अव्यवहार्य तसेच कालबाह्य कायदे ही भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण करतात. पुण्यात चालू झालेली हेल्मेट सक्ती चा नियम हे त्याचे एक उदाहरण आहे काही सेलिब्रिटी हेल्मेट जागृती साठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे होणार्या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करणे अयोग्य नाही. पण विरोध आहे तो सक्तीला आहे हेल्मेटला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हेल्मेट घातले नाही तर त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत. ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय? कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत? रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. एखाद्या शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ असताना त्याकडे लक्ष न देता जर पोलिसांनी उचल्यांविरुद्ध मोहीम राबवली तर त्यांच्या हेतु विषयी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. कुठलाही कायदा करताना त्याला काही वैधता असली पाहिजे. गरजे नुसार त्याचे नूतनीकरण झाले पाहिजे वा रद्द झाला पाहिजे. हेल्मेटची शिफारस करा पण सक्ती नको.
हेल्मेटसक्ती
Submitted by प्रकाश घाटपांडे on 12 November, 2014 - 22:55
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मै, __/\__
मै,
__/\__
माझ्या ओम्नीतून
माझ्या ओम्नीतून दिल्लीप्रवासाच्या धाग्यावर आणि या धाग्यावर देखील अनेकांनी ओम्नी असुरक्षित आहे असे विधान केले आहे. त्यांनी सुद्धा ओम्नी किती चालविली असेल याची मला शंकाच आहे.
>>> अहो, ती असुरक्षित आहे म्हणून चालवली नाही. कारण म्हणूनच ती मुळातच विकतच घेतली नाही.
चेतन , तुमच्या गाडीची टेस्ट
चेतन , तुमच्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह करायला मिळेल का? तुम्ही गाडी मला सोबत घेऊन स्वतः पण चालवाल का?
खुपच जेन्युईन प्रॉब्लेम दिसतोय सीटबेल्टचा.तुमची केस स्टडी करायला आवडेल. मारुतीच्या लोकांनीपण केलेली केस स्टडी तुम्ही त्यांना माघु शकता आणि ती जर पहायला मिळाले तर अजुनच बरे होईल.
मी ओम्नी गाडी बर्याच वेळेस चालवलेली आहे.
maitreyee >> मस्तच चित्र .
maitreyee >> मस्तच चित्र .
बेफिकिर>>+ १
चेतनजी (हा वाद तुम्हालाच धन्य, मी कंटाळलो.)>> फायनली, मी सुद्धा कंटाळलेच तुम्हाला सीट्बेल्ट सक्ती विषयी समजावुन.
प्रतिसाद थोडक्यात लिहा लोकहो,
प्रतिसाद थोडक्यात लिहा लोकहो, म्हणजे पटापट वाचता येतील.... दरवेळेस २५-५० नवीन असतायत
@ -सुशांत- << चेतन ,
@ -सुशांत-
<<
चेतन , तुमच्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह करायला मिळेल का? तुम्ही गाडी मला सोबत घेऊन स्वतः पण चालवाल का?
खुपच जेन्युईन प्रॉब्लेम दिसतोय सीटबेल्टचा.तुमची केस स्टडी करायला आवडेल. मारुतीच्या लोकांनीपण केलेली केस स्टडी तुम्ही त्यांना माघु शकता आणि ती जर पहायला मिळाले तर अजुनच बरे होईल.
मी ओम्नी गाडी बर्याच वेळेस चालवलेली आहे. >>
याला म्हणतात मुद्याचं आणि स्पष्ट विधान. मी तयार आहे. केस स्टडीची जी काय निरीक्षणे / निष्कर्ष / अनुमाने असतील ती इथे मायबोलीवर टाकू. पाहिजे तर व्हिडीयो देखील घेऊन अपलोड करू. रिकामी वादावादी नकोच.
माझा पत्ता:-
भूखंड क्रमांक ८६, पेठ क्रमांक २५, पिंपरी-चिंचवड नवनगर, निगडी, पुणे - ४११०४४.
