छोटी कारली = ६ ते ७
धणे पुड = १/२ वाटी
तीळ - ४ चमचे (चहाचे)
बढी शोप = १ चमचा (चहाचा)
लसुण = १ छोटं फुलं (१० ते १५ पाकळ्या)
लाल सुक्या मिरच्या = २
आमचुर पावडर किंवा लिंबा एवढी चिंच (भिजवलेली)
जिरे = १ चमचा
तेल = १ प़ळी
हळद, तिखट, मिठ, साखर अंदाजे
सगळ्यात आधी कारली स्वच्छ घुवुन पुसुन घ्यावी. सोलणीनी पाठ सोलुन घ्या. बिया सोलणीनी काढुन घ्या (बीया पण वाफवायच्या , त्या मसाल्यात वापरायच्या आहेत) मसाल्याची वांगी चीरतो तशीच चिरुन घ्या किंवा सरळ दोन काप करा आणी एका भांडयात घालुन कुकर मधे दोन शीटया होऊ द्या.
आता कढईत धणेपुड, जिरे, तीळ, शोप, सुकी मिरची आणि लसणाच्या पाकळ्या एक चमचा तेलात खमंग भाजुन घा, आणि थंड झाल की मिक्सर मधुन बारिक गीरवुन घ्या. हा मसाला एका बाउल मधे काढुन घ्या त्यात साखर( नेहमी पेक्षा जास्त घालावी) साधारण दोन चमचे, मिठ अंदाजे, आणि चिंचेच कोळ घालुन भिजवावा. (किंवा आमचुर पावडर घालुन,मसाल्यात थोड पाणी घालुन भिजवावा) त्यात मगाशी शिजवलेल्या कारल्याच्या बिया पण घालायच्या आहेत. हा मसाला शिजवलेल्या/ वाफवलेल्या कारल्यात भरावा.
कढईत एक पळी तेल घालुन जिरं तडतडल की, हळद तिखट घालुन, त्यात भरली कारली सोडावी, वरुन परत मिठ आणि साखर घालावे. ५ ते ७ मी.वाफ काढुन बारिक चिरलेली कोथिंबीर घालुन सर्व्ह करावे...
गरम गरम फुलके, साधं वरण आणि भरवा करेला,,,,मस्त कोंबीनेशन आहे.:)
कारली सोलुन कुकर मधे वाफवली तर कडु पणा तर जातोच शिवाय भाजी पटकन होते, शिजायचा वेळ वाचतो.
समजा दुसर्या दिवशी सकाळी डब्याला कारलं करायच असेल तर, रात्रीच कारली वाफवुन फ्रीज मधे ठेवावी. आणी हा मसाला पण तयार करुन फ्रीज मधे ठेवता येतो (भरली भेडी , वांगी पण हा मसाला वपरुन करता येईल) असे केले तर मसाल्याची कारली १० मी.तय्यार
वि. टी. नेहमी छोटी कारली बाजारात असतातच असे नाही, जर मोठी कारली असतील तर सरळ मधुन कापुन दोन ते अडीच इंचाचे काप करावे. मसाला धरुन राहातो कारण, कारले शिजलेले असते आणि मसाला पण ओलाच असतो, शिवाय आपण पाणी घालणारच नाहीये...
छान... कारली आवडतातच. ही तर
छान... कारली आवडतातच. ही तर छानच लागतील.
इथे एकदा चायनातली कारली मिळाली.. त्यानंतर नाहीच कधी दिसली.
धन्यवाद दा, खरच खुप छान लागते
धन्यवाद दा, खरच खुप छान लागते ही भाजी..... फोटो जमल तर उद्या टाकीन....
कारली कशी पण केली तरी
कारली कशी पण केली तरी आवडतातच. ही तर सुप्पर पाकृ आहे
पावसाळ्यानंतर छोटी कारली
पावसाळ्यानंतर छोटी कारली मिळतांत. तेव्हा करुन पाहता येईल. रच्याकने, अशा पद्धतीने भरवा कंटोळी पण करता यावी ना??
दक्षे,करेले के मामलेमे हमारे विचार जुळते है.
मस्त, कारली आवडतातच. मी ह्या
मस्त, कारली आवडतातच. मी ह्या साहित्यात थोडेसे दाण्याचे कुट,भरपुर कोथिंबीर आणि गोडा मसाला घालुन भरली कारली करते.
बडीशेप कधी घातली न्हवती आता घालुन बघेन.
.
.
ईंटरेस्टिंग वाटतंय.. पण कारली
ईंटरेस्टिंग वाटतंय.. पण कारली strict NO NO असल्यामुळे मसाल्याचा सदुपयोग वांगी, भेंडी अशा निरुपद्रवी भाज्यांसाठी करता येईल..
