साडेसातीचा प्रवास

Submitted by नितीनचंद्र on 1 November, 2014 - 01:45

२ नोव्हेंबर २०१४ रात्री ८ वाजुन ५४ मिनिटांनी शनि निरयन वृश्चिक राशी प्रवेश करतो. गेले साडेसात वर्ष पिडलेल्या कन्या राशीची साडेसाती पासुन सुटका होईल.

याच बरोबर साडेबावीस वर्षांनी धनु राशीला साडेसाती सुरु होते.

तुळ राशीची साडेसातीतली शेवटची अडीच वर्षे सुरु होतात तर वृश्चिकेला पाच वर्ष साडेसाती बाकी आहे.

या कालावधी विषयक अनेक गोष्टी व कथा लोकांनी वाचल्या असतील. अनुभवही घेतले असतील. खास जाणवते ती मानसीक पीडा आणि त्यातुन बदलणारी मानसीकता.

साडेसाती तुळ, वृश्चिक आणि धनु राशीला काय परिणाम जाणवेल हे जाणुन घेऊ या.

तुळ राशीला शेवटची अडीचकी आहे. शेवटची अडीचकी काही चांगले घडवुन जाते. तुळ राशीला शनि राजयोग कारक असल्याने किंवा तुळ राशीत शनि उच्चीचा असल्यामुळे पहिली अडिचकी सोडली तर दुसर्‍या आणि तिसर्‍या अडीचकीत फारसा त्रास होत नाही.

शेवटच्या अडिचकीत कुटुंबस्थानातुन किंवा धन स्थानातुन होणारे शनिभ्रमण हळु हळु सांपत्तीक स्थितीत सुधारणाच करेल. याचा वेग मंद असला तरी स्लो बट स्टेडी अश्या प्रकारचा असेल.

कुटुंबात शनि हा वाढ करणारा ग्रह नसुन कितीही हवे असले तरी कुटुंबातील सदस्य संख्या एका आकड्याने किमान कमी होताना काहिंना दिसते. अत्यंत वृध्द असे आजी - आजोबा यांचा या अडिचकीत वियोग होण्याची शक्यता असते तेव्हा लवकरच त्यांच्या जिवंतपणी आशिर्वाद घेण्याचे मनात आणा. त्यांच्या बरोबर काही काळ व्यतित करा. त्यांच्या इच्छा पुर्ण करण्याचा प्रयत्न करा.

शेवटी अमर कोणीच होत नसते. पण मोठ्यांचे कृपाछ्त्र मात्र कायम रहावे असे वाटत असते. अश्या वेळी रुख रुख राहु नये या दृष्टिने हे लिहले आहे.

वृश्चिक राशीला ही मधली अडिचकी. प्रत्यक्ष चंद्रावरुन शनिचे भ्रमण होताना होणारा मानसीक त्रास लक्षात राहिल असा असतो. तुमच्या राशीला अनुरुप बदला घ्यायचा स्वभाव जरा अजुनही लांब ठेवा . शांत पणे पहात रहा काय घडते आणि का घडते या कडे. अनुकुल काळ येईल तेव्हा तुम्हाला सव्याज उट्टे काढायची संधी येणारच आहे. पहिलीच साडेसाती असेल तर आत्मपरिक्षणाची सवय याच काळात लागेल.

शनिवारी तेलाने मालीश करुन गरम पाण्याने स्नान करावे हा उपाय साडेसातीत करायला जुने व जाणते ज्योतिषी सांगतात. मनाचे व्यापार वाढतात तेव्हा शरीरातले रक्ताभिसरण वाढवणे सुखद अनुभव देते असा काहिसा प्रकार यामागे असावा.

शनि हा शिक्षक आहे. जे नुकसान होते यातुन मोठा धडा मिळतो याकडे लक्ष द्या.

धनु राशीला पहिलीच अडीचकी आहे. व्यावसायीक महात्वाकांक्षांना आवर घालुन लो रिस्क असलेले करार मदार करणे क्रमप्राप्त ठरेल. धनु राशीला धन स्थानाचा मालक असलेला शनिच व्ययस्थानात या अडिचकीत असल्यामुळे स्थावर / रोकड यांचा क्षय होताना दिसणार आहे. तो थांबविण्यासाठी अतिरिक्त कामाचा ताण आणि मानसीक ताण जाणवणे अपरिहार्य आहे.

तृतीयेश शनि तुमच्या व्ययात असल्यामुळे सहोदरांची खास करुन मोठ्या भावा - बहिणीची चिंता सतावेल.

आपली मानसीकता अध्यात्मीक आणि परमेश्वराला मानणारी असल्यामुळे या कालखंडातुन आपण पार जाणारच आहात.

