Submitted by ऋन्मेऽऽष on 25 October, 2014 - 08:09
नवरात्री असो वा गणपतीचा सण, रात्रीच्या वेळी लाऊडस्पीकर लावण्यासंदर्भात जशी वेळमर्यादा असते तशी कानठळ्या बसवणार्या फटाक्यांच्या संदर्भात नाही का?
आमच्या मुंबईचे म्हणाल तर रात्री साडेबारा वाजेपर्यंत तूफान आतिषबाजी चालू असते. त्यानंतरही साधारण दोन वाजेपर्यंत मधूनच रात्रीच्या नीरव शांततेचा फायदा उचलत एखादा फटाका काळजात धडकी भरवतोच. हे झाले तरुणांचे हाल. वृद्धांची आणखी चीडचीड होत असेल आणि लहानग्यांची रडारड.
काही ठोस कायदा नाही का यावर? कारण फटाके इत्र तित्र सर्वत्र वाजत असल्याने ठराविक कोणाची तक्रार करण्यात अर्थ नाही, वा ते संभव नाही.
धन्यवाद,
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हिंदू धर्मावरच बोला?
हिंदू धर्मावरच बोला? वर्षातून अवघे 5 दिवसतर फटाके वाजतात. हिंदू धर्मावर बोलायची फैशनच निघाली आहे
खर तर परदेशात अमेरीका सोडता
खर तर परदेशात अमेरीका सोडता फटाके वाजवण्याला परवानगी नाही. काही ठरावीक वेळी म्युन्सीपल कॉरपोरेशन्स फायर शो करतात ज्यात रोषणाई वाले फटाके उडविले जातात आणि त्याचा आनंद जनता लुटु शकते.
आपल्याकडे यावर जनमत तयार व्हायला हवे.
गेल्या दहा पेक्षा जास्त वर्षात लक्ष्मी पुजन सोडता फटाके उडविण्याचे प्रमाण कमी होत आहे याचे कारण शाळांमधुन मुलांना आवाज आणि हवेचे फटक्याने होणारे प्रदुषण यावर समुपदेशन होते याचा परिणाम दिसत आहे.
माझ्या मुलीने २००० साली निर्धाराने फटाके वाजवायचे नाहीत. मी ही नाही आणि घरात कुणीच नाही ही घोषणा ती आठवीत असताना केली. तेव्हापासुन आजपर्यंत आम्ही फटाके वाजवले नाहीत.
त्रास होतोच पण हिंदु धर्म फारच लवचीक आहे. यात फटाके फोडा असा कोणताच धर्म ग्रंथ सांगत नाही. गणेश उत्सव सुध्दा आवाजा शिवाय करणे शक्य आहे.
दिवाकरजी, चुकीचे आहे त्याला धर्माचा संबंध कशाला जोडायचा ?
रात्री ३ वाजता वगैरे
रात्री ३ वाजता वगैरे सेलेब्रिटीज, अतिमहत्वाच्या व्यक्ती, धर्मगुरू, नयायाधीश, पोलीस कमिशनर अशांच्या घराजवळ वाजवून पहा. आपोआप कायदा आहे किंवा नाही, असल्यास कोणता याची माहीती होईल.
भारतातच जास्तीत जास्त
भारतातच जास्तीत जास्त बेशिस्तीचे प्रकार घडतात याचे कारण वैयक्तिक शिस्त पाळली जात नाही.
१. फटाके वाजवणे : कधी नि कुठे याचे ताळतंत्रच नसते : रात्री बेरात्री कधीही नि भर रस्त्यावर सुद्धा.
२. सिग्नल न पाळणे : आम पब्लिक आपलाच हक्क असल्याचे समजून गाड्या चालवतात.
३. सार्वजनिक स्वच्छता : रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी, गाडीतून बाहेर डोकावून, जिन्यांमध्ये थुंकणे, नाक शिंकरणे, कुठेही शौच करणे, कचरा फेकणे इ.