कारली कशी पण केली तरी
कारली कशी पण केली तरी आवडतातच.>>>>
सॉरी पण खरच कारली कशीही केली तरी नाही हो आवडत पण पाकृ मस्त आहे
अधिक टिपा: कारली सोलुन कुकर
अधिक टिपा:
कारली सोलुन कुकर मधे वाफवली तर
<<
सोलून?? कशी?
इब्लिस, बटाट्याची साले
इब्लिस, बटाट्याची साले काढायचे पीलर असते त्याने काटे खरवडायचे.. अशी कारली ( सरफेस स्मूथ झाल्याने ) छान परतता येतात.
बादवे सायली >> भरवा करेला कह
बादवे सायली >> भरवा करेला कह रहा है .......अरे कुठे नेऊन ठेवलाय फोटो माझा?
कारली कशी पण केली तरी
कारली कशी पण केली तरी आवडतातच.>>>+११११
अशा पद्धतीने भरवा कंटोळी पण
अशा पद्धतीने भरवा कंटोळी पण करता यावी ना?? >>> कर्टुल्यात इतका मसाला घालणे हा त्यांचा अपमान आहे
कर्टुल्यात इतका मसाला घालणे
कर्टुल्यात इतका मसाला घालणे हा त्यांचा अपमान आहे >>> प्रचंड अनुमोदन.
भरवा कारली कृती आवडली. कारली ऑल टाईम फेव.
हा घ्या फोटो....
हा घ्या फोटो....
दक्षिणा, भ्रमर, अनुश्री,
दक्षिणा, भ्रमर, अनुश्री, आनंदिता,इब्लीस, डीविनिता,आदिती माधच, rmd खुप खुप धन्यवाद...:)
बटाट्याची साले काढायचे पीलर असते त्याने काटे खरवडायचे.. अशी कारली ( सरफेस स्मूथ झाल्याने ) छान परतता येतात.++++ अगदी बरोबर दा....
भ्रमर छोटी कारली नसतील तर मोठी कारली २ ते २/५ इंच का कापुन करता येईल (तस वर लिहिलय मी)
आनंदिता,हा मसाला वापरुन भेंडी, वांगी छानच होते भाजी..
rmd
मला तर खुप आवडते कारल्याची
मला तर खुप आवडते कारल्याची भाजी आणि भरली कारली...
आणि फोटो पाहुन तर तोंडाला पाणी सुटले....:)
भरवा करेलाची पाककृती मस्तच.
भरवा करेलाची पाककृती मस्तच. तशी कारल्याची मला अॅलर्जी नसल्यामुळे (जी खुप जणांना असते:)) नक्कीच करून खाण्यात येईल.
छान पाक्रु! कारले आवडतात,
छान पाक्रु! कारले आवडतात, अश्या पध्दतीने करुन पाहण्यात व दाखवण्यात येतील
आईगं, प्रचंड भुक लागली आहे.
आईगं, प्रचंड भुक लागली आहे. अन त्यात समोर कारल्याची तोंपासु भाजी. लाळेरं हव आता. स्लर्र्र्र्र्र्प.
मस्त! सायलीताई, तुम्ही
मस्त!
सायलीताई, तुम्ही दिलेल्या पाकृ छान असतातच, पण त्यात तुम्ही जे शब्द वापरतात तेही गोड वाटतात.
सायली, फोटो आत्ताच्या आत्ता
सायली, फोटो आत्ताच्या आत्ता भरवा करेला खायलाच पाहिजे असा.
मस्त, बडीशेप कधी घातली नव्हती
मस्त, बडीशेप कधी घातली नव्हती आता घालुन बघेन.
साक्षी, नरेश, मंजु
साक्षी, नरेश, मंजु ताई,मोनाली, चिन्नु,कामिनी सगळ्यांचे आभार....
भरवाँ करेला दाखवण्यात येत आहे
भरवाँ करेला दाखवण्यात येत आहे
अरे व्व मंजु ताई, मस्त आलाय
अरे व्व मंजु ताई, मस्त आलाय फोटो....:)
मंजु तुझा फोटो मला का कुणास
मंजु तुझा फोटो मला का कुणास ठाउक अॅन्डॉइड सारखा वाटला
वॉव! मस्त पाक्रू . दोन्ही
वॉव! मस्त पाक्रू . दोन्ही फोटोज तोंपासु
फोटो टाकायच्या घाईपायी
फोटो टाकायच्या
घाईपायी भाजी मस्त झाली लिहायचे राहून गेले
अदिती
जाई, मंजु ताई धन्यवाद.
जाई, मंजु ताई धन्यवाद.
Pages