शनिवारी शनिमहाराजांना तेल आणि काळे उडीद याच बरोबर रुईपत्रांची माला अर्पण करा. मारुतीचे दर्शन घ्या. हा उपाय पुढील साडेसात वर्षे न चुकता करा. सोबत शनिस्तुती आणि हनुमान चालिसाचा पाठ सुरु ठेवा.

सर्वांसाठीच शनिचा नवग्रहपिडाहर स्त्रोत्रातला मंत्र रोज जपावा असा आहे.

सुर्यपुत्र दिर्घदेहो विशालाक्ष शिवप्रिया:|
मंद्चार प्रस्सनात्मा पीड़ा हरतु में शनि ||

हा मंत्र रोज किमान ११ वेळा रोज म्हणावा म्हणजे साडेसाती सुखकर होते

|शुभंभवतु |

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धा दिपकजी,

मुळ पत्रिकेत शनि वक्री असल्यास शनि कोणत्या भावाचा भावेश आहे ? हे तपासल्या खेरीज उत्तर मिळणे कठीण आहे.

१) समजा पंचमेश आहे तर शिक्षणात अडथळे येतील. पंचमावर जर गुरुची ड्रुष्टी असेल तर शिक्षण पुर्ण होईल.

२) सप्तमेश असेल तर विवाहास विलंब / अडथळे येतील . शुक्र जर बलवान असेल तर हे अडथळे कमी असतील.

साडेसातीचा विचार वेगळा आहे. शनि मनाचा कारक असलेला चंद्र या काळाकरता ग्रासतो. परिणामी इतर वेळी तीच कारणे जास्त दु:ख देत नाहीत पण साडेसातीत मात्र त्याचा मानसीक त्रास जास्त होतो.

याचा मुळ शनिशी संबंध नाही. पण पत्रिकेत मुळ शनिवरुन गोचरीचा शनि जाताना शनिचे कारकत्व जास्त प्रभावी होते. मुळ कुडलीत शनि राजयोग कारक असता ( वृषभ किंवा तुळा लग्न ) समजा शनि तुला राशीत आहे व शनिवरुन शनि जाताना जास्त शुभ फले देऊन जाईल.

या उलट समजा सिंह लग्नाची पत्रीका आहे आणि षष्ठेश - सप्तमेश असलेला शनि कर्क राशीत व्ययात वक्री आहे आणि त्यावरुन गोचरीचा कर्केचा शनि जाताना जास्त आरोग्याचे प्रश्न निर्माण करील.

आत्ता अर्ध्या पाऊण तासापुर्वी साडेसाती संपली आहे. Happy
जरा वेळ डोळे मिटून मागच्या साडेसात वर्षांच प्रवास आठवला.
स्थैर्य नसणे, खोलवर आपटून परत वर येणे, पुढे काय या चिंतेत असताना अचानक काम होणे, इ. इ.
जोरदार अनुभव येऊन गेले. Sad
पहिली दिड वर्षे चांगली गेली, नंतरचे दिड वर्ष बेकार गेले, त्यानंतरची ३ वर्षे चांगली गेली, शेवटचे दीड वर्ष बरेच चांगले गेले पण,
गेले साडेचार वर्षे कुछ पाने के लिये कुछ खोना पडता हैं असे चालू आहे. केव्हा स्थिर आयुष्य मिळणार आहे माहिती नाही. Sad

नाही ही अंधश्रद्धा मुळीच नाही ऋ. फक्त काही लोक ह्या विद्येचा गैरफायदा उचलतात.

माझी रास वृश्चिक आहे आणि माझ्या भावाची सुद्धा तिच आहे. साडेसातित त्याचा मृत्यु झाला. ही त्याची दुसरी साडेसाती होती. पहिल्या साडेसातित त्याच्या पत्नीचा मृत्यु झाला होता Sad

माझ्या साडेसातिचे ५ वर्ष उरले आहे. आणि खरेच मागचे अडीच वर्ष मला अत्यंत तापदायक गेले आहे. अनेकांशी माझे संबंध तुटले. अनेक जण सोडून गेलेत. जवळ्यांचे मृत्यु पाहिले. दरी घरी व्याप पाहिला. नोकरीत कष्ट आणि अपयश पाहिले. मुख्य म्हणजे भावाचे निधन होऊन त्याच्या जबाबदार्‍या माझ्यावर आल्यात. आर्थिक खर्च अतोनात होऊ लागला आहे. शरीर कमालीचे थकले. असे अनेक चढउतार मी पाहत आहे.

नि तिन, मला सांङाला का की मला कालसर्प योग आहे का? मी माझे डीटेल्स तुम्हाला पाठवू शकेल. प्लीज उतर द्यावे. धन्यवाद.

