मासे, (अक्खा, किंवा तुकड्या. मी तुकड्या घेतल्या आहेत.)
केळीची / ओल्या हळदीची पाने
मॅरिनेशन: नेहेमीचे. हळद, मीठ, लिंबू, आलं-लसूण पेस्ट, तिखट. सगळे चवीनुसार.
हिरवी चटणी: पुदिना, कोथिंबीर, नारळ, हिरवी मिरची, जिरं, मीठ. पुन्हा चवीनुसार. एक पीस माशासाठी सुमारे २-अडिच चमचे चटणी लागेल.
नेहेमीचे मॅरिनेट लावून मासे बाजूला ठेवावेत. तोपर्यंत चटणी तयार करायला मिक्सरमधे टाकावी.
दरम्यान गॅसवर एका पातेल्यात पाणी उकळत ठेवावे. या पाण्यात मिरे व असल्यास ओली हळद घालावी. (चवीत सटल फरक पडतो.) त्या पातेल्यावर चाळणी व वर झाकण असा बेत असावा. हा असा :
केळीच्या पानाचे तुकडे सुरीने कापून घ्यावेत. एका तुकड्यात चमचाभर हिरवी चटणी टाकून त्यावर माशाचा तुकडा, वर पुन्हा थोडी चटणी टाकून (जमेल तशी) पुरचुंडी वळावी. केळीचे पान पुरचुंडी वळताना तुटते. त्यासाठी ते पान गॅसच्या ज्योतीवर पापड भाजल्यासारखे थोडे भाजून घ्यावे. याने ते मस्त मऊ पडते. हवे असल्यास या पुरचुंडीत गाजर, कोबी इ. भाज्याही टाकाव्यात.
पुरचुंडी चाळणीत वाफवायला ठेवावी.
वर झाकण ठेवावे. सुमारे १०-१२ मिनिटांत मासा शिजतो. टूथपिक टोचून पहावी. सहज आत गेली की समजते. नीट शिजलेला मासा सहजी फ्लेक होतो. असा :
भात आणि मासे हे आपले मुख्य अन्न असल्याने, थोडा भात फोडणीस घालून सोबत घ्यावा.
या जेवायला!
अक्खा मासा असेल तर केळीच्या पानात गुंडाळून मग अॅल्युमिनियम फॉईलमधे गुंडाळावा. पुरचुंडी नीट वळता येत नसेल तर नुसत्या अॅल्युमिनियम फॉईलमधे केली तरी चालते. पान घातले तर चव मस्त येते. मी विड्याच्या कलकत्ता पानातही केले आहेत. ऑफकोर्स फॉईल रॅप करून.
फॉइल रॅप मासा ओव्हनमधेही भाजता येतो. (ओटीजी. मावेमधे नाही)
फॉईल लावलीच पाहिजे असे नाही. पुरचुंडी सुगरणपणे बंद करता येत नसेल, तर सरळ शिवाण्याच्या सुती दोर्याने बांधलीत तरी चालेल.किंवा टूथपिक टोचून बंद केली तरी चालेल.
मूळ पारशी प्रकार आहे. पाठभेद असतात तसे मसाला बनवण्यात भेद असतातच.
अळूच्या पानात करून पाहिलेली नाही. कुणी केली तर इथे झब्बू द्यावा. अळूचे पान खाऊन पाहिले तर कसे लागते तेही सांगावे.
इब्लिस एकदम फॉर्मात ..
इब्लिस एकदम फॉर्मात ..
रेस्पी इंटरेस्टींग दिसत आहे ..
नुसत्या मॅरिनेट केलेल्या तुकड्यांचा फोटो नाही का काढला?
मस्तच. जेवून झाल्यावर देखिल
मस्तच. जेवून झाल्यावर देखिल खावासा वाटतो आहे
पात्रानी मच्छी आवडते.
पात्रानी मच्छी आवडते. धन्यवाद रेसिपीसाठी. आता घरी करून बघणार.
घाईघाईत प्रतिसाद दिला, आता पान कुठलं आणवं? इथे वरीलपैकी काहीही मिळेलस वाटत नाही. अल्युमिनियम foil मधेच करावा लागणार.
