एगलेस अवाकाडो मूस

Submitted by दिनेश. on 6 October, 2014 - 06:21
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
दोन जणांना पुरेल.
अधिक टिपा: 
माहितीचा स्रोत: 
दुबई मॉलमधे अवाकाडो जिलेटो खाल्ले होते, त्यावरून सुचले.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अविकुमार, ते अंजीर फ्लेवरचे ग्रीक योगर्ट आहे. फक्त फोटोसाठी वापरलेय नाहीतर हा प्रकार नुसताच छान लागतो.

Tempting!

आवोकाडो हे मुळात फळ कमी भाजी जादा टाईप प्रकार आहे त्यामुळे त्यात दुध वगैरे टाकणे थोडं विचित्र वाटतं (मला).
नुसता आवोकाडो सॅलड मध्ये टाकून खाताना टेक्सचर जरी क्रिमी लागले तरी ते आंब्यासारखे क्रिमी लागत नाही तर थोडं तेलकट लागतं. एखादा ऑईली फिश खाताना कशी चव येते साधारण तशी चव लागते त्यामुळे दुधात मिक्स केल्यावर थोडा विचित्र लागेल असं वाटतं.

आभार,
वैद्यबुवा.... प्रत्येकाची आवड वेगवेगळी असू शकते. बाकी जगात अनेक देशात असे मिल्कशेक्स, स्मूथी, जिलेटो खाल्ले जातात. मी ते चाखलेही आहेत. तूम्ही खावेच असा काही आग्रह नाही हो Happy

http://www.huffingtonpost.com/2014/04/23/avocado-smoothies_n_5193023.html

वैद्यबुवा,
अरेरे, दूधापासून सुरु करून आंबा ते फिश अशी सगळी तुलना करून झाली. एकाच पदार्थाला इतकी नावं?

इतना भी रोता क्युं है बच्चू, जबरदस्ती है क्या? असे आम्ही कॉलेजमध्ये म्हणायचो ते (उगीच) आठवले. Proud (ह. घ्या.)

---------------------------------------------

अवाकडो नुसता देखील मस्त लागतो. एकदम लोण्यासारखा. त्यात दही मिक्स करून मस्त लागते. मी तर एक जेवण म्हणून दही अवाकडो खाते. पुर्ण जेवण होते दही व अवाकडो.

मस्तच.

छान दिसतय... रंग सुंदर आलाय Happy

ती योगर्ट ची टोपी नको होती सजावटीत... हेमावैम.

अवाकाडो आवडतो.. पण शक्यतो सॅलड्स, डीप्स, स्प्रेड्स, या स्वरूपात. याचे गोड प्रकार मला नाही आवडत. एकदा अवाकाडो स्मुदी प्यायले होते पण बात कुछ बनी नही... असो.. पसंद अपनी अपनी Happy

वॉव, केव्हढा मोठा होता अवाकाडो???

मस्त दितीये रेसिपी..
दुधा ऐवजी योगर्ट घेतलं तर किती लागेल्??अंदाजे?

ग्वाकमोल तर मस्त लागतंच
पण दिनेश, इंडोनेशियाला अवाकाडो जूस ट्राय केलास कि नाही?? अवाकाडो पल्प, sweet condensed milk,
थोडासा गूळ, पाणी एकत्र करून ब्लेंड करतात ...सिंपली यम्मी!!!!!!!!

वर्षू, हा अवाकाडो साधारण आपल्याकडच्या नारळाएवढा मोठा होता. पण जेवढा गर असेल तेवढे योगहर्ट लागेलच.
हा गर आणि दूध ब्लेंड केले कि थोड्यावेळाने ते आपोआप घट्ट होते.

लाजो, मला हा मूस सेट होईल असे अजिबात वाटले नव्हते. योगहर्ट आधीच डिशमधे होते त्यातच मूसचा मोल्ङ उपडा केला. मी न्यू झीलंडला अवाकाडो खाल्ला होता तो लहान आकाराचा आणि खडबडीत सालाचा होता.
त्याचे ग्वाकामोलेच चांगले होते.
आफ्रिकेतले अवाकाडो आकाराने बरेच मोठे आणि स्मूथ सालीचे असतात. मूळातच त्यांना क्रिमी टेक्स्चर असते.
स्थानिक लोक ब्रेड्बरोबर किंवा भाताबरोबरही खातात. याचे गोड पदार्थ चांगले लागतात.