लाल भोपळा पाव किलो.
१ छोटा कांदा,
१ मोठा टोमॅटो,
१ मध्यम आकाराचे गाजर,
२ मोठ्या लसुण पाकळ्या,
१ छोटा चमचा जिरे,
१ छोटा चमचा धणे,
४ मिरे,
साखर, मिठ (चवीप्रमाणे),
२ चमचे तुप / बटर,
५-६ कडीपत्त्याची पाने,
१ हिरवी मीरची,
४ कोथिंबीरीच्या काड्या (मुळं आणि पान काढुन, फक्त काड्या)
भोपळ्याची पाठ काढुन घ्यावी. भोपळा, टोमॅटो, गाजर, कांदा सगळ्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करुन घ्याव्या. लसुण सोलुन घ्यावा.
एका खोलगट भांड्यात तुप घेउन तुप तापल्यावर त्यात कडिपत्ता आणि हिरवी मिरची टाकावी. नंतर कांदा आणि लसुण थोडा प्रतुन घ्यावा, कच्चटपणा जाईल इतपतच.
आता त्यात गाजर, टोमॅटो, लाल भोपळ्याच्या फोडी, कोथिंबीरीच्या काड्या, जिरे, धणे, मिरे, साखर, मिठ घालावे. हे सगळे बुडेल इतके पाणी घालावे.
पाण्याला चांगली उकळी आली की गाजराच्या फोडिला टोचुन बघावे (गाजर जास्त कडक असल्याने). मऊ झाले असेल तर पाणी गाळून घेउन बाकी सगळे मिश्रण मिक्सर्मधुन एकजिव करुन घ्यावे.
बाजुला काढलेले पाणी व हे एकजीव केलेले मीश्रण एकत्र करुन एक उकळी आणावी. घट्ट वाटल्यास थोडे अजुन पाणी घालावे.
*
हिरवी मीरची वगळू नका. पाहिजे तर मीरे कमी करा. [याचे नाव 'केरला स्पाईस्ड पंपकीन सुप' असे आहे ]
मुळ कृतीत, लाल ढब्बु मिरची आणि मक्याचे पिठ पण वापरले आहे.
मुळ कृतीत तुपाच्या ऐवजी तेल वापरले आहे आणि कडिपत्ता वापरलेला नाही.
मस्त दिसतंय. हि. मिरची आणि
मस्त दिसतंय. हि. मिरची आणि मिरे वगैरे मिक्सरला फिरवल्यावर जास्त तिखटपणा येत नाही का?
सायो, इतर मिश्रणाच्या मानाने
सायो,
इतर मिश्रणाच्या मानाने जास्त नाही वाटले. अगदी फिकी चव आली होती. अर्थात सवयी प्रमाणे कमी-जास्त वाटु शकते.
मिरे वगळुन, नंतर आवश्यक वाटाल्यास वरुन थोडी मिरेपुड घालात येइल.
हॅलोविन च्या पम्प्कीन आहे.
हॅलोविन च्या पम्प्कीन आहे. नक्की ट्राय करणार.
भोपळा अतिशय आवडत असल्याने
भोपळा अतिशय आवडत असल्याने नक्की करून बघणार. बायकोला भोपळा आवडत नसल्याने सगळे सूप मलाच गिळायला मिळेल.
मी पण करून पाहणार. तीच ती
मी पण करून पाहणार. तीच ती भाजी किती वेळा करायची? बरं झालं नवीन रेसीपी सापडली. धन्यवाद!
मस्तं पाककृती आहे.
मस्तं पाककृती आहे. थँक्सगिव्हिंगच्या जेवणासाठी एक पदार्थ मिळाला. थँक्यू!
मस्त प्रकार आहे !!
मस्त प्रकार आहे !!
मस्त वाटत आहे रेसिपी .. नक्की
मस्त वाटत आहे रेसिपी .. नक्की करून बघेन ..
पाव किलो भोपळा आणि त्याबरोबर कांदा, टोमॅटो, गाजर, लसणीच्या पाकळ्या वगैरेंकरता (तेही इकडच्या अमेरिकेतल्या) छोटा, मोठा, मध्यम ही विशेषणं बघून थोडं चॅलेंजींग वाटत आहे .. अंदाजाला कामाला लावावं लागेल ..
टण्या, अरे करतानाच थोडे जास्त
टण्या, अरे करतानाच थोडे जास्त कर की ....
सशल
मी पण सगळे अंदाजानेच घातले होते. पाकृ लिहीताना आकार डोळ्यासमोर आणुन 'अचुक' लिहायचा प्रयत्न केला आहे
आज केले. मस्त लागते हे सूप.
आज केले. मस्त लागते हे सूप. सायोचा प्रश्न आधी वाचला असता बरं झालं असतं. मिरची तिखट होती. सूप थोडे तिखट झाले. खाताना त्यात दही घालून खाल्ले ( क्रीम नव्हते म्हणून). तिखटपणा बराच कमी झाला.
आरती खूप धन्यवाद एका टेस्टी रेसीपीबद्द्ल.
मी पण करून पाहणार. तीच ती
मी पण करून पाहणार. तीच ती भाजी किती वेळा करायची? बरं झालं नवीन रेसीपी सापडली. स्मित धन्यवाद! >>>अगदी नक्की करणार, पण मिश्रण गाळायचे नाही का?
