हितगुज दिवाळी अंक, अनुभव, अपेक्षा, सूचना

Submitted by श्यामली on 9 November, 2011 - 11:57

हितगुज दिवाळी अंक २०११ वर दिलेल्या अभिप्रायांसाठी सगळ्यांना मन:पूर्वक धन्यवाद.

यंदाचा हितगुजचा हा बारावा अंक. संपादक आयडीने एक धन्यवादाची पोस्ट टाकून दिवाळी अंक हे प्रकरण माझ्यापुरतं संपवता आलं असतं . पण मायबोलीशी असणारं नातं हे त्यातून असं सहज बाहेर पडू देत नाही. म्हणून हा पोस्ट प्रपंच.

आमच्याकडे आलेलं उत्तम साहित्य बघून आपण (मायबोलीकर) अजून चांगला अंक देऊ शकतो असं जाणवल. त्यासाठी जुन्या जाणत्यांच मार्गदर्शन आवश्यक आहेच, हे ही जाणवलं. नवीन मंडळींच्या नव्या कल्पनांना जुन्या जाणत्यांच्या सूचना, सल्ले याची साथ असेल तर पुढे येणारे अंक अजून चांगले होतील यात शंका नाही.

आम्हाला आलेल्या अडचणी त्यातून शोधलेली वाट, हे सगळं फक्त मी इथे लिहिण्यात काहीच हशिल नाही. यंदाच्या संपादक मंडळातल्या सगळ्यांनीच त्यांचे त्यांचे अनुभव इथे लिहावे, सुधारणा करता येण्यासारख्या असतील त्याही इथे लिहाव्या.

पुढील अंकांच्या सुधारणेसाठी काय करायला हवं, हे आजवरच्या सगळ्या संपादक मंडळातील मंडळींनी पण इथे लिहावं.

मला सुचलेले काही मुद्दे.
१) अंकाच काम अजून जरा लवकर सुरु करायला हवं
२) तांत्रिक बाजू सांभाळणारी एक स्थायी समिती आपल्याकडे असावी.
३) टेस्टिंगसाठी मंडळाच्या बाहेरची एक समिती असावी.
४) अंकासाठी जनसंपर्क विभाग वेगळा असावा (किमान ३-४ लोक तरी यात असावेत)
५) मुद्रित शोधनासाठी तांत्रिक उपलब्धता असेल तर वेळ आणि श्रम कमी लागतील
६) अंकाच प्रकाशन ऐन दिवाळीत न करता जरा आधीच करावं.

फेसबुकवर आलेली एक विचारणा अशी की, अंक बाजारात केंव्हा येणार (गो, अ‍ॅडमिन Happy )
माध्यम प्रायोजक हितगुज दिवाळी अंकासाठी काम करणार का? Happy

सध्या तरी एवढच.. सुचेल तसं इथे लिहिन.
अंक अजून चांगला कसा होईल केवळ एवढ्याचसाठी इथे लिहावं . अवांतर वाद-विवादांसाठी इतर अनेक बातमी फलक आहेत.

विषय: 

कोणीतरी लिहिलेला स्कोअर सेटल करण्याचा मुद्दा पण मला महत्त्वाचा वाटला.
पण हा मुद्दा संपादकांनी स्कोअर सेटल करणे यापेक्षा साहित्य देणार्‍यांनी "अमूक एकजण संपादक मंडळात आहे तेव्हा मी साहित्य देणार नाही " असा जास्त असावा.<<<
प्लीजच.. साहित्य न देणार्‍यांना अश्या प्रकारे लेबलं लावणं हे दुर्दैवी आहे.

दरवर्षी कुणानाकुणा कंपूमधले लोक संपादक मंडळावर असतातच की. म्हणजे त्या कंपूविरोधातले सगळे लिखाण देत नाहीत असे धरायचे का? हे का ही ही आहे.

काहीही स्पेसिफिक कारण नसताना द्यावेसे नाही वाटले.
ऑनलाइन दिवाळी अंकात लिखाण देणे बंद केले आहे.
योग्य वेळेत काहीही सुचले नाही

ही ऑब्व्हियस कारणे सोडून ही असली विचित्र कारणे शोधून ब्लेमगेम कशासाठी?

