अभिप्राय

Submitted by संपादक on 23 October, 2014 - 21:05

वाचकहो,

आपणां सर्वांस दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा!

मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंक २०१४बद्दल आपले अभिप्राय येथे वाचण्यास आम्ही उत्सुक आहोत. अनेक मायबोलीकरांच्या स्वयंस्फूर्त सहभागामुळेच या अंकाची निर्मिती होऊ शकली, याची आम्हांस विनम्र जाणीव आहे.

बहुविध साहित्याने नटलेली ही निर्मिती आपल्याला कशी वाटली, हे जरूर सांगा. अंकातील प्रत्येक लेखावर प्रतिसाद देण्याचीही सोय आहे. ते सर्व प्रतिसाद या दुव्यावर पाहू शकता: http://vishesh.maayboli.com/navinlekhan

हितगुज दिवाळी अंक २०१४

विषय: 

थोडं वाचून झालं आहे. वाचून होईल तसतसं तिथेच प्रतिक्रिया देत जाईन. एकंदरीत सुरेख वाटतो आहे अंक. विचारमंथन मध्ये वगैरे वाचायला भरपूर आहे.

त्या त्या ठिकाणच्या प्रतिक्रिया संपादित करता येत नाहीत का? मला कथा/कविता वाचनाचेही कौतुक करायचे होते.

संपादक मंडळाचे अभिनंदन !!
एक अनुक्रमणिका हवी होती - लेखकांच्या नावासह !! आता प्रत्येक लेखावर जाऊन बघावं लागतंय कोणता लेख कुणाचा आहे ते.
बाकी अजून वाचतेय.

अनुक्रमणिकेबद्दल +१
अंक सुरेख आहे Happy
झक्कास !!!!!!!!!!!!!!!!.
अजुन बराच अंक वाचायचा बाकी आहे पण बघताच क्षणी आवडावा असा झालाय अंक Happy

मी पाहिला अंक .फोनवरून दिसत नाही म्हणून पीसी वरुन चाळला .अतिशय देखणा , सुरेख अंक ! डिझाईन , रंगसंगती ,
नाविन्यता , कल्पकता याबातित पैकिच्या पैकी मार्क्स .कटेंटही जबरी आहे.
पुढच्या संपादक मंडळाला सॉलिड आव्हान आहे. सर्व संपादक मंडळाच मन:पूर्वक
अभिनंदन. चार महिन्याची तुम्हा सर्वाची
मेहनत खरोखर रंग लायी है .

विविध विषय आणि संकल्पनांसह अतिशय सुंदर आखणी केलेला यंदाचा दर्जेदार दृक-श्राव्य मायबोली दिवाळी विशेषांक २०१४ आवडला. ,संपादक मंडळाचे मनःपूर्वक अभिनंदन !

मस्त कथा आणि मांडणी . कथा वाचनची आयड्या मस्ते.
मेंडकेचा सल्ला सॉल्लीड आवडला.
पां.टि. ( पांचट टिप) - मेंडकी जामच सेक# वाटते. Lol

यावेळची सजावट खुपच छान आहे. लेखकाचा फोटोसकट परीचय द्यायची कल्पना छानच ! लेख वाचून त्याखाली प्रतिक्रिया देतोच.

काही चौकटी परत परत आल्या आहेत. ठाकर लोकांच्या बाबतीतला उल्लेख जरा परत तपासणार का ? माझ्या माहितीप्रमाने ते शेर निवडुंगाची खोडे कोरून दिवे करतात, व शेणात रोवतात.

एका कथेत, झालंच तर रात्रीची सोय म्हणून रांजणभरून देशी अन् चकण्याला मीठ आणि फरसाण अशी सगळी व्यवस्था त्यांनी प्रचाराच्या दरम्यान केली होती असे वाक्य आहे. तो शब्द मीठ नसावा.