तुम्ही पापलेट केला होता का?
तुम्ही पापलेट केला होता का? अजुन कोणते वापरता येतील?
अमितव, हळदीचे पान हवे असेल तर
अमितव, हळदीचे पान हवे असेल तर इं. ग्रो. त मिळते ती ओली हळद कुंडीत लावायची. ओरीएंटल स्टोअर मधे काहीवेळा केळीची पाने मिळतात. फॉइल मधे गुंडाळून बेक करुनही छान लागतो मासा.
हळद लावतो, पातोळेपण खाता
हळद लावतो, पातोळेपण खाता येतील. सध्या फॉइल.
इब्लिस एकदम फॉर्मात >>>
इब्लिस एकदम फॉर्मात >>> +१
मस्त दिसत आहे. तुम्ही कोणता मासा वापरून केले हे इब्लिस?
मस्त दिसत आहेत !करून पाहण्यात
मस्त दिसत आहेत !करून पाहण्यात येतील .
झब्बू द्यायचा का? आमच्याकडे
झब्बू द्यायचा का?
आमच्याकडे माशांचा हा अतिशय आवडता प्रकार आहे. तळलेले मासे आणि ग्रेव्हीमध्ये घसाघसा मसाला टाकून शिजवलेले जास्त आवडत नाहीत. आमच्याकडे रोज केळीची पाने विकणारी बाई येतेच. हवी तेव्हा घेता येतात, लेकीला सध्या "ग्रीन लीफमध्ये" जेवायचं खूळ आलंय. त्या नादांत चार घास जास्त जातात
त्या पातेल्यावर चाळणी व वर झाकण असा बेत असावा. हा असा :>>>> मोदकपात्र किंवा ढोकळापात्र बेष्ट पडतं.
मला वाटते बारीक काट्याचे मासे
मला वाटते बारीक काट्याचे मासे नाही असे नाही करता येत, मागे मी एकदा केले होते मांदेलीचे, वाटले स्लिम मासे खाल्ले की स्लिम होऊ पण जरा जाडजूड मासे वाफवून चांगले लागतील.
केळीच्या पानात नाहितर
केळीच्या पानात नाहितर हळदिच्या पानात मस्त लागतात पापलेत, रावस, सुरमय, रोहु, काटला (बांगलाफिश).
मिळालिच तर पान्दान पानं तर झकास.
कोणताही कमी काट्यांचा फ्लेशी
कोणताही कमी काट्यांचा फ्लेशी मासा चालेल.
@ नंदिनी
झब्बू नक्कीच द्यायचा.
मोदक/इडली पात्रातही करता येतो, हे बरोबर. टीपेत द्यायचे राहिले. चाळणी हा बेत मोमोजसाठीही छान होतो. (पुढची रेस्पि गेस करा पाहू )
आज किंवा उद्या करून बघू. फक्त
आज किंवा उद्या करून बघू. फक्त वासाचा जरा प्रॉब्लेम आहे. अगदी हलकासा जरी वास येत असेल तरी मी मासा खाऊ शकत नाही /बनवू तर अजिबातच नाही. नवरोबा आणि लेकाचं डिपार्टमेंट आहे मासे म्हणजे.
मी आत्तापर्यंत फक्त १-२ वेळा नदीतला मासा खाऊ शकलेय. बाकी कोणताही मासा जमत नाही अजिबात.
अल्पना, मासा जर ताजा असेल तर
अल्पना, मासा जर ताजा असेल तर अजिबात वास येत नाही. आमच्याकडे घराच्या जवळच फिशींग जेटी आहे. (हे दोन वर्षे राहून आम्हाला नक्की कुठाय ते माहित नव्हतं, पण नवर्याच्या एका ज्युनिअरने (तोच "सेम नाववाला") तिथून रोज मासे आणायची सोय केली आहे. मस्त ताजे मासे मिळतात. शिवाय भरपूर व्हरायटी.
झब्बू आज उद्या देते.
