अव्यवहार्य तसेच कालबाह्य कायदे ही भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण करतात. पुण्यात चालू झालेली हेल्मेट सक्ती चा नियम हे त्याचे एक उदाहरण आहे काही सेलिब्रिटी हेल्मेट जागृती साठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे होणार्या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करणे अयोग्य नाही. पण विरोध आहे तो सक्तीला आहे हेल्मेटला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हेल्मेट घातले नाही तर त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत. ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय? कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत? रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. एखाद्या शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ असताना त्याकडे लक्ष न देता जर पोलिसांनी उचल्यांविरुद्ध मोहीम राबवली तर त्यांच्या हेतु विषयी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. कुठलाही कायदा करताना त्याला काही वैधता असली पाहिजे. गरजे नुसार त्याचे नूतनीकरण झाले पाहिजे वा रद्द झाला पाहिजे. हेल्मेटची शिफारस करा पण सक्ती नको.
हेल्मेटसक्ती
Submitted by प्रकाश घाटपांडे on 12 November, 2014 - 22:55
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नीधप +१
नीधप +१
अरे आशु हेल्मेट न घालता ज्या
अरे आशु हेल्मेट न घालता ज्या पद्धतीने सहजगत्या मान फिरवून आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेता येतो तो हेल्मेट घातल्यावर सहज होत नाही. शिवाय हेल्मेट न घालता किंचित मान फिरवली तर अजुनी जास्त चित्र स्पष्ट दिसते ते हेल्मेट घातल्यावर डोके बर्याच अंशात फिरवावे लागते. इ.
तु लकी असशील म्हनून तुला मापाची हेल्मेट्स मिळाली असतील. मी आत्तापर्यंत ३ हेल्मेट् वापरली, सगळी डुगडुगायची, तशी हेल्मेट घालून फार सर्कस होते.
मी अगदी सुरूवातीला हेल्मेट वापरायला सुरू केलं तेव्हा मला एस एन डि टी पाशी ट्रक धडकणारच होता ऑलमोस्ट कारण मी हेल्मेट घातलं होतं आणी त्याने दिलेले हॉर्न मला कळले नव्हते.. पण नंतर हेल्मेट घालोनही आपल्यासाठी असलेला हॉर्न कसा हेरायचा हे कळलं होतं.
माझा वैयक्तिक रित्या हेल्मेट वापराला पाठिंबाच आहे.
सार्वजनिक वहातुकीचे बारा
सार्वजनिक वहातुकीचे बारा वाजलेले असताना व खड्यांमधे रस्ते अडकलेले असताना त्याबाबत निष्क्रीय राहून
फक्त हेलमेट सक्ती होते, तेव्हा ती सक्ती हास्यास्पद होते. इतकी काळजी असेल पब्लीकची तर पहिल्यांदा प्रमुख गोष्टी बघा ना.
ह्याच धर्तीवर, ह्याच कळवळ्यापोटी व मायेपोटी, पावसाळ्यात सुंठीचा चहा पिण्याची, थंडीत चवनप्राश व उन्हाळ्यात गुलकंद खाण्याची सक्तीही होऊ शकेल का?
अवांतर पण संबंधित - आता
अवांतर पण संबंधित -![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
आता पुण्यात तर वादळ आल्याप्रमाणे पोलिस चेकिंग करत सुटले आहेत.
आमच्या कंपनीच्या बसेस चांदणी चौकात उभ्या असायच्या... इतकी धडक कारवाई की एके दिवशी आमच्या एका बसला आणि गिरिकंदच्या २ बस जॅमर लावलेल्या आढळल्या.
बाकी एक टिम तिथे उभीच असते, मिळेल त्या कारणावरून पकडत आहेत.
हा फतवा कोणी आणि कधी काढलाय?
<< आता पुण्यात तर वादळ
<< आता पुण्यात तर वादळ आल्याप्रमाणे पोलिस चेकिंग करत सुटले आहेत. >>
<< हा फतवा कोणी आणि कधी काढलाय? अ ओ, आता काय करायचं >>
पंधरा वर्षांपासून भुकेलेले आता भोजनाच्या पंक्तीत बसलेत... त्यांची भूक समजून घ्या.