मामीच्या सज्जेशनला (प्रत्येक लेखाचा बीबी/ किंवा सगळ्याचा मिळून एक मूळ मायबोलीवर बीबी) जोरदार अनुमोदन. माझं दिवाळीमध्ये मायबोलीवर येणं झाल्यावर आवर्जून अंक वाचन झालं. पण नंतर तो नजरेआड गेल्याने जाणं झालं नाही. मामीसारखा 'पुरेसा (मायबोलीइतका) वाचकवर्ग मिळत नाही' म्हणून दिअं लेखन करत नाही असा विचार होऊ लागलाय ही वॉर्निंग बेल आहे समजून मायबोली व्यवस्थापकांनी विचार करावा.
पुढील मते वैयक्तिक (सगळी मतं वैयक्तिकच असतात, पण असं लिहायची पद्धत आहे ... Happy )
१. दिवाळी अंक चित्र चांगली आहेत, सजावट छान आहे, टेक आहे, ऑन्लाइन अंकाला साजेसा आहे, फीचर छान वापरल्येत इ. असून कंटेंट नसेल तो वाचला जात नसेल, हिट्स मिळत नसतील तर काय फायदा? अंकावर जाहीरातीपण नसतात, त्यामुळे मायबोलीला आर्थिक फायदाही होत नसणारच.
२. तो विशेष या डोमेनवर ठेवण्याचं कारण, देखणा करण्यासाठी लागणारी प्रणाली तिकडे असणे, दृपल ची वेगळी वर्जन तिकडे वापरता येणे फक्त हेच आहे का?
३. वरील १ मधील चांगल्या गोष्टी हव्यावाटणे समजू शकतो. मग विशेष डोमेन बरोबर तो सगळाच्या सगळा अंक मायबोलीवर सुद्धा ठेवावा. जसे प्रत्येक कंटेंटचा एक धागा बनवावा. यातून लेखकाला वाचक मिळतील, वाचकांना लेख वाचायची आठवण राहिलं, मायबोलीला उत्पन्न मिळेल आणि देखणा आजच्या युगातला अंक बघायची इच्छा असणाऱ्यांना तो मिळेल. हे सव्यापसव्य फार किचकट असणार नाही असं वाटतंय. या वर्षीच्या अंकाला करणे ही शक्य आहे.
४. टीझर/ जाहिराती या नजरेआड करण्यासाठी असतात.. रादर मेंदू त्याकडे बघतच नाही असं वायरिंग माझं तरी झालय. पण वाढत्या प्रतिसादांची संख्या/ न वाचलेले प्रतिसाद धागा उघडायला प्रचंड इनव्हायटिंग असते. काय चूक काय बरोबर हे कोण ठरवणार पण आहे हे असं आहे.
इतरांचेही असेच असावे असं वरील चर्चेत वाटतंय. विचार करावा.

दिवाळी अंक मला इझी रिडिंगपेक्षा वैचारिक जास्त वाटला. माबोवरचं इतर बरंच साहित्य हे इझी रिडिंग मध्ये येतं म्हणून वाचलं जातं. त्याची क्वालिटी कमी असते असं नाही पण उगाच जड जड शब्द वापरुन लिहिलेलं नसतं.
दि.अं. मात्र क्लासेससाठी होता, मासेससाठी नाही असं वाटलं. मामी यांची कथा व मोहना यांची कथा वाचली दोन्ही आवडल्या. बाकी काही लिंक्स उघडून बंद केल्या. तितक्या मनोरंजक नाही वाटल्या इव्हन खाद्यसंस्कृती वगैरे. माहितीपर, वैचारिक जास्त वाटलं. कदाचित तसं वाटावं हाच हेतू असेल मनोरंजन हा हेतूच नसेल.
लय भारी किंवा दुनियादारीला मिळणारा रिस्पॉन्स आणि एखाद्या विचारप्रवर्तक, फॉर क्लासेसवाल्या चित्रपटाला (उदा. पुणे ५२) मिळणारा रिस्पॉन्स यात फरक असणारच Happy

