Submitted by mnp on 13 July, 2013 - 08:18
शनी मंगळ युती ही खरच खुप वाईट असते का?
एखाद्याच्या पत्रिकेत ती सातव्या घरात असेल तर वैधव्य येते हे खरे का?
क्रुपया वाद वा चेष्टा नको, चर्चा व्हावी ही ईच्छा व विनंती.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्वत: ज्योतिष याचसाठी पाहू
स्वत: ज्योतिष याचसाठी पाहू नये .शनी मंगळ युती असतांना साधारणपणे अडीच महीने एकाच राशीत आणि पंधराएक दिवस अंशात्मक निरनीराळ्या स्थानातून फिरेल .चतुर्थ आणि सप्तम स्थान तसेच या दोन ग्रहांच्या बलांवरून कमी अधिक अप्रिय फळे मिळणार .
शनी मंगळ युतीचे बळी ची या
शनी मंगळ युतीचे बळी ची या निमित्ताने आठवण आली. पत्रिकेत सप्तमात शनिमंगळ युती असेल तर लगेच वैधव्य वगैरे असे काही होत नाही. अनेक स्त्रियांच्या पत्रिकेत शनिमंगळ युती असते. त्यांना काही वैधव्य वगैरे आले नाही. वैवाहिक सौख्यात बाधा असा अर्थ मात्र ज्योतिषी लोक काढतात.
काल एका मराठी वाहिनीवर एका
काल एका मराठी वाहिनीवर एका ज्योतिषविशारद पंडितबाई यांनी याबद्दल बरेच वाईट सांगीतले. त्याच्यामते ३५ नंतर वैधव्य येतेच आणि बरेच काही. म्हणून ईथे जाणकारांकडून माहीती घेण्यासाठी हा धागा.
वरील प्रतिसादांसाठी धन्यवाद
शनी मंगळ प्रथम स्थानात असले
शनी मंगळ प्रथम स्थानात असले तर काय असते फल ज्योतिष?
शनी-मंगळ बरोबर इतर ग्रह कसे
शनी-मंगळ बरोबर इतर ग्रह कसे आहेत, कुठे आहेत, अंश काय ह्याच्यानुसार फळ मिळते. असे सरसकट सप्तमात शनी-मंगळ बघुन काही बोलू नाही शकत.
मुख्य म्हणजे अमुक एक फळन्यासाठी त्या स्थानांच्या, ग्रहांच्या दशा याव्या लागतात.
उगाच टेंशन नका घेऊ.
"Without Prejudice" >>>> शनी
>>>> शनी मंगळ युती ही खरच खुप वाईट असते का? <<<<
सरसकट वाईटच असते असे म्हणता येत नाही, ती कोणत्या स्थानातून, कोणत्या शुभग्रहाच्या नजरेत आहे वा नाही, तसेच लग्नेश, पंचमेश, भाग्येश किती बलीष्ठ आहेत यावर परिणाम अवलम्बुन असतात. मात्र, सरसकट "वाईट फल" नसले तरी शनि अन मंगळ युति योगातुन काहीतरी वैचित्र्यपूर्ण फले ज्या भावात/स्थानात असतात त्या भावा/स्थानासंदर्भाने देतातच.
>>>>> एखाद्याच्या पत्रिकेत ती सातव्या घरात असेल तर वैधव्य येते हे खरे का? <<<< इथे "एखाद्याच्या/एखादीच्या" आणि "वैधव्य/विधुरता" असे हवे का?
असो. यास स्पष्ट उत्तर "नाही" असे आहे.
मात्र वर सान्गितल्याप्रमाणे "वैचित्र्यपूर्ण" फले नक्कीच मिळतात. सामान्यतः एकटा शनि सप्तमात असेल, तर विवाहास विलंब वा विजोड जोडीदार दर्शवितो. पण पुन्हा हे सापेक्ष ठरते.
तसेच सप्तमात मंगळ असेल, तर अतिसूक्ष्मात जाऊन विचार करावा लागतो व सहा आठ बारा या स्थानांचा दूरान्वयानेही संबंध येत नसेल, तर उलट हा मंगळ उन्नतीकारक/भरभराट/स्थावर वगैरेचा दर्शक ठरतो.
आता असे दोन्ही ग्रह एकत्र असतील तर भावफलाबाबत काही एक तृटी निश्चितच दर्शवितात, पण तृटी याचा अर्थ "वैधव्यच" असा घेऊन चालणार नाही. तृटी अन तिचे विरोधात "वैधव्यात" दर्शविला जाणारी फळाची समूळ नष्टता यात प्रचंड फरक आहे. तृटी असेल, तरी मूळ बाब शाबूत असते. समूळ नाशात मूळ बाबीचे अस्तित्वच अपेक्षित नाही. शनिमंगळ युतिमध्ये शनि "समूळ" नाशास पाठिंबा न देणारा असा ग्रह असल्याने वरील शंका व्यर्थ ठरते. मंगळाचे बाबतीत खास करुन "एकट्या मंगळाचे" बाबतीत मात्र हा निर्णय तावुनसुलाखून सखोल अभ्यासाअंतीच घ्यावा लागतो.
|| शुभंभवतु ||
"वैचित्र्यपूर्ण फले" कशास म्हणावे याबाबत देशकालवर्तमान अन धर्म/जात/रितीरिवाजरुढीपरंपराप्रमाणे मनभिन्नता असू शकते. जो नियम हिन्दुस्थानात लागेल, वा ज्या स्थितीस हिन्दुस्थानातील कुटुंब व्यवस्थेत महत्वाचे मानले जाईल त्यास एकविसाव्या शतकात पाश्चिमात्य देशात तितके महत्व दिले जाईलच असे नाही.