जवळची खूण - कॉसमॉस बँकेपासून बधिर मूक विद्यालयाला जोडणार्या रस्त्यावर, ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या मनोहर सभागृह प्रवेशद्वारापाशी, वसंतबहार बंगल्याच्या समोर असलेल्या ऑर्किड व्हिला बंगल्याच्या पाठीमागे. मयुरपंखी रंगाची ओम्नी उभी असलेली दिसेलच. घर सापडायला अडचण होणार नाही. काही शंका असल्यास मला भ्रमणध्वनी क्रमांक ०९५५२०७७६१५ वर संपर्क साधणे.
धन्यवाद.
चेतन, मारुतीच्या लोकांनी
चेतन, मारुतीच्या लोकांनी केलेल्या केस स्टडीचे काही डॉक्युमेंट आहेत का तुमच्या कड?
सॉरी, सुशांत असे काही
सॉरी, सुशांत असे काही कागदपत्र माझ्याकडे नाहीत. हमी कालावधी (वॉरंटी पिरीयड - चार वर्षे होता) मध्ये त्यांनी एकदा मला सीटबेल्ट कुठलेही अतिरिक्त मुल्य न घेता अगदी मोफत आणि विनाखळखळ बदलून दिला होता, त्यामुळे मीही त्यांच्याकडून काही कागदपत्रे मागितली नाहीत. अर्थात त्यांच्या सिस्टीममध्ये ह्याची नोंद असणारच.
चेतन आपण लवकरच भेटुयात....
चेतन आपण लवकरच भेटुयात....
नक्कीच सुशांत. मी वाट पाहीन.
नक्कीच सुशांत. मी वाट पाहीन. सहकार्याबद्दल धन्यवाद.
हायला इक्डे अजून ओम्नीचंच
हायला इक्डे अजून ओम्नीचंच सुरू आहे...
चित्र लय भारी..:हहगलो:
संपादन
संपादन
मागे कुनाच्या तरी पोस्ट मधे
मागे कुनाच्या तरी पोस्ट मधे वाचले होते पुण्यात घरटी एखादा तरी माणुस बाहेर देशी असतो म्ह्नुन.
भोंगळ विधान माझ्या घरात फारेणला कुणीच न्हाय . आमच्या आख्ख्या सुसायटीत कोणीच न्हाय.
अय हुडा, तू कुठच सापडेना
अय हुडा, तू कुठच सापडेना म्हणून इथं आलो बाबा तुला शोधत. ते फारेणला कोन हाय कोन नाय ते असून देत पण तुझा इमेल कॉम्प्रोमाईज झालाय ते बघ. ते पार फारेण ला भलभलते इमेल पाठवतय तुझ्या अकाऊंटहून. मला कालच इमेल आला.
(पोस्ट विषयाला धरुन नाही म्हणून क्षमस्व पण निरोप द्यायला म्हणून आलो, धन्यवाद)
संपादन
संपादन
मराठी भाषा माझी mother tongue
मराठी भाषा माझी mother tongue नाहीय मी ती घरिच शिकले आहे मला माहित आहे अशुद्ध आहे.
>>
बरं मग?
इथे अनेक आहेत ज्यांची मातृभाषा मराठी नाही
ते असोच!
मागे कुनाच्या तरी पोस्ट मधे वाचले होते पुण्यात घरटी एखादा तरी माणुस बाहेर देशी असतो म्ह्नुन.
>>
माझ्या घरात कोणीही नाही
विषयांतर होत असल्या मुळे
विषयांतर होत असल्या मुळे पोस्ट संपादन केल्या आहेत.
हा धागा हॅम्लेट चा आहे
हा धागा हॅम्लेट चा आहे बाबानू, कशाला परत परत o मीनीच्या फालतू गप्पा मारताय . फोन नं घ्या आणि बसा गप्पा मारत काय मारायच्या आहेत.
हेल्मेट सक्ती ला विरोध केलाच
हेल्मेट सक्ती ला विरोध केलाच पाहिजे
म्हातारी मेल्याचे दु:ख नसते , पण काळ सोकावतो त्याचे काय , उद्या नविन नविन सक्त्यांना सामोरे जावे लागेल. तसेही पुणेकर कोणाच्या बापाला ऐकत नाहीत. ज्याला त्याला आपल्या जीवाची काळजी आहे , ज्याला वाटते तो घालेन हेल्मेट, मी पुण्यात गेली १० वर्षे गाडी चालवतोय. कधीही हेल्मेटची गरज वाटली नाही. ( पुणे शहरापुरते बोलतो आहे उगाच आपले हायवेचे वाईट अनुभव सांगून सक्तीला अनुमोदन देऊ नये.)
