या प्रकारात मापं देणं कठिण आहे आणि खरंतर गरजही नाही. थोडं इकडं तिकडं झाल्यानं काही फरक पडत नाही.
मी जरी 'स्ट्यू' असं लिहिलं असलं तरी ते केरळी नाव नाही. केरळमध्ये त्या पदार्थाला 'इश्टु' म्हणतात. अर्थात तो 'स्ट्यू' चाच अपभ्रंश आहे हे उघड आहे.
कडला करी :
भिजवलेले हरभरे, कांदा बारीक चिरून ( ऑप्शनल), कढिपत्ता, गरम मसाला (मी बादशहाचे गरम मसाला आणि नबाबी मटण मसाला वापरले आहेत.), तेल, मोहरी, जिरे, हिंग, धणे-जीरे पूड, हळद, तिखट, मीठ.
कडला करी डायरेक्ट कुकरमध्ये केलेली चांगली. नेहमीपेक्षा मोठ्या कुकरमध्ये करावी कारण जरा जास्त पातळ करावी लागते. नेहमीच्या हरभर्याच्या आमटीच्या दुप्पट पाणी घालून हरभरे अगदी पूर्ण शिजतील इतक्या वेळ शिजवावी.
पोटॅटो स्ट्यू :
बटाटे, कांदे, आलं, हिरव्या मिरच्या, कढिपत्ता, नारळाचे दूध, मीठ. स्ट्यू करता जरा जास्तच आलं घ्यावं. त्याची चव स्ट्यूमध्ये मस्त उतरते.
बटाटे सोलून त्याचे बारीक क्यूब्ज कापावेत. कांद्याचेही त्याच आकाराचे तुकडे कापावेत. हिरव्या मिरच्या अगदी बारीक कापाव्यात. आलंही स्वच्छ धुऊन अगदी बारीक कापावे. किसलेलं, वाटलेलं आलं नको. ती नेमकी चव येत नाही. नारळाचे दूध काढून ठेवावे.
पुट्टु :
पुट्टु पोडी ( तांदळाचे पीठ), काळ्या मिरीची पूड, खोवलेलं खोबरं, मीठ.
दाक्षिणात्य दुकानांतून पुट्टु पोडी नावाची पावडर मिळते. मुंबईत माटुंग्याला मिळते. पुट्टु पोडी म्हणजे तांदळाचे रवाळ पीठ. माटुंग्याला पांढर्या तांदळाची अथवा केरळच्या लाल तांदळाची अशी दोन्ही प्रकारची पुट्टु पोडी मिळते. ती नसेल तर साधे तांदळाचे पीठ वापरले तरीही चालेल.
माझ्याकडची पुट्टु पोडी संपली होती. म्हणून तांदळाच्या पीठाची शोधाशोध करताना इडलीचा रवा आणि लाल ब्रोकन राईस मिळाले ते वापरले. ब्रोकन राईस म्हणजे गव्हाच्या लापशीसारखे जाड असे तांदळाचे तुकडे. हा ब्रोकन राईस मी काहीवेळाकरता (१० मिनिटे) भिजत ठेवला. जेमतेमच पाणी घातले कारण पुट्टुचे पीठ भिजवायला अगदी कमी पाणी लागते.
कडला करी :
कुकर गॅसवर ठेऊन गॅस सुरू करा. तेल घालून ते गरम झाल्यावर मोहरी-जिरे आणि मग हिंग घाला. त्यात (वापरणार असलात तर) बारीक चिरलेला कांदा घालून जरा परता. मग भिजलेले हरभरे, कढिपत्ता, हळद, तिखट, धणेजिरे पूड, मीठ वगैरे घालून एक मिनिट परतून मग पाणी घाला. त्यात मग मसाला/ले घालून, जरा ढवळून मग कुकरचे झाकण बंद करा. मध्यम आंचेवर कडला करी शिजू द्या. चांगल्या ८-१० शिट्या करा म्हणजे हरभरे व्यवस्थित शिजून मऊ होतील.
कडला करी मध्ये आलं किंवा लसूण वापरण्याची गरज नाही. आवडत असेल तर वापरायला हरकत नाही. बाकी इतर पदार्थ करण्याच्या निदान एक तास आधी कडला करी करत ठेवावी. ती व्हायलाही जास्त वेळ लागेल आणि झाल्यावर वाफ निघून मग कुकर उघडला जाण्यासही वेळ लागेल हे लक्षात ठेवावे.