ऋग्वेद (असे आयडी का घेतात देव जाणे) Uhoh
अंधश्रद्धा म्हणजे पुर्णपणे या अशा गोष्टींवर आयुष्याचे तारू सोडून दिलेले आहे असा होतो. मी माझ्यापुरते सांगू शकतो.
जरी वर माझा अनुभव दिलेला असला तरी मी कोणत्याही कर्मकांडात उपायांमधे कधीच अडकलो नाही, अगदी साडेसाती सुरू होती तेव्हासुद्धा. विश्वास आहे एवढेच.
असो, अजुन काही लोकांनी आपापले अनुभव लिहिले तर विविधता कळू शकेल.

माझा कधीच अश्या गोष्टींवर विश्वास नव्हता, त्यामुळे मी कधीच माझी कुंडली वगैरे काढली नाही. त्यामुळे मला माझी रासही माहित नाही(exact ). जन्मनाव आणि दिनांकावरून ती कदाचित ‘कन्या’ असावी असे वाटते. कृपया या details वरून माझी रास सांगू शकाल का?
दिनांक- १८ सप्टेंबर १९९०
वेळ - दुपारी १२.५५

कन्या राशीची साडेसाती संपल्याच वाचलं म्हणून थोडी उत्सुकता चाळवली.

आबासाहेब वेळेच्या व्यापानुसार मी ज्योतिष्य विषयक अभ्यास सोडुन दिला.:अरेरे: त्याला फार बैठक लागते, कारण पत्रिका चुकता कामा नये. आता वर- वर माहिती आहे तीच देते. मात्र माहिती अचूक आहे.

सीमा सिन्व्ह राशीच्या मुली मानी,कणखर, थोड्या तापट, महत्वाकान्क्षी आणी ऑर्डरीन्ग नेचरच्या असल्याने वर माया आणी वर पिता घाबरत असावेत. मात्र सिन्व्ह राशीच्या मुलीनी त्याच राशीचा नवरा करु नये, नाहीतर तो तिच्या ताटाखालचे मान्जर बनतो.:खोखो::दिवा:

सिन्व्ह आणी धनु व मेषेशी जोडी जमवु शकते, कन्या मिथुनेशी पण त्याचे जमु शकते.

सीमा सिन्व्ह राशीच्या मुली मानी,कणखर, थोड्या तापट, महत्वाकान्क्षी आणी ऑर्डरीन्ग नेचरच्या असल्याने वर माया आणी वर पिता घाबरत असावेत.
>>>
हे मात्र १००% खर आहे....सिंह(मी) आणि तुळ रास जोडी आहे आमची...

धन्यवाद नितीनचंद्रजी,
सिंह राशीची साडेसाती संपली असे म्हणतात, पण माझे सध्याचे status पाहता मी जरा साशंक आहे. असो

साडेसाती पाह्ताना जन्मरास पाहतात हे मला माहित आहे.

पण एखाद्याच्या जन्मराशीला साडेसाती नाही पण लग्नराशीला आहे तर त्याचा काय परिणाम होतो? उदा. जन्मरास कर्क आणि लग्न रास वृश्चिक. अशा वेळीही शनीची उपासना करावी का?

इतर देशांमधे साडेसाति हा प्रकार आहे का? >>>>>
तुमच्या म्हणण्या-प्रमाणे जर हि प्रमाणित विद्या असेल तर ती वैश्विक असायला हवी म्हणजेच ती इतर देशातील लोकांना सुद्धा लागू व्हायला हवी. आता ते लोक यावर विश्वास ठेवतात कि नाही हा वेगळा प्रश्न आहे. माझ्या माफक माहितीनुसार तरी इतर देशात साडेसाती बद्दल माहिती असेल असे वाटत नाही.

साधना, हो. साडेसाती लग्नराशीला पण लागु होते. कारण चन्द्र जसा मनाचा कारक तसे लग्न रास जी असेल तिला व्यक्तीमत्वाचे कारक समजतात. आता लग्नस्थानात ( म्हणजे पत्रिकेत पहिल्या स्थानात ) वृश्चिक आली, ती मन्गळाची रास आहे. आणी शनी व मन्गळ दोघे एकमेकान्चे शत्रु. त्यामुळे शनी लग्न राशीला पण परीणाम देणार.

पण काही ज्योतिष्यी रवी राशीला पण महत्व देतात, म्हणजे पाश्चिमात्य ज्योतिश्यानुसार रवी ज्या राशीत असेल त्या महिन्यात तुमचा जन्म असेल तर तुमची ती रवि रास होते. म्हणजे १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या दरम्यान कुम्भ रास येते. ( रवी कुम्भ राशीत असतो) जर त्या कालात जन्म असेल तर साडेसाती नसेल कारण मकर आणी कुम्भ या राशीना साडेसाती लागायला अजून ५ आणी साडेसात वर्षे आहेत.