फालतू गप्पा मारताय... याच्या
फालतू गप्पा मारताय...
याच्या आधी काय लई म्हण्जी लईच भारी गप्पा चालु व्हत्या नाही का या धाग्यावर
(No subject)
सुरक्षा नावाचा मिथुन
सुरक्षा नावाचा मिथुन साहेबांचा अतर्क्य अविश्वसनिय चित्रपट आहे. त्यात इतकी सुरक्षा दाखवली आहे की कार देखील लोक हेल्मेट घालुन चालवत आहे. . इथे तर फक्त बाईक वर हेल्मेट घालायला सांगत आहेत
या मूर्खांच्या कुठे नादी
या मूर्खांच्या कुठे नादी लागता? चौकात पोलीसाने अडवल्यावर हे थोडेच दण्ड भरायला येनार आहेत की यांचे आर्ग्युमेन्ट तिथे उपयोगी पडणार आहे? त्यो म्हननार " या गोष्टी साहेबापुढे करा राव चौकीवरी......"
त्या येळंला ह्ये आपले तिकडे चार चाकीत फिरत असतील.....
आपला सूळ आपणच वाहावा हे बरे... क्वाय?
>>>> अव्यवहार्य तसेच कालबाह्य
>>>> अव्यवहार्य तसेच कालबाह्य कायदे ही भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण करतात. <<<< मान्य
>>>>पुण्यात चालू झालेली हेल्मेट सक्ती चा नियम हे त्याचे एक उदाहरण आहे <<<< वरील वाक्याच्या अनुषंगाने हे पूर्णतः अमान्य.
>>>> काही सेलिब्रिटी हेल्मेट जागृती साठी प्रयत्न करताना दिसतात. <<<< चांगली गोष्ट आहे, पण त्यामुळे हेच सिद्ध होते की आजही लोक स्वतःच्या अक्कलेने विचार करण्या ऐवजी "सेलिब्रिटी" च्या मागे धावतात. असो.
>>>> त्यामुळे होणार्या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करणे अयोग्य नाही. <<<< धन्यवाद.
>>>> पण विरोध आहे तो सक्तीला आहे हेल्मेटला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. <<<< सक्ति नसेल तर या जगात कोणतीच गोष्ट पाळली जाणार नाही. निसर्गालाही विनासक्ति मान्य नाही.
>>>> हेल्मेट घातले नाही तर त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. <<<< ही तुलनाच अनाठाई आहे. व्यक्तिच्या सुरक्षिततेचा संबंध एकट्या व्यक्तिपुरता नसून त्यावर अवलंबुन असलेल्या प्रत्येक घटकाचाही विचार होणे अपेक्षित आहे. डोके आपटून फुटून तत्काळ मरण आल्यावर कुटुंबातील उरलेली माणसे कशी बेवारस होतात त्याची असंख्य उदाहरणे आहेत. व एकूण रस्ते अपघातात गेल्या तीन पुण्यात वर्षात मरण पावलेल्यात हेल्मेट घातलेले व न घातलेल्यांचे प्रमाण आकडेवारी गेल्याच आठवड्यात जाहिर केली गेली ती तपासावी.
>>>> वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत. <<<<< अंमलबजावणी म्हणजे? केवळ खाकी/पान्ढरी वर्दी अन्गावर धारण केलेल्यांचेच ते काम आहे का? नागरिकांचे काहीच सहकार्य /सहभाग नको नियम पाळण्यात? नागरिकांनी नियम पाळले तर खाकी/पान्ढर्या वर्दीधारकांचे कामच उरत नाही हे लक्षात घ्यावे. पोलिस हवे लागताहेत याचाच अर्थ तमाम नागरीक अत्यंत बेशिस्त झाले आहेत. (हाच नियम मी गेल्या सहस्र वर्षातील ये देशीच्या बक्कळ संतांचे उपस्थितीबाबतही लावतो, पण तो विषय वेगळा).
