पास्ता- पेन्ने. पॅकेटवर सांगितल्याप्रमाणे शिजवून घ्यावा.
पास्ता सॉसकरता : ऑलिव्ह ऑईल किंवा नेहमीचं तेल, बारीक चिरलेला कांदा-अर्धा ते एक, भोपळी मिरची-लाल आणि हिरवी-उभी चिरुन, कॉर्नचे दाणे- अर्धी ते एक वाटी, मटार- अर्धी ते एक वाटी, कॅन्ड टोमॅटो सॉस (१ ते २ कॅन), लसणीची सुकी चटणी (वडा-पावबरोबर घेतो ती), थोडी लवंग (४,५) ,वरुन थोडं चीज.
नॉनस्टीक सॉसपॅनमध्ये तेल तापवून त्यावर लवंग टाकून कांदा परतून घ्यावा. त्यावर लसणीची सुकी चटणी घालून चांगलं परतून घ्यावं. त्यावर कॉर्न, मटार, भोपळी मिरची ह्या भाज्या घालून परतून घ्यावं. व टोमॅटो सॉस घालून एक वाफ काढावी. भोपळी मिरची वगैरे अती शिजवायची गरज नाही. हे सगळं दाट सॉससारखं झालं की त्यावर शिजवलेला पेन्ने पास्ता घालावा. एक दोन मिनिटं वाफ काढून बेकिंग डीश मध्ये घालावा. वरुन चीज घालून आयत्यावेळी थोडा वेळ अव्हनला टाकावा.
परवा मैत्रिणीकडे जेवायला गेलो होतो. तिने गार्लिक ब्रेड, सूप, सॅलड वगैरे केलं होतं आणि हा पास्ता फक्त तिच्या सासर्यांनी केला होता. सुक्या लसणीच्या चटणीमुळे (:फिदी:) मस्त झणझणीत झाला होता. लगेच रेसिपी घेऊन आले आणि थोडा पास्ता डब्यात भरुन घेऊनही आले. हा त्याचा फोटो.फ्रिजमध्ये ठेवल्याने जरा ड्राय वाटतोय.
..
..
सायो! फोटो दिसत नाहिये!
सायो! फोटो दिसत नाहिये!
प्राजक्ता, एकत्र केला
प्राजक्ता, एकत्र केला मेसेजमध्येच.
दिसला!( जरा म्हणुन धिर नाही!
दिसला!( जरा म्हणुन धिर नाही! मलाच :फिदी:)
साधारण सायो सारखीच माझी देसी
साधारण सायो सारखीच माझी देसी पास्ता कृति आहे
वेगळी कृति लिहित नाही, फक्त जे चेन्जेस करते ते असे :
* त्यात वडापाव चटणी ऐवजी कान्दा लसुण मसाला घालते
* भाज्या परतण्या आधी जीरे-कढीपत्ता-लाल मिर्ची फोडणी देते.
* विकतचा टोमॅटो पास्ता सॉस प्रिझर्वेटिव्ह मुळे मला जास्त आंबट लागतो आणि टमॅटो पास्ता सॉस मधे मला चीज नाही आवडत म्हणून घरीच करते पास्ता सॉस( टमॅटो-कान्दा-कोथींबीर- पास्ता हर्ब्स-मिरपूड टाकून , थोडे अननसाचे तुकडे पण टाकते.)
झणझणीत आवडणार्या लोकंनाच आवडेल , इतरांना झेपणार नाही :).
टिपः फोडणीचं टॉप रॅमन करी फ्लेवर पण या पध्दतिनी मस्तं लागतं, फक्त पास्ता सॉस ऐवजी जीरा-मिर्ची-कढीपत्ता फोडणीत परतलेल्या भाज्या (सिमला मिर्ची, गाजर, मटार) , उकळतं पाणी आणि टेस्ट मेकर.
छान डिजे. कांदा लासूण
छान डिजे. कांदा लासूण मसाल्याने मस्तच झणका होत असेल.
चला. फोटो दिलाय. नाहीतर परत
चला. फोटो दिलाय. नाहीतर परत 'बघारे ' .. गुड. आणि हो, शिर्षक बदला. देशी म्हणा. ही माबोली नाहीये.. :रागः (उगाचच हां काय.. )
रुयाम, तुला कळलं नाही. अरे ते
रुयाम, तुला कळलं नाही. अरे ते 'फोटो' बघारे नव्हतं तर 'करुन' बघारे होतं.
मी बाकी सगळं असंच करते फक्त
मी बाकी सगळं असंच करते फक्त लसूण चटणी टाकून नाही पाहीली.. पुढच्या वेळी नक्की पाहीन्...आणि हो पास्ता होल व्हीट पाहून घेते...
सायो, डीजे..सही देसी-करण!!
सायो, डीजे..सही देसी-करण!!
