अभिप्राय

Submitted by संपादक on 23 October, 2014 - 21:05

वाचकहो,

आपणां सर्वांस दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा!

मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंक २०१४बद्दल आपले अभिप्राय येथे वाचण्यास आम्ही उत्सुक आहोत. अनेक मायबोलीकरांच्या स्वयंस्फूर्त सहभागामुळेच या अंकाची निर्मिती होऊ शकली, याची आम्हांस विनम्र जाणीव आहे.

बहुविध साहित्याने नटलेली ही निर्मिती आपल्याला कशी वाटली, हे जरूर सांगा. अंकातील प्रत्येक लेखावर प्रतिसाद देण्याचीही सोय आहे. ते सर्व प्रतिसाद या दुव्यावर पाहू शकता: http://vishesh.maayboli.com/navinlekhan

हितगुज दिवाळी अंक २०१४

विषय: 

आता आयफोनवरूनही अंक वाचता येतो आहे. त्याबद्दल धन्यवाद.
अंक प्रेझेंटेशनकरता आवडला. पानावरची नक्षी, चित्रं वगैरे मस्त आहेत. यंदा संपादक मंडळातल्या सदस्यांची चित्रं काढण्याची कल्पना नवीनच आहे. मजा आली बघायला. मेंडका वाचलेलं नाही पण त्यातली चित्रंही एकदम भारी जमली आहे. गुड जॉब कंसराज आणि मिनोती.

कंटेट (माझ्या आवडीचा) अतिशयच कमी वाटला यावर्षी. कथा विभागातही अगदी ४, ५ गोष्टीच फक्त. दिवाळी संवादही छान आहेत.बाकी हळूहळू वाचन चालू आहे.

सायोसारखेच माझे मत. साहित्य फारच कमी आहे. जे आहे ते पण क्वचित लिहिणार्‍या किंवा नाममात्र सदस्यत्व असलेल्या माबोकरांचेच जास्त आहे. खाद्ययात्रा विभाग तर टण्याने एकहाती लिहिला आहे म्हटले तरी चालेल .
इथे एरव्ही नेहमी भरपूर लिहिणार्‍या लोकांची दिवाळी अंकात साहित्य देण्याविषयी अनास्था का असवी हा एक नेहमीच्या चर्चेचा विषय आहेच !

सायोला अनुमोदन..!
अंकाची कलाकुसर, चित्रं मस्त आहेत.. दिवाळी संवादमधली दोन्ही मुलाखती छान! छोट्या जाहिराती एकदम हहपुवा Happy

साहित्य फारच कमी आहे. जे आहे ते पण क्वचित लिहिणार्‍या किंवा नाममात्र सदस्यत्व असलेल्या माबोकरांचेच जास्त आहे. >>> खरं आहे.
इतकंच नाही तर काही साहित्य माबोबाहेरच्या लोकांचंही असावं असं वाटलं.
दिवाळी अंकात बाहेरच्या लोकांचं साहित्य असणं मला तरी पटत नाही.
-----------------------------------------------------------------------------------------------------
इथे एरव्ही नेहमी भरपूर लिहिणार्‍या लोकांची दिवाळी अंकात साहित्य देण्याविषयी अनास्था का असवी हा एक नेहमीच्या चर्चेचा विषय आहेच >>> दिअंकात साहित्य न देण्याची बरीच कारणं असावीत
१) आपलं साहित्य नाकारलं गेलं तर..... ही शंका
२) लिहिलेलं केव्हा एकदा प्रकाशित करतो अशी घाई. त्यामुळे दिवाळी अंक येईपर्यंत धीर धरायची तयारी नसणे.
३) गुलमोहोरात प्रतिसाद मिळतायत ना, मग उगाच अंकासाठी कशाला पाठवायचं
४) मी फार दर्जेदार लिहितो/ते अशी धारणा. त्यामुळे कुणा सुमार लिहिणार्‍याच्या साहित्याबरोबर आपलं
साहित्य प्रकाशित होणं रुचत नसावं असंही कुणाच्या बाबत असू शकेल.

ह्याशिवायः

'खास दिवाळीसाठी म्हणून' असे काही वेगळे सुचत नसते. जे सुचते ते मात्र 'खास दिवाळी अंकात' घेतले गेल्याने त्याला अचानक 'रसिकांची खास ट्रीटमेंट' मिळावी अशी अपेक्षा निर्माण होते. (ही अपेक्षा प्रत्यक्षात लेखकाची नसतेच, दिवाळी अंक काढणार्‍यांची असू शकते आणि रसिकांची असू शकते). पण मुळात ते सुचणे काही विशेष वेगळे नसल्याने (व हे लिहिणार्‍याला स्वतःला माहीत असल्याने) लिहिणार्‍याला हे समजत नाही की 'खास दिवाळी अंकासाठी' म्हणून मी द्यायचे तरी काय?

