्र वा नातेवाईक मदत करु पहात असेल तर ते बघा. पण पैशाचे सोंग आणता येत नाही. अनुभव येईल एक मस्त मागून पाहिले तर.
नवीन जास्त पगारावाली नोकरी शोधा. नक्की मिळेल.
तेच ना ! तीस लाखाचे घर घेऊन
तेच ना ! तीस लाखाचे घर घेऊन हे असल्या दोन चार हजाराच्या डिफ्रन्ससाठी डोकेफोड करत बसायची.. त्यापेक्षा दुसरी एखादी पार्ट टाइम नोकरी धरा.. ईतर पर्याय शोधा.
Alterations in the rate of
Alterations in the rate of interest requires lot of man-hours; please understand the value of your time also while taking all numbers in the consideration.
अजून एक सल्ला देऊ का? माझ्या
अजून एक सल्ला देऊ का? माझ्या एका मित्राने त्याचे नवीन घर भाड्याने दिले आणि स्वतः एक छोटे घर भाड्याने घर घेऊन तिथे राहतो आहे. हे असे दोन तीन वर्ष करतो आहे पण जे भाडे त्याला येते त्यातून त्याचे ई. एम. आय भरायला थोडी तरी मदत होत आहे.
असे अनेक जन मी पाहिले आहे जे नवीन घर भाड्याने देऊन स्वत: मात्र भाड्याच्या घरात राहतात.
आपला असा समज असतो भाडेकरु घर खराब करतात. पण खराब जरी झाले घर तरी रंगरंगोटी करुन ते चांगले करता येते. पैसे जातील पण सध्याचा प्रश्न मिटतो आहे ना ते बघा.
माणसाला चिंता खाऊ नये.
मला जास्त कर्ज नकोय. राहिलेले
मला जास्त कर्ज नकोय. राहिलेले कर्ज फेडण्यासाठीच टॉप-अप कर्ज घेणार. >> पिनी व्हॉट आर यू टॉकिंग? मला कळत नहिये. एल आय सी कडून टॉप अप लोन घेऊन त्यांनाच परत करणार? अहो टॉप अप ला पण इन्ट रेस्ट असतो. आणि त्याचा रिपेमेन्ट पिरियड फक्त १० वर्ष असतो. (निदान एच डि एफ सी त तरी इतकाच आहे) आणि रेऑइं हा होमलोन इतकाच असतो. म्हणजे तुम्ही इकडे ५ लाखाचा खड्डा बुजवायला दुसरीकडे खड्डा करणार, तो ही कधीतरी भरायला लागणारच की.
माझा सल्ला आहे त्यात सुखी रहा. ११% हा काही फार रेट ऑफ इंट आहे असं मला वाटत नाही. काही लोक नॅशनलाईज्स्ड ब्यान्का कर्ज देत नाहीत म्हनून कॉप्रेटिव्ह ब्यान्केतून कर्ज घेऊन अव्वाच्या सव्वा व्याजदर फेडत बसतात. त्या ब्यान्का तर अधीही इ एम आय वाढवतात. शिवाय स्प्रेड पण अॅडज्स्ट करत नाहीत.
एल आय सी लुटते. (आपण फक्त होम
एल आय सी लुटते. (आपण फक्त होम लोन बद्दल बोलतोय)
त्यात त्यांच्याकडे ट्रान्स्परन्सी नावाचा प्रकार कमी आहे.
ऑनलाइन कामं होत नाहीत. स्प्रेड किती राहणार हे आधी लोन अॅग्रीमेन्ट मध्ये लिहिलेलं नसतं.
सरळ लोन स्विच करा. एसबीआय बेस्ट आहे. काहि प्रोसेसिन्ग फी जाइल पण लॉन्ग टर्म सेव्हीन्ग जास्त आहे.