चारचाकी वाहनात असलेल्या आसन
चारचाकी वाहनात असलेल्या आसन सुरक्षा पट्टा (सीट बेल्ट) च्या सक्तीविषयी आपले काय मत आहे? >>>>
माझे हे मत आहे.जे मी तुमच्या धुळे क्रेझी जर्नी वरही लिहीणार होते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मान्य आहे की हेल्मेट आणि सीटबेल्ट ने जरा गैरसोय होते.पण स्वतःच्या जीवा पेक्षा मोठी कोणतीही गोष्ट नाही .त्यामुळे सीटबेल्ट आणि हेल्मेट सक्ती सगळ्यांसाठीच महत्वाची आहे. बाकी फायद्याने जाणार्यांनी कायद्याने जाउन बघावे. कारण "जान है तो जहान है."
मुंबईत तर कायद्यानेच रहावे ,नाहीतर पोलीस मामा आपला कायदा दाखवतात.
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वाहतुकीचे नियम पाळून चांगल्या पद्धतीने गाडी चालवणार्यांबद्दल आदर आहे त्यामुळे जाहीराती योग्य ठीकाणी हलवण्यात आल्या आहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शरद आणि आशूचँप यांच्या पोस्टी
शरद आणि आशूचँप यांच्या पोस्टी पटल्या आणि आवडल्या.
हेल्मेटची सक्ती फक्त वाहनचालकाला न करता त्याच्या मागे-पुढे, आजूबाजूला बसलेले लहान-थोर यांना पण केली पाहिजे. हे मी मागे पण एकदा लिहिलं होतं, पुन्हा लिहिते- हेल्मेट सक्तीची आहे म्हणून स्वतः घालायची आणि चार-पाच वर्षांचं पोर बिना-हेल्मेटचं पुढे उभं करायचं किंवा बसवायचं हे भयंकर डेंजरस आहे त्या पोरासाठी.
मी स्वतः ठाणे, मुलुंड गावांमध्ये हेल्मेट घालून २-३ वर्ष बाइक चालवली आहे. इथे अनेकांनी मांडलेले इश्युज (व्हिजन-मान-बिन) मला तरी अजिबात जाणवले नाहीत.
कुणाचे असे अनुभव आहेत???
कुणाचे असे अनुभव आहेत??? <<
माझे. नीट वाचा २-३ वेळा लिहिलंय मी याच बाफवर.
सक्ती हवी का नको... ती
सक्ती हवी का नको... ती पोलिसांना पैसे खायला आहे...अंशतः सहमत पण,![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
वरच्या आशुच्या पोस्टीशी सहमत. मी पुण्यात ५-६ वर्षे सतत हेल्मेट घालून बाईक चालवली आहे. व्हिजन अजिबात ब्लॉक होत नाही. साईड मिरारचा योग्य वापर आणि आपल्या साईझचे हेल्मेट मात्र हवे. पुण्यात प्रचंड धूळ आणि प्रदूषण आहे, ज्याने डोळ्याची वाट लागते. हेल्मेटने ते प्रचंड सुसह्य होते. पावसात थोडे त्रासदायक आहे, पण धो-धो पावसात डोकं भिजत/ निथळत (चष्मा असेल तर तो लावून, कारण मी लावतो) बाईक वरून जाणे जितकं आनंददायक आहे त्यापेक्षा हेल्मेटवापरून थोडं कमी वेगात जाऊन, काच उघडी ठेवून किंवा हाताचा वायपर करून जाणे जास्त सुखकर वाटतं मला. वर कोणी म्हटलंय तस, हेल्मेटशिवाय चालवली की चुकल्यासारखं वाटतं.
पुण्यातला ट्राफिक आणि वाहनचालकांचा बेदरकारपणा बघता, लवकरच, चालवणारा सोडा, रस्त्याने चालणारा हेल्मेट घालून जाताना बघायला मिळेल असं हल्ली वाटायला लागलंय
मागच्या विधानसभेच्या ( २००९ )
मागच्या विधानसभेच्या ( २००९ ) प्रचारात एक आरोप मा. राजसाहेब ठाकरे यांनी केला होता. दुचाकी वाहनांची विक्री वाढावी म्हणुन सार्वजनिक वाहन व्यवस्था ( पब्लीक ट्रान्सपोर्ट ) ज्या पध्दतीने नियोजनपुर्वक असायला हवे ते असत नाही. या साठी महत्वाचे दुचाकी उत्पादक राजकीय पक्षांना निवडणुक फंड देताना ही अट घालुन देतात.