>>>> ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय? <<<< अर्थात. अन समजा नसली, तरी गाडीवरुन जाताना स्वतःचे डोके हेल्मेट घालून शाबुत ठेवणे ही गरज नाही काय? पायी चालणार्यान्ना कुणि विचारित नाही, हेल्मेट घातलय का ? माणूस म्हातारे झाले की आपसूक बाकी लोक सान्गतात आता घसरून पडाल , हातपाय मोडेल तेव्हा एका जागी बसा.... बाथरुम वगैरेमधे कडीलावून जावू नका वगिअरे... तसेच हे...
>>>> कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत? <<<<< समजा असले तर? काय फरक पडतो? कोण कोणत्या उत्पादकांचे हितसंबंध? नावपत्ता, उत्पादक क्षमता, उत्पादकांची संख्या वगिअरे द्याल का प्लिज? की अशाच हवेत मारलेल्या गोळ्या झेलू म्हणता?
>>>>> रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय? <<<< अपघात कशाही मुळे झाला तरी सर्वात सेनसेटीव्ह प्राणघातक अवयव डोके असल्याने ते साम्भाळायला नको काय? जसे की क्रिकेटमध्ये चेंडूच्या मारापासून लिंगबचाव व्हावा म्हणून त्यालाही हेल्मेट घालतात... !
माझा हेल्मेटसक्तिला पूर्ण पणे पाठिंबा आहे.
मी हेल्मेटसक्ति व्हायच्या कितीतरी वर्षे आधीपासून म्हणजे १९९५ पासून हेल्मेट वापरतोय.
आजवर मला कधीही मानदुखी/डोकेदुखी ऐकू न येणे वगैरे कसलेही आजार/अडचणि भासल्या नाहीत.
हल्ली तर रेसिंग/माऊंटन सायकलवर देखिल हेल्मेट वापरले जाते.
लिंबुभाउंचा शनिवार वाड्यावर
लिंबुभाउंचा शनिवार वाड्यावर ३१ नोव्हेंबर रोजी जाहीर सत्कार करण्यात येणार आहे इच्छुकांनी लाभ घ्यावा
जाता जाता लिंबुभाउ आपण ओम्नीच्या सीटबेल्टवर देखील दोन शब्द बोलावे ही विनंती
सत्कार समारोह ला आमची पण
सत्कार समारोह ला आमची पण ह्जेरी पक्की.
चांगल्या कामासाठी नेहमिच पाठिंबा .
>>> जाता जाता लिंबुभाउ आपण
>>> जाता जाता लिंबुभाउ आपण ओम्नीच्या सीटबेल्टवर देखील दोन शब्द बोलावे ही विनंती <<<<
कोणे एके काळी, पस्तिसएक वर्षे झाली असतील त्याला, मी पुण्याच्या पोलिस कमिशनरना पोस्टकार्ड टाकून विचारले होते की सायकल ला मागे लाल रिफ्लेक्टरची सक्ती का करता? उद्या पायी चालणार्याच्या पार्श्वभागावरही लाल रिप्लेक्टर लावायची सक्ति करणार नाही कशावरून? सायकला हवे तर चालणार्याला का नको?
आज त्या पत्राबद्दल मला पश्चा:ताप होतोय, (त्या न बघितलेल्या पोलिस कमिशनरची मनोमन माफीही मागितली आहे). रात्रीचे पायी चालणार्याने देखिल रिफ्लेक्टर लावणे जरूरीचे आहे असे आजचे माझे मत आहे.
सीटबेल्ट बद्दल म्हणाल, तर तो गाडीतील प्रत्येक प्रवाशास अत्यावश्यक आहे.