४. अनधिकृत बांधकाम करणे : हावेचा अतिशय बेकार प्रकार आहे हा!
आणि अनेक.....
खर तर परदेशात अमेरीका सोडता
खर तर परदेशात अमेरीका सोडता फटाके वाजवण्याला परवानगी नाही.
>>> काय सांगता राव.. इथे लंडनमध्ये येउन बघा. भारतापेक्षा जास्त फटाके फूटत आहेत गेल्या ३-४ दिवसात.
>>> काय सांगता राव.. इथे
>>> काय सांगता राव.. इथे लंडनमध्ये येउन बघा. स्मित भारतापेक्षा जास्त फटाके फूटत आहेत गेल्या ३-४ दिवसात.
<<
तुम्हाला त्यातलं काही समजत नाही, तस्मात तुम्ही बोलू नका. ते सांगताहेत ना? तेच खरं असतं. समज्ल?
अवांतर प्रतिसाद उडालेमुळे
अवांतर प्रतिसाद उडालेमुळे अॅडमिनचे आभार.
दिवाकरजी, धर्माचा इथे काही एक संबंध नाही, तसेच फटाक्यांनाही विरोध असा नाहीच कारण एकेकाळी आम्हीही वाजवलेतच, पण तेव्हाही कोणाला त्रास होतोय असे लक्षात आल्यास वा कोणी विनंती केल्यास थांबवलेही आहेतच. इथे प्रश्न आहे तो रात्रीबेरात्री फटाके वाजवण्याचा. माझ्या माहितीप्रमाणे रात्री १२-१ नंतर फटाके वाजवून सण साजरा होत नसावा.
नितीनचंद्र यांच्याशी सहमत, जे चुकीचे आहे त्याला धर्म जोडून आपणच आपल्या धर्मावर एकप्रकारे बोट ठेवतोय.
डिविनिता,
आपल्या येथील शिस्तीबाबत सहमत. आणि त्यामुळे कोणाला शिस्त लावायच्या भानगडीतही पडायचे नाही. म्हणून तसा कायदा आहे का विचारणा करतोय कारण कायद्याचा बडगा उगारणे सोपे पडते.
अवांतर - आपल्याइथे लोकांना रोषणाईच्या फटाक्यांपेक्षा धडामधुडूम आवाजाच्या फटाक्यांचे जास्त कौतुक वा मोठेपणा असतो. बहुतेक हे तुलनेत स्वस्तही पडत असावेत.
इब्लिस्जी, धन्यवाद, मी कुठे
इब्लिस्जी,
धन्यवाद, मी कुठे चुकतो यावर आपण कायम लक्ष ठेऊन असता.
माझा एक नातेवाईक पॅरीसला रहातो. त्याने सांगीतलेली माहीती मी लिहली. ही माहिती अनेक देशात प्रवास केलेल्या माझ्या मेहुण्याने प्रमाणित केली आहे.
मी स्वतः परदेशात गेलो नाही. पण फ्रान्स मधे फटाके उडवण्यास ( वैयक्तीक रित्या ) बंदी असेल तर याबाबत जनमत तयार होऊन आपल्याकडे ही यायला हवे.
कायदे आहेत ना . पण पाळायचे
कायदे आहेत ना . पण पाळायचे कुणी? आता दुचाकी चालवताना हेल्मेट घालावे हा झाला कायदा. पण देशाचे परिवहन मंत्री गडकरीजी हे हेल्मेट न घालता स्कूटर चालवत जाताना टीव्ही वर पाहिले. आता केंद्रीय मंत्री स्कूटर वर जातात त्याचे कौतुक करावे की स्वतःच्या खात्याचा नियम मोडतात म्हणून त्यांचेवर कारवाई करावी? आणि कोणी करावी?