मी मिश्रण गाळले नाही. सगळे
मी मिश्रण गाळले नाही. सगळे मिक्सर मधून काढले. थोडे चंकी राहिले, तरी छान लागत होते.
डीविनिता, भाज्या चांगल्या मऊ
डीविनिता,
भाज्या चांगल्या मऊ झाल्या असतिल तर व्यवस्थित मिळुन येतात. गाळायची आवश्यकता नाही पडली. अगदी एखादा धण्याचा तुकडा मधे आला होता.
आणि भोपळ्याची पाठ काढायची असे लिहायचे मी विसरले आहे
छान प्रकार.. कडीपत्ता सोडून
छान प्रकार.. कडीपत्ता सोडून सगळे मिळेल इकडे.. त्यामूळे त्याशिवायच करावे लागेल मला.
सुपाचा फोटू पाहून लगेच ते
सुपाचा फोटू पाहून लगेच ते करून बघायची सुरसुरी आली आहे!
तुपातली फोडणी व कढीपत्त्यामुळे स्वाद छानच लागेल.
शिजवलेली मूगडाळ / नारळाचे दूध घालूनही मस्त लागेल बहुतेक.
छान रेसिपी आहे.
छान रेसिपी आहे.
हेल्दी सूप! प्रकार आवडला.
हेल्दी सूप! प्रकार आवडला. अकु म्हणते त्याप्रमाणे मूडा टाकलीतर फुलमील होईल.
अकु म्हणते त्याप्रमाणे
अकु म्हणते त्याप्रमाणे नारळाचे दुध घातले तर तिखटपणा कमी होण्यासही मदत होइल. (आणि थोडा अजुन केरळी फील पण येइल)
पण चव मात्र थोडी बदलेल.
ह्यामधे ब्रेड क्रम्ब्स छान
ह्यामधे ब्रेड क्रम्ब्स छान लागतात. किंवा एखादी ब्रेड घेतली गोलसर तर आणखी छान लागते. आमच्याकडे उपासाला आई हे असे सुप किंवा खिर करते.
तुमच्याकडे उपवासाला भोपळा चालतो का?
बी, लाल भोपळा फक्त
बी, लाल भोपळा फक्त नऊरात्रींच्या उपवासाला चालतो. (आमच्याकडे)
दिनेश, तुम्ही कडीपत्त्याची पुड नाही नेत का भारतातुन ? चांगली टिकते आणि चव पण फार बदलत नाही.
मी पण करून पाहिलं काल.
मी पण करून पाहिलं काल. मिरचीमुळे तिखट झालं पण आवडलं.
तीच ती भाजी किती वेळा करायची?
तीच ती भाजी किती वेळा करायची? >> अंजली, याच भोपळ्याच रायत पण चांगल होत. इथेच माबोवर पाकृ असेल कदाचीत.
हो येस्स रायतं.. करते पण अगदी
हो येस्स रायतं.. करते पण अगदी क्वचित कारण मी एकटीच खाणारी..
काल करुन पाहिले. तिखट अजिबात
काल करुन पाहिले. तिखट अजिबात सहन होत नाही म्हणुन मिरे वगळले. हिरवी मिरची कमी टाकली. मस्त झाले होते. हेल्दी रेसिपी बद्दल धन्यवाद, आरती
आरती, आवडला हा प्रकार..
आरती, आवडला हा प्रकार..
पाव किलो भोपळा, एक गाजर, एक
पाव किलो भोपळा, एक गाजर, एक कांदा, एक टोमॅटो य मिश्रणाला एक हिरवी मीरची (मीरे वगळता) खरच जास्त होते आहे का ( feeling confused ) ?
पाककृती आवडल्याचे कळवल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद
आरती, काल हे सुप बनवले. छान
आरती, काल हे सुप बनवले. छान झाले. लेकाने आधी नाव ऐकुन चेहेरा केला होता पण नंतर आवडीने खाल्ले सुप स्टिक्स सोबत. थॅन्क्स .
सूप फक्त माझ्या साठी ! म्हणुन
सूप फक्त माझ्या साठी ! म्हणुन भोपळा पाव किलो नाही घेतला. भोपळा कमी म्हणुन इतर जिन्नसही कमी घेतले.
मिरचीच्या चित्राकडे पाहिले तरी नाक कान लाल होतात माझे
त्यामुळे तुझ्या मिरचिच्या प्रश्नाला उत्तर देउ शकत नाही
प्रिंसेस काल हे सूप करणार
प्रिंसेस
काल हे सूप करणार होते, पण नाही जमले. आज करायचा प्लॅन आहे. लाल भोपळ्याला स्वतःचेच असे मस्त टेक्स्चर असते. त्यामुळे दाटपणा येण्यासाठी वेगळे काही करावे लागणार नाही असे वाटते. नाहीतर मग थोडासा उकडलेला बटाटा मॅश करून किंवा तांदळाचे पीठ पाण्यात मिसळून तेही लावता येऊ शकेल.
अकु, पीठ/बटाटा दोन्ही लागत
अकु, पीठ/बटाटा दोन्ही लागत नाही.
प्रिंसेस
Pages