पोटॅटो स्ट्यू :
एका भांड्यात स्ट्यूचे सर्व जिन्नस एकत्र करा. बटाटे, कांदे, मिरच्या, आलं, कढिपत्ता आणि मीठ एकत्र करून त्यात हे सर्व बुडतील इतके पाणी घाला. त्यावरही आणखी दोन कप पाणी जास्त घाला. मग हे भांडं गॅसवर ठेऊन गॅस मध्यम ठेऊन शिजू द्यात. झाकण ठेऊ नका. ठेवलेच तर वाफ जायला थोडी जागा ठेवा कारण नाहीतर पाणी उकळून बाहेर येतं. अर्ध्यातासात बटाटे अगदी छान शिजतील. ते चमच्याने थोडे थोडे दाबून फुटू द्यात. मग त्यात हवे तेवढे नारळाचे दूध घालून व्यवस्थित ढवळून एक उकळी येऊ द्या.
शिजलेले स्ट्यू - नारळाचे दूध घालण्याआधी:
पुट्टु :
पोटॅटो स्ट्यू करत ठेवला की पुट्टु कडे वळा.
सगळे जिन्नस एका परातीत घेऊन त्यात अगदी थोडे थोडे असे ५-६ चमचे पाणी घेऊन एकत्र करा.
पाणी इतकं कमी घालायचं की पीठ सुटं सुटंच राहिलं पाहिजे.
पुट्टु शिजवण्यासाठी पूर्वी बांबूचा वापर केला जाई. आता स्टील अथवा पितळेची सिलिंडर्स मिळतात. हे पुट्टु मेकर. माटुंग्याहूनच आणलंय.
पुट्टुच्या मूळ रेसिपीमध्ये खवलेलं खोबरं तांदळाच्य पीठात एकत्र करत नाहीत. सिलिंडरमध्ये भरताना थोडं खोबरं- बरंच तांदळाचं मिरीपावडर आणि मीठ घालून भिजवलेलं पीठ - पुन्हा थोडं खोबरं - पुन्हा तांदळाचं पीठ - शेवटी पुन्हा खोबरं अशा क्रमाने भरतात. पण हे सगळं आधीच एकत्रं करायचं ही माझी अॅडिशन आहे.
या खालच्या भांड्यात पाणी घालून गॅसवर ठेवायचे. मग या मधल्या सिलिंडमध्ये तयार केलेली पुट्टुची पावडर चमच्याने सुट्टी सुट्टीच भरायची. दाबून अजिबात भरू नका.
हे सिलिंडर मग त्या भांड्यावर लावून त्यावर झाकण लावायचे. सिलिंडरमध्ये खालच्या बाजूला जाळी असल्यामुळे भांड्यातील पाण्याची वाफ वरच्या सिलिंडरमध्ये येते आणि त्या वाफेवर पुट्टु शिजतं. झाकणालाही वाफ जाण्यासाठी भोकं असतात. शिजल्यावर पुट्टु एकसंध निघतं. ते सुरीनं कापून मग वाढायचं.
माझ्या ब्रोकन राईसमुळे तयार झालेलं पुट्टु अगदी पूर्ण एकसंध राहिलं नाही. कदाचित पाणीही जरा कमी पडलं असण्याची शक्यता आहे.
पुट्टु मेकर नसेल तर मोदक पात्रात जाळीवर छोट्या छोट्या वाट्यांतून पुट्टुचं पीठ भरून वाफवता येईल. किंवा थोडं पाणी जास्त घालून हातानेच मुटके वळून ते मोदक पात्रातून अथवा कुकर ला शिटी न लावता वाफवता येतील.
गरमागरम पुट्टु, कडला करी आणि स्ट्यू तयार आहे.
टीपा :
एखाद्या दिवशी ब्रंचकरता हा प्रकार छान होतो.
आवडत असल्यास कडला करी आणि स्ट्यू शिजल्यावर वरून खोबरेल तेल घालू शकता.
हे स्ट्यू इतर काही भाज्या वापरूनही करता येतं उदा. गाजर, फ्लॉवर, फरसबी इ.
हे स्ट्यू इडली, डोसे, अप्पम बरोबरही अप्रतिम लागतं.
नुसतं सूप म्हणून प्यायलाही छान लागतं.
वाचनखुणा बघून वाटले कूकरी शो
वाचनखुणा बघून वाटले कूकरी शो सारखे शेवटाला पुन्हा एकदा जिन्नसांचे प्रमाण रीपीट केलेय![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हे खातात कसं? >> हाच प्रश्न मलाही पडलेला, उत्तरही प्रतिसादातच मिळाले. याआधी कधी हे खाल्ले नव्हते, पण आता दिसले तर ट्राय केले जाईल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मामी, तुस्सी ग्रेट हो!