हे आपले आदर्श. परवा ओबामाला एका कर्मचार्याने ओळखपत्र मागितल्याचा व्हिडिओ पहाण्यात आला....आणि ओबामानी ते दाखवलेल्ही....
>>परवा ओबामाला एका
>>परवा ओबामाला एका कर्मचार्याने ओळखपत्र मागितल्याचा व्हिडिओ पहाण्यात आला....आणि ओबामानी ते दाखवलेल्ही....<<
हो हो. जगातला सर्वात पावरबाज माणुस असला म्हणुन काय झालं, त्यांचं क्रेडीट कार्ड न्युयाॅर्क मध्ये डिक्लाइन होतं...
ओबाम्याचे आय डी कार्ड
ओबाम्याचे आय डी कार्ड !
https://www.youtube.com/watch?v=o6dPYynO860
गडकरी हेल्मेट शिवाय...
https://www.youtube.com/watch?v=wszmZNof_lY
अॅडमिन मनापासून धन्यवाद
अॅडमिन मनापासून धन्यवाद
कायदे आहेत ना . पण पाळायचे
कायदे आहेत ना . पण पाळायचे कुणी?>>अनुमोदन. मीही हाच मुद्दा मांडला आहे, स्वयंशिस्त असेल तरच कायदे करून उपयोग आहे. अन्यथा कायदे कागदावरच राहतात.
ऋन्मेऽऽष >> होना आपण इतराना
ऋन्मेऽऽष >> होना आपण इतराना नाहीच शिस्त लावू शकत, पण स्वत: शिस्तीने नक्कीच वागू शकतो.
विनिता, नक्कीच. पण आपल्याकडे
विनिता, नक्कीच.
पण आपल्याकडे होणार्या बेशिस्त वर्तनाला मोठ्या प्रमाणात जबाबदार असते ते "चलता है" अॅटीट्यूड. आणि हा अॅटीट्यूड घालवायला तरी कायद्याची गरज आहे.
तसेच बरेच लोकांच्या तर ध्यानीही नसते की आपल्या या वर्तनाने इतरांना त्रास होतोय. कायदा झाल्यावर निदान अश्या लोकांना समजते की अश्या कायद्याची गरज आहे म्हणजेच कोणालातरी याचा त्रास होत असणार.
बरेच लोकांच्या तर ध्यानीही
बरेच लोकांच्या तर ध्यानीही नसते की आपल्या या वर्तनाने इतरांना त्रास होतोय.<<< +१
हाच बेसिक प्रॉब्लेम आहे. फक्त फटाके असे नव्हे तर ट्रॅफीक, मिरवणूका अश्या अनेक बाबतीत!
ऋन्मेऽऽष अनुमोदन
ऋन्मेऽऽष अनुमोदन
लंडन मधे लक्ष्मी पूजना च्या
लंडन मधे लक्ष्मी पूजना च्या दिवशी भारता सारखे फटाके वाजले.
ही लोक लाज आणतात मला.
लंडन मधे लक्ष्मी पूजना च्या
लंडन मधे लक्ष्मी पूजना च्या दिवशी भारता सारखे फटाके वाजले. >> मग भारतासारखं "स्वच्छता अभियान" राबवलं की नाही??
फटाके वाजवण्यावर वेळेचे बंधन
फटाके वाजवण्यावर वेळेचे बंधन कायद्यात नाही, जसे वाद्ये वाजविण्यावर आहे. १२० डेसिबलच्या वर ध्वनी निर्माण करणार्या फटांक्यांवर मात्र कायद्याने बंदी आहे.
फटाके वाजवण्यावर वेळेचे बंधन
फटाके वाजवण्यावर वेळेचे बंधन कायद्यात नाही, जसे वाद्ये वाजविण्यावर आहे.
>>
शप्पथ मग कुठेतरी असा नियम बनवायची गरज आहे. याबाबत आपण ठरवले तर काय करू शकतो, कोणी मार्गदर्शन करेल का? म्हणजे कोणाला मेल वा कुठे अॅप्लिकेशन वगैरे?