म्हणजे मुळात सरकारची जबाबदारी असलेली सार्वजनिक वाहन व्यवस्था अपुरी निर्माण करायची. नाइलाज म्हणुन दुचाकी वहान खरेदी करायचे. त्याला सोन्याच्या भावाने पेट्रोल खरेदी करुन घालायचे. जो रोड टॅक्स १९८५ सालापासुन वर्षाला भरण्याच्या ऐवजी एकरकमी भरुन सरकार ला द्यायचा. रस्त्यांच्या अवस्थेबाबत बोलायचे नाही आणि सरकार त्यावर हेल्मेटची सक्ती करणार.
ह्या मुक्या बिचार्या जनतेचा काही विचार कुणी करेल का ?
सर्वत्र सक्ती बरोबर नाही.
सर्वत्र सक्ती बरोबर नाही. हायवे किंवा जिथे चारचाकी वाहनांची संख्या जास्त आहे अशा भागात सक्ती योग्य वाटते. त्याबरोबर वाहतुक नियमन, उत्तम रस्ते ह्या गोष्टी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. तसेच हेल्मेटचे चांगले पर्याय (variety) मार्केट्मध्ये आधी उपलब्ध करुन देणे हे देखील आवश्यक आहे.
मंगळूरमध्ये हेल्मेट सक्ती
मंगळूरमध्ये हेल्मेट सक्ती आहे. नवर्यानं दोन वर्षं तिथंच गाडी चालवल्यानं त्याला हेल्मेटची चांगलीच सवय झाली आहे. सध्या त्याचा जायचा यायचा रस्ता पोर्टकडे जाणारा आहे त्यामुळे भलेमोठे कंटेनर क्रेन वगैरेंनी रस्ता भरलेला असतो. त्यामुळे हेल्मेट असणं मस्टच आहे.
अनेकजण तेच तेच बोलतायत पण आपण
अनेकजण तेच तेच बोलतायत पण आपण एक नवीनच मुद्दा लिहिला अश्याप्रकारे लिहीत आहेत असे वाटत आहे.
थोडक्यात, शिफारस करा पण सक्ती नको असे अनेकांचे म्हणणे आहे आणि हेल्मेटने गैरसोय होत नाही असेही अनेकांचे म्हणणे आहे.
मेरिट बेसिसवर अशी सक्ती केलू जायला हवी आहे.
जितका हा प्रश्न चुकीचा आहे की 'हेल्मेट घालून अपघात झाला तर सरकार फुकट वैद्यकीय सेवा पुरवणार का' तितकाच हा ताशेराही चुकीचा वाटतो की 'पुणे व इतर शहरांंमध्ये काहीही फरक नाही'.
पुण्यातील प्रश्न तपशीलवार लिहायचा प्रयत्न करतो.
१. अनेक रस्ते प्रचंड गजबजलेले असतात. त्यावर फेरीवाले, पादचारी, जड वाहने, हलकी चारचाकी वाहने, हातगाड्या, सायकली, स्वयंचलीत दुचाकी व इतर निर्जीव बाबी (जसे कचराकुंडी, होर्डिंग्ज वगैरे) हे सगळे एकाच ठिकाणी असते. सरासरी वेग अश्या ठिकाणी वीस ते पंचवीस असतो. नुसताच वेग कमी नसतो तर दर दहा फुटांवर ब्रेकिंग अॅप्लाय करावे लागते व गिअर्स बदलावे लागतात. पाय टेकावे लागतात.
२. अनेक रस्ते अजूनही खूप अरुंद आहेत. परिणाम वरील प्रमाणेच!
३. अनेक रस्त्यांची दुरावस्था आहे. त्या दुरावस्थेमुळे पुन्हा परिणाम तोच! सरासरी वेग अतिशय कमी, सातत्याने ब्रेक्स लावणे, पाय टेकायला लागणे!
४. पुण्यातील रस्त्यांना क्रॉस रोड्स प्रचंड प्रमाणात आहेत. ह्याचाही परिणाम तोच.
५. पुण्यात फ्लाय ओव्हर्स तुलनेने कमी आहेत. (मुंबईपेक्षा). त्यामुळे सरासरी वेग मर्यादीत होतो.
६. पुण्यातील वाहतुक अतिशय बेशिस्त आहे. त्यामुळे पुन्हा वेग खूप कमी ठेवता येणे, ब्रेकिंग आणि पाय टेकणे हे आले.