मामी, तुस्सी ग्रेट हो!
काय सुंदर दिसत आहेत तिन्ही
काय सुंदर दिसत आहेत तिन्ही पदार्थ.. खूपच छान.
सगळे पदार्थ शेपरेट शेपरेट करून बघण्यात येतील.
एकत्र करायला हरकत नाही, पण तीन प्रयोग एकदम करायचे तर नवरा 'बकरे की जान लोगे क्या?' असं विचारेल.
मामी मस्त रेसिपी. केरळी
मामी मस्त रेसिपी. केरळी मित्राकडे पुट्टु चिकन करी बरोबर खाल्ले होते, खूप आवडलेले. दुबई ला गेले असताना पण तिथे ही केरळी कूक ने चिकन बरोबरच दिले होते त्यामुळे पुट्टु हा प्रकार नॉन वेज बरोबरच खातात असे वाटले होते. वरची रेसिपी आवडली. करून बघेन नक्की.
पहिल्यांदाच ही नावं कळली आणि
पहिल्यांदाच ही नावं कळली आणि लगेच रेसिपीसुध्दा! कडला करी करते आधी.
नवरा 'बकरे की जान लोगे क्या?'
नवरा 'बकरे की जान लोगे क्या?' असं विचारेल. >>>>
सगळे पदार्थ शेपरेट शेपरेट करून बघण्यात येतील. >>> शेपरेट नको करूस. नुसतं पुट्टु खाववणार नाही. कडला करी करच. स्ट्यू वेगळं कर. ते अप्पम नाहीतर डोसे नाहीतर इडली बरोबर करून खा.
मी जरी 'स्ट्यू' असं
मी जरी 'स्ट्यू' असं लिहिलं असलं तरी ते केरळी नाव नाही. केरळमध्ये त्या पदार्थाला 'इश्टु' म्हणतात. अर्थात तो 'स्ट्यू' चाच अपभ्रंश आहे हे उघड आहे.
(आधी लिहायचं राहिलंच. आता हे वरही अॅड केलं आहे.)
ओके!! धन्यू. पुट्टू करता
ओके!! धन्यू.
पुट्टू करता येईल असं साधन माझ्याकडे आहे, म्हणून 'करून बघेन' असं म्हणण्याचं धाडस करतेय.
आजच इथे पुट्टुचं पीठ पाहिलं.
आजच इथे पुट्टुचं पीठ पाहिलं. कॉर्न पुट्टु आणि रागी पुट्टु असे दोन टाईप होते.
कॉर्न पुट्टु आणि रागी पुट्टु
कॉर्न पुट्टु आणि रागी पुट्टु >>>
पण पुट्टु तांदळाच्या पीठाचं अस्तं ना?
ण पुट्टु तांदळाच्या पीठाचं
ण पुट्टु तांदळाच्या पीठाचं अस्तं ना?<<< बहुतांश करून तांदळाच्यापिठाचंच पण रागी पुट्टू पण हल्ली "न्युट्रिशन"मुळे बरंच फेमस झालंञ. कॉर्न प्पुट्टू मी तरी इकडं पाहिलं नाहीये.
मस्त वाटतेय प्रकरण. पुट्टु
मस्त वाटतेय प्रकरण. पुट्टु मेकर बद्दल वाचलेलं पण पाहिला नव्हता कधी.
माझी केरळी शेजारीण हे पुट्टू प्रकरण चकलीच्या सो-याला शेवाची जाळी लावुन करायची ते आता वरचे फोटो पाहुन आठवले. ती जे काही करायची त्याचे नाव इडलीआप्पम की असे काहीतरी होते असे मेमरीत सेव झालेय.. ते चुकीचेही असु शकते, कारण साऊथ इंडीयन लोक्स खाणार म्हणजे पदार्थाचे नाव इडली पासुनच सुरू होणार असा माझा एक (गैर्)समज....
.. मी तिला करताना पाहिलेले पण खाल्ले कधीच नाही.
आता नेटावर इडलीअप्पम पाहिले तर ते आपल्या शिरवाळ्यासारखे दिसताहेत. म्हणजे मी इडलीआप्पम आणि पुट्टू ह्या दोन्ही गोष्टी एकाच रकान्यान सेव केल्यात माझ्या मेमरीत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता करुन पाहिन आणि खाईनही.
पुट्टू आणि इडीअप्पम वेगळे।आहे
पुट्टू आणि इडीअप्पम वेगळे।आहे हो
वा मामी मी येते तुझ्याकडेच
वा मामी मी येते तुझ्याकडेच खायला. एकदम हटके आहे रेसिपी.