मस्त अगदि सोपी छान रेसिपी.
मस्त अगदि सोपी छान रेसिपी. आमच्याकडेही तळनाचाच घाट असतो . असे करुन बघायला पाहीजेत.माश्यात सुरमयी ,हलवा , पापलेट चालेल माझ्यामते.
तोंडाला पाणी सुटले .. अग्गं
तोंडाला पाणी सुटले .. अग्गं आई गं .. आज नेमका शनीवार ..
लय भारी
लय भारी
नंदिनी, ताजा मासा कुठे मिळणार
नंदिनी, ताजा मासा कुठे मिळणार ग आम्हाला? कोल्ड स्टोरेजवालेच मासे मिळतात आम्हाला.
nandini, i disagree. Kitihi
nandini, i disagree. Kitihi taja, agdi goDya paNyatala masa asala tari mala tyacha vaas yeto.
salmon fish पण चालेल का?
salmon fish पण चालेल का?
वरदा, वो तुम्हारे नाक की
वरदा, वो तुम्हारे नाक की प्रॉब्लेम होगी. मला तरी मासा ताजा आहे की नाही हे शक्यतो वासावरूनच समजतं. (वास म्हणजे माश्याला येणारा वसवट वास. खार्या पाण्याचा वास अर्थातच येणार) गोड्या पाण्यातल्या माश्यांचा मला काहीच अनुभव नाही.
>>salmon fish पण चालेल का?>>
>>salmon fish पण चालेल का?>> हो. मी तेरीयाकी मॅरीनेड वापरते.
नंदिनी म्हणते तसा मासा ताजा असेल किंवा योग्य पद्धतीने साठवणूक केली असेल तर कोल्ड स्टोरेजचाही- तर वईस वास येत नाही. मासा गोड्या पाण्यातला असला तरी ताजा नसेल किंवा नीट फ्रोजन केला नसेल तर कळतेच. आमच्या कडे सगळे मासे प्रिवियसली फ्रोजन किंवा फ्रोजन असेच मिळतात.
प्रत्येक अन्नपदार्थाला
प्रत्येक अन्नपदार्थाला स्वतःचा असा वास असतोच. तो दुर्गंध असला, तर पदार्थ खाण्यायोग्य नसतो. नेहेमी मासा खाणार्याला हा मूळ वास 'चांगला' असे मेंदूत रजिस्टर्ड असल्याने, त्याचा त्रास होत नाही. काही वास काही लोकांना आवडत नाहीत. म्हणून काहींना मूळ वासाचाही त्रास होतो.
As simple as that.
करदलीच्या पानात केलीत तर नाही
करदलीच्या पानात केलीत तर नाही चालणार ना ?
कडवट लागेल. त्यापेक्षा सरळ
कडवट लागेल. त्यापेक्षा सरळ अॅल्युमिनियम फॉइल वापरा.
इब्लिस वरच्या पोस्टला
इब्लिस वरच्या पोस्टला +१
खार्या पाण्यातला मासा ह्याला वेगळा वास असतो तो बर्याच लोकांना आवडत नाही.
नदीतल्यांना खार्यापेक्षा सोम्य असतो तो इतका जाण्वत नाही.
म्हणूनच रोहू, काटला वगैरे काहींना ज्यास्त आवड्तात तर खारे मासे खाणारे नदीतील मासे इतक्या चवीने पसंद करत नाहीत.
आमच्यासारखेतर मासा म्हटले के लाळ गळणार. तरी खारे मासे( समुद्रातीलच) ज्यास्त चवीस्ट असे मा. म. आहे.:)
दुसरी पद्धत आहे, पुस्तकात
दुसरी पद्धत आहे,
पुस्तकात वाचलेली,
उकळीच्या टोपात, विनेगर, लवंग , आलं. पुदीनापानं टाकून चाळणीत फक्त हळदीच्या पानात मासा मीठ लावून गुंडाळून ठेवावा.
छान लागतो. भरम्साठ मसाल्याचा मारा नसल्याने माशाची चव व हलकासा हळदीचा पानाचा वास आणि लवंगाचा.