अश्या परिस्थितीत स्थळाबाहेरील लेख अधिकाधिक घेणे हे (मला तरी) गैर वाटत नाही. ह्या विशिष्ट अंकात असे (स्थळाबाहेरून घेतलेले) साहित्य आहे किंवा नाही आणि असल्यास किती आहे हे मी पाहिलेले नाही.

संपादक मंडळाचं अभिनंदन ! अंक दर्जेदार झाला आहे असं वरवर चाळूनही जाणवतं आहे. अजून संपादकीय ,संपादक-ओळख (मस्त! ) ,कथा आणि कविता विभाग इतकंच वाचून झालंय , तयारीने लिहिलं आहे एकूणात.प्रतिसाद तिथे-तिथे देतेच आहे. कवितावाचनाची एकच क्लिप ..असायला हरकत नाही, पण ते सुटंसुटंही त्या त्या कवितेसोबत असायला हवं होतं आणि ते अजून थोडं तब्येतीने, ठाशीव व्हायला हवं होतं. मांडणी ,रेखाटनं , सजावट आवडली.

या अंकात माबोबाहेरील लोकांचे लिखाण आहे की नाही हे मला माहित नाही. पण अ-माबोकर लोकांचे लेख घेण्यात का चुकीचे वाटावे?
एखाद्या कॉलनीत जेव्हा गणेशोत्सव होतो तेव्हा कॉलनीतल्या लोकांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम असतात पण त्याचबरोबर एकुणात कार्यक्रमांचे कलेक्शन जास्तीतजास्त दर्जेदार व सर्वांना काहीतरी आवडेल अश्या प्रकारचे असावे यासाठी कॉलनीबाहेरूनही काही कार्यक्रम मागवले जातातच की.
तसाच हा प्रकार आहे. अंक जास्तीत जास्त चांगला होणे महत्वाचे आहे की माबोकर/अ-माबोकर हा घोळ घालणे?
अर्थात यासंदर्भात संस्थळाचे काही स्पष्ट धोरण असेल तर मला माहित नाही.

दिवाळी अंकासाठी खास न सुचणे वा एकुणातच त्या ठराविक वेळेला काही न सुचणे हा अनेकांचा खरोखरीचा प्रॉब्लेम असू शकतो.

क्वचित लिहिणार्‍या किंवा नाममात्र सदस्यत्व असलेल्या माबोकरांचेच जास्त आहे. <<< हा खरंच प्रॉब्लेम आहे? म्हणजे नेहमीच्याच लोकांनी लिहिले तर त्याच त्याच लोकांचे घेतले जाते यावर एक रडगाणे बाफ चालतोच अनेकदा दिवाळी अंक प्रसिद्ध झाला की. आता नेहमीपेक्षा वेगळ्या लोकांचे आहे तर ती समस्या झाली...
पयले नक्की करो बाबा!!

माबोबाहेरच्या लोकांचे लेखन अंकात येण्यात मलाही काही चूक वाटत नाही. जे लोक अजून माबोवर लिहीत नाहीत ते (अंकात लिहील्यावर) कदाचित मग पुढेही येथे लिहीतील.

कथा विभाग मलाही खूप लहान वाटला.

Happy नाही नाही , नेहमी न लिहिणार्‍यांनी लिहिले हा प्रॉब्लेम नाही. माबोबाहेरच्या लोकांचे लेखन असणे हा पण नाही . नेहमी लिहिणार्‍यांचे साहित्य दिसले नाही ये समश्या है! Happy

दिवाळी अंकासाठी खास न सुचणे वा एकुणातच त्या ठराविक वेळेला काही न सुचणे हा अनेकांचा खरोखरीचा प्रॉब्लेम असू शकतो. >> हो बरोबर. मेंडकेचा सल्ला चे प्रश्न महिनाभर माहीत असून मला ३-४ च उत्तरे सुचली होती.

अजुन पूर्ण वाचून व्हायचा आहे. पण सजावट व ओव्हरऑल खूप आवडला अंक!!
पूर्वाने घेतलेली मेघना एरंडेची मुलाखत जबरी. किती टॅलेंटेड आहे ती!
'गंध' कथा पण छान. प्रेडिक्टेबल शेवट असेल असं वाटलेलं पण मला धक्का मिळाला थोडा. Happy
मेंडकेंचा सल्ला फारच भारी. मी सगळ्यात आधी हाच भाग वाचला. एकदम नाविन्यपूर्ण भाग यावेळेचा. मेंडकेची चित्रं खूप मस्त!