निदान रात्रीसाठी १२ नंतर १२० च्या जागी ६० करता येणार नाही का?
किंबहुना शून्यच.
कारण १२० डेसिबल हे साऊंडचे युनिट झाले आणि नॉईज (गोंगाट) म्हणजे अनवांटेड साऊंड. आणि १२ नंतर आम्हाला कसलाही आवाज नको असतो.
अवांतर - हा १२० डेसिबल म्हणजे नक्की केवढा असतो
रात्री १० चा नियम आहेच लागू.
रात्री १० चा नियम आहेच लागू.
रात्री १० चा नियम आहेच
रात्री १० चा नियम आहेच लागू.
>>
आता हा कुठे? ईंग्लंड लंडन का पॅरीसला?
मला वाटते आवाजासाठी सरसकट
मला वाटते आवाजासाठी सरसकट कायदा आहे... पण फटाक्यांसाठी असा काही नाही... चेक करून सांगते
१२० डेसिबल म्हणजे सुतळी बाँब
१२० डेसिबल म्हणजे सुतळी बाँब असावा..
फटाक्यांबाबत वेळेच्या नियमाय सुस्पष्टता नाही
इथ देडेसिबेल्सच्या
इथ देडेसिबेल्सच्या तीव्रतेच्या तुलने चा चार्ट आहे....
http://www.gcaudio.com/resources/howtos/loudness.html
काल टीव्हीवर एका मराठी
काल टीव्हीवर एका मराठी मालिकेत एक पोलीस इन्स्पेक्टर "रात्री दहा नंतर फटाके वाजवू नका" असं सांगताना दाखवला आहे. कदाचित कायदा नाही पण पोलीस वेळोवेळी सूचना / आज्ञा देतात तसं काहीसं असावं.
वैयक्तिक मत: आवाज वाले फटाके असतील तर रात्री दहाची मर्यादा हवीच.
रॉबिनहूड, आपला चार्ट पाहिला.
रॉबिनहूड,
आपला चार्ट पाहिला. उपयुक्त माहिती. १२० म्हणजे खूपच झाले.
वेळेची अशी ठोस मर्यादा बहुतेक नाहीयेच. इतरही चौकशी करता काही सापडले नाही.
आमच्या सोसायटीमध्ये मागे एका
आमच्या सोसायटीमध्ये मागे एका मुलाचे लग्न झाले. त्याची वरात रात्री १ वाजता आली. तेव्हा म्हणजे रात्री १ वाजता १०००० ची माळ आणि परत रस्सीबॉम्ब लावण्यात आले! विशेष म्हणजे ज्याचे लग्न झाले त्याची बायको ही बालरोगतज्ञ आहे!!!
यंदाही १० चा नियम आहे आणि
यंदाही १० चा नियम आहे आणि भाजपा समर्थक किंवा हिंदुत्ववादी याला विरोध करत आहेत का?
कारण माझ्या फेसबूकफ्रेंडलिस्टमधील बरेच या गटात मोडणारे मित्र आम्ही मुद्दाम १० नंतर फटाके फोडणार अश्या पोस्ट टाकत आहेत...
आवाज न करणारे किंवा कमी
आवाज न करणारे किंवा कमी आवाजाचे फटाके फोडायला हवेत.नाहीच फोडले तर सर्वोत्तम. ते हजार, दहा हजार ची लड वगैरे फार प्रदुषण कारक आहेत. त्रास दायकच असतात फटाके. प्रत्येक गोष्टीला कायदाच कशाला हवा.
