१ १/२ कप फ्रोजन किंवा मिळत असल्यास ताजे वाल-पापडिचे दाणे.
अर्धी जुडी ताजी मेथिची गड्डि (निवडुन धुवुन चिरलेली साधारण २ कप)
१ मोठा कांदा बारिक चिरुन
१ टोमॅटो बारिक चिरुन
१ चमचा आल-लसुन पेस्ट
अर्धा चमचा धणा-जिरा पावडर
कढीपत्त्याची पान-२-३
फोडणिचे साहित्य
तेल्,मिठ
एका भांड्यात तेलाची हिंग्,जिरे,मोहरी ,कढिपत्ता घालुन फोडणी करावी त्यावर आल्-लसुण पेस्ट घालुन लगेच कांदा घालुन परतुन घ्यावा,कांदा गुलाबी झाला की धणा-जिरा पावडर घालुन परतावे त्यावर टोमॅटो घालुन तेल सुटेस्तोवर परतावे मग, हळद्,तिखट्,गरम मसाला घालुन परतावे.
मेथिची पाने घालुन परतावे, मेथिचा रंग जरा बदलला की वालाचे दाणे आणि मिठ घालुन परतावे आणी पाण्याचे झाकण देवुन कमि आचेवर वाल मऊ शिजेस्तोवर ठेवावे.
लागलच तर झाकणातलेच चमचा-दोन चमचे पाणि घालावे.
पोळी किंवा फुलक्याबरोबर खावे.
१) भाजी नुसत्या तेलावर पाणि अजिबात न घालता केली तर जास्त चवदार लागते पण, खाली लागु शकते.
२)मेथीची पाने जास्त वापरली तरी चव छानच येते.
छान आहे. आजच ओले वाल आणले
छान आहे. आजच ओले वाल आणले आणि माबोवर काय मिळते का ते पाहात असताना ही पाकृ सापडली. करुन पाहिन आता.
vaal aaNi methee, chhaan meL
vaal aaNi methee, chhaan meL aahe.
खरे आहे वाल आणि मेथी उत्तम
खरे आहे वाल आणि मेथी उत्तम मेळ आहे. करुन बघेन. धन्यवाद.
हल्ली हे वाल लिल्वा फ्रोजन
हल्ली हे वाल लिल्वा फ्रोजन सेक्शनला दिसतच नाहीत.
फोटो छान दिसतोय. एक भाजी वाढली.
अरे व्वा.. छानच आहे रेसिपी..
अरे व्वा.. छानच आहे रेसिपी.. सोपी आणी टेस्टी , मस्त वाटतंय हे काँबी
तिन वर्शापुर्वी लिहलेल्या
तिन वर्शापुर्वी लिहलेल्या रेसिपीला अचानक उर्जितावस्था आल्याने मलाही परत करायला पाहिजे आता..
साधना! तु ताजे दाणे वापरत असल्याने भा़जी अजुन चवदार लागणार आणी पटकन ही शिजेल... इथले फ्रोजन दाणे शिजायला वेळ घेतात तेव्हा आधी कुकरात घालुन एक शिट्टि केली तरी चालेल
ताजी मेथि नसेल तर कसुरी वापरली तरी चालते, ताजीची चव अर्थात जास्त छान लागते.
हायला एवढी जुनी आहे का कृती.
हायला एवढी जुनी आहे का कृती. फोटो छान दिसतोय. वाल आणि मेथी दोन्ही आवडीचे असल्याने नक्की करेन ही भाजी.
माझी आवड्ती भाजी. पण मी मेथी
माझी आवड्ती भाजी. पण मी मेथी नाही घालत.
रेसीपी वर आणुन ठेवते. मागे
रेसीपी वर आणुन ठेवते. मागे वाचून करायची ठरवलेली. फक्त वाल आणण्या ऐवजी मी ओली तुर आणली आहे. असो. करणार आज.
अरे वा! कर आणी सान्ग आवडली का
अरे वा! कर आणी सान्ग आवडली का ते!
काय छान दिसतेय भाजी! गरमागरम
काय छान दिसतेय भाजी! गरमागरम पोळीबरोबर खायला मजा येईल
मिरची पावडर किन्वा हिरवी
मिरची पावडर किन्वा हिरवी मिरची काहिच घालायच नाही का?