अव्यवहार्य तसेच कालबाह्य कायदे ही भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण करतात. पुण्यात चालू झालेली हेल्मेट सक्ती चा नियम हे त्याचे एक उदाहरण आहे काही सेलिब्रिटी हेल्मेट जागृती साठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे होणार्या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करणे अयोग्य नाही. पण विरोध आहे तो सक्तीला आहे हेल्मेटला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हेल्मेट घातले नाही तर त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत. ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय? कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत? रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. एखाद्या शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ असताना त्याकडे लक्ष न देता जर पोलिसांनी उचल्यांविरुद्ध मोहीम राबवली तर त्यांच्या हेतु विषयी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. कुठलाही कायदा करताना त्याला काही वैधता असली पाहिजे. गरजे नुसार त्याचे नूतनीकरण झाले पाहिजे वा रद्द झाला पाहिजे. हेल्मेटची शिफारस करा पण सक्ती नको.
हेल्मेटसक्ती
Submitted by प्रकाश घाटपांडे on 12 November, 2014 - 22:55
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
साजिरा सध्या 'भारतातील इतर
साजिरा सध्या 'भारतातील इतर सर्व गाड्या भंगारात काढून सगळ्यांना केवळ ओम्नी विकत घेण्याची सक्ती करावी' अशी जनहित याचिका दाखल करण्यात गुंतला आहे. 'ओम्नीसारख्या अपघातप्रूफ वाहनात सीटबेल्टची सक्ती करू नये' अशी एक सबयाचिकाही तो जोडणार आहे.
वेळ मि़ळताच तो इथे येईल. तोवर जरा कळ काढावी ही विनंती.
ता.क. - साजिरा इथे येणारही नाही. बहुतेक याचिका दाखल करून तो भारतातल्या रस्त्यांच्या पातळ्या मोजायला जाईल.
अशक्य!
अशक्य!
अती झालं (कौतुक ओम्नीचं) आणि
अती झालं (कौतुक ओम्नीचं) आणि हसू आलं (ओम्नीचं) असं झालंय. आवरा आता..
चेतनजी इथे गाड्यांच्या
चेतनजी इथे गाड्यांच्या विषयीची जी तुम्ही अभ्यास पुर्ण माहीती सांगताय ती शोधायला फार वेळ लागला असता, हे का लोकांच्या लक्षात येत नाही .सो येउद्या अजुन माहीती . जरी तुम्हाला माझे मागचे मत पटले असेल तरी.
सायो, मी इथे ओम्नीचं कौतूक
सायो,
तेव्हा मला आवरा म्हणण्यापेक्षा तुमचं हसू आवरा कारण त्यात हसण्यासारखं काहीही नाहीये.
सिनि,
थॅंक्स, निदान इथे तुम्ही तरी ओम्नी खेरीज मी इतर चारचाकी व दुचाकी वाहनांविषयी मांडलेली मतं वाचली आहेत.
चेतन ओम्नीच्या डिझाईनला काही
चेतन ओम्नीच्या डिझाईनला काही काड्यापेटीचा डब्बा म्हणतात. त्यांच्या मते हायवेवर जर शेजारुन मोठे वाहन गेले की गाडी डगमगते. ओम्नी तुमच्या अंगवळणी पडलीय म्हणा. पण इतर वाहनांच्या तुलनेनी ती कमी सुरक्षित आहे हे बहुसंख्यांचे मत आहे.तसे तज्ञांचे ही मत आहे.
तसेच हेल्मेट सोबत बाळगावे लागते तसे सीट बेल्टचे नाही.
वेल, एकंदरीत पुण्यातले
वेल, एकंदरीत
पुण्यातले रस्ते भयंकर खड्डेदार आहेत.
पुण्यात रस्त्यांवरच्या दिव्यांचा प्रकाश पुरेसा नसतो.
पुण्यात वाहतूक नियम पाळत नाहीत.
इ.इ.
त्यामुळे पुण्यात ताशी तीस कि.मी.पेक्षा जास्त वेगाने दुचाकी चालवता येत नाही.
ताशी तीस कि.मी. हा वेग अपघातास आणि दुखापतीस पुरेसा नाही.