फटाके वाजवण्यावर बन्धन घालावे
फटाके वाजवण्यावर बन्धन घालावे असे जर महाराष्ट्र सरकारने सान्गितले तर राठा व उठा या दोघान्च्या सेना उभ्या राहतील ते मोडायला. उठा सरकार सोडून जाण्याची भाषा करतील तर राठान्चे सैनिक काही तोडफोड करतील. शिवाय बारामतीकर पण हे सरकार काही महिन्यान्चे आहे राष्ट्रवादी सरकार आल्यावर हे बन्धन काढण्यात येईल असा प्रतिसाद देतील.
फटाक्यावर बंदी आली तरी हरकत
फटाक्यावर बंदी आली तरी हरकत नाही!
नाही वाजविले तरी चालेल!
पण उद्या दिवाळीचे अभ्यंगस्नान सुर्योदयानंतरच करावे असा काही फतवा काढू नये. ऊगा इतरांची झोपमोड होते बिल्डिंगमधील इतरांची म्हणून!
सांगता येत नाही कुणी तरी तक्रार दाखल करतील सोसायटीतील मंडळी..
सर्वोच्च न्यायालयाच्या
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री
8- 10 च फोडता येणार फटाके
@मटा
हिंदू धर्मावरच बोला? वर्षातून
हिंदू धर्मावरच बोला? वर्षातून अवघे 5 दिवसतर फटाके वाजतात. हिंदू धर्मावर बोलायची फैशनच निघाली आहे। >>>> मी हिंदू आहे, धर्माचा अभिमान वगैरे नाही पण हिंदू लोकांवर नॉन हिंदू मित्रमैत्रिणींनी टीका केली तर टोचतं आणि लॉजिकल युक्तिवादही केला जातो, पण तरी इथे सगळे हिंदु आहेत असं अस्युम करून आणि हिंदूंची आपापसात चर्चा आहे त्यामुळे स्वतःच्या चुकांच अवलोकन म्हणून मी हे मुद्दे लिहिते.
बाकी 2-3 धर्म वर्षभरात जेमतेम 3-4 सण साजरे करतात. हिंदू वर्षात मिनिमम 18-20 सण साजरे करतात. बरं स्वतःपुरते करतील तर तसे नाही, हल्ली सगळं सार्वजनिक. बाकी धर्माच्या सणापेक्षा हिंदू सण त्रासदायक होताहेत.
गणपती सार्वजनिक, मग सार्वजनिक देवी बसवणं चालू झाले ( हे आधी फक्त बंगालमध्ये होत, हल्ली महाराष्ट्रात पण गल्लोगल्ली चालू झालं. हे काही टिळकांनी सांगितलं नव्हतं, पण हौसच अति), मग देवीची तोरणं नेणं सार्वजनिक झालं, दहीहंडी आहेच, दांडिया 10 दिवस, मग कोजागिरी ( ती सुद्धा बागेत जाऊन करणार, सिंहगडावर करणार आणि येताना प्रचंड कचरा करून येणार), आंबेडकर एवढा ज्ञानी माणूस पण त्यांची जयंती रात्रभर लाऊडस्पीकर आणि रोडसवर जत्रेसारखी गर्दी करून, एकुणात सार्वजनिकच सेलिब्रेशन, मग दिवाळी, होळी आहेच, उरलेल्या वेळेत बारसं, लग्न, घरची पूजा, सार्वजनिक सत्यनारायण हे सगळं लाऊडस्पीकर लावल्याशिवाय होतच नाही.
या सगळ्या सणाउत्सवात, रस्त्यावर मंडप त्यामुळें वाहतुकीची वाट, खड्डे खणून रस्त्यांची अजून दुर्दशा, पैसे वेळ यांचा गरजेपेक्षा जास्त अपव्यय, आवाज, गुलाल, फटाके, यांचं प्रदूषण, मूर्ती विसर्जन करून पाणी खराब करायचं, पत्री, सोनं, पूजा साहित्य या नावाखाली निसर्ग ओरबाडायचा........
या सगळ्या समरी नंतर हिंदू सणांची चीड नाही येणार तर काय?