आणि हो लोन वर जो इन्श्युरन्स घेताय तो टर्म आहे. (त्याला खर्च समजु नका. खर्च फक्त प्रोसेसिन्ग फीच असेल)
जर आपलं काही बरं वाइट झालचं तर आपल्या पश्चात मागे राहिलेल्यांना घर मिळेल.
बॅण्केच लोन टर्म इन्श्युरनस्च्या पैशातुन फिटेल. नक्की घ्या.
नैतर ३० लाखाच लोन आणि त्याला कव्हर करणारा टर्म इन्श्युरन्स नाहिये ही गोष्ट घातक आहे.
एसबीआय डोअर स्टेप सर्व्हीस देतात हल्ली.
त्यांच्या नादी लागायचच नसेल तर त्याखालोखाल एचडीएफसी उत्तम.
ट्रान्सपरन्सी आहे. स्प्रेड लोन अग्रीमेन्ट मध्ये लिहिलेलं असतं.
ऑन लाइन तुमच्या लोन अकाउन्ट्चे डिटेल्स बघु शकता.
आता तर मोबाइल अॅप पण आलय.
पिनी मला कळत नहिये. एल आय सी
पिनी मला कळत नहिये. एल आय सी कडून टॉप अप लोन घेऊन त्यांनाच परत करणार? अहो टॉप अप ला पण इन्ट रेस्ट असतो.
>>
बरोबर आहे. तेच मी लिहिले आहे. फक्त फरक आहे -
१. मूळ कर्ज - ११.२५%
२. एल आय सी स्प्रेड अॅड्जस्ट केल्यानंतर - १०.९५% (+१% प्रींसिपलवर चार्जेस )
३. टॉप अप लोन - १०.१०% (०.५% प्रींसिपलवर प्रोसेसिंग फी)
सर्वांना धन्यवाद. घर झाले हा
सर्वांना धन्यवाद.
घर झाले हा आनंद तर आहेच. अक्क्लखाती जमा होणारे पैसे (एल. आय. सी.ची मूळ योजना निट न समजून घेतल्याने) कमी करता येतील का हा विचार आहे.
इथे बर्याच क्षेत्रातील तज्ञ मंडळी आहेत. त्यांच्या सल्ल्यांचा उपयोग होउ शकतो.
इतका घोळ घालण्यापेक्षा झकास
इतका घोळ घालण्यापेक्षा झकास ने सांगितल्याप्रमाणे एस बी आय ला स्विच करा लोन किंवा मग एच डी एफ सी.
साधं गणित करून बघा आणि निर्णय
साधं गणित करून बघा आणि निर्णय घ्या.
मूळ कर्जाचा हप्ता x महिने + कर्ज घेण्यासाठी खर्च केलेले पैसे (प्रोसेसिंग फी वगैरे)
आणि
नवीन व्याजाने कर्जाचा हप्ता x महिने + नवीन कर्ज घेण्यासाठी खर्च केलेले पैसे (प्रोसेसिंग फी वगैरे) + आधी भरलेले हप्ते + जुने कर्ज घेण्यासाठी खर्च केलेले पैसे (प्रोसेसिंग फी वगैरे)
आर बी आय रेट कट्स करण्याची
आर बी आय रेट कट्स करण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट आपोआप कमी होइल.
(इंटरेस्ट रेट्स चा ट्रेंड downwards असणार आहे त्यामुळे दोन वर्षात रेट परत वाढेल हे तुम्हाला त्यांनी कुठल्या बेसिसवर सांगितले कळत नाही)
I will say stay put with existing
एखादी नामांकीत बँक (उदा.
एखादी नामांकीत बँक (उदा. HDFC) जर गृहकर्जास मंजूरी देत असेल तर त्या प्रॉपर्टीची संबंधीत सगळी कागदपत्रे (ओ.सी. वगैरे) क्लिअर असतील असे गृहीत धरावे का? >>> यासाठी , एसबीआय बेस्ट .
<<< ओके. धन्यवाद हिम्स आणि स्वस्ति. HDFC, ICICI इ. चा याबाबतीत काही अनुभव असेल तर जरूर लिहा. धन्यवाद.