दिनेश भाऊ , देशीबरोबर चवीसाठी मीठपण वापरतात , तेच बघुन मार्गरिटाच्या ग्लासाच्या रिमला पण मीठ लावत्यात लोकं Proud

संपादक, वर जी लिंक दिली आहेत त्यात गेल्या वर्षीच्या दिवाळी अंकातले लेखही दिसतायत. ते काढून टाकणार का?

सायो, ती सर्व प्रतिसाद दिसण्याची सोय असणारी लिंक साधारण मायबोलीवरच्या 'नवीन लेखन'प्रमाणे चालते. नवीन अंकातल्या लेखांवर प्रतिसाद येत जातील तसे ते धागे वर येतील आणि आधीचे धागे मागच्या पानांवर जातील. पण ते राहातील तिथेच.

तांत्रिक अंगांने भरपूर नटलेल्या दिवाळी अंकाचे स्वागत.

संपादक मंडळ आणि सर्व सहयोगी सभासदांचे अभिनंदन.

अभिनंदन संपादक. Happy
एकदम देखणा अंक. हेडर मधली बदलती चित्र, संपादकांची चित्रमय ओळख, रेखाटनकार ओळख मस्त. प्रत्येक लेखाला लेखक/ लेखिका परिचय करून देण्याची कल्पनापण आवडली. audio कथा कन्सेप्ट भारी, हे मराठीत हवं असं नेहेमी वाटायचं. संपादकीय आवडलं. कधीकधी राईट कॉलम मध्ये झलक दिसते ती क्लीकेबल करा वेळ मिळेल तशी. शुभ दीपावली. कंटेंट चाळला, आवडेल असं वाटतंय, विकांताला मस्त फराळ.

अंक पहिल्या नजरेत छाप पाडून जातोय. आंतरजालावरच्या अंकाला छापील अंकापेक्षा दिलेली स्पष्ट वेगळी ओळख आवडली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरात परंपरांचा हात घट्ट धरून ठेवलेली हौशीपणाचा आव घेतलेली चित्रे पाहून गंमत वाटली. प्रत्येक पानाची सजवलेली उजवी बाजूही आवडली. हास्यटपरीला रंगांपासून वंचित का बरे ठेवले?

विचारमंथन हा भाग अन्य मजकुराच्या मानाने बराच वजनदार झाला आहे.

प्रतिसादांसाठी काही वेगळे तंत्र वापरलेले दिसते. जे एका अन्य मराठी संकेतस्थळावर पाहिल्याचे आठवते. प्रतिसादांतले काही शब्द मोठ्या अक्षरांत, मग वाचकाचे नाव, वेळ इ. मग प्रत्यक्ष प्रतिसाद हे स्वरूप आवडले नाही. तसंच प्रत्येक प्रतिसादावरही वेगळी प्रतिक्रिया द्यायची सोय दिली आहे का?

दिवाळी अंकात प्रवेश केल्यावर संपादकीयाच्या खाली पुन्हा एकदा लॉगिनची सोय दिसली. ते अनिवार्य आहे का हे न तपासता (पुन्हा) लॉगिन केले. आता काही वेळाने पुन्हा संपादकीय पाहताना लॉगिनची सोय दिसत नाही. मात्र मोबाईलमधून त्या पानावर लॉगिन करायचा प्रयत्न केला, तर आयडी किंवा परवलीचा शब्द चुकल्याचा मेसेज येतोय.

एका अत्यंत देखण्या दिवाळीअंकाबद्दल संपादकांचं आणि अंकाच्या निर्मितीला हातभार लावणार्‍या सगळ्यांचं मनःपूर्वक अभिनंदन!!

आता दिवाळी सुरू झाल्यासारखं वाटलं. Happy

"प्रतिसादांतले काही शब्द मोठ्या अक्षरांत, मग वाचकाचे नाव, वेळ इ. मग प्रत्यक्ष प्रतिसाद हे स्वरूप आवडले नाही." >>> भरत मयेकरांच्या या मुद्द्याशी सहमत.