आता पूर्ण वाचेन, पण कथा-ललितं मात्र खूपच कमी वाटली त्यामानाने.

एखादी बिनबक्षीसाची (किंवा छोट्याश्याच बक्षीसाची) स्पर्धा घेऊन त्यातील पाच विजेते लेख दिवाळी अंकात प्रसिद्ध अशी क्लृप्ती लढवता येऊ शकते. अर्थात हे लेख प्रकाशित न करता दिवाळी साहित्यासारखे गपचूप पाठवायचे.

छोट्याश्या बक्षीसासाठी माबोकरांमधूनच स्पॉन्सरशिपसाठी आवाहन करता येऊ शकते. वा जे योग्य वाटेल ते, हा महत्वाचा मुद्दा नाही.

एखादी बिनबक्षीसाची (किंवा छोट्याश्याच बक्षीसाची) स्पर्धा घेऊन त्यातील पाच विजेते लेख दिवाळी अंकात प्रसिद्ध अशी क्लृप्ती लढवता येऊ शकते. अर्थात हे लेख प्रकाशित न करता दिवाळी साहित्यासारखे गपचूप पाठवायचे. >>> अरे पण दिवाळी अंकात साधारण याच पद्धतीने निवड होत असेल ना? Happy

दिवाळी अंकातील साहित्यावर प्रतिसाद दिला की तो नेहमीच्या 'नवीन लेखन' मधील पानावर दिसत नाही असा नुकताच अनुभव आला. फक्त 'अभिप्राय' सदरातील प्रतिसाद 'नवीन लेखन' मधे दिसतो.
वास्तविक दिवाळी अंकातील प्रत्येक सदरात दिला गेलेला प्रतिसाद नवीन लेखनात दिसण्याची सोय हवी.
ज्यायोगे अंकात घडणारी हालचाल सतत सर्वांच्या नजरेसमोर राहील.

संपादक मंडळाचे अभिनंदन.
अंक फारच वरवर पाहिला असल्याने त्यावर काहीच लिहीणे योग्य नाही. मेंडकेच्या चित्रांबद्दल वाचून उत्सुकतेने फक्त तीच पाहिली. खरंच खूप छान आहेत. पण मूळ संकल्पना बघता त्या प्रकारातले कंटेंट शॉर्ट आणि क्रिस्पी असेल अशी अपेक्षा होती. फार तर फार दोन पानात सर्व प्रश्नांची उत्तरे मावतील असे. एवढे लांबलचक सल्ले वाचायचा कंटाळा आला. त्यामुळे मुख्य आकर्षणच गोत्यात आलेय की काय असे वाटले. पण मूळ कल्पना चांगली होती.

अरे पण दिवाळी अंकात साधारण याच पद्धतीने निवड होत असेल ना?
>> अरे दा पण त्यालाच स्पर्धेचे नाव दिले की साहित्य पाठवणार्‍यांची मेंटेलिटी बदलते, थोडा उत्साह संचारतो अंगात, कोतबो स्पर्धेच्या वेळी हे पाहिलेय. Happy

मेंडकेची चित्रे लय भारीच...!

>>पण मूळ संकल्पना बघता त्या प्रकारातले कंटेंट शॉर्ट आणि क्रिस्पी असेल अशी अपेक्षा होती. फार तर फार दोन पानात सर्व प्रश्नांची उत्तरे मावतील असे. एवढे लांबलचक सल्ले वाचायचा कंटाळा आला

अनुमोदन!

किरण सामंत यांचे कविता वाचन आवडले.

बाकी, साहित्य घेताना कुठलिही गाळणी वा चाळणी वापरली नसावी असे वाटते.

अजून थोडाच वाचलाय तरी त्या फाँट्स ने डोळ्यातून पाणी काढलय... संपूर्ण वाचणे धाडस ठरेल. Happy

अंक वरवर चाळला आहे. थेट त्या-त्या पानांवर प्रतिक्रीय द्यायच्या आहेत, पण माझं लॉगीन रोमन असल्यामुळे तिथे लॉगीनची सोय नाही Sad

संपादक मित्रहो,
अतिशय देखणा झाला आहे अंक!
अनेक गोष्टी इनोवेटिव्ह आहेत ह्यावर्षी : हेडर्स, लेखकांची ओळख, लिखाण कव्हर करणार्‍या ऑडियो क्लिप्स
हे म्हणजे दर नव्या संपादक मंडळाने पुढच्या वर्षींच्या मंडळासाठी एक बेंचमार्क तयार करणे आहे... दरवर्षी अंक सरस होतो आहे..