मला एक स्थळ आलेले आहे आणि मी लग्नाच्या विचारत होतोच तर आता ५ वर्ष साडेसाति आली आहे. काहीच उपाय नाही का?

बी फुकटचा सल्ला देतेय, रागवु नकोस. तुझी वृश्चिक रास आहे. तुला सध्या गुरु अनुकुल आहे, शनी धनु राशीत गेल्याने आता हळू हळु सर्व चान्गले होईल. सर्व दृष्टीने ते स्थळ चान्गले असल्यास जरुर हो म्हण. पत्रिकेच्या फार खोलात शिरु नकोस. साडेसाती मध्येच लोकान्ची लग्ने, मुलेबाळे, नोकरी, घर इत्यादी पार पडते. उगाच शन्का घेत बसु नकोस. आईचा आशीर्वाद घे, सर्व काही उत्तम होईल. काळजी करणे आणी मनात ठेवणे सोडुन दे. तुला शुभेच्छा.

दुसरे असे की साडेसातीतच माणसाला आपल्या आणी परक्या लोकान्कडुन बरे वाईट अनूभव येतात, त्यातुनच माणुस तावुन सुलाखुन बाहेर पडतो. तेव्हा जास्त विचार करु नकोस. जे वाईट झाले ते झाले, पण पुढे चान्गले होईल अशी आशा ठेव.

) जर त्या कालात जन्म असेल तर साडेसाती नसेल कारण मकर आणी कुम्भ या राशीना साडेसाती लागायला अजून ५ आणी साडेसात वर्षे आहे>> हायला, म्हणजे आधी धनुची साडेसाती मग ती संपली की लग्न रास कुम्भ त्याची साडेसाती.
एकावर एक फ्री. ती ही एका मागोमाग एक Sad

ही दुसरी साडेसाती आहे.
पहिली लहान असतानाच आलेली.
तेव्हा मन्स्ताप प्रकार व्होलॅटाइल असतो.
पण शारीरीक त्रास झालेला त्याच्या खुणा अजुनही आहेत.

रश्मी, माझे डोळे भरुन आलेत तुझे मजकुर वाचून. मला इतका वाईट अनुभव आलाय ना ७१/२ मधे !!!! मला अपयश हा प्रकारच कधी माहिती नव्हता. नुकसान मी कधी पाहिले नव्हते. मृत्युमधे मी कधी शोक केला नव्हता. आर्थिक खर्च मी कधी केला नव्ह्ता. नातेगोती, मित्रदोस्त कधी माझ्यापासून विलग अलग दुर परक झाले नव्हते. षडरिपु मला कधी नव्हतेच. मी मागिल २१/२ वर्षांपासून हे सगळे भोगत आहे Sad

अहो नाही झकासराव. कुम्भेला अजून बरीच वर्षे आहेत. पण जर दुखापत झाली असेल असे म्हणता आहात, तर तो कुन्डलीतल्या मन्गळाचा प्रभाव असु शकतो. मन्गळ असणार्‍याना किन्वा मन्गळ प्रभावी असणार्‍याना डोक्याला / शरीराला लागणे, कापणे, चटका / शॉक बसणे असे अनूभवास येते. आणी तसेही लहानपणी आपल्या उद्योगान्मुळे खरचटने, कापणे हे होतच असते.

माझी वृश्चिक रास आहे म्हणजे अडीचकी संपली. मलाही खुप त्रासातुन जाव लागलयं या अडीच वर्षात.
एकच चांगली गोष्ट झाली ती म्हणजे स्वत:च घर झालं.

बी त्यालाच साडेसाती म्हणतात. जर माणुस यातुन काही शिकला नाही, तर तो कधीच बदलु शकत नाही. शनी हा ग्रह मास्तर आहे, तो दुखावत नाही तर तो आपल्याला शिकवतो. शनी हा कायद्याचा कर्ता आहे, तो न्याय देतो. उशिरा का होईना पण माणसाचे भलेच् करतो, तेव्हा दुखः आवर आणी आईला समाधान दे. निदान या वयात तरी तिला शारीरीक आणी मानसीक सुख लाभु दे. वेळ घालवु नकोस.

पत्रिकेत चन्द्र ज्या राशीत असतो तिला जन्मरास म्हणतात. चन्द्र जिथे असेल तिथे जर ८ आकडा असेल त्र ती वृश्चिक रास. ४ असेल तर कर्क रास. बारा राशी आहेत.

आबासाहेब हळु हळु होईल व्यवस्थीत.:स्मित:

मी शनीदेवाला पुर्वी फक्त नवग्रहामधे पाहिले होते पण अकोल्याला शनीचे एक मंदीर आहे. शनीचा क्रोधाने तापलेला चेहरा बघून मी थक्क झालो. केवढे क्रोध आहे त्यांच्या चेहर्‍यावर.

Pages

Back to top