पुणे आणि पुणेकर हे अर्थातच आगळे-वेगळे आहे/त.
तस्मात इतर ठिकाणी लागू असलेली आणि बहुधा पाळली जाणारी हेल्मेट्सक्ती पुणेकर पाळणार नाहीत.
पुण्याला आणि पुणेकरांना कोणताही नियम लागू करताना सरकारने दहावेळा विचार करावा.
अकरावी वेळ पुण्याच्या बाबतीत अशक्य असते.
कितीही कमी वेगात पडलो तरी
कितीही कमी वेगात पडलो तरी डोक्यास मार लागून माणूस मरू शकत असेल तर फक्त दुचाकीवाल्यांनाच हेल्मेटची सक्ती का?
पादचारी मार्गावरून चालणार्यांनाही वाहनाची धडक बसू शकते. ते पादचारी स्वत:ही सहा किलोमीटर पर अवर ह्या वेगाने चालत असतात व पडू शकतात. बसथांब्यावर उभ्या असलेल्या माणसांच्या डोक्यात बसथांब्याचे लोखंड पडू शकते. एखाद्य चांभाराच्या डोक्यावर झाड पडू शकते. चारचाकी चालवणार्यांनी सीट बेल्ट लावावा असा नियम आहे कारण स्टीअरिंग व्हील छातीवर आघात करू शकते. तसेच एखाद्या चारचाकी अपघातात डोक्यासही मार लागू शकतो.
ह्या सगळ्यांना हेल्मेटची सक्ती का नाही?
ह्या सगळ्यांना हेल्मेटची सक्ती नाही कारण त्यांच्याबाबतीत डोक्याला इजा होण्याची शक्यता धूसर असते. ती धूसर असते कारण त्यांचा वेग तरी अतिशय कमी असतो किंवा झाड, बसस्टॉप अश्या गोष्टी पडण्याची शक्यता तरी खूप कमी असते. दुचाकीस्वारांच्या बाबतीत वेगही अधिक असतो आणि भर रहदारीत वाहन चालवत असल्यामुळे अपघाताची शक्यताही अधिक वाढलेली असते, म्हणून सक्ती!
ह्याचाच अर्थ वेग आणि अपघाताच्या तीव्रतेची शक्यता ह्यांचा हेल्मेटशी थेट संबंध आहे. मग जेथे वेग धारण करणे जवळपास अशक्य आहे, जेथे सलग दिडशे मीटर्सही ब्रेक लावल्याशिवाय जाता येत नाही, जेथे सरासरी वेग पंचवीसच्या वर जाऊ शकत नाही, तेथे ही सक्ती करण्यापूर्वी त्या वाहनचालकाला अधिक सुस्तिथीतील रस्ते व सुरक्षा व्यवस्था देणे हे शासनाचे काम नाही का?
होय, या प्रतिसादानंतर माझे
होय, या प्रतिसादानंतर माझे मतपरिवर्तन झाले आहे.
आता पुण्यात कोणाही दुचाकीस्वारास हेल्मेटसक्ती नसावी. पादचार्यांस मात्र ती सक्तीची असावी.
प्रांजळ कबूली तरी कोण देतं
प्रांजळ कबूली तरी कोण देतं म्हणा हल्ली जगात!
बेफिकीर, मी देतो ना प्रांजळ
बेफिकीर,
मी देतो ना प्रांजळ कबूली.
जोवर सीटबेल्ट सक्तीला मायबोलीकर पाठिंबा देतील, मी देखील हेल्मेटसक्तीला पाठिंबा देत राहील.
हे
जबतक सूरज चांद रहेगा, xxxx तेरा नाम रहेगा|
या धर्तीवर वाचावे.