गणेशोत्सवात एक भयानक प्रकार
गणेशोत्सवात एक भयानक प्रकार पाहिलेला. मद्यधुंद अवस्थेतील काही कार्यकर्ते कंटीन्यु सु.बॊम्ब लावत होते. आजुबाजुने जाणाऱ्या वाहनांना त्रास होत होता. वाहनांवरती लहान मुले, स्त्रिया होत्या. पण त्यांना काळजी वाटत नव्हती. अगदि निर्बुद्ध आणि होपलेस असतात असे गणेशोत्सवातील पुवेका.
सर्वोच्च न्यायालयाच्या
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री
8- 10 च फोडता येणार फटाके
@मटा
>>>>>>
कमॉन हे मटा कोण लागून गेलेत.. आणि सकाळी काय प्रॉब्लेम आहे.
नरकचतुर्दशीला तर सकाळीच अभ्यंगस्नान करून फ्टाके फोडूनच अभ्यंगसनान करायचे अशी प्रथा आहे आमच्यात..
"अभ्यंगस्नान करून फ्टाके
"अभ्यंगस्नान करून फ्टाके फोडूनच अभ्यंगसनान करायचे" - infinite loop!
आय माय सॉरी फाफे... टाईपो
आय माय सॉरी फाफे... टाईपो झाला
अभ्यंगस्नान करून फटाके फोडूनच फराळ करायचा अशी प्रथा आहे आमच्यात..
जर रात्री आठपर्यण्त फराळ लांबला तर दिवसभर उपास होईल आणि दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आमचा रोजा होईल..
आता सुप्रीम कोर्ट मटाच्या संगमतीने आमचा धर्म बदलणार का? सुप्रीम कोर्टाचे डोके ठिकाणावर आहे का?
भास्करराव, झोपा आता. काही
भास्करराव, झोपा आता. काही चाललय. बरेच टायपो झाले
आठपर्यण्त - आठ पर्यंत
संगमतीने - संगनमतानं
फाफे - फेफ
यंदा कोरोनाच्या
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फटाके फोडण्यासंदर्भात काय नियम आहेत हे जाणून घ्यायला धागा वर काढतोय.
पुरेसा टीआरपी न मिळाल्याने
पुरेसा टीआरपी न मिळाल्याने आणखी काही प्रतिसाद मिळवायचा खटाटोप
अरेरे काय हे दिवस आलेत
असो हा घ्या माझा प्रतिसाद
आजारी व्यक्तींना मदत करावी म्हणतात
दिस उगवता उगवता मनसोक्त फटाके
दिस उगवता उगवता मनसोक्त फटाके पूर्वापार वाजवले जातातच तवा रातच्याला बी थोडंफार वाजलं तर काय बिगडतंय जी !!
सॉरी आशुचँप, धागा पुन्हा वर
सॉरी आशुचँप, धागा पुन्हा वर काढतोय.
फटाकेमुक्त दिवाळी धाग्यावर विषय निघाला म्हणून काढतोय..
तुला सुटका मिळवून दिली (
तुला सुटका मिळवून दिली ( म्हणजे तसं वाटतंय मला) तर आशुचॅंप आशुचॅंप करून आ बैल मुझे मार कशाला करतोयस?
आशुचॅंप, तुम्हाला बैल म्हणाले नाहीये. गैस नको.
(No subject)
आशुचॅम्प X ऋन्मेSSष आर्क काय
आशुचॅम्प X ऋन्मेSSष आर्क काय आहे ?
अहो सस्मित धागा वर काढताना
अहो सस्मित धागा वर काढताना त्यांची पोस्ट दिसली.
जसे आपण फटाके वाजवताना ईतरांना त्रास होत असेल तर त्याची काळजी घ्यावी
तसेच जुना धागा वर काढताना ईतर कोणाला त्रास होत असेल तर दिलगिरी व्यक्त करावी असे मला वाटले ईतकेच