दिवाळी अंकाचा अपेक्षित वाचक वर्ग कोणता ? जर नेहमीचे मायबोलीकरच वाचणार असतील, म्हणजे तशी अपेक्षा असेल तर, जसे लिखाण मायबोलीवर लोकप्रिय ठरते, तसेच त्या अंकात असावे.
ते विचारपूर्वक, "वैचारीक" का करायचे ?
जर त्यापेक्षा वेगळा वाचकवर्ग अपेक्षित असेल तर तशी प्रसिद्धी व्हायला हवी. ती केवळ मायबोलीवरच न होता इतरत्रही व्हावी.

मागच्या वर्षी माझी अजिबात प्रूफ रीड न केलेली कथा जशीच्या तशी छापलेली पाहून फार वाईट वाटलं होतं>> यावर उत्तर देणं माझी नैतिक जबाबदारी आहे. पण विशेष नोडवर गेल्या वर्षीचा हिदिअं सध्या दिसत नाहीये, त्यामुळे माझा तूर्तास रूमाल.

मामीसारखा 'पुरेसा (मायबोलीइतका) वाचकवर्ग मिळत नाही' म्हणून दिअं लेखन करत नाही असा विचार होऊ लागलाय ही वॉर्निंग बेल आहे समजून मायबोली व्यवस्थापकांनी विचार करावा.>>
अमित, हे नाही पटलं. 'वाचकवर्ग मिळत नाही' हे गृहितक कश्याच्या आधारावर? इतक्या तातडीने 'दिवाळी अंकाला प्रतिसाद नाहीत' या निष्कर्षाला येण्याची घाई कश्यासाठी?
दिवाळी अंक प्रकाशित होऊन आत्ताशी पंधरा दिवस झाले आहेत. इतक्या दिवसांत किती जणांना सगळाच्या सगळा दिवाळी अंक वाचून काढणं जमलं आहे? त्यातल्या किती जणांनी प्रत्येक लेखावर आवर्जून प्रतिसाद लिहिला आहे?
मायबोलीची सभासदसंख्या किती आहे? काही लाखांच्या घरात.. मायबोलीवर एखाद्या यशस्वी लेखाला किती प्रतिसाद येतात? शंभर, दीडशे, अगदी डोक्यावरून पाणी म्हणजे अडीचशे.. सभासदसंख्येच्या तुलनेत प्रतिसादांची संख्या नगण्यच म्हणायला हवी मग. तरीही मायबोली चालू आहे ना?

मायबोली दिवाळी अंक लोक वाचतच नाहीत की अंक वाचतात पण प्रतिसाद देत नाहीत हे पेजहिट्सवरुन वेबमास्टरना कळु शकते. त्यामुळे त्याबद्दल मी लिहीत नाहीये.
पण लेख वाचले जात नसतील तर / प्रतिसाद मिळत नाहीत यात सर्वात मोठ्ठा प्रॉब्लेम व्हिजिबिलिटी हा आहे असे मला वाटतेय.
१ - बहुधा मायबोली उघडताना ( मी) नवीन लेखनाचे पानच उघडले जाते, मुखपृष्ठ नाही. नवीन लेखनाच्या पानावर दिवाळी अंकाची लिंक नाही.
२- यावर्षीचा दिवाळी अंक उघडल्यावर त्यावर काही प्रतिसाद द्यायचा असेल तर पुन्हा लॉगिन करावे लागते. मोबाईलवरुन अंक पाहिल्यास ते फारच बोअरिंग होतेय. ( मी अंक प्रकाशित झाल्यावर मोबाईलवरुन पाहिला, लेखांना प्रतिसाद दिला नाही )
३- मोबाईलवरुन दोन स्क्रॉल्स ने वाचायला यावर्षी त्रास होतोय ( मेन पेज चे स्क्रॉल आणि दुसरे आतल्या लेखाच्या फ्रेमचे स्क्रॉल )
४- दरवर्षीची हि मागणी आहे की एखाद्या लेखाला प्रतिसाद मिळाल्यावर तो लेख नविन लेखनात दिसायला हवा. माबोला विषेश डोमेन मेंटेन करायचे आहे ते ठिक आहे पण त्यामुळे जर अंक लपला जात असेल आणि लोकांना वाचायला आमंत्रण मिळत नसेल तर त्या मुद्द्यावर विचार करुन बदल करणे जरुरी आहे. ( नविन लेखनात नवे प्रतिसाद दिसले की अधिकाधीक लोकांना लेख वाचावासा वाटु शकतो / वाटतो)