७. पुणे ह्या शहराची रचना बँगलोर, हैदराबाद ह्यांच्यापेक्षा मुळातच वेगळी आहे. ह्या शहरात एकमेकांत मिक्स झालेल्या पेठा, मंदिरे, बाजार असे अनेक प्रकार मिसळले गेलेले आहेत. हैदराबाद व बँगलोर ह्या शहरांची रचना बरीच वेगळी आहे, काहीशी पुण्यातील निगडी प्राधिकरणासारखी! (चंदीगढची रचना सर्वात सुंदर आहे).
८. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या बाबतीत पुण्यातील प्रशासन व संबंधीत खाती अत्यंत उदासीन आहेत व पी एम टी वगैरेंचा परफॉर्मन्स पॅथेटिक आहे. साहजिकच पुण्याची ओळख (विद्येचे माहेरघर, आय टी हब, ऑटोमोबाईल हब, सिटी ऑफ रेस्टॉरंट्स ह्यांच्याइतकीच) स्वयंचलीत दुचाकींचे शहर अशी झालेली आहे. अनंत दुचाकी सर्वत्र वाहत असल्यामुळे घातक अपघातांचे प्रमाण (काही खास प्रयत्न न करताच) घटते.
निव्वळ वरील कारणांसाठी नव्हे, तसेच, निव्वळ 'विशेष अपघात होतच नाहीत तर हेल्मेट कशाला' असा युक्तिवाद करता येत असल्यामुळेही नव्हेच, तर सुधारणांसाठी दशकानुदशके स्वतः काहीही गंभीर प्रयत्न न करता प्रशासन दुचाकीस्वारांना वेठीस धरते ह्याबद्दलचा संताप म्हणून पुण्यात हेल्मेटसक्तीला सातत्याने विरोध होतो. दुसर्या शब्दांत, ९९ टक्के प्रॉब्लेम्स तुमच्यामुळे असताना आमच्या एक टक्का चुकीसाठी आम्हाला भुर्दंड आणि तुम्ही पुन्हा तंबाखू चोळायला मोकळे हे सहन होत नाही. हेल्मेटने डोके वाचते हे सर्वांनाच समजते, स्वतःच्या सुरक्षेचा प्रश्न असताना चूक प्रशासनाची की आपली हे बघू नये हेही सर्वांना समजते. पण त्यापेक्षा हे अधिक समजते की हेल्मेट घातल्याने मी वाचेन आणि मला इतर जे काय होईल त्याबाबत कायदा व प्रशासन आपले काम चोखपणे करेल ह्याची काहीही गॅरंटी नाही.
माझाही हेल्मेट सक्तीला विरोध
माझाही हेल्मेट सक्तीला विरोध आहे.
कारण माझ्यामते सक्ती करण्याची वेळच येऊ नये. हेल्मेट हे घातलेच पाहीजे. सीटबेल्टस लावलेच पाहीजेत.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
मी स्कुटी आल्याबरोबर पहिली खरेदी हेल्मेटची केली होती.. काही अवघड जात नाही. सवयीचा भाग असतो. सेफ्टी मेझर्सची सवय करून घेतलीच पाहीजे. त्यात सक्ती करण्याची वेळ का यावी?
बेफी, कर्वे रस्ता, ज.म.
बेफी, कर्वे रस्ता, ज.म. रस्ता, फर्गसन रस्ता, पौड रस्ता, सिंहगड रस्ता, शास्त्री रस्ता, एम जी रस्ता, गणेशखिंड रस्ता, औध/ बाणेर/ पाषाण रस्ते, रावेत आणि वाकड कडील रस्ते, आळंदी रस्ता, होळकर पूल आणि डेक्कन कॉलेज रस्ता, सातारा रस्ता, जुना मुंबई-पुणे रस्ता, नगर रस्ता, बंड गार्डन रस्ता, सेनापती बापट रस्ता, law कॉलेज रस्ता, अगदी बाजीराव आणि शिवाजी रस्त्याचा काही भाग इ. ठिकाणी तुम्हाला खरचं वाटतंय की दिवसाचे आठही प्रहर दर १० फुटावर पाय टेकवावे लागतात?
