Submitted by सायो on 20 March, 2009 - 13:17
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
१, २ कांदे, ४,५ लसणीच्या पा़कळ्या, धणे-जिरे १/२ टीस्पून प्रत्येकी, ३,४ लाल सुक्या मिरच्या, थोडी चिंच, गूळ, मीठ.
क्रमवार पाककृती:
कांदे सालं काढून गॅसवर भाजून घ्यावेत. धणे-जिरे व सुक्या मिरच्या कोरड्या भाजून घेऊन मिक्सरमध्ये वाटून घ्यावेत. कांदा गार झाल्यावर मिक्सरमधे वाटून घ्यावा. त्याचबरोबर लसणीच्या पाकळ्या, चिंच, गूळ, मीठही काढावे. नंतर सर्व एकत्र करावे.
अधिक टिपा:
ही चटणी भाकरीबरोबर छान लागते.
माहितीचा स्रोत:
आई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा कधी
अरे वा कधी ऐकली पण नव्हती कांद्याची चटणी. मी तुझ्याकडे येइन तेव्हा कर हां कारण माझ्याकडे कांदा भाजायला सोय नाहीये![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
बेसीक
बेसीक प्रश्न, ओव्हनमधे भाजुन होईल का? कारण गॅस नाहीये
आणि बार्बेक्यु करायला ऊन नाहिये
छानच लागते
छानच लागते ही चटणी. मी केलीये.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झुणका, गरम गरम भाकरी अन कांद्याची चटणी... आSहाहाS
जुन्या
जुन्या माबोवर टाकली होती ही रेसिपी. ओव्हनमध्ये मी कधी केली नाहीये.
सिंडे, नक्की![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझा
माझा प्रश्न आधीच बर्याच लोकांनी विचारलाय त्यामुळे मी फक्त 'मम' म्हणते.
गॅसला पर्याय सुचवा.
उन्हाळ्या
उन्हाळ्याची वाट बघा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गॅसला
गॅसला पर्याय :
इलेट्रिक कॉईल वर पापड/फुलके भाजायची जी जाळी मिळते ती ठेवायची. कांदयात लांब दांड्याची सुरी किंवा काहीतरी टोकदार टोचून कांदा त्या जाळीच्या लगत धरायचा. हळूहळू फिरवत सगळ्या बाजूने चांगला भाजला जातोय नं हे बघायचे.
हा का ना का![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गॅस टॉप
गॅस टॉप असेल तर ? मी रस्सा करायचा असेल तर कांद्याच्या फोडी अगदी थेंबभर तेलावर कढईत परतुन घेते. पण भाजल्याची चव ती नाहीच लागत.
पन्ना
पन्ना काकु, आहो ते कॉईलच्या रेंजवर जमते ओ. मी वांगी तशीच भाजायचे आधी. पण आता माझ्याकडे ग्लासटॉप रेंज आहे![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
ओवन मधे
ओवन मधे करुन बघ. ब्रॉईल कर, बेक नको. जरा लक्ष ठेवावं लागेल.
यो सायो!
यो सायो! क्या चटनी हैं!
आता पंचचटणीचं व्रत घेतल्यासारखं कारल्यानंतर हीच चटणी करून बघते. (मग पुढे दोडक्याची, गिलक्यांची, तोंडल्याची आणि कर्ट्युल्याची
)
मिनोती ग्लासटॉपवर सुध्दा फुलक्यांची जाळी ठेवून पापडापासून कांद्यापर्यंत काय वाट्टेल ते भाजता येतं.
मी कांदे /
मी कांदे / वांगे काहीही भाजायचे असले तर त्याला अॅल्युमिनियम फॉईल गुंडाळून , माझ्या सिरॅमिक च्या रेंजवर भाजते . अगदी गॅसवर भाजल्यासारखे लागते .
सायो, ही चटणी जुन्या मायबोलीवर वाचून मी अनेकदा केलीये . क्लास लागते , रेसिपीसाठी थँक्स .
कांदा साले
कांदा साले न काढता भाजला तर जास्त चांगले ना ? नाहीतरी वरची साल जळूनच जाते. असा भाजलेला कांदा नूसता खायलाही खूप छान लागतो.