मात्र एक अतिशय ढोबळ विधान करता येईल की जातकाच्या आंतरिक इच्छा-अपेक्षेपेक्षा वेगळइच्छा-काही घडणे म्हणजे "वैचित्र्यपूर्ण" म्हणता येईल. असो.
>>>>> क्रुपया वाद वा चेष्टा नको, चर्चा व्हावी ही ईच्छा व विनंती. <<<<< याचबरोबर, इथे "अंनिसवाले/अविश्वासी/अश्रद्ध/बुप्रा" देखिल नकोत असेही हवे होते ना?
धन्यवाद गमभन आणि लिंबुटिंबु.
धन्यवाद गमभन आणि लिंबुटिंबु.
माझ्या पाहाण्यातील कुंडली
माझ्या पाहाण्यातील कुंडली मध्ये शनी मंगळ युती द्वितीय स्थानात आहे. त्याचे फलित काय?
त्या व्यक्तीच्या दोन्ही मुलांच्या कुंडलीत सुद्धा तीच युती आहे पण वेगळ्या स्थानी.
द्वितीय स्थानातले फल काय?
दोन ग्रहांचे जेंव्हा
दोन ग्रहांचे जेंव्हा राशी,अंश आणि नक्षत्र सारखे असतात तेंव्हा त्यांची युती होते असे ज्योतिष शास्त्र सांगते.
द्वितियात :गणिताची आवड आहे का
द्वितियात :गणिताची आवड आहे का ?
द्वितीय स्थानावरून
द्वितीय स्थानावरून कुटुंब,खाण्या-पिण्याची आवड,बोलणे,जोडीदाराचे अष्टमस्थान,वाडवडीलांची मालमत्ता,भावंडांचे व्यय इ. विचार करता येतो. अर्थ त्रिकोणातील हे एक महत्वाचे स्थान आहे .
शनि राहू एका घरात असतील तर
शनि राहू एका घरात असतील तर वाईट फळे अनुभवायला मिळतात का ???
माझ्या पत्रिकेत शनि राहू अष्टमात मकर राशीत आहेत .अंशात्मक युती नाहीये . त्यांच्यावर कर्केच्या गुरूची दृष्टी आहे( गुरु बरोबर तिथे केतू हि आहे ) .
शनि राहू एकत्र असतील जीवन अतिशय खडतर असते असे मला एका ज्योतिष्याने सांगितले.
द्वितीय स्थानावरून
द्वितीय स्थानावरून कुटुंब,खाण्या-पिण्याची आवड,बोलणे,जोडीदाराचे अष्टमस्थान,वाडवडीलांची मालमत्ता,भावंडांचे व्यय इ. विचार करता येतो. अर्थ त्रिकोणातील हे एक महत्वाचे स्थान आहे .
>>>>>>>>
खूपच सुंदर माहिती दिलीत लेखक तुम्ही .
शनि राहू एकत्र असतील जीवन
शनि राहू एकत्र असतील जीवन अतिशय खडतर असते असे मला एका ज्योतिष्याने सांगितले.>>>>
निमुजी,
बऱ्याच वेळा हे ज्योतिषी वरवरचं reading देतात. त्यामुळे आपण एखाद्या निष्णात ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.
शनी मंगळ युती ही खरच खुप वाईट
शनी मंगळ युती ही खरच खुप वाईट असते का?>>>>>>>.. मुळीच नाही........ माझ्या पत्रिकेत आहे........ सगळ मस्त चालू आहे समोरच्याला हेवा वाटेल अस
शनी मंगळ युती ही वाईट कि
शनी मंगळ युती ही वाईट कि चांगली हे ती कोणत्या स्थानात होते,लग्न रास कोणती,त्या लग्नाला हे योगकारक आहेत कि नाही (उदा. कर्क लग्नाला मंगळ तर तूळ व वृषभ लग्नाला शनि योगकारक),नवमांशतील स्थिती,त्यांच्या नक्षत्र स्वामींची स्थिती अश्या अनेक गोष्टींवर अवलंबून असते. शनि हा नियंत्रण तर मंगळ हा उर्जेचा कारक आहे.
लेखकजी, धन्यवाद, योग्य
लेखकजी,
धन्यवाद,
योग्य मुद्याला हात घातलात. एखाद्या स्थानाचे फळ पहाताना भावेशाचा अर्थात वरील प्रश्नात ( सप्तमेश ) सुध्दा तपासणे महत्वाचे आहे.
या प्रश्नात सप्तमेश जर भाग्यात, भाग्येशाच्या नक्षत्रात असेल तर भावेश बळ जोरदार आहे असे म्हणावे लागेल. अस असता फळे वेगळी असतील.