माझ्या सख्ख्या मैत्रीणीला
माझ्या सख्ख्या मैत्रीणीला घरापासून कोपर्यापर्यंत जाताना स्कूटी स्किड होऊन डोक्याला भयंकर मार बसला व आयुष्यभराचा फटका बसला
हेल्मेट घालाच! वेळ सांगून येत नाही!
आशुचॅम्प मस्त पोस्ट! मी ६-७
आशुचॅम्प मस्त पोस्ट!
मी ६-७ वर्ष पुण्यात, रोज न चुकता हेल्मेट घालून गाडी चालवली आहे. काहीही प्रॉब्लेम नाही. हे ९८-२००४ चं बोलतेय. तेव्हा रस्त्यावर आताच्या तुलनेने जरा कमी वाहने असायची. तरीही बस, टेम्पोच्या बाजुने जाताना हेल्मेट आवश्यक आहे असं कळायचं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दक्षे, रास्ता पेठ, गंज पेठ भागात २-३ दुकाने आहेत तिथे वाटेल त्या प्रकारची हेल्मेट मिळ्तात. बघ एकदा जाउन.
हेल्मेट सक्ती हवीच. सुरक्षा
हेल्मेट सक्ती हवीच. सुरक्षा प्रथम ! हेल्मेटला विरोध पाहुन आश्चर्य वाटतय. आणि सक्ती का करावी लागली असावी ते ही समजतय.
तंबाखू सेवनाची सक्ती नाही ना! ती स्वेच्छा आहे. इथे हेल्मेट वापरण्याची सक्ती आहे ना!>>>> तुलना चुकीची आहे. गाडी वापरण्याची सक्ती नाहीये ना ?
<<खरा मुद्दा हा आहे की ह्या
<<खरा मुद्दा हा आहे की ह्या भारत सरकारला हेल्मेट सक्ती करायचा अधिकार आहे का?>>
गंमत वाटली हे वाचून. राज्यघटनेच्या आधीन राहून कुठलाही कायदा बनवण्याचा अधिकार संसदेला किंवा विधानसभांना आहे हे सामान्यज्ञान आहे.
सरकारला विविध एजन्सीद्वारे (म्हणजे पोलीस वगैरे) त्या कायद्यांची अंमलबजावणी करावी लागते. त्यासाठी लागेल ते नियम सरकार बनवू शकते. नागरिकांना ते कायदे पाळावे लागतात.
हेल्मेट घातले नाही तर त्या
हेल्मेट घातले नाही तर त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते.
>>>>>> सर्वात आवडलेला आणि विचार करायला लावणारा मुद्दा +1
गंमत वाटली हे वाचून.
गंमत वाटली हे वाचून. राज्यघटनेच्या आधीन राहून कुठलाही कायदा बनवण्याचा अधिकार संसदेला किंवा विधानसभांना आहे हे सामान्यज्ञान आहे.>>>>>@ शरद, माझा प्रतिसाद नीट वाचला असता तर असले बालिश उत्तर दिले नसते.
मी सरकारला नैतिक अधिकार आहे का असे विचारले होते.
तसेही, कुठलाही कायदा वगैरे बनवायचा अधिकार सरकारला नाही. उद्या सर्वांनी रोज भात किंवा कुठलाही पदार्थ खाल्लाच पाहीजे असा सरकार नी कायदा केला तर तो बेकायदेशीर असेल.
गुजरात ने आत्ता जो मतदान सक्तीचा कायदा केला तो पण न्यायालयात टीकणार नाही.
एका नागरीका मुळे , समाजाला किंवा दुसर्या नागरीकांना त्रास होणार असेल तर सरकार बंधन आणु शकते. पण तुला डायबेटीस आहे म्हणुन तू साखर खायचीच नाही असा कायदा सरकार आणू शकत नाही.
जे सरकार, रस्ते नीट बनवत नाही, वाहतुकीचे नियम न पाळणार्यांना शिक्षा करत नाही, उपचाराचा खर्च करत नाही. त्या सरकारला असले कायदे बनवायचा अधिकार नाही.
शिक्षणाच्या हक्काचा कायदा केला पण सगळ्या मुलांनी शाळेत जायलाच पाहीजे असा कायदा केला नाही.
तसेच ह्या प्रकारात तुम्ही शिफारस करा, पण सक्ती नाहीच
जे सरकार, रस्ते नीट बनवत
जे सरकार, रस्ते नीट बनवत नाही, वाहतुकीचे नियम न पाळणार्यांना शिक्षा करत नाही, उपचाराचा खर्च करत नाही. त्या सरकारला असले कायदे बनवायचा अधिकार नाही.