(No subject)
काय गरज नाही सिटबेल्ट आणि
काय गरज नाही सिटबेल्ट आणि हेल्मेटची फुकटचे कौतूक च्यामारी
पैसे जातात कंपनीचेच भले होते. मी हेल्मेट घेऊन 4 वर्ष झाली अजुन काहीच उपयोग नाही झाला उगाच खिशाला चाट पडली. 100 पैकी 4-5 जणच डोक्यावर पडतात त्यासाठी सगळ्यांनाच सक्ती करू नये. अपघात तर होतातच मग सीटबेल्ट लावला काय आणि हेल्मेट घातले काय. घडायचे ते घडुनच जाते ना. उगाच यमदेवाच्या काम कशाला अडवायचे. यमराजाला अजुन पर्यंत कोणी थांबवु शकले नाही आणि भविष्यात देखील कोणी थांबवण्याचे कार्य करु शकेल असे वाटत नाही
How about making driving on
How about making driving on left optional ? Licence optional ?
मी हेल्मेट घेऊन 4 वर्ष झाली
मी हेल्मेट घेऊन 4 वर्ष झाली अजुन काहीच उपयोग नाही झाला उगाच खिशाला चाट पडली. 100 पैकी 4-5 जणच डोक्यावर पडतात त्यासाठी सगळ्यांनाच सक्ती करू नये.
>>> म्हणजे हेल्मेट घेतलं की त्या हेल्मेटचे पैसे वसूल व्हायला अॅक्सडेंट झालाच पाहिजे अशी सक्ती केली पाहिजे की काय आता? आयुर्विम्यालाही हेच लॉजिक लावता का?
म्हणजेच मी गाडी व्यवस्थित
म्हणजेच मी गाडी व्यवस्थित चालवतो असे आहे तरी पण मी हेल्मेट घेतलेच
ओम्नी म्हनजे kidnapping साठि
ओम्नी म्हनजे kidnapping साठि वापरतात तिच गाडी का ???
माझा मुलगा बाईक चालवायचा तेव्हा रोज मी त्याला आठवनिने हेल्मेट द्यायचि आनि तो पन ती हेल्मेट घालायचा मला टेंन्शन येउनये म्ह्नुन.एखाद्या दिवशी जर तो हेल्मेट घालायचे विसरला तर तो घरी येईपर्यत मला काळजी वाटायचि त्याची
आई किंवा बायको हेल्मेट घालायचा आग्रह करत असतिल तर त्यांच्या आज्ञेचे जरुर पालन करावे कायदा गेला खड्यात.
ओम्नी म्हनजे kidnapping साठि
ओम्नी म्हनजे kidnapping साठि वापरतात तिच गाडी का ??? >>> असे जनरल स्टेटमेन्ट करण्याएव़जी,
सिनेमात / टीव्हीत kidnapping साठि वापरतात तिच गाडी का ??? असे म्हणावे.
अन्यथा काही ओम्नीप्रेमी माबोकरांच्या व्यवसायवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.
गरजुंनी दिवे घ्यावे.
ओम्नी म्हनजे<<<< सिनेमात /
ओम्नी म्हनजे<<<< सिनेमात / टीव्हीत kidnapping साठि वापरतात तिच गाडी का ??? असे म्हणावे.>>>
मला असेच म्ह्नायचे होते मि ज्याना ओम्नी बद्दल विचारल त्यानि मला असेच सांगितले .
कोनी माझ्या प्रतिसादामुळे व्यथित झाले असेल तर क्षमस्व.
ओम्नी म्हनजे kidnapping साठि
ओम्नी म्हनजे kidnapping साठि वापरतात तिच गाडी का ???>>>>:फिदी: त्यामुळेच ही बदनाम झाली असावी.
आई किंवा बायको हेल्मेट घालायचा आग्रह करत असतिल तर त्यांच्या आज्ञेचे जरुर पालन करावे कायदा गेला खड्यात.>>>>:फिदी:
अभिजित नवले आणि सुरेख तुमचे
अभिजित नवले आणि सुरेख तुमचे आभार
<< सिनेमात / टीव्हीत kidnapping साठि वापरतात तिच गाडी का ??? असे म्हणावे.
अन्यथा काही ओम्नीप्रेमी माबोकरांच्या व्यवसायवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.
गरजुंनी दिवे घ्यावे >>
<< मला असेच म्ह्नायचे होते मि ज्याना ओम्नी बद्दल विचारल त्यानि मला असेच सांगितले .