साधना, इडिअप्पम वेगळं आणि
साधना, इडिअप्पम वेगळं आणि पुट्टु वेगळं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझं नारळाशी फारसं जमत नसल्याने असेल)
मला कधीच पुट्टू आवडलं नाही
पोटॅटो स्ट्यू करून पाहीन आणि सूप म्हणून पिऊन टाकेन![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
(रच्याकने अतिच अवांतर पण जेवणेच जेवेन होतं तसं पिणेचं काय होतं?)
मावशीला कडला करीआवडते त्यामुळे ती आली की नक्की करणार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पिणेचे पिईन.
पिणेचे पिईन.
जागू ये की गं. नक्की ये. आज
जागू ये की गं. नक्की ये.
आज मी माटुंग्याला या पोड्या घेतल्या.
यापैकी इडिअप्पमच्या पोडीत थोडे यीस्ट घालून २-३ तास ठेवून अप्पम (गोल डोश्यासारखे पण कढईत/ खोलगट तव्यात केल्याने मध्ये गुबगुबीत असलेले असे मऊ मऊ) करता येतात.
यीस्ट ऑलरेडी घालून तयार असलेली अशी अप्पमकरता पोडीही होती.
काल म्हंटलं करून बघू.. पण
काल म्हंटलं करून बघू.. पण करताना किती कॉम्प्रमाईजेस करावे लागले ते एक मीच जाणे.
आमच्याकडे नारळ पिकत नाहीत. अगदी समुद्रकिनारा असूनही. क्वचित कधीतरी दुकानात नारळ दिसतो. ( काल वट्ट साडेसातशे रुपयांना एक नारळ होता. समजा आणला असता तरी फोडू कश्याने, फोडला तर खवणू कश्याने आणि खवणला तरी एवढ्या खोबर्याचे करू काय ? ) नारळाला पर्याय म्हणून मी टिनमधले स्वीट कॉर्न वापरले. थोडे वाटून घेतले.
ते पुट्टू मेकर असायची शक्यता नव्हतीच. इथे बांबू पण उगवत नाही. म्हणून फॉईल वापरली. एकंदर चवीला बरे जमले.
काळे चणे नाहीच मिळणार पण त्याला पर्याय म्हणून ब्लॅक बीन्स वापरले.
झाला प्रकार चवीला चांगला झाला.. पण...
याला इतर कोण, मामीसुद्धा पुट्टू म्हणणार नाही... म्हणून चाड देशातल्या, सोतोका प्रांतातली, मुर्वीउरीगांझोकी अशी पारंपारीक डिश म्हणजे हिच, असे मी का म्हणू नये![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बापरे दिनेशदा, किती ती खटपट!
बापरे दिनेशदा, किती ती खटपट! दिसतेय तर छान की! आणि नावही झक्कास आहे.
दिनेश मलाही करुन पाहाय्चा
दिनेश![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
मलाही करुन पाहाय्चा मोह होतोय. ती पोडी एकदाची मिळू दे हातात. मग मी आहे आणि घरचे खाणारे आहेत..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
साधना ....
साधना ....![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
जबरी फोटो आलेत मामी. मी काही
जबरी फोटो आलेत मामी. मी काही हे अक्रेन अस वाटत नाही. त्या ऐवजी आप्पम करेन.
रेसिपीज् छान .. फोटोही छान
रेसिपीज् छान .. फोटोही छान ..
खटपट बरीच आहे ..
>> आम्ही नारळाची करवंटी कुकरच्या शिट्टीच्या जागी लावून त्यात पुट्टं करतो. किमान उपकरणे धोरण
"हे कसं काय बुवा" ह्यावर खूप विचार करते आहे ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मामी त्या पॅकेटवरचं
मामी
त्या पॅकेटवरचं .............नीरपरा चेम्बा पुट्टु पोडी ..... हे जरा मोठ्यांदा म्हणून बघितलं तर.....:खोखो:
आणि मेहमूदचं मुत्तकोडी कव्वाडी हडा ..............हे गाणंच आठवतंय!
दिनेश........सोतोका प्रांतातली, मुर्वीउरीगांझोकी अशी पारंपारीक डिश म्हणजे हिच, असे मी का म्हणू नये स्मित>>>>>>>>![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
मामी पुट्टूची रेसिपी मी एकदा
मामी पुट्टूची रेसिपी मी एकदा सह्याद्री वाहीनीवर पण बघितली होती
झकास आणी स्टेप बाय स्टेप
झकास आणी स्टेप बाय स्टेप भन्नाट कृती. >>++११
Pages