नुकताच माझा एक चुलत जावई पुण्याहून चिपळूणास एस्टीने जात असताना, ड्रायव्हरचे मागिल बाजूस बसलेला, त्यांच्ए गाडीस अपघात होऊन एस्टी एका टेम्पोला धडकुन पुढे रस्ता उतरुन शेडपर्यंत धडकत गेली, तेव्हा त्या वेगात झालेल्या अपघातामुळे जावई समोरील बाजूस जोरदार आपटल्यामुळे त्याचे वरील दोन दात पडले व जीभेखालून बाहेर आले, व एकुण चेहर्यातील हाडात १७ फ्रॅक्चर्स झाली, ज्यामुळे तो पुढील तिन महिने घरी बसून होता. सुदैवाने, तोन्ड/जबडा इत्यादीला मार बसूनही, नाक/डोळे व मुख्यतः मेंदू वाचला, तरीही पुढील दोनेक महिने विस्मृतीचा त्रास खूप होत होता. आत्ता बोललेले थोड्या वेळाने लक्षात रहात नसे.
माझ्या मते खाजगी/सार्वजनीक सर्व जागी प्रत्येकास सीटबेल्ट सक्तिचा केला पाहिजे.
सिट्बेल्ट हवाच माझा नवरा पण
सिट्बेल्ट हवाच माझा नवरा पण आताच ऑगस्ट्मध्ये ड्रायवर सीट शेजारी बसला होता ब्रेक दाबले हा गेला काचेवर चांगलाच तोंड फुटल होत.नशीब काचेला आदळुन काच फोडुन परत सीटवर आला...बाहेर नाय आपटला...
बाकी हेल्मेट मला वापरायला जमत नाहि पण बाकिच्यांनी वापराव अस माझ मत आहे...पण हेल्मेट सक्ति नको...
सक्ती करायची तर गल्लीगल्लीत चालनारे देशीचे,आणि रस्त्यावर्ची दारुची दुकाने सक्तीने बंद करा खुप लोक जीवंतपणी नरकयातना सोसतात ते वाचतील लाखो करोडो संसार सुखाचे होतील...
पुणेकरांनी पुण्याच्या वेशीलगत
पुणेकरांनी पुण्याच्या वेशीलगत असलेले सर्व टोलनाके पूर्णपणे स्वीकारले. त्यांचा कधी विरोध केला नाही. कोल्हापूरमध्ये टोलनाक्यांच्या विरोधात अनेकदा अतिशय हिंसक प्रकार झाले. कोल्हापूरमधील टोलनाके हा नेहमीच एक वादग्रस्त विषय होऊन राहिला. मी कोल्हापूरला गेलो की आनंदाने दिवसाचा २० रुपये टोल एकदाच भरून मग दिवसभर कुठेही फिरतो. मला त्यात कमीपणा किंवा त्रासदायक असे काही वाटत नाही. जेथे खराब रस्ते आहेत तेथे कोल्हापूरचे कॉर्पोरेशन काही का करत नाही ह्यावरून मी टोलवाल्यांशी भांडत नाही. मग कोल्हापूरचे लोक तेथील टोलचा विरोध का करतात?
कारण असे एकेका शहराचे एकेक विशिष्ट इश्यूज असू शकतात. तेथील प्रश्न तेथे प्रथमपासून राहणार्यांना नीट माहीत असतात.
टोल व हेल्मेट ह्यात काहीही साम्य नाही. मी त्यांची तुलना केली म्हणून कोणी लगेच वेड्यात काढणारा प्रतिसाद देऊन आनंद मानू नये. फक्त इतकेच म्हणायचे आहे की एखादे शहरवासीय एखाद्या गोष्टीच्या बाबतीत इतर जगापेक्षा निराळे वागण्यामागे काही कारणे असू शकतात व त्यावरून त्या शहरवासीयांची अक्कल काढणे, त्यांना जगावेगळे मानणे असे प्रकार केले जाऊ नयेत.
हेल्मेटने सुरक्षा वाढते, समजत कसे नाही, हे बघा किती लोक हेल्मेट नसल्यामुळे मेले वगैरेची आकडेवारी, शासकीय आवाहने, जाहिराती असे सर्व प्रकार ह्या धाग्यावर करून व वापरून पाहणार्यांना पुन्हा एकदा सांगतो की हेल्मेट आवश्यक आहे हे पुण्यातील प्रत्येकाला समजलेले आहे. वाद त्यावर नाही आहे.
limbutimbu +१ सक्ती
limbutimbu +१
सक्ती हवीच...लाथों के भूत बातों से नाही मानते हे बाकी कुठल्या शहरांइतकेच पुण्यालाही लागू आहे...
Pages