सायो छानचं पास्तामधे, mdh चा
सायो छानचं
पास्तामधे, mdh चा गरम मसाला किंवा किचन किंग मसाला घालून पण मस्त होतो झकास झणझणीत
हो, मी पास्ता सॉस करताना गरम
हो, मी पास्ता सॉस करताना गरम मसाला पण घालते, राहिलच लिहायचं :).
आणि सिमला मिर्ची हिरवी आणि पिवळी घेते ( लाल आणि केशरी मिर्ची लाल टोमॅटो ग्रेव्ही बरोबर उठून दिसत नाही.)
हायला, सहीच कृती आहे की. करून
हायला, सहीच कृती आहे की. करून बघेन लवकरच.
विकतचा टोमॅटो पास्ता सॉस
विकतचा टोमॅटो पास्ता सॉस प्रिझर्वेटिव्ह मुळे मला जास्त आंबट लागतो>> अनुमोदन.
लच आयडीया मस्त आहे. करून बघणार. आमच्यात लसूण बटर चे लग्न झाले की विमाने हवेत तरंगायला लागतात पास्ता पास्ता करून. काय वास पसरतो. कोथिंबीर पण घालीन.
सहिये. सायो आमचा एक जपानातला
सहिये.
सायो आमचा एक जपानातला मित्र आलं, लसुण, गरम मसाला, टोमॅटो ग्रेव्ही करुन पास्ता खायचा. खरंतर पास्त्याची रस्सा भाजी म्हणायला हरकत नाही.
बापरे, बरेच प्रकार आहेत की
बापरे, बरेच प्रकार आहेत की देसी व्हर्जनचे. मी तरी मैत्रिणीकडे पहिल्यांदाच खाल्ला.
मैत्रिणीने बरोबर केलेलं सूप पण खूप पौष्टिक होतं. भरपूर भाज्या घातल्याने एकदम पोटभरीचं.
मी पास्ता किंवा पिझ्झा वर
मी पास्ता किंवा पिझ्झा वर लोणचं मसाल घालून खाते (चिली flakes ऐवजी). मस्त लागतं.
मी पण सांगू मी कसा करते
मी पण सांगू मी कसा करते ते?
एकीकडे मीठ घालून पाणी उकळते मग पास्ता त्यात घालते गॅस लहान करून.
ऑऑ वर आलं लसूण पेस्ट/ क्रश्ड आणि ड्राय हर्ब्ज घालून कांदा टॉमेटो परतून घेते. मग थोडा शेपू. याचा फ्लेवर भारी येतो अगदी शेपूप्रेमी नसाल तरी. मग सुक्या लाल मिरच्या/ लाल तिखट. जेवढं तिखट हवं त्याच्या अर्ध्या. मग पाहिजे त्या भाज्या (भोपळी मिरची मस्ट, बेबीकॉर्न, गाजराचे तुकडे, अगदी बारीक चिरलेला पालक, मक्याचे दाणे, तोंडल्याच्या चकत्या, भिजवलेली कडधान्ये इत्यादी) त्यात ढकलून खमंग परतते. नंतर मिक्सरातून टॉमेटो + हिरवी मिरची (प्युरीसदृश पण कच्चे) असं काढून ते या भांज्यांवर घालते. परत थोडं परतणे आणि गरजेप्रमाणे पाणी, मीठ घालणे. एक उकळी, एक वाफ काढणे.
प्लेटमधे पास्ता आणि वरून हे कालवण. बाजूला गा ब्रेड.
भारी रेस्पी. हा घ्या
भारी रेस्पी. हा घ्या झब्बू.
याच्यावर थोडं चीज टाकून ओव्हनमधे गरम करून घेतलं.
अन हा व्हाईट सॉस वाला
फोटो छान दिसतायत इब्लिस. काय
फोटो छान दिसतायत इब्लिस. काय रेसिपी? वर सगळ्यांनी आपापली टाकलीये त्यातलीच की तुमचं वेगळं वर्जन?
वेगळं काही नाही. तुमच्याच
वेगळं काही नाही. तुमच्याच रेस्पीने केलाय म्हणून झब्बू दिला.
पास्त्याच्या मानाने रेड सॉस कमी झाला म्हणुन थोडास्स रेडिमेड टोमॅटो-चिली सॉसचा जोड दिला, अन उरलेल्या पास्त्याला व्हाईटसॉस बनवला इतकाच डिफरन्स.
छान पाककृती . पास्त्याचे
छान पाककृती .
पास्त्याचे फोटो मस्त इब्लिस !
लगेच पास्ता शिजायला टाकला .
व्हाईट सॉस साठी यु ट्यूब वर चक्कर मारून येते .
स्वराली, इथे बघ. एकदम अहाहा
स्वराली, इथे बघ. एकदम अहाहा पास्ते आहेत.
http://www.maayboli.com/node/44240