करेक्ट
करेक्ट दिनेशदा . मी खरं तर कांदा साल न काढताच भाजते . वर सायो ने साल काढून भाजायचे लिहिलेय , हे मी वाचले नाही .
सायो मस्त झाली ही चटणी. माझी
सायो मस्त झाली ही चटणी. माझी पण आई करते, मी नव्हती केली कधी. तुझी रेसीपी वाचून बरेच दिवस मनात होतं करायची...आज केली...अहाहा..मन तृप्त झालं अगदी.
फक्त एक बदल म्हणजे आई सुकं खोबर पण असच गॅसवर भाजून टाकते.
मिती, गेल्या आठवड्यातल्या
मिती, गेल्या आठवड्यातल्या गटगला केलेली ही चटणी. माझी आई गॅसवर कांदा अगदी खरपूर भाजत नाही त्यामुळे तिच्या चटणीचा रंग लालसर येतो. माझ्या चटणीचा काळसर आलेला. तो बदल ज्याने त्याने अवडीनुसार करावा. खोबरं घालून केली नाहीये कधी. पुढच्या वेळी करेन.
सायो, आईने सांगितलं मला की
सायो, आईने सांगितलं मला की सुकं खोबरं भाजून घातलं की खमंग होते आणखीन म्हणून. पुढच्यावेळेस मी ही अॅडिशन करणार आहे ही.
सायो करुन बघेन हि. चिंच, गूळ
सायो करुन बघेन हि. चिंच, गूळ म्हणजे मस्त आंबट गोड लागत असणार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सावली, स्टेप बाय स्टेप जा
सावली, स्टेप बाय स्टेप जा बघू. आधी तांदळाची भाकरी या बीबीवर जावं लागतं त्यासाठी, त्यानंतर एखादी पालेभाजीची रेसिपी शोध आणि मग ह्या बीबीवर ये.
पालेभाजी = पालक ग
पालेभाजी = पालक ग इथे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भाकरिची जरा मारामारिच होते माझि.
हि चटणि सोपी वाटतेय ना. चुकल तर लग्गेच सायोला विचारता येईल
सावली अमृताच्या रेसिपीने
सावली अमृताच्या रेसिपीने तांदळाची भाकरी करून बघ..एकदम सोपी.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
पालेभाजी पालक तर छान लागेलच पण कांद्याच्या पातीची पिठ पेरून पण छान लागेल. किंवा पिठले/भरीत.आणि ही चटणी.दोन घास अंमळ जास्तच जातात मग.
रच्याकने:या चटणी ला खमंग फोडणी दिली तरी मस्त लागते एकदम.
सावली, तुझी विपु बघ ग सवडीने.
सावली, तुझी विपु बघ ग सवडीने.
सह्हीच आणि सोप्पी वाटतेय.
सह्हीच आणि सोप्पी वाटतेय. करुन बघते उद्याच!
खाल्लीये मी अशी चटणी एकदा,
खाल्लीये मी अशी चटणी एकदा, मस्त लागते, बरं झालं रेसिपी मिळाली. नक्की करणार.
कांदे कितपत भाजायचे ?? वरचे
कांदे कितपत भाजायचे ?? वरचे बाजु पुर्ण काळे कराय्चे का ?? आनि तसेच फिरवायचे मिक्सीमधुन ??
हो, साल जळलं पाहिजे आणि तसेच
हो, साल जळलं पाहिजे आणि तसेच वाटायचे मिक्सरला. मस्त खमंग चव येते त्यामुळे.
वोक्के करुन च पाहते आज.
वोक्के
करुन च पाहते आज.
तसेच वाटायचे मिक्सरला << तसेच
तसेच वाटायचे मिक्सरला << तसेच म्हणजे विथ साल ना? लसुण कच्चेच वाटायचे का?
अदिति, मी कांद्याचं जाडं साल
अदिति, मी कांद्याचं जाडं साल काढून टाकते आणि मग भाजते. लसूण कच्चीच.
सायो रेसिपी मस्तच ..
सायो रेसिपी मस्तच ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)