Submitted by सायु on 17 November, 2014 - 01:01
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
वाटी भर आंबाडीचे बोंडं (चिरलेले + बियांसकट)
लसुण = १० -१२ पाकळ्या
जीरे = १ छोटा चमचा
तिखट = १ चहाचा चमचा
गुळ = मोठया लिंबा एवढा
मीठ = अंदाजे
क्रमवार पाककृती:
आंबाडी चे बोंडं धुवुन, पुसुन बियांसकट चीरुन घ्यावे.
यात वरिल सगळे जिन्नस घालुन मिक्सर मधुन गिरवुन घ्यावे..
आयत्या वे़ळी, चटणीच्या मधोमध आळं करुन कच्च गोडं तेल घालुन वाढावे..
ही चटणी आंबट, गोड, तिखट अशी चवीला चटपटीत लागते.
वाढणी/प्रमाण:
अंदाजेच..
अधिक टिपा:
भाकरी, पोळी सोबत मस्तच लागते..
माहितीचा स्रोत:
सासु बाई.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
छान चटणी.. हा प्रकार
छान चटणी.. हा प्रकार पुण्यामुंबईत माहीत नाही. तशी अंबाडीची भाजी खुद्द मुंबईत पिकवतात ( कुठे ते विचारू नका ) पण ही बोंडे कधीच बाजारात येत नाहीत.
धन्यवाद दा..
धन्यवाद दा..
सायली, धन्यवाद. माझी आई
सायली, धन्यवाद.
माझी आई पाट्यावर वाटून करायची चटणी.
ही चटणी. ही भाजी शरिरालातील दाह कमी करते. म्हणून ह्या बोंडांचे उन्हाळ्यात शरबत करतात.
अंबाडी एवजी (मिळणार नाहीत
अंबाडी एवजी (मिळणार नाहीत म्हणुन) क्रॅनबेरीज वापरता येतील का?
बी धन्यवाद.. आईच्या हातची चव
बी धन्यवाद.. आईच्या हातची चव काही वेगळीच असते नाही.. ती पण पाट्यावरची व्वा!
:
नवर्याची प्रत्येक पदार्थाला कमेंट असते, अरे व्वा छान झलाय. पण आई सारखा नाही...:P
आदिती, ट्राय करुन बघ आणि अनुभव सांग तुझा..
जे ब्बात!!
जे ब्बात!!
फोटोत लसूण आहे पण लिहिलेल्या
फोटोत लसूण आहे पण लिहिलेल्या साहित्यात नाही. उल्लेख चुकून राहून गेलाय का?
बोंडांऐवजी आंबाडीचे कोवळे तुरे वापरले तर अशीच चव येईल की काय असा विचार चाललाय.
धनुकली हीरा, धन्यवाद.. हीरा,
धनुकली हीरा, धन्यवाद..
हीरा, पा.कृ बदल केला आहे..लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद.
आंबाडीचे कोवळे तुरे वापरले तर अशीच चव येईल का?+++ कदाचित येईल
अदिति, मी स्वातीच्या पद्धतीने
अदिति, मी स्वातीच्या पद्धतीने क्रॅनबेरीजची चटणी करते. सासु-सासर्यांना खाऊ घातली, तर म्हणे तुला अंबाडीची बोंड कुठे मिळाली
व्वा! सायली मस्तच असणार ही
व्वा! सायली मस्तच असणार ही चटणी. पण इथे नगरात मला ही बोंडे कुठे दिसली नाहीत.
आणि प्रीती.........स्वाती आंबोळेच्या रेस्पीने मी लेकीकडे क्रॅनबरीचा मेथांबा केला तो इतका हिट झाला होता तिकडे!
नगरात मला ही बोंडे कुठे दिसली
नगरात मला ही बोंडे कुठे दिसली नाहीत.>>पिंपरीत पण नाही दिसली
मानुषी मुलींनो हा विदर्भातला
मानुषी
मुलींनो हा विदर्भातला प्रकार आहे. मस्त पाककृती सायली!
प्रिती, मनुषी ताई, धन्यवाद.
प्रिती, मनुषी ताई, धन्यवाद.
अकोल्यात नुकतीच आली आहेत ही
अकोल्यात नुकतीच आली आहेत ही बोंडे, मी दररवर्षी करतो.
सध्या १५ रु. पाव आहेत. ! त्यामूळे सहज होते ४/५ दिवसापुरती
आईशप्पथ्थ .. ये धागा तो मेरे
आईशप्पथ्थ .. ये धागा तो मेरे नजर्खालसे छुट हि गया था .
मी पन करते हि चटणी .. शेम टु शेम फक्त पाकळ्या घेते बोंडाच्या . आतल बी / फळ नै घेत .
मला वाटत सायली विदर्भात खुप सहज मिळून जातात बोंड वगैरे म्हणुन इकड जास्त बनतात हे प्रकार..
आंबाडीच्या पानांची पन चटणी करतात माहितीये ना .. बोल तू टाकते रेसिपी कि मी टाकू ?
छान.
छान.
आभार एस आर डी... तुम्ही क
आभार एस आर डी... तुम्ही क मे न्ट ए डीट का केलीत...
छान सुचलं तुम्हाला आंबाडी पrत रुजवायच....
बhuतेक पां ढryaa आंबाडीच्या फुलाचा वेग ळा प्र कार अ सावा...
टिना धnyवाद... पानांची च टNee वॉव... लौकर टाक पा.कृ....
वॉव.. इथे खू>>>प मिळत असतात
वॉव.. इथे खू>>>प मिळत असतात वेट मार्केट मधे.. नेक्स्ट टैम घेऊन येईन.. चटणी चटपटीत दिसतीये.. मस्त!!
धन्स ग वर्षु दी, एकदा नक्की
धन्स ग वर्षु दी, एकदा नक्की करुन बघ..