कोनी माझ्या प्रतिसादामुळे व्यथित झाले असेल तर क्षमस्व. >>
म्हणजे मी किडनॅपिंग करतो असा मायबोलीकरांमध्ये गैरसमज पसरला जाईल असे तुम्हाला वाटते का?
- पसरला तर पसरु द्या. मला राग नाही. उलट असे झाले तर बरेच. त्यामुळे धाक वाटून माझ्या लेखांवर व प्रतिसादांवर खोडकर प्रतिक्रिया देण्याआधी दहादा विचार तरी करतील.
तसे माबोकरांना वाटेल असे नाही
तसे माबोकरांना वाटेल असे नाही वाटले.
तुम्हीच ओम्नीवर लागलेला डाग पुसन्यासाठी पुढे याल आणि त्यावर परत एक "ओम्नी किडनॅपिंगसाठी का बेस्ट आहे/नाही" असा एखादा डिटेल्ड प्रतिसाद लिहाल असे वाट्ले.
(ही स्मायली अपमान कर्ण्यासाठी टाकलेली नाही. जे काही लिहिले आहे ते गंमत म्हणुन लिहिले आहे यासाठी टाकली आहे याची नोंद घ्यावी)
म्हणजे मी किडनॅपिंग करतो असा
म्हणजे मी किडनॅपिंग करतो असा मायबोलीकरांमध्ये गैरसमज पसरला जाईल असे तुम्हाला वाटते का?
- पसरला तर पसरु द्या. मला राग नाही. उलट असे झाले तर बरेच. त्यामुळे धाक वाटून माझ्या लेखांवर व प्रतिसादांवर खोडकर प्रतिक्रिया देण्याआधी दहादा विचार तरी करतील.>>>.. चेतन तसे कुणालाच वाटत नाहीये. उलट ओम्नीच अशी चटकन वापरताना दाखवतात कारण दोन्ही साईडने बाजूला सरकणारे दरवाजे, मागे तीन जण आरामात बसतील, आणी सामान भरपूर मावेल अशी भरपुर्र स्पेस यामुळे ओम्नी सोपी वाटते.
पण ओम्नी दणकट नाही हे १००१ टक्के खरे. तुम्हाला असले प्रवास करायचेच असतील तर मग स्कॉर्पिओ किन्वा सफारीच घ्या.
<< तुम्हाला असले प्रवास
<< तुम्हाला असले प्रवास करायचेच असतील तर मग स्कॉर्पिओ किन्वा सफारीच घ्या. >>
आर्थिक कुवत नाही.
ओम्नी अपघाताच्या दृष्टीने
ओम्नी अपघाताच्या दृष्टीने फारच भयानक आहे. आमच्या कंपनीच्या माणसाचा अपघात झालेला सीटबेल्ट वगैरे लावुन सुध्दा. रात्री हायवेवर ओवरटेक करण्याकरीता थोडी गाडी बाहेर काढली होती पुढे घेतली असताना समोरुन येणार्या ट्रक्स या वाहनाचा ताबा सुटून त्या ओम्नीवर आदळली ड्रायव्हर ऑन द स्पॉटच गेला आणि आमच्या कंपनीचा माणुस समोरची काच फुटुन रस्त्यावर फेकला गेला अत्यंत क्रिटीकल केस झालेली एक डोळा आणि एका बाजुचा जबडा गेला. नशिबानेच जिवंत वाचला म्हणायचा. धडक समोरुन बसल्याने गाडी आत पर्यंत चेपली गेलेली.
आज ही तो माणुस ओम्नी बाजुने जरी गेली तरी थरथर कापत असतो.
घाटपांडेजी , तुमच्या सेन्सिबल
घाटपांडेजी , तुमच्या सेन्सिबल पोस्ट्स मी आवर्जून वाचत असतो. तुमच्याकडून अशा दुर्दैवी धाग्याची खरोखर अपेक्षा नव्हती . ज्या देशात सेफ्टी फीचर नसलेल्या चारचाक्या एन्ट्री लेवेल मॉडेल म्हणून खपवल्या जातातताणि बजेट म्हणून खरीदल्या जातात तिथे फार बोलण्यासारखे काही नसते. असो ओल्या रस्त्यावर सिग्नलला बन्द गाडी
स्टार्ट करताना जागच्या जागी फिरून घसरून हेड इंज्युरी होऊन काही आठवडे कोम्यात गेलेली आणि नन्तर वागण्यात बदल झालेली केस जवळून पाहिलेली आहे. असो.वकीली आर्ग्युमेन्ट कोणत्याही बाजूने करता येते. प्रज्ञावंतांपुढे अधिक काय बोलणे ? हेल्मेटच्या सक्ती म्हणजे जगण्याची सक्ती एवढेच म्हणू शकतो !