बेसनाचे- रव्याचे लाडू, चकल्या, बारीक शेव, लसूणी शेव, चिवडा तयार करून अभ्यंगानंतर समोर आणून ठेवल्यावर चार घासात फडशा पडतो हो त्याचा, त्यामागची महिनाभराची तयारी आणि ऐनवेळची मेहनत गृहीणीच जाणो! आणि त्याचवेळी अशी आयती प्लेट हातात पडल्यावर तिला आस्वादता येणं महत्वाचं!

सोपं नाही आपापला व्याप सांभाळात, अनेक लोकांशी संपर्क करत अंक तयार करणं...
खूप खूप compliments!!!
मला सगळेच सदर आवडलेत.. सगळेच!
ऑडइयो क्लिप्सदेखील उत्तम झाल्यात..
तुमच्या मेहनतीला मनापासून सलाम!

ह्यावर्षी वाचलेल्या सार्‍या ऑनलाईन अंकातल्यापैकी माबोचा अंक सरस झाला आहे, आणि त्याचं संपूर्ण श्रेय संपादक मंडळाला जातंय!
ब्राव्हो!

दिवाळी अंकाची तुलना कोतबो स्पर्धेसोबत
>>>>>

एक्झॅक्टली नंदिनी, यही सोच तो बदलनी है.

दिवाळी अंकाला बरेच जण साहित्य देत नाही याचे कारण एक म्हणजे रिजेक्ट होण्याची भिती आणि तशी भिती वाटण्याचे कारण म्हणजे दिवाळी अंक म्हटले की खूपच दर्जेदार लेखन हवे जे आपल्याने कधी झाले नाही वा सात्यत्याने होत नाही असे वाटणे. हि भितीच काही लिहू देत नाही, मग ते दर्जेदार आहे की नाही हे ठरवणे दूरच राहिले.

याउलट कोतबो सारख्या स्पर्धेत, किंवा याआधीही इथे काही स्पर्धा झाल्या असतील त्यावर नजर टाकल्यास आढळून येईल की कित्येक रेग्युलरली न लिहिणार्‍यांनी शॉर्ट पीरीअडमध्ये कसलीही भीड न बाळगता ट्राय मारली. आणि यातून कित्येकांना आपणही चांगले लिहू शकतो याचा शोधच लागला असावा. जर ती तशी ट्राय मारायला जास्तीत जास्त लोकांना उद्युक्त केले तर नक्कीच बरेच साहित्य जमा होईल. त्यातही दिवाळी अंकात एखाद्या नॉनरेग्युलर लेखकाचा लेख सिलेक्ट झालेला बघून अरे त्या अमुकतमुक सारखा लिहू शकतो तर मी का नाही याने हि संख्या वाढत जाईल.

दिवाळी अंकाला आपणही साहित्य देऊ शकतो हा आत्मविश्वास जास्तीत जास्त लोकांमध्ये जागवण्याची गरज आहे. जेणेकरून पर्याय वाढतील. अन्यथा ज्या नावाजलेल्या लेखकांकडे तो आत्मविश्वास आहे ते देखील सातत्याने चांगलेच लिखाण देतातच अश्यातलाही भाग नसतोच Happy

आणि हो, राहिला प्रश्न दिवाळी अंकाच्या दर्जाचा, तर आलेल्या साहित्यापैकी काय घ्यायचे आणि काय नाही इथे फिल्टर लावायचा हक्क संपादक मंडळाला आहेच की. Happy

दिवाळी अंकाला बरेच जण साहित्य देत नाही याचे कारण एक म्हणजे रिजेक्ट होण्याची भिती आणि तशी भिती वाटण्याचे कारण म्हणजे दिवाळी अंक म्हटले की खूपच दर्जेदार लेखन हवे जे आपल्याने कधी झाले नाही वा सात्यत्याने होत नाही असे वाटणे. हि भितीच काही लिहू देत नाही, <<
हेच एकमेव कारण आहे हे नक्की?

हेच एकमेव कारण आहे हे नक्की?
>>>>>>
एकमेव असा दावा मी कुठे केला, हे एक कारण झाले आणि माझ्यामते तो एका फार मोठ्या गटाला लागू होतो. मी सांगितलेला उपाय या कारणावर इलाज ठरेल असे मला वाटते. किंवा आपणही अश्यांना प्रोत्साहन द्यायचा आणखी एखादा मार्ग सुचवू शकता.

तसेच आपल्या वरच्या पोस्टवरून समजतेय की नक्कीच आपल्या डोक्यात इतरही कारणे आहेत, आपण ती सांगा, त्यावर त्यानुसार इतर उपाय शोधता येतील Happy

Pages

Back to top