लेखक/कवीचा परिचय देण्याची कल्पना छान वाटली. या परिचयात त्यांचा माबो-आयडी दिला असता तर अधिक बरे झाले असते असे वैम. अजूनही देता येत असेल तर कृपया दिला जावा.

अंक प्रकाशनाबद्दल मंडळाचे अभिनंदन.
बर्‍याच नवीन कल्पना आहेत. अनुक्रमणिका विथ लेखकांची नावं हवी होती. साईडचा मेन्यू क्लिकेबल असता तर अधिक छान झालं असतं. वरचा expandable header छान आहे. एक क्लिक वाचते आहे त्यामुळे.
मला सजावटीतली मागची नाजूक नक्षी आवडली. मस्त आहे एकदम. तसच काही चाळलेल्या लेखांमध्ये बॅकग्राऊंडला चित्र आहेत ती पण मस्त दिसत आहेत. हेडरमधली चित्र गॉडी वाटलीआणि ती खूप मोठी वाटली. नवीन पेज लोड झालं की जवळ जवळ अर्ध पानभर ती चित्रं दिसतात. एकंदरीत पानावर सजावटीचे खूप आयटम भरल्या सारखे दिसतात. ते थोडं सुटसुटीत असतं तर जास्त आवडलं असतं. संपादकांची मैचित्र आणि मेंडकेची चित्र आवडली. छोट्या जाहिरातींची कल्पना छान आहे. ऑडीयो अजून ऐकले नाहीत ते ऐकेन.

बाकी लेखनाबद्दलचे प्रतिसाद तिथे लिहिनच पण आत्तापर्यंत वाचलेल्यापैकी बिंदुमाधव खिर्‍यांचा लेख आवडला. पूर्वाने घेतलेली मेघना एरंडेची मुलाखत छान झाली आहे. डुल्पिकेट निवडणूक कथा आवडली नाही. अनुच्या आवाजातल्या कथा ऐकायची उत्सुकता आहे. Happy

आणि हो, अंक कधी प्रकाशित होणार ह्याची माहिती वेळेवर दिल्याबद्दल मंडळाचे आभार !

प्रतिसादाला प्रतिसाद ही थ्रेड ची कल्पना मला आवडली. हे मायबोलीतपण आवडेल. नकोसे प्रतिसाद फिल्टर करायला खूप प्रभावी ठरेल असं वाटतं.

संपादक मंडळ, अंकासाठी आभार.
दमलात, जरा टेका आता. Happy

आधी उघडता येत नव्हता, पण पर्यायी धाग्यावर उघडतो आहे अंक.
संपादक मंडळाचे फोटू मस्त आहेत. Proud

वाचेन तसा अभिप्राय देईनच.

एका नितांतसुंदर निर्मितीबद्दल साहित्यिकांचे, संपादक मंडळाचे, सल्लागारांचे आणि मायबोली प्रशासकांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार! अतिशय देखणा झालाय दिवाळी अंक! मुखपृष्ठ आवडले. नेव्हिगेशन सोपे आहे. सजावट आणि रंगसंगती छान आहे. पूरक चित्रं आकर्षक आहेत. उजव्या बाजूची अनुक्रमणिका क्लिकेबल होईल तर नेव्हिगेशन अजून सोपे होईल असे वाटते.

साहित्य दर्जेदार आणि विपुल प्रमाणात आहे असे दिसते. अजून वाचायला सुरुवात केली नाही.

पुन्हा एकदा अभिनंदन!

||शुभ दीपावली||

Happy

आवड म्हणून आधी कवितांच्या धाग्यावर गेले. किरण सामंतांचं काव्यवाचन आवडलं. बाकी लयबद्ध कविता वाचणार्‍यांनीतरी त्या लयीची बूज राखून वाचल्या असत्या तर बरं झालं असतं. एकूणच सामंत वगळता काव्यवाचन नाही आवडलं.

सगळ्या कविता एकाच क्लिपमधे का कोंबल्या आहेत?

Pages

Back to top