बरोबर आहे.
मुद्दा सक्तीचा आहे हेल्मेटच्या उपयुक्ततेचा नाही हे कितीदा खरडलय बाबानो
ज्याला घालायचे आहे हेल्मेट त्याने चार चार घालून फिरावे हेल्मेटसक्तीला अनुमोदन कशासाठी ?
एवढी सक्ती करायची आहे तर फ्री वाटा म्हणावे दुचकीस्वारांना , हो पण ते शक्य नसणार आपल्याकडे झोपडपट्या पुनर्वसनासाठी, नेत्याच्या गाड्यासाठी, मंत्र्यांच्या घरदुरुस्तीसाठी जितका सहज निधी उपल्ब्ध होतो तो हेल्मेट वाटायला थोडीच उपलब्ध होणार आहे.
राज्यातला सरकारचा तमाशा संपला असेल तर अशा गोष्टीत रस घ्यायला मेल्या नेत्यांना वेळ मिळेल अन्यथा ये रे माझ्या मागल्या आहेच .......... कुठे गेले पुण्यातून निवडून दिलेले आमदार का आता ५ वर्षांनी तोंड दाखवणार
सक्तीला विरोध असण्याशी सहमत
सक्तीला विरोध असण्याशी सहमत ...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण पर्सनली मी वापरते आणि वर बर्याच जणांनी सांगीतलेल्या त्रासांपैकी एकही त्रास हेल्मेट मुळे मलातरी झाला नाही ..
भूतकाळात दोन तीन असे काही
भूतकाळात दोन तीन असे काही विचित्र अपघात माझ्या डोळ्यासमोर घडले की तेंव्हापासून हेल्मेट हे घातलेच पाहिजे असे माझे मत ठाम झाले. सर सलामत तो.......................................
बाकी नियमांबाबतही आग्रही राहा पण हेल्मेट वापराच. जिथे वाहतूकीच्या नियमांना बासनात गुंडाळले जाते तिथे तर हवेच हवे. शेवटी रस्त्यावर कोण कसे वागेल यावर आपले फारसे नियंत्रण नसते. योग्य मापाचे/आकाराचे हेल्मेट घेतले तर तसा काही कायमस्वरूपी त्रास होत नाही. प्रथमच वापरत असाल तर सुरुवातीचा एखाद आठवडा मान थोडी दुखू शकते. अन्यथा काही त्रास व्हायला नको खरेतर. एकदा हेल्मेट अंगवळणी पडल्यावर एखाद्या वेळी बिनाहेल्मेटचे रस्त्यावर आले तर (दुचाकीवरून!) कळते की हेल्मेट आपल्याला अपघातापासूनच नाही तर धूळ, लहान कीटक, थंड/उष्ण वारा यांच्यापासून किती कम्फर्ट देते.
अजून सगळी पाने चर्चा वाचली नाही. बीजभाषणातला आणि पहिल्या पानावरचा नकारात्मक सूर वाचून राहावले नाही.
मी सरकारला नैतिक अधिकार आहे
मी सरकारला नैतिक अधिकार आहे का असे विचारले होते.>>
"राज्यघटनेच्या आधीन राहून" या शब्दांमध्ये बर्याच प्रमाणात नैतिकतासुद्धा येते. तसे पाहता कायदा आणि नैतिकता यांचा संबंध असलाच पाहिजे असे नाही.
राज्यघटनेच्या विरोधातील कुठलाही कायदा कधी ना कधी बरखास्त होतोच.
राज्यघटनेच्या विरोधातील
राज्यघटनेच्या विरोधातील कुठलाही कायदा कधी ना कधी बरखास्त होतोच. >>>>>> मी ही हा कायदा बरखास्त करायला पाहीजे ह्या मताचा आहे.
त्या ऐवजी रस्त्यावर खड्डे दिसले तर तिथल्या पालिकेच्या, सरकारच्या अधिकार्याला फाशी देणे, पोलिस चौकीच्या हद्दीत गुंडगीरी, खंडणीखोरी होत असेल तर इन्स्पेकटर ला जन्मठेप. कोर्टात केस चा निकाल लवकर लावला नाही तर न्यायाधीश आणि वकीलांना जन्मठेप असे कायदे करावेत.