You might have opted for
You might have opted for flexible rates
Rates of interest are expected to fall now, so it will even out the tenure of the loan.
.
Some companies give am option of switching between flexible and fixed once. If and when rates fall sufficiently for you, consider that.
While considering switching
While considering switching over to another lender, just don't consider the immediate costs or savings but see the total savings over the loan tenure, with time value of money.
रेट कमी करण्यासाठी एल आय सी
रेट कमी करण्यासाठी एल आय सी उरलेल्या कर्जावर १% चार्जेस लावते. >> मूर्ख पणा ..
इंटरेस्ट रेट साधारण १० च्या आसपास होता. आता तो वाढत वाढत ११.२५ झाला आहे. बाहेर अथवा एल. आय. सी.मध्येच कितीही कमी इंटरेस्ट रेट असला तरी मला हाच रेट असेल. >>> अशी कोणती योजना आहे हि ? तुम्ही स्वत: चेक केले का काही कागदपत्रे ? का त्यांनी सांगितले , तुम्ही ऐकले !!
LIC ला लाथ मारून बाहेर पडा . माझा रेट १०.५० चा 10.25 केला ICICI ने, जेव्हा मी सांगितले आता बाहेर पडतोय तेव्हा. आणि हा रेट change करण्याबद्दल charge फक्त रुपये ८००० भरले मी . हे LIC वाले सरळ लुटत आहेत तुम्हाला. ICICI / HDFC / SBI कडे चेक करा. लोन move करा तिकडे.
You well save0.3% each for so
You well save0.3% each for so many year, although on reducing balance, while 1% is only one time. Switch to fixed rate if you want a certainty in your outgoing, else continue with flexirate. You must havetaken the loan when rates were rising. Else, if you have some extra funds, try part repayment
झकासराव, टर्म इन्शुरंस असेल
झकासराव,
टर्म इन्शुरंस असेल तरी तो जनरली रीमेनिंग प्रिन्सिपल इतकाच असतो. सो पहिल्या दिवशी पासून इन्शुरंसचा हफ्ता शेवट पर्यंत बदलत नाही पण इन्शुरंस कव्हर कमी होत जातं. माझ्या मते वेगळा टर्म इन्शुरंस घ्यावा, लोन बरोबरचा इन्शुरंस घायचा असेल तर नीट समजून उमजून घ्यावा.
मला एल. आय. सी. ऑफिसमध्ये
मला एल. आय. सी. ऑफिसमध्ये सांगितले होते की टॉप-अप लोन १०% चे २ वर्ष फिक्सड आहे पण ते त्यानंतर १२% पर्यंत जाउ शकते. त्यामुळे फक्त गणित मांडून योग्य निर्णय घेता येईल अशी खात्री वाटत नव्हती. तसेच एसबीआय खर्चिक वाटत होते.
सल्ल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. होपफुली योग्य निर्णय घेऊ.
मनस्मी, भरत मयेकर यांनी
मनस्मी, भरत मयेकर यांनी दिलेला सल्ला योग्य आहे. लवकरच व्याज दर कमी होण्याची शक्यता आहे. तुमचाही व्याज दर कमीच होईल. कदाचित तुम्ही कर्ज घेताना Floating Rate चा पर्याय निवडला असेल. त्यामुळे व्याजदर वाढला असेल. पण सार्वत्रिक व्याज दर कमी होताच तुम्हालाही फायदा होईल. वारंवार कर्ज पुरवणारा बदलल्यामुळे फार फरक पडत नाही. बरेचदा असा सल्ला देताना सर्व बाजूनी विचार केला जात नाही. तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याकरिता अजूनही काही माहिती आवश्यक आहे. मी गेली २० वर्ष वित्तीय क्षेत्राशी संबंधित काम करीत आहे. माझा संपर्क #९८५०९३३६५४. तुमची समस्या सोडवण्यास नक्कीच मदत करू शकेन.
Pages