अंडी - २
सोया सॉस ( अधिक टिपा पहा) - १ टीस्पुन
मिरिन - २/३ टिस्पुन ( मिरिन इथे भारतात मिळत नाही त्यामुळे त्याऐवजी पाणी - २/३ टिस्पुन + साखर - अर्धा ते एक टीस्पुन ( चवीनुसार ) घ्यावी.
तेल - थोडेसे
ऑम्लेटचा चौकोनी / आयताकृती तवा ( असल्यास) नाहीतर छोटा गोल पसरट तवा.
तवा सपाटच हवा ( खोलगट असलेला चालणार नाही) गोल तव्यावर करणे थोडे त्रासदायक होईल, प्रयत्न करुन पहायला हरकत नाही.
तामागो म्हणजे अंडे, याकी म्हणजे ग्रील्ड. पदार्थाच्या नावात ग्रील्ड असले तरी हा ग्रील करायचा पदार्थ नाही.
वरिल सर्व पदार्थ एका भांड्यात काढुन घेऊन हलक्या हाताने फेटा. साखर विरघळली पाहिजे.
सगळे व्यवस्थित मिक्स झाले की गॅसवर तवा तापत ठेवा. गॅस अगदी बारिक ठेवा..
तव्यावर थोडे तेल घालुन ते सर्व बाजुना पसरववुन घ्या. चौकोनी तवा असल्यास कोपर्यातही पसरवा.
१ - तवा तापल्यावर अंड्याच्या मिश्रणातले अगदी थोडे मिश्रण तव्यावर टाकुन तवा हलवुन सगळीकडे पटापट पसरवुन घ्या.
२ - अगदी पातळ थर तयार झाला पाहीजे. थर लगेच्च खालुन शिजेल , तेव्हा वरचा भाग ओला /अर्ध कच्चा असतानाच एका पसरट उलथण्याने हळुहळू त्या थराची गुंडाळी करा.
३ - ही गुंडाळी तव्याच्या डाव्या ( किंवा कोणत्याही) बाजुला सरकवुन ठेवा
४. आता पुन्हा एकदा आधीसारखाच पातळ थर स्टेप १ आणि २ करा. मात्र यावेळी एकाबाजुला ठेवलेली गुंडाळी घेऊन त्यावर नविन थर हळुहळू गुंडाळा.
५- या १,२, ३ स्टेप अजुन दोन / तीनदा ( अंड्याचे मिश्रण संपेपर्यंत) रिपीट करा
६- सगळे मिश्रण संपुन जाड गुंडाळी झाली की एखाद दोन मिनीटाने तव्यावरुन हलकेच काढुन थंड व्हायला ताटात ठेवा.
७ - साधारण ५ मिनीटाने त्याच्या वड्या कापुन खायला द्या.
डब्यात द्यायला किंवा ब्रेकफास्टला छान पदार्थ आहे.
- तवा पसरटच घ्या. नाहीतर पातळ थर करणे शक्य नाही.
- गॅस अगदी बारिक ठेवा.
- पहिल्य प्रयत्नात जमले नाही तरी एखाद दोन वेळा केल्यावर जमेल ( मलाही जमले म्हणजे..).
- माझ्या फोटोत अंड्याचे थर तितकेसे पातळ नाहीत. सुगरण माणसांना इथे अति पातळ थर करुन आपले स्किल्स दाखवायची संधी आहे. मुळ पदार्थात शक्य तितके पातळ थरच हवेत.
- सोयासॉस बद्दल -
आपल्याकडे सर्रास जो सोयासॉस मिळतो तो चिनी सोयासॉस असतो. त्याचा वास किंचीत आंबट, तीव्र आणि रसायनांसारखा येतो आणि ते लिक्विड पाण्यापेक्षा थोडे घट्ट वाटते. शिवाय याचा रंग खुप गडद असतो. सोसासॉस बनवणे ही थोडी मोठी प्रक्रीया आहे आणि त्याला वेळ लागतो. त्यामुळे कंपन्या रसायने आणि एम एस जी वापरुन ती प्रक्रीया कमी वेळात करतात आणि चायनीज सोयासॉस बनतो. याची चव जास्त खारट आणि कृत्रिम वाटते.
जपानी सोयासॉस हा आंबवण्याच्या प्रक्रीयेतुन तयार केलेला असतो. हा सॉस अगदी पातळ प्रवाही असुन रंगही फिकट असतो. याचा वास घेतल्यास गोडसर, हलका आणि रसना खुलवणारा वाटतो ( उमामी ) यात रसायने / एम एस जी नसतात. याची चव अर्थात उजवी आहे.
मी ही माहिती शोधायला का गेले तर भारतात परत आल्यावर इथला सोयासॉस वापरुन दोन तीन वेळा जपानी पदार्थ करुन पाहिले आणि ते खराब लागले/ हवी ती चव आली नाही. नंतर एकदा गोदरेज नेचर्स स्टोर मधे किक्कोमान सोयु ( सो.सॉ) ची बा टली मिळाली ती घेऊन आले. या सो.सॉ ची चव जपानीच होती म्हणुन शोधुन यातला फरक वाचला. याबद्दल अधिक माहीती वाचायची असल्यास इथे पहा. यात दिलेले सेन्सरी चेक मी घरी करुन पाहिले आणि घरात असलेली जुनी सोयासॉसची बाटली फेकुन दिली.
ईंटरेस्टिंग! नक्की करून
ईंटरेस्टिंग! नक्की करून बघणार आणि सोया सॉसच्या माहितीबद्दल खूप खूप आभार.
पर्सनली मला अंडे आवडत नाही पण
पर्सनली मला अंडे आवडत नाही पण भाची साठी करुन पाहील नक्की ..
सावली मस्त फोटो .. रेसिपीही
सावली मस्त फोटो .. रेसिपीही इंटरेस्टींग आहे .. एकदा आहे त्या तव्यावर ट्राय करून बघायला हवं ..
मस्त रेसेपी. हे करून बघणार.
मस्त रेसेपी. हे करून बघणार.
Pages