कृपया हे पहाच आणि दुर्लक्षही
कृपया हे पहाच आणि दुर्लक्षही करा.....
https://www.youtube.com/watch?v=A4yGNDBBuy8
>>घाटपांडेजी , तुमच्या
>>घाटपांडेजी , तुमच्या सेन्सिबल पोस्ट्स मी आवर्जून वाचत असतो. तुमच्याकडून अशा दुर्दैवी धाग्याची खरोखर अपेक्षा नव्हती <<
रॉबिनहूड मी पोस्ट टाकताना माझ्या मनात हा विचार आला होता. पण आपणच निर्माण केलेल्या प्रतिमांच्यात गुरफटून आपलाच जीव गुदमरतो.अपेक्षांच ओझ, प्रतिमांच ओझ झाल कि उस्फुर्तपणा नाहीसा होतो.मानसिक आरोग्यही खराब होते. त्यापेक्शा मनात आलेल लिहून टाका. माझा फोकस हेल्मेटसक्तीच्या अंमलबजाणीच्या व्यवहार्यतेवर होता.वेगवेगळे विचारप्रवाह असणार हे माहीतच होत. त्यांचा आदर आहेच. पण विचारशून्यतेपेक्षा विचारभिन्नता बरी नाही का?
प्रकाश घाटपांडे +१
प्रकाश घाटपांडे +१
चेतन, तुम्ही तुमच्या
चेतन, तुम्ही तुमच्या अनुभवांतुन काढलेली गाडीबद्दलची सारी निरीक्षणे आणि निष्कर्ष फार इंटरेस्टिंग आहेत. मात्र ही निरीक्षणे आणि अनुमाने तज्ज्ञांकडून 'व्हॅलिडेट' करून घेतल्यास त्यांना अधिक बळकटी आणि ऑथेंटिसिटी मिळेल असं वाटतं. कुठचीही मोठी कंपनी प्रॉडक्ट लाँच करण्याच्या आधी प्रचंड पैसे त्याच्या आर-अँड-डी वर खर्च करते. त्यामुळे अर्थातच त्यांचं हे नवं बाळ किती गुणाचं आहे, आणि ते बाजारात आणण्यासाठी काय व्यावसायिक तडजोडी कराव्या लागल्या आहेत, हे त्यांना नीट माहिती असतं. त्यांनी ते जनतेला नीट सांगितलं नाही तरीदेखील प्रतिस्पर्धी कंपन्या या अशा बाळाचे गुण उघड करतातच. या आणि या प्रकारच्या योग्य सोर्सेसकडून, या क्षेत्रातल्या तज्ज्ञांकडून तुमची माहिती आणि अनुभव ताडून बघितल्यास तुम्हाला अधिक ठोसपणे सार्वजनिकरीत्या तुमचे अनुभव मांडता येतील- हे एक; आणि इथं जे अनेक जण वाचत असतात त्यांची तुमच्या वैयक्तिक अनुभवांमुळे दिशाभूल होणार नाही- हे दुसरं.
आपणच निवडून दिलेले प्रतिनिधी, आमदार इ. सक्तीविरूद्ध रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे हेल्मेटसक्ती पुन्हा एकदा रद्द होणार हे निश्चित. पुणे हे शेकडो स्क्वेअर किलोमीटर पसरलेलं आणि अर्धा पाऊण कोटी लोक भरलेलं एक महाखेडं आहे- याची आता मी माझ्यापुरती खात्री करून घेतली आहे. जगायचीही सक्ती आहे. मरायचीही सक्ती आहे.
Pages