"राज्यघटनेच्या आधीन राहून" या शब्दांमध्ये बर्याच प्रमाणात नैतिकतासुद्धा येते. >>>>> राज्यघटना करणार्यांना जर कल्पना असती की हे बिन कामाचे सरकार असले कायदे करणार आहे तर त्यांनी लिहुन ठेवले असते की हेल्मेट सक्ती करु नये.
आजच्या सकाळमधली बातमी. आणून
आजच्या सकाळमधली बातमी.
आणून द्या डोक्याच्या मापाचे हेल्मेट!
पुणे - पोलिसांनो, हेल्मेटसक्ती करताय खरी... पण माझ्या डोक्याच्या मापाचे हेल्मेटच मिळत नाही, तर करणार काय? अख्ख पुणं धुंडाळलं, मिलिटरीच्या कॅंटीनमध्ये जाऊन पाहिलं.. पण व्यर्थ... आता ही सक्ती आम्ही कशी पाळायची सांगा?... उपशिक्षणाधिकारी किशोर पवार यांना भेडसावलेला हा प्रश्न आहे.
पवार हे जुन्या जिल्हा परिषद इमारतीत माध्यमिक विभागात उपशिक्षणाधिकारी आहेत. हेल्मेट डोक्यात बसत नाही, हे सांगताना रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीवरील लोकांना थांबवून हेल्मेट बसत नसल्याचे सिद्ध करून दाखवितात. "आमचं डोकं मोठं, तिथं हेल्मेट तरी काय करणार‘, असे स्वत:विषयी उपहासाने बोलतात...
पवार म्हणतात, ‘लष्करी भागात हेल्मेटसक्ती केली तेव्हा जाणे-येणे अडचणीचे झाले. मग दोन वर्षांपूर्वी वाहतूक नियंत्रण शाखेच्या तत्कालीन उपायुक्तांकडे धाव घेऊन त्यांना सवलतीसाठी विनंती केली. पण त्यांचाही विश्वास बसेना. त्यांनी स्वत: काही पोलिसांची हेल्मेट मागवून तपासून पाहिले. मग त्यांचा विश्वास बसला.‘‘
‘दुचाकीवरून जाताना अनेक पोलिस अडवतात. हेल्मेट विचारतात. मापाचे मिळत नाही म्हटले की हसतात. मग मीच त्यांना म्हणतो, हे पैसे घ्या आणि माझ्या मापाचे शिरस्त्राण आणून द्या. कधी त्यांना पोलिस उपायुक्तांनी सूट मिळण्यासाठी दिलेले पत्र दाखवावे लागते तेव्हा सुटका होते. पुण्यात फिरून पाहिले, लष्कराच्या कॅंटीनमध्ये गेलो; पण माझ्या डोक्याच्या मापाचे एकही हेल्मेट मिळाले नाही. आता तुम्हीच सांगा काय करायचे?...‘
हेल्मेट सक्ती नकोच कारण शहरात
हेल्मेट सक्ती नकोच कारण शहरात गाडी चालवतान जर हेल्मेट घातले असेल तर आजुबाजुचे निट दिसत नाही. फार वळुन पहावे लागते.किंवा वारंवार आरश्यात बघावे लागते. तेच हेल्मेट नसल्यास सहज नजर फिरवुन दिसते. त्यामुळे हेल्मेट घालणे किचकट आहे. गांवाबाहेर ठिक आहे.
आपापल्या मापाची टोपरी शिवून
आपापल्या मापाची टोपरी शिवून घ्या म्हणजे कापडात बसवलेलं हेल्मेट नीट डोस्क्यावर नाडीने बांधता येईल. मान फिरवल्यावर गळ्याशी बांधलेलं असल्याने हेल्मेटवालं टोपरंही फिरेल. बायकांची आणि पुरुषांची अशी डिझाईन्सही करता येतील, फॅशनी करता येतील. कुंचीसारखं पाठीवर कापड असल्यास अजूनच ट्रेन्डी दिसेल
:कैच्याकै:
अगदी अगदी! आणि पाळलेले लहानसे
अगदी अगदी! आणि पाळलेले लहानसे पॉमेरियन वगैरे पुढे पायात किंवा मागच्या सीटवर बसवून न्यायचे असले तर त्याच्यासाठीही ते उपयुक्त ठरेल.
Pages