>>
१ - बहुधा मायबोली उघडताना ( मी) नवीन लेखनाचे पानच उघडले जाते, मुखपृष्ठ नाही. नवीन लेखनाच्या पानावर दिवाळी अंकाची लिंक नाही>> आहे की. वर टॅब आहे दिवाळी अंक २०१४ चा.

दिवाळी अंक प्रकाशित होऊन आत्ताशी पंधरा दिवस झाले आहेत. इतक्या दिवसांत किती जणांना सगळाच्या सगळा दिवाळी अंक वाचून काढणं जमलं आहे?

>>>>> मी आत्ताच नविन लेखनावर आधीच्या वर्षीचे लेख पाहिले. त्या लेखांना दोन वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्यांच्यावर एक आकडी प्रतिसाद आहेत.

त्यातल्या किती जणांनी प्रत्येक लेखावर आवर्जून प्रतिसाद लिहिला आहे?

>>>> तेच का होत नाही याचा उहापोह सुरू आहे.

मायबोलीची सभासदसंख्या किती आहे? काही लाखांच्या घरात.. मायबोलीवर एखाद्या यशस्वी लेखाला किती प्रतिसाद येतात? शंभर, दीडशे, अगदी डोक्यावरून पाणी म्हणजे अडीचशे.. सभासदसंख्येच्या तुलनेत प्रतिसादांची संख्या नगण्यच म्हणायला हवी मग.

>>>> हो, पण निदान तेवढे तरी प्रतिसाद मिळायला काय हरकत आहे? चला, धरून चालू तेवढे मिळणार नाहीत. मग त्यांच्या निदान ५०%? ते नाही तर २५%? अगदीच नाही तर १०% तरी?

तरीही मायबोली चालू आहे ना?

>>> यातून नक्की काय म्हणायचं आहे ते कळलं नाही. मायबोलीची चालू आहे की नाही याचा दिवाळी अंकातील लेखांना प्रतिसाद मिळतो की नाही या मुद्द्याशी काय संबंध?

आहे की. वर टॅब आहे दिवाळी अंक २०१४ चा. >> ओके सायो, मला दिसले नव्हते. आताही जरा शोधावे लागले Wink पण म्हणजे थोडी आकर्षक लिंक हवी (ज्याकडे सहज लक्ष जाईल) असं वाटतय.

नवीन लेखनाशेजारीच आहे की टॅब.
तुला झगझगीत फाँटमध्ये सतत समोर नाचणारी लिंक हवी आहे असं दिसतंय Proud

हो ना. साधं लिहीलेलं असलं की दुर्लक्ष होतं म्हणायचं Wink
पण खरच मोबाईलवरुन माबो वाचलं तर अशा लिंक्सकडे माझं लक्ष जात नाही.

एनीवे, मी माझ्या सुचना केल्या आहेत. केवळ एक स्टेप जास्तीची घेतल्याने दिवाळी अंकातील लेख मायबोलीच्या नविन लेखनात सहज समाविष्ट करता येतील. इतकंच.

मंजूडी,
वर सावली म्हणतेय तसचं काहीसं म्हणायचं मला. किती प्रतिसाद आले त्यावरून तो लेख कितीजणांनी वाचला हे कळत नाही ते अगदींच मान्य, आपण admin नाही त्यामुळे पेज हिट्स किती झाले याचा दर लेखामागे नंबर मला माहित नाही. आणि एक करता येऊ शकतं म्हणजे पेज व्यू counter दिसेल असा ठेवायचा. हा ठेवण्यामागे/ न ठेवण्यामागे अनेक बंधनं/ कनोटेषण असू शकतात याची पूर्ण जाणीव आहे. हे इलाज tangent होत चाललेत असं पण वाटायला लागलयं. आता किती जणांनी वाचला तो मुद्दा बाजूला जरी ठेवला तरी, नवीन पानावर दिअं लिंक आहे, जी क्लिक करावीशी (मला) वाटत नाही, पण नवीन लेखन वाचा हे क्लिक करावसं वाटतं. त्यावर इतरांनी प्रतिसाद दिला की वर येण्याचा फीचर मुळे बरचसं वाचूनही होतं, पण अंक ताजाताजा असताना वाचला जातो मग मागे पडतो लपतो. अनेक फालतू धागे सतत दिसणं आणि चांगले मागे पडणं, आणि त्यावर प्रतिसाद देऊन ते वर काढायचा प्रयत्न ही शक्य नसणं हे प्रचंड खटकतं.

वर काही लोकांनी म्हटलंय त्याप्रमाणे जे लेखन माबो वर खपत, तेच अंकात घ्यावं याला तितकीच जोरदार असहमती. अंक दर्जेदार/ उत्तमच असला पाहिजे, छोटा असला तरी चालेल. वाहिन्यांवर लोकांना असंच आवडतं म्हणून सासू सून होतं तसं (मलातरी) अंकाबाबत झालेलं आवडणार नाही.

मागच्या वर्षी माझी अजिबात प्रूफ रीड न केलेली कथा जशीच्या तशी छापलेली पाहून फार वाईट वाटलं होतं>> यावर उत्तर देणं माझी नैतिक जबाबदारी आहे. पण विशेष नोडवर गेल्या वर्षीचा हिदिअं सध्या दिसत नाहीये, त्यामुळे माझा तूर्तास रूमाल.>>>

हितगुज दिवाळी अंक २०१३ च्या कथा विभागातली नंदिनीची 'वादळ' ही कथा ही 'अजिबात प्रूफ रीड न केलेली' नव्हती. मायबोलीवरील तीन दिग्गज मुशोकारांकडून कथा तपासून घेतलेली होती. आणि त्यातल्या सुधारणा लेखिकेला ईमेल पाठवून कळवलेल्याही होत्या. दिवाळी अंक प्रकाशित झाला तरी बरीच कामं पडद्याआड चालूच असतात. वाचकांनी निदर्शनास आणल्यावर तातडीने कथेत बदल केलेले होते. त्याबद्दल नंदिनीने कथेखालच्या प्रतिसादांमध्ये संपादकांचे आभारही मानलेले होते. तरीही, एका वर्षानंतर पुन्हा हा विषय छेडण्याचे प्रयोजन समजले नाही. असो!

वेगळा दिवाळी अंक काढण्या पेक्षा किंवा त्या सोबतच एखाद्या प्रचलित प्रसिद्ध आणि चांगल्या गुणवत्तेच्या( तुमचे निकष असतील त्यानुसार) हार्ड कॉपी दिवाळी अंकाला स्पॉन्सर का करत नाही. तो पर्याय एकदा तपासून बघा. ह्यात खालील फायदे आहेत.
१) दर्जेदार साहित्य
२) चांगली व एस्टॅब्लिशड रीडर शिप
३) बेटर रीच जिऑग्रॉफिकली.
४) ह्या अश्या अंकात एक मायबोली विशेष असे फीचर टाकून त्यात मायबोलीवरील उपक्रमांची माहिती,
माबोकरांनी केलेल्या चांगल्या कार्याचा उल्लेख बाल कलाकारांच्या कविता चित्रे वगैरे देता येइल.
५) दिवाळी अंक प्रिंट करणे खर्चिक काम आहे त्यात तुमच्या स्पॉनसर शिपचा उपयोग होईल. व माबोची कीर्ती अजून पसरेल. जो वाचकवर्ग ऑनलाइन नाही त्यांना तुमच्या कार्याची माहिती मिळेल.

Pages