१.भाज्या -
कांदा - १ मोठा बारीक चिरून
ब्रोकोली
फ्लॉवरचे तुरे बारीक चिरून
कोबी - पातळ उभा चिरून
बटाटा - १ लहान बारीक चिरून
आणखी ज्या आवडतील त्या आणि उपलब्ध असतील त्या भाज्या.
२.नूडल्स - या मात्र अंदाजे, म्हणजे सूप व्हायला हवेय, घट्ट नूडल्स नाही.
३.मिरपूड - १ चमचा
४. चवीनुसार मीठ
५. पाणी - ४ पेले
६.आले आणि लसूण - १ मोठा चमचा अगदी बारीक किसून
१.एका मोठ्या भांड्यात सगळ्या भाज्या नाममात्र तेलावर परतून घ्याव्यात. आच मंद ठेवावी. मीठ,मिरपूड आणि आले लसूण टाकून २ -३ वाफा काढाव्यात.
२.नूडल्स टाकून परतून घ्यावे.
३.पाणी टाकून शिजू द्यावे. नूडल्स शिजल्या की पाणी आटू लागते, लक्ष ठेवावे नाहीतर घट्ट गोळा झाला की सूप हातचे जाईल.
४. गरमागरम सूप वाडग्यात काढावे आणि भुरका मारत गट्टम करावे
सूप गरमच प्यावे. गरम सूप घशातून खाली उतरताना जे काही वाटतं ते निव्वळ अनुभवण्याची गोष्ट आहे.
आवडत असेल तर वरून थोडेसे घट्ट क्रीम घालावे. मी घालत नाही कारण त्याने सूपची मूळ चव अफेक्ट होते असं मला वाटतं.
मस्त वाटतय प्रकरण ! फोटो ?
मस्त वाटतय प्रकरण ! फोटो ?
धन्यवाद जाई. हा फोटो :
धन्यवाद जाई.
हा फोटो :
मस्तच... , तों.पा.सु.
मस्तच... , तों.पा.सु.
छान !
छान !
साक्षी, मॉनिटरमधून वाफा निघत
साक्षी, मॉनिटरमधून वाफा निघत आहेत
मस्तं लागतंय. मी करून प्यायले
मस्तं लागतंय.
मी करून प्यायले (खाल्लं म्हणावं का?)
नूडल्सचा गोळा नको होता म्हणून पास्ता अर्धवट उकडून मग या सूपाला उकळी आल्यावर त्यात घातला.
मुलांनाही चव आवडली.
रेसिपीबद्दल धन्यवाद.
मुझमे और तुझमें फर्क क्या..
मुझमे और तुझमें फर्क क्या..
फरक- १. आयते मसाला क्यूब
फरक-
१. आयते मसाला क्यूब वापरलेले नाहीत. मॅगी मसालाक्यूब थोडं केमिकलसारखं लागतं (मलातरी) आणि त्यात एम एस जी असेल अशी शंका आहे. एकदा पाकिट आणून पाहिलं पाहिजे.
२. यात सूपाला आलेला दाटपणा बटाटा आणि नूडल्स सुटताना आलेला स्टार्च यांचाच आहे , कॉर्नफ्लॉवर वापरलेले नाही.
३. यात नूडल्स भाज्यांमध्ये परतून मग पाणी टाकून उकळायच्यात त्यात आधी बोलमध्ये शिजवलेल्या नूडल्स घालून मग वर तय्यार सूप ओतायचंय.
या आणि त्या सूपाच्या चवीत आणि कन्सिस्टन्सीमध्ये खूप फरक आहे.
धन्यवाद सर्वांना साक्षी,
धन्यवाद सर्वांना
साक्षी, मॉनिटरमधून वाफा निघत आहेत>>>> चिन्नु
साती सगळ्याच फरकांसाठी धन्यवाद आणि फरकांना +१
यम्मी झालं सूप! थँक्स सा
यम्मी झालं सूप! थँक्स सा
क्लास आहे सूप, ह्यातल्या
क्लास आहे सूप, ह्यातल्या भाज्या, नूडल्स, मिरपूड अन आले लसूण पेस्ट वजा केल्यास आमचे अतिशय आवडते सूप तयार होईल, त्याला आम्ही लाडाने, अरुणाचल फॉरवर्ड सूप म्हणतो, साला सहीत गर चिरून घ्यायचा बटाट्याचा त्यात चवीनुसार मीठ अन फुकट उपलब्ध चिल्ड वॉटर घालायचे अन ते गरगाट 2 तास उकळून मग एका दमात एक मग्गा ह्या हिशेबाने पिऊन टाकायचे??
यम्मी.
यम्मी.
कॉर्नफ्लोर न घालताही छान चव
कॉर्नफ्लोर न घालताही छान चव आणि टेक्स्चर आले होते सूपचे. नेहमीच्या यशस्वी सूप भाज्याच घातल्या होत्या आणि राईस नूडल्स वापरले. त्याने सूप थंड झाल्यावरही टेक्स्चर बदलले नाही. तसही थोडेसेच उरले होते आणि लक्षही फार द्यावे लागले नाही.
यम्मी दिसतय अगदी.
